थंडीतील आहार

Submitted by Geetanjalee on 7 February, 2013 - 03:41

हिवाळा कोणाला आवडत नाही? हिवाळा हा बल देणारा ,आरोग्य वाढवणारा काळ.

खा,प्या, मजा करा !!!

हिवाळ्यात मस्त दणकून भूक लागते आणि छान पचतेही . या ऋतूत दोन्ही वेळा भरपूर प्रमाणात आहार घ्यावा.

मी इथे काही पौष्टिक खुराक देत आहे जो काहीजण घेत असतीलच .. फक्त थंडी साठीच असा नव्हे , कधीही आवडेल असा...

चल मग तुमच्याही पाककृती येउद्या

मुगाचे कढण

१ वाटी मूग शिजवून , १ चमचा जिरेपूड, हिंग , मीठ

मूग शिजवून , त्यातील पाणी चाळणीने गळून घ्यावे , मूग बारीक करून घ्यावे , काढलेले पाणी घालून एकजीव करावे .तुपात हिंग, जिरेपूड घालून गरम गरम सूप सारखे प्यावे .
हे पचायला अतिशय हलके , भूक वाढवणारे असते .

मूग +नाचणीचे लाडू
हिरवे मूग भाजून +नाचणी मोड आणून वाळवून पीठ ,+ पोहे +डाळ तुपावर भाजून भरडसर पीठ करून , + बदाम + अक्रोड

थोड्या मेथ्या पण भाजून टाकू शकता .

खजुराचे सरबत

काळे खजूर पाण्यात ३-४ तास भिजवून बी काढून , मिकसर मध्ये चांगले फिरवून घेऊन तयार दुध , साजूक तूप, गुळ चवीनुसार घालून प्यावे .हे पिल्याने शरीरातील लोह वाढते

रंगीबेरंगी भेळ
मटकी, मूग - मोड आणून त्यात टोमाटो , गाजर , काकडी,कोबी , बीट , कांदा बारीक करून , खजूर+चिंचेच कोळ , जिरेपूड, मीठ, कोथिंबीर पुदिना , दही/ लिंबू अशी रंगीबेरंगी भेळ लहान मुलांना नक्की आवडेल
मी तर ह्याला विटामिन +प्रोटीन ची भेळ म्हणेन Happy

बाजरीचा खिचडा

बाजरी भरडसर दळून किंवा थोडीशी ओलि करून बारीक करून, चांगली शिजवून घ्यावी , त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, जिरे, कोथिंबीर, गोड दही / ताक , लसूण बारीक करून , मीठ घालून खावे

मक्याचा ठोम्बरा

मक्याच्या भरडलेल्या कण्या ताकात कूकर मध्ये शिजवून, त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, जिरे, कोथिंबीर, लसूण बारीक करून , मीठ घालून खावे

तांदळाची उकड
१ वाती ताकात तांदळाचे पीठ कालवून घ्यायचे आणि फक्त तूप+मिरची+जिरे+कडीपत्ता घालून फोडणी टाकायचे , गाठी होऊ द्यायच्या नाहीत .मस्त लागते गरम गरम ....

ज्वारी/नाचणीचे आंबील
रात्री ज्वारी/ नाचणीचे पीठ दह्यात भिजवून ठेवायचे. सकाळी पाण्याला आधण येईपर्यंत गरम करून त्यात मीठ घालून उकळी आली कि हे पीठ सोडायचं ए, गाठी होऊ न देत, लसून आणि जिरे बारीक करून टाकायचे आणि गरम गरम वरपायाचे ...

ह्याच बरोबर, ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे/ आवळा सुपारी खाणे चांगले असते

आवळा सुपारी
नुसते जिरे आणि मीठ लावून वाळवण्या पेक्शा अशी करून पहा , बाहेरच्या आवळा सुपारी पेक्षा ही जबरदस्त लागते

१ किलो आवळे चाळणीवर वाफवून, ७-८ लिंबाचा रस ,जिरे ओवा बारीक करून, शेंदेलोण , पादेलोण , आमचूर पावडर , ज्येष्ठमध , मीठ घालून थोडा वेळ मुरत ठेवा , मग त्यात आवळा घालून चांगले कालवून ,प्लास्टिक च्या कागदावर वाळवा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! आवडले. धन्यवाद गीतांजली रेसेपीबद्दक व धन्यवाद धनवंती धागा वर काढल्याबद्दल.

शेंगोळे विसरलात का?

https://www.maayboli.com/node/52664 आणी कुळिथाचे पिठले पण.

दिवाळी नंतर धुंधुरमास सुरू होतो

डाळ तांदळाची खिचडी
पापड
वांग्याचे भरीत
सोलाणा, गाजर, पावटा, मटार मिक्स भाजी
गाजर कोशिंबीर

https://www.maayboli.com/node/31180

थंडीतील आहार
थंडी: तीलाहार.
तीळ खा थंडीत. तिळाची चटणी. मसालेदार भाजी करताना दाणेकुट ऐवजी/सोबत तीळकूट वापरायचा. लौकरच तिळगुळ होईलच. अजून तिळाचे पदार्थ सुचवा.

तीळ जास्त झाल्यास पोट झडते, मूळव्याध असल्यास त्रास हाऊ शकतो एवढे ध्यानात ठेवावे.

पोट झडते म्हणजे?
आम्ही तीळ खूप वापरतो.
कणकेत/बाजरी-नाचणी भाकरीत/थालीपिठात/सर्व कोरड्या चटण्यांत उ.दा. कारळे/कोरड्या भाजीत उ.दा. भेंडी

पोट झडते म्हणजे वारंवार शौच्यास जावे लागते...... ऑ, अंग झडणे म्हणजे बारीक होणे म्हणतात.म्हणून वाटले बरेच दिवस तीळ खाल्ले की शौचास सुलभ होऊन अंगकाठी पर्यायाने पोट झडते.