कुळीथ पीठ- २ वाट्या
सुकं खोबरं- २ चमचे
दाण्याचा कूट- २ चमचे
लसणाच्या पाकळ्या- ७-८
कोथिंबीर- सढळ हातानं
इतर- हळद, तिखट, मीठ, हिंग, गरम मसाला, मोहरी, धणेजिरे पूड (ऐच्छिक), पाणी
हुलग्याच्या पिठात खोबरं, दाण्याचा कूट, बारीक चिरलेला लसूण, हळद, तिखट, मीठ घालून मळून घ्यावं. जरा घट्टच मळावं. एकीकडे खोलगट पातेल्यात मोहरी-हळद-हिंगाची फोडणी करावी. फोडणी तडतडली की पातेलं तीन चतुर्थांश तरी भरेल एवढं कोमट पाणी घालावं. गरम मसाला, धणेजिरे पूड, मीठ आणि कोथिंबीर घालावी. तेलाच्या हातावर शिंगोळे साधारण कडबोळ्यांसारखे वळावेत. शिंगोळे नंतर चांगले फुलतात त्यामुळे जरा बारीक वळ्या वळाव्यात. पाण्याला उकळी आली की त्यात शिंगोळे सोडावेत. शिजले की शिंगोळे फुलून वर येतात. सगळे वळून झाले की झाकण घालून मंद आचेवर अगदी अर्धा मिनिट शिजवावेत.
शिंगोळे तयार आहेत. गरम-गरम शिंगोळे लोणकढं तूप घालून खावेत.
* शिंगोळ्याचं पीठ सुटून पाण्याला थोडा दाटपणा येतो पण आणखी दाट हवं असल्याच अर्धा चमचा कोरडं पीठ फोडणीत परतून घालायला हरकत नाही.
* शेंगोळे दिसायला फारसे आकर्षक दिसत नाहीत म्हणून मी फोटोसाठी काही शिंगोळ्यांना वेगळा आकार दिला आहे.
माझा आवडता पदार्थ पण कित्येक
माझा आवडता पदार्थ पण कित्येक वर्ष झाले खाल्ला नाहिये कारण शेंगोळ्याचे पीठच नाही मिळत इथे
धन्यवाद तृप्ती. मी बर्याच
धन्यवाद तृप्ती. मी बर्याच दिवसापासुन याचीच कृती शोधत होते. पीठ आणले पण तसेच पडले आहे. नक्की करणार.
कुळथाचं पिठलं साधारण
कुळथाचं पिठलं साधारण आठवड्यातून एकदा होतं, पण हे शिंगोळे कधीच खाल्ले नाहीयेत. मी करून खाणार नक्कीच!
पण पीठात दा.कु. नाही घालणार.
छान दिसताहेत शेंगोळ्या. करुन
छान दिसताहेत शेंगोळ्या. करुन मात्र पाहणार नाही
माझ्या अति नावडीच्या पदार्थात शेंगोळ्या हा पदार्थ आहे. हा पदार्थ मी पहिल्यांदा एका मित्राच्या डब्यात पाहिला आणि ते रुप पाहिल्यावर आयुष्यात परत कधीही शेंगोळ्या खाणार नाही अशी शपथ घेतली. अर्थात कुळथाचे पिठ असल्याने या शेंगोळ्या खुप पौष्टिक आहेत याची मला जाणिव आहे पण तरीही...
दुस-या एका मित्राच्या बायकोने एकदा शेंगोळ्या ब्ननवलेल्या. तिने बहुतेक बेसन वापरुन बनवलेल्या आणि त्या शेंगोळ्यांच्या पिठात भरपुर कोथिंबीर होती. मी शेंगोळ्या ऐकल्यावर नको म्हणुनच नाक मुरडलेले पण तिने कोथिंबीरीच्या शेंगोळ्या आहेत, चव घ्या म्हटले म्हणुन एक उचलुन खाल्ली. मस्त होती चवीला. तिच्या शेंगोळ्या कोरड्या होत्या. रस्सा अजिबात नव्हता.
@ पेरू, एकदा मी सरळ मिक्सर ला
@ पेरू, एकदा मी सरळ मिक्सर ला फिरवले कुळीथ अन पीठ केले. पण करून खाल्लेच !
मस्तच. शेंगोळे मी पहिल्यांदा
मस्तच.
शेंगोळे मी पहिल्यांदा श्रीरामपूरला खाल्ले पण खूप वेगळे होते ह्यापेक्षा. आम्ही राहायचो त्यांच्याकडे फोडणी नाही द्यायचे आणि शेंगोळ्याला जिलब्या म्हणायचे. तीपण टेस्टी होती.
एकदा टीव्हीवर कृती दाखवली तसे मी करते त्यात दाण्याचे कुट कुळथाच्या पिठात मिक्स न करता फोडणी दिलेल्या पाण्यात घालायचं असं दाखवलं होतं.
आज हि तिसऱ्या प्रकारची शेंगोळे कृती मिळाली.
पेरू, हुलगे मिळत असतील तर
पेरू, हुलगे मिळत असतील तर कॉफी ग्राइंडरमध्ये गरजेपुरते पीठ करता येइल का?
रश्मी.., करून बघा आणि सांगा कसे झाले होते
मंजूडी, दाकु का नाही घालणार? हुलग्याचं पीठ जरा चिकट असतं. खोबरं आणि दाण्याच्या कुटाने खाताना तो चिकटपणा जाणवत नाही.
अन्जू, घर घर की रेसिपी वेगळी असावी असं वाटतंय
साधना, I don't blame you.
साधना, I don't blame you. शिंगोळ्यांचं रंग-रूप-आकार बघून हा पदार्थ आजन्म न खाण्याची शपथ घेतलेले दोन मेंबर घरातच असल्याने समजु शकते.
पण तुला कुळथाचं पिठलं आवडत असेल तर याची चव नक्की आवडेल. शिंगोळे तयार होताना त्या पिठाची आणि लसणाची चव उतरून तो रस्सा इतका भारी चविष्ठ होतो की बास रे बास
कोथिंबीरीच्या शेंगोळ्या >>> वर्णन वाचून या साधारण कोथिंबीरीच्या वड्या करतो तशा पिठाच्या वाफेवर शिजवलेल्या असतील असं वाटतंय. किंवा मग पाटवड्या करतो तशा.
वाह! फोटो बघुनच एकदम
वाह! फोटो बघुनच एकदम तोंपासु. उद्याच करते. कुळीथाचं पिठलं खूप आवडतं.
हे भाताबरोबरही खाता येतील ना?
तू नुडल्स किंवा वरणफळं
तू नुडल्स किंवा वरणफळं भाताबरोवर खात असशील तर हे पण खा जोक्स अपार्ट, हा थोडा वरणफळांसारखा प्रकार आहे गं. त्यामुळे नुसतेच खायचे.
ऑन सेकंड थॉट, गरम गुरगुट्या भातावर तो रस्सा घालून खायला छान लागेल खरं तर.
कुळथाच पिठलं खूप आवडतं, कालच
कुळथाच पिठलं खूप आवडतं, कालच केलं होतं. पण हे कधी खाल्लं नाहीये. कुळथाच पीठ एकदम लिमिटेड आहे, त्यामुळे पुढचा स्टोक आला की करणार.
ऑन सेकंड थॉट, गरम गुरगुट्या
ऑन सेकंड थॉट, गरम गुरगुट्या भातावर तो रस्सा घालून खायला छान लागेल खरं तर. >>> माझा तर पहिलाच थॉट होता तो.
माझ्या पहिल्या थॉटमध्ये फक्त
माझ्या पहिल्या थॉटमध्ये फक्त त्या रश्श्यात तरंगणारे शिंगोळे होते.
कुळीथ मिळतात का ते बघते.
कुळीथ मिळतात का ते बघते. एकुलता एक मिक्सर बिघडायला नको आहे. पण आयडीया चांगली आहे.
कुळथाचं पीठ आहे घरात. करणार
कुळथाचं पीठ आहे घरात. करणार म्हणजे करणार.
फोटो भारी आहे हे लिहायचं राहिलं.
करणार म्हणजे करणार. >>>
करणार म्हणजे करणार. >>> कराच! देखता है तुमको कौन रोकता है!!
पेरु जर कुळिथ मिळाले तर ते
पेरु जर कुळिथ मिळाले तर ते हलकेसे गरम करुन मग दळुन बघा. कारण ते थोडे चिकट असतात. पण पीठ जास्त दिवस ठेऊ नका, सम्पवुन टाका.
तृप्ती, शेन्गोळे छानच झाले. पीठाला थोडी विरी गेल्याने कडबोळ्यान्चा आकार जमला नाही, लाम्बट केले. म्हणून फोटो टाकत नाही. पण चव मात्र छानच होती.:स्मित: मात्र एक बदल केला. पीठात लसुण घालण्या ऐवजी लसणाचा ठेचा जो केला होता, त्याचेच पाणी फोडणीला घातले. ( लसुण्+मीठ्+लाल तिखट एकत्र मिक्सीत नेहेमी वाटुन ठेवतो) धन्यवाद परत एकदा.
फोडणीत चरचरित लसुण, वरुन
फोडणीत चरचरित लसुण, वरुन भर्पुर कोथिन्बिर असे वाफाळतेच खायचे शेन्गोळे... आहाहा!
तृप्ती, कुपिचा तो चिकटपणा
तृप्ती, कुपिचा तो चिकटपणा आवडतो, पिठल्यात दाकु घालायचं? ही कल्पना सहन झाली नाही म्हणून शिंगोळ्यातही घालणार नाही. फोडणीत पाणी घातल्यावर आमसूल घालणार मात्र नक्कीच.
कुलिथ म्हणजे horsegram का?
कुलिथ म्हणजे horsegram का? फोटो छान दिसतो आहे. किंवा ते मसूर म्हणून असतं ते का?
हो, हॉर्सग्रॅमच. मसूर वेगळे
हो, हॉर्सग्रॅमच. मसूर वेगळे असतात, ते गोल असतात. रन्गाने तपकिरी, चपटे. कुळिथाचा आकार वेगळा.
http://en.wikipedia.org/wiki/Lentil
आमसूल? नका रे असं करु
आमसूल? नका रे असं करु
रश्मी, लगेच केले पण?
करणारच म्हणणार्यांनी केले की नाही?
फोटोचं कवतिक करणार्यांना धन्यवाद
कुळीथ मुळात चवीला कसे असतात
कुळीथ मुळात चवीला कसे असतात हेच नाही माहीत. हाप्रकार कुळीथ पीठ आणून करून पाहायला हवा!
बाकी शेंगोळे प्रकार आवडीचा आहेच. आई कणीक, ज्वारीचं पीठ, ह.डा. पीठ वापरून करते. य वर्षे झालीत आता खाऊन
फोटो अग्दी तोंपासू आहे मात्र
कुळीथ मुळात चवीला कसे असतात
कुळीथ मुळात चवीला कसे असतात हेच नाही माहीत.>>> कसं व्हायचं!
पिठलं अतिच आवडतं त्यामुळे शिंगोळे कधी केलेच नाहीत आईकडे असताना.
काही दिवसांपूर्वी साबांनी मात्र केले ते आवडले. पण पिठलं ते पिठलंच असं मला वाटलं. साबांनी कडबोळ्यासारखा आकार न देता वळ्या अखंडच, थोड्या लहान ठेवल्या होत्या. फरसाणातल्या जाड शेवेसारख्या. पण मी पिठलेभक्त!
पित्ताचा त्रास होणार्यांनी
पित्ताचा त्रास होणार्यांनी बेतानी .....मागे एक दिवस पिठ संपवण्यासाठी एकाच दिवशी कढण व पिठले दोन्ही केले होते तेव्हा अतोनात डोके दुखले होते...नंतर डॉ कडून समजले होते की कुळीथ पित्तकारक असतात.
मी पण पिठलेभक्त. २-२ वाट्या
मी पण पिठलेभक्त. २-२ वाट्या पिते असंच अजून तरी कधी बाधलं नाहिये. बाधत नाहिये तोपर्यंत पिऊन घेते.
पिठलं आवडणार्यांनी एकदा तरी
पिठलं आवडणार्यांनी एकदा तरी शिंगोळे खावेच अशी आग्रहाची नम्र विनंती आहे
पिठलं आवडतं.. पिठल्यातलं
पिठलं आवडतं.. पिठल्यातलं आमसूल आवडतं. म्हणून यातही आमसूल
करणारच म्हणणार्यांनी केले की
करणारच म्हणणार्यांनी केले की नाही? >>>> भटजींकडे पत्रिका पाठवली आहे. मुहुर्त काढून मिळाला की लगेच करणार आहे. उगाच गुढग्याला बाशिंग बांधून बसू नये.
फोटो भारी आलाय
फोटो भारी आलाय
Pages