निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली: लिंक आवडल्याचे सांगितल्या बद्दल धन्स ! Happy

सगळ्यांचे फोटो मस्त आहेत. लाल गुलाब झकास. सोनचाफा... आअहाहा.. मित्रानी वाढदिवसाला रोप दिलं होतं गिफ्ट म्हणून. पण इतकं उंच वाढणारं झाड नको होतं मला. फुलं काढणं अवघड होतं ना.. म्हणून. ते बदलून घेतलं नर्सरी मधून. पण तो विक्रेता म्हणाला की ही जरा वेगळी/प्रक्रिया केलेली व्हरायटी आहे. ७-८ फूट पर्यंत च वाढते. Happy तरी मी नहीच घेतलं. मला शक्यतो बोन्साय किंवा जेनेटिकली मॉडिफाईड झाडं घ्यायला आवडत नाही. पण बघायला छान वाटतात बोन्साय.

दिपु. छान फोटो.

मुंबई महानगरपालिका आयोजित वृक्ष, फुल प्रदर्शन शुक्रवार ८ फेब्रुवारी ते रविवार १० फेब्रुवारी दरम्यान वीर जिजामता उद्यानात आहे (राणीच्या बागेत). Sad

आजच स्टेशनजवळ बॅनर पाहिला.

सर्वच फोटो छान. माहीती नेहमीप्रमाणे वाचनीय.

दिनेशदा, पळसाचा सडा उचलावासा वाटला होता. पण माळी फार काळजी घेतात सगळ्या झाडांची आणि पडलेल्या पाला-पाचोळ्याची सुद्धा.

गोरेगावात शेणखत कुठे मिळेल?>>>>> जोगेश्वरी ते बोरिवली मधील बरेचसे गोठे हलवले गेले आहेत. त्यामुळे जरा कठिणच. पण मंदिरा बाहेर गाय घेउन बसणार् या लोकांकडे मिळू शकेल.

(एक प्रश्नः अर्धा र कसा लिहितात / टाईप करतात)

सध्या शिंपी पक्षाचे दर्शन सुरु झाले आहे. ओरडायला लागला कि गळ्याखाली काळी रेघ दिसते. याला स्थिरता अजिबात नाही.
सुर्यपक्षी मात्र गायब झाले आहेत.

सोमवार, ०४/०२/२०१३: लोकसत्ता : कुतुहल सदरः फुकुओकां बद्दल लिहिले होते. त्यांच्या "वन स्ट्रॉ रिव्होल्युशन" पुस्तकाचा मराठी अनुवाद : "काडातून क्रांती" ... असे वाचताना नि.ग.ची आठवण आल्यावाचून रहावत नाही.

सुर्यपक्षी मात्र गायब झाले आहेत. >>>>हे सध्या आमच्या इथे आलेत वाटतंय Happy

घरासमोर शेवग्याचे आणि पिंपळाचे झाड आहे. सध्या शेवग्याला भरपूर फुले लागलीत. तेथे रोज किमान ०८-१० सूर्यपक्ष्यांचा कलकलाट चालु असतो. आज त्यांचे काहि फोटो काढलेत. पिंपळाच्या झाडावरील फळे खायला तांबट, बुलबुल येतात आणि आज तर चक्क व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर आला होता. कॅमेरा आणायला घरात पळालो. बाहेर येऊन बघतोय तर चिमण्या कावळ्यांनी कलकलाट करून त्याला हाकलुन दिले. Sad

या सूर्यपक्ष्यांचा आवाज मधुर वाटतो Happy

सुदुपार,
सर्वच फोटो छान ! माहीती देखील वाचनीय..

आज वाचलेली एक बातमी ..
पुण्यातली झाडे मोजण्याचा कार्यक्रम (गेल्या ५-६ वर्षात) पुर्ण झाला, एकुण ३२ लाखाच्या वर झाडांची नोदणी झाली आहे.
यात काही दुर्मिळ झाडे, त्यांची कमी झालेली संख्याही लक्षात आली आहे ,ही चांगली बाब आहे.

माझ्या घरासमोरच्या शेवग्याच्या झाडावर पण बरेच पक्षी येतात. त्यापैकी १ मी भारतात बघितला नाही.
पॅराकिट प्रकारातला आहे. काळी चोच, फिक्कट चॉकलेटी रंग, डोक्यावर तुरा आणि लांब शेपटी. आवाज
फारसा करत नाही पण ३/४ जणांचा गट असतो.
याचे उड्डाण फार सुंदर असते पण बसला कि सगळी शान जाते. शेपटीचे ओझे झाल्यासारखा बसतो. बाकीचे
पक्षी झाडावर कोनात बसतात हा बहुदा लंबरूप बसतो ( म्हणून तोल जात असेल.)

आमच्याकडे सकाळी सध्या अंधारून आलेले असते, त्यामूळे फोटो नीट येत नाहीत.

पिंपळाच्या झाडावर भरपूर फळ लागलेली पण वटवाघूळांनी (एकदा त्यांचा डिनर बघत होतो Happy )त्याचा फडशा पाडला. त्यामुळे फार कमी फळं उरली आणि पक्षीही कमी येत आहेत. Sad

जिप्सि Happy

भरतजी त्याचे नाव दिनेशदांना नक्की माहीत आहे. राणीच्या बागेत हे झाड आहे. कैलाशपतीला पण अशीच फळे लागतात.

कॅनन बॉल, कैलाशपती यालाच कुणी नागचाफा पण म्हणतात पण नागकेशर वेगळे ( मसाल्यातले. पांढरे चार पाकळ्यांचे फूल आणि मधे पिवळे धम्मक केसर ) दोन्ही झाडे राणीच्या बागेत आहेत.

ती फळे फुटल्यावर मात्र भयानक दुर्गंधी सुटते Sad

जिप्स्या तू पिंपळावर रात्री काय करत होतास ?????????????????????????? वटवाघळांच्या डिनरवर तुझ लक्ष ????????????????>>>>>>>>>>> जागुले काय गं तू! फार हसले बाई!
हा पक्षी कोणता? सध्या संध्याकाळी एक प्रचंड मोठी झुंड कल्कलाट करत कडुलिंब आणि नारळावर बसतात. अर्धा पाऊण तास तरी बसतात. पण काही वेळेला त्यांना कावळे हाकलतात, नाहीतर हे स्वता:च निघून जातात. परिसरात खूप वृक्ष आहेत त्यावर फायनली झोपत असावेत.

DSCN1679.JPG

या फोटोत दोन साळुंख्याही आहेत.
DSCN1681.JPGDSCN1684.JPGDSCN1685.JPGDSCN1687.JPG

मानुषी,

तूमच्या नगरला आता नेपतीच्या झाडांना आता फळे लागली असतील ना ? ( हे झाड एरवी हिरव्या खराट्यासारखे दिसते. पाने नसतातच. दिवाळीच्या सुमाराला सुंदर गुलाबी / अबोली रंगाची फुले येतात आणि मग फळे )

हि झाडे कोकणात नाहीत. पुण्यातही दिसली नाहीत. सातारा / कोल्हापूर भागातही नाहीत. या फळांचे लोणचे करतात.

परवा एका लेखात वाचले कि याच झाडांना, राजस्थानात केर म्हणतात. आणि केर / सांगरी चे लोणचे तर राजस्थानात खुप लोकप्रिय आहे. ( सुलेखाने लिहिले होते.) ही माहिती मला नवीन. मी या झाडांची फुले बघितली आहेत, पण फळे नाहीत. ( आणि खाल्ली पण नाहीत.)

दिनेशदा केर-सांगरी च्या शेंगा असतात. ह्याचे झाड काटेरी असते. आम्ही राजस्थानला गेलो होतो तिथे प्रत्येक हॉटेलमध्ये ही भाजी असायची. चव काही खास नाही. पण तिथल्या लोकांचे असे म्हणणे आहे की आपल्या इथला मटार जसा खास भाजी म्हणून वापरतात तशी केर-सांगरीची भाजी स्पेशल असते त्यांच्याकडे. त्या शेंगा वाळवूनही ठेवतात वर्षभरासाठी.

मानुषी :स्मितः
मी पण साळुंख्यांना ओळखले.

बागेत लावण्यासाठी रोपं आणायला उद्या नर्सरीत जाणार आहे.
सुगंधी फुलं येणारी झाडं हवी .....काही कुंडीत लावायला आणि काही वाफ्यामधे...काही नावं सुचवा बरं..

अवनी मला आठवतात ती लिस्ट खाली देते.

वेली (आधाराची गरज असलेली) - सायली, रानजाई, मोगरा, डबलचा मोगरा, मदन बाण, जुई, रातराणी, हिरवा चाफा
झाडे - सोनटक्का, अनंत, गुलछडी, गावठी गुलाब, सोनचाफा, प्राजक्त, दवणा

Pages