निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुसंध्याकाळ.

पिशि अबोली सध्या माझ्याकडे गावठी, कलमी गुलाब, लाल, शेंदरी, पिवळी शेवंती, अबोली, प्राजक्त, झेंडू, तगर ह्या फुलांचा बहर आहे.

हे भोकरचे लोणचे.
http://www.maayboli.com/node/35165

जागू, वैबु, सौरभ, सुंदर फोटो. Happy
सौरभ, तुमच्या परवानगीशिवाय, मी पण ते फुल घेतल. Happy

पिशि अबोली सध्या माझ्याकडे गावठी, कलमी गुलाब, लाल, शेंदरी, पिवळी शेवंती, अबोली, प्राजक्त, झेंडू, तगर ह्या फुलांचा बहर आहे. >>>>>>>>>>>>जागू, का जळवतेस आम्हाला? Angry Lol

काल मी अक्षर अंकातला एक लेख वाचला.. त्याबद्दल थोडेसे.

त्यापूर्वी हा एक अनुभव आपल्या सगळ्यांना आला असेल. समजा तूमच्या हातातून एखादी लहान वस्तू खाली पडली, आणि पायाजवळ एक रांगते / बसते / खेळते लहान बाळ आहे. तर ते बाळ काय करेल ?
ते ती वस्तू उचलून तूम्हाला देईल. आणि चेहर्‍यावर एक लोभस हसू आणेल. हे घडणे अगदी नैसर्गिक आहे.
म्हणजे कुणीही न सांगता ते बाळ तसेच करेल. असे करताना तूम्ही त्याच्या ओळखीचे असा वा नसा.

हि दुसर्‍याला मदत करण्याची प्रेरणा माणसात मूळातच असते ( लेखकाने त्याला परार्थ असा शब्द योजलाय.)
आपण ज्यावेळी दोन पायावर ऊभे राहू लागलो त्यानंतर स्त्रीच्या कटीच्या हाडांची रचना बदलली. ( कारण
गर्भातील बाळाचे वजन तिला दोन पायावर तोलायचे होते.) पण त्यात एक अडचण अशी होती, कि बाळाची
पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला पोटात ठेवणे अशक्य होते. त्यामूळे आवश्यक तेवढी वाढ पोटात आणि बाकीची नंतर
संगोपनात होते. बाकीच्या प्राण्यांप्रमाणे मानवाचे बाळ जन्मतःच आपल्या पायावर ऊभे राहू शकत नाही.

हे करताना अर्थातच माता त्यात पूर्णपणे गुंतली. नेहमीच्या कामात ( शिकार / कंदमूळे गोळा करणे ) तिला
भाग घेणे अशक्य होते. तिचे पोषण तर बाकिच्यांना करावेच लागले पण वेळप्रसंगी बाळाचीही जबाबदारी
घ्यावी लागली.
असेच नव्हे तर ज्या समूहांनी अशी जबाबदारी घेतली, त्यांचीच बाळे वाढली आणि अर्थातच वंशही त्यांचाच
वाढला.

आणि लक्षात घ्या, यावेळी कुठलाही धर्म अस्तित्वात नव्हता. म्हणजे दुसर्‍यासाठी जे काही करायचे, ते केल्याने
माझा काही फायदा होईल, गेलाबाजार मागच्या जन्मातली पापे धुतली जातील वा पुढच्या जन्मासाठी
पुण्यसंचय होईल, असा काहिही विचार नव्हता.

तर दुसर्‍यासाठी काही करावे, हि अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आता आपल्या प्रगतीमूळे ( ?? ) आपण
ती करताना, आपला कोण / परका कोण असा विचार करू लागलो आहोत.

म्हणजे दुसर्‍यासाठी जे काही करायचे, ते केल्याने
माझा काही फायदा होईल, गेलाबाजार मागच्या जन्मातली पापे धुतली जातील वा पुढच्या जन्मासाठी
पुण्यसंचय होईल, असा काहिही विचार नव्हता.

तर दुसर्‍यासाठी काही करावे, हि अगदी नैसर्गिक भावना आहे.>>>>>>>
मस्त विचार आहे हा दिनेशदा....

खूपच वाचनीय लेख असणार.

आज माझ्या एका मैत्रिणीने काटे कणगी नावाचं कंदमूळ उकडून आणलं होतं. गोव्याला मिळतं म्हणे. रताळ्यासारखं; पण बेचव असं होतं ते. कुणाला ह्याबद्दल अजून काही माहिती आहे का? काटे कणगी हे स्थानिक नाव असणार.

काटे कणंग असे नाव देशावर आहे. वेल असतो त्याचा. माझ्या आजोळी पावसाळ्याची बेगमी म्हणून
ठेवलेले असते. उकडण्यापेक्षा ते भाजले तर जास्त चांगले. ( म्हणजे चिकट होत नाही. )
मग त्यात तूप, साखर व किंचीत मीठ घालून खायचे. गोव्यात ते भाजीत वापरतात.

http://mimarathi.net/node/9878#new श्रीफळातून कलावस्तू निर्माण करणारा एक कलाकार... फोटो बरेच आहेत लिंका कॉपी पेस्ट करायचा कंटाळा आला अन तपशील बदल करायचा टंकाळा आला म्हणून माबो वर टाकायच राहुन गेल होत. पण हे जरूर पहा.

<<आज माझ्या एका मैत्रिणीने काटे कणगी नावाचं कंदमूळ उकडून आणलं होतं. गोव्याला मिळतं म्हणे. रताळ्यासारखं; पण बेचव असं होतं ते. कुणाला ह्याबद्दल अजून काही माहिती आहे का? काटे कणगी हे स्थानिक नाव असणार.>>
शांकली,काटे कणंग काहीजणांना आवडत नाही..त्याला कापून भात शिजताना वर एक ताटली ठेऊन मीठ टाकून कुकरमधे ठेव. कदाचित आवडेल. पाण्यात शिजवलं तर खूप चिकट होईल.
त्याचे उकडून तुकडे करून त्यात ओलं खोबरं,किंचित साखर, हिंग टाकून कुस्करून बघ. कोशिंबिरीसारखं खाऊन आवडेल कदाचित.
दिनेशदा,खतखत्यात फार वापरतात गोव्यात.अन्य काही माहीत असतील तर सांगा ना उपयोग..माझा आवडता कंद आहे.. Happy

किडे कसे प्रिझर्व्ह करायचे कुणी सांगू शकेल का?मला एक सापडला मेलेला किडा.आणि खूपच आवडला आहे. फोटो खूप ब्लर झालाय.पण बघा..
Rut4959.jpg

हो हो, चिकट होतं ते. मगाशी मी गूगलवर ipomoea batatas या नावाने शोधून बघितलं, पण हे काटे कणंग नाही मिळालं त्यात.

अबोली, फॉरमॅलीनमधे ठेवलास किडा तर प्रिझर्व्ह होईल. पण त्याचा (फॉरमॅलीनचा) वास मात्र भयानक असतो हं. त्यामुळे खूप काळजी घेऊन कर.

श्रीकांत, लिंक बघितली. तुम्हीच लिहिलाय ना लेख? छानच लिहिला आहे. खूप सुंदर वस्तू बनवल्या आहेत. श्री. शेंबेकरांना वस्तू आवडल्याचं आवर्जून सांगा.

हो शेंबेकरांच्या कले बद्दल मीच लिहिलय ते. इथे मायबोलीवर टाकायच राहुन गेल होत. आता मार्च मधे भारतात जाईन तेव्हा शेंबेकरांची भेट होईलच. तेव्हा सगळ्यां ना आवडल्याच जरूर सांगेन.

<<पिशि अबोली सध्या माझ्याकडे गावठी, कलमी गुलाब, लाल, शेंदरी, पिवळी शेवंती, अबोली, प्राजक्त, झेंडू, तगर ह्या फुलांचा बहर आहे.>>
चला.. म्हणजे मी सुद्धा आहे तिकडे प्रातिनिधिक स्वरूपात.. Happy

पिशी माझ्याकडे असे दोन मेलेले किडे काड्यापेटीत जस्सेच्या तस्से राहिले होते कित्येक दिवस.... एक हिरवट पण ज्याच्यावर सप्तरंग असतील असा भास होतो. म्हणजे थोडक्यात फिरता रंग म्हण.
आता तो इतके दिवस कसा काय राहिला असेल हा विचार येण्याचं ते वय नव्हतं!

किडे पूर्ण वाळले कि कोरड्या हवेत तसेच टिकतात. पण मग बहुतेक मुंग्या लागतात.

मानुषी, या पक्ष्याचा वरुन / मागून फोटो घेता आला तर छान. निळसर रंग असतो.

श्री, लेख छानच आहे. आणि अर्थातच वस्तूही !

सुसंध्याकाळ.

आज माझ्याकडे एक वर्षापुर्वी लावलेल्या सोनचाफ्याच्या कलमी झाडावर पहिले फुल आले आहे. सकाळी खुप आनंद झाला. खर तर सुप्रभात करायला सकाळीच फोटो काढला पण आत्ता वेळ मिळाला.

जागू, सोनचाफ्याचा फोटो क्लास आलाय. Happy

यावर्षीचे मुंबई महानगरपालिका आयोजित फळ, फुल, वृक्ष प्रदर्शन किती तारखेला आहे? कुणाला काही माहिती?

जिप्स्या, त्या प्रदर्शनासाठी तूझ्यावरच अवलंबून आहेत सगळे. गेली अनेक वर्षे मला प्रत्यक्ष बघायला मिळालेले नाही. तूझ्या कॅमेरातूनच बघतोय.

जागू, फोटो मस्तच.
पुर्वी सोनचाफ्याची ताजी फुले, तूरटीच्या पाण्यात बुडवून, एका सीलबंद बाटलीत ठेवत. अशी फुले वर्षानुवर्षे टिकत. फुले मात्र ताजी हवीत.

आता महाराष्ट्र सरकारतर्फे राणीच्या बागेत भरवतात का ? पुर्वी फ्रेंड्स ऑफ ट्रीज अशी संस्था, व्ही.जे.टी.आय. मधे भरवत असे.

योगेश तुझी तारीफ फोटोला म्हणजे नक्कीच चांगला आला फोटो धन्स. Happy

पिवळी शेवंती अजुन फुलली नाही माझ्याकडे.

दिनेशदा आमच्या गावातील लोकही करायचे ते बाटलीत तुरटीच्या पाण्यात सोनचाफ्याची फुले घालून सिल करणे. आणि त्या बाटल्या गणपतीच्या दिवसांत गणपतीच्या मखरात दोन बाजूला दोन ठेवायचे.

हल्ली राणीच्या बागेच्या सुधारणेबाबतच्या बर्‍याच न्युज पेपरला येतात.

सुदुपार,
जागु,
चाफा छान आलायं..

मानुषी,
छान फोटो ...

(परवा गावाकडे कैमेरा नेला होता पण काही वेळात बैटरी संपली, चार्जर/कॉर्ड न्यायच विसरलं...)

Pages