निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषीचे पक्षी : Rosy Pastor / Rosy Starling / गुलाबी मुनिया.>>>>>>>>>>>
स्वातीनेही हेच नाव दिलं होतं.पण ओव्हरऑल हे पक्षी खालून पिवळट दिसत होते.
वर्षू ......काय छान वेगवेगळेच रेअर फळं फुलं!
दिनेशदांचा आवडता पक्षी : फतकल्या विदुषक!

शोभा, तो फोटो नीट आलेला नाही, म्हणून ओळखता येत नाही. जिप्स्या, शांकली आल्यावर नावे कळतील !
माझ्या हाताशी आता पुस्तके नाहीत ना !

वर्षू, या पिचर प्लांटला वेगळी फुले पण येतात. हि आहेत ती पाने. मराठीत घटपर्णी असे नाव आहे.
पण तो पिवळा लिंबू बटाटा मात्र आपल्याकडे बघितला नाही.

दिनेशदा तुम्हा अगदी........"उगी उगी .............आता शांकली येईल नी सग्गळं सांगेल बाळांना!" असं म्हटल्यासारखं वाटलं!(दिवे!!)
दारात दोन नारळीची झाडं आहेत. एकाचे मात्र मध्यंतरी १५० नारळ उतरवले. आणि गेली तीन वर्षं खूप नाऱळ येतात. दुसर्‍या झाडाला यंदाच पहिल्यांदा!

DSCN1691.JPG

वर्षू - प्र चि ३ - हे fuschia - (उच्चार फुश्चिया का फुक्सिया माहित नाही) आहे.

सुसंध्याकाळ.

मला स्वतःला जास्त माहीत नाही. ३१.०१.२०१० ला उरणला डॉ.केतकींबरोबर एक दिवसाचे पक्षी निरिक्षण केले होते, तेव्हा दिसले होते. त्यात त्यांनी सांगितलेली माहीती.

उरणला येउन मला माहीत नाही?????????????

जिप्स्या धन्स धन्स धन्स. खुप सुंदर आहेत फुले.

वर्षू मस्त फुले.

मागच्या पानावरचे पिचर प्लांट म्हणजे कीटक 'खाणारे' प्लान्ट का? माझ्या लहानपणी किशोर मासिकात अशा एका झाडाबद्दल वाचल्याचे आठवतेय. चित्रेही तशीच होती.

जागू, फुलाचा आकार मस्त आहे.

हो ना मानुषी, बाळं रडत होती !

घटपर्णी, वर माझा एक लेख होता. ( असावा. Happy )

जिप्सी, ती पांढरी फुलं पांढर्‍या सावरीची आहेत. याच भागाच्या पहिल्या पानावर मी फोटो टाकलाय. पण फळांचं नाव मात्र नाही सांगू शकत. जरा शोध घ्यावा लागेल.

वर्षूतै, सगळे फोटो सह्हीयेत. पण नावं नाही सांगता येत. Sad

चिनी लोकं ह्या वनस्पती का बाळ्गतात याचं विश्लेषण खूप आवडलं.

दिनेशदा, तुम्ही टाकलेला 'विदूषकाचा' फोटो खूप आवडला!

जिप्सी, वर्षू नील
मस्त फोटो आहेत.
वर्षू नील वरच्या दुसरा फोटो पाहून माझ्या कडे आत्ताच येऊ लागलेल्या अननसाची आठवण झाली. असाच दिसतोय साधारण.

जिप्सी
सर्वच फुलोरे मस्त.........शेवटचा फारच छान.
पारंपारिक रिसायकलिंगचा एक उत़्कृष्ट नमुना. त्याचं आपोआप झालेलं डिझाइनही मला आवडलं!

DSCN1609.JPG

ब्राऊनियाची कोवळी पाने सुरूवातीला >>> केळ फूलच वाटतय ते.
एरंडाचा फुलोरा छान दिसतो.
हा फुलोरा कसला? >> काहि कळत नाही , काजू/बदाम अशा कशाचा आहेका?

gulabi myna, हे बरोबरच आहे - याचा उच्चार मैना आहे, "मुनिया" नाही. कृपया तुझी आधीची पोस्ट पहा -
(मानुषीचे पक्षी : Rosy Pastor / Rosy Starling / गुलाबी मुनिया) म्हणजे हे लक्षात येईल. मुनिया हे गुगलून पहा म्हणजे मैना व मुनियातील फरक लक्षात येईल. कृ गै न>>>>>>>>>>>>>>>>>> शशांक, गैरसमज कधीच नाही. उलट आताच नि.ग.वर येण्याआधी मुलाला सांगत होते येथे काहीही विचारले तरी लगेच उत्तर मिळते. फार भारी भारी, माहीतगार मेंबर आहेत. गुगलून पहाते.

मधु-मकरंद - फार भारी भारी, माहीतगार मेंबर आहेत. >>>> हे बरोबर आहे पण मी नाही गं त्यातला - मी अजून शिकाऊच आहे.
सध्या आमच्या येथील (ऑफिस) हिरवळीवर एक अतिशय गोड / सुंदर पक्षी बागडतोय - पण मला अजून कुठला आहे तो हे ही कळत नाहीये... Sad Sad

जिप्सी, ती फुलं शिसवाची नाहीयेत. शिसवाची पानं पण वेगळी असतात. माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर आहेत शिसवाची झाडं.

आणि तो फुलोरा बेहड्याचा वाटतोय.

ब्राऊनियाची कोवळी पानं सीता अशोकाच्या पानांशी खूप मिळती जुळती असतात. त्याच्या फुलांचा फोटो टाक ना.

ही शिसवाची पाने, फुले व शेंगा -

1 042.jpg1 047.jpg1 045_0.jpg

गूगलवर dalbergia sissoo सर्च कर.

Pages