निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह्..खूप छान वाटतंय या गप्पा बघून.. गावठी गुलाब मस्तच..
आणि ही चाफ्याची फुलं सगळ्यांसाठी.. Happy
Rut3109 - Copy.jpg

जागु.. मोहोराचा सुर्रेख वास सुटला असेल ना???
शांकली ,खताबद्दल छान टिप्स दिल्यास.. हिरवी बोटं नसलेल्या मला तर फारच उपयोगी हैत Happy
सुंदर आहे चाफा...

शोभा, गावठी गुलाब खूप सुंदर आहेत. खूप मंद पण गोड वास असेल ना?

आणि जागू, जिप्सी प्रमाणेच तुझ्यापुढेही पक्षी पोझ देऊन माझा पण फोटो काढ ना म्हणून येऊन बसतात वाटतं!! :डोमा:.... धनेशाचा फोटो मस्त आलाय. आणि आंब्याचं झाड तुमच्या बागेतलं दिसतंय! फुललं असेल ना मोहोराने?

साधना, पावसाचं पाणी ताटलीत साठेल हे माझ्या ध्यानातच नाही आलं!! तू म्हणतेस तशी काळजी घ्यावी लागेल नक्की!

अबोली, तुमच्या सोनचाफ्याचा सुगंध अगदी इथपर्यंत पोचला बरंका!! मस्त आहेत फुलं!

जागू..:स्मित:

व्वॉव... कृष्णकमळ!!..अबोली; तुमच्या घरी आहे का हा वेल? सुंदर आहेत फुलं.

आणि जागू, हे अ‍ॅस्टरचंच फूल ना गं? याचा आकार आपल्या १ रु च्या नाण्यापेक्षा थोडा मोठा असतो, तेच ना? सुंदर आलाय फोटो.. आणि रंग कस्ला भारी आहे! ही फुलं डोळ्यांपुढे ठेऊन भरतकामाची डिझाईन्स तयार होत असतील नै!

वर्षूतै..तुझ्याकडचे फोटो टाक ना इथे...खूप उत्सुकता लागलीये...

चिमुरी, शोभाकडच्या गावठी गुलाबाची फांदी आणून लावलीस तर कदाचित तो फुटणार नाही. कारण बर्‍याचदा गावठी गुलाबाचंही कलम करूनच (वेगळ्या गुलाबाच्या खोडावर गावठी गुलाबाची फांदी पाचर कलमाने लावतात ते कलम) लावतात. त्यामुळे नुसती फांदी लावून सहसा उपयोग होत नाही. आणि वर रीमा म्हणाली तसं, गुलाबाला शेणखत चांगलं. पुण्यात रोझ सोसायटी ऑफ इंडिया आहे ना त्यांचं टिळक स्मारकला प्रदर्शन भरतं; तेव्हा खास गुलाबासाठी म्हणून असणारी विविध खतं मिळतात. ती खूप उपयोगी असतात. पण एकूणच गुलाबाला खूप निगराणी लागते. ते थोडं नखरेलच रोप असतं (हे मात्र माझं वै.मत :स्मित:)

हो शांकली उद्याच्या सुप्रभातला टाकतेच.

माझेही गुलाबाबाबतचे असेच मत आहे. मी आधी टॉपरोझ हे खत घालायचे. त्याने गुलाबांना चांगला बहर यायचा.

हा माझ्याकडचा गावठी गुलाब. मी फांदीच लावली होती ह्याची. आता खुप वाढला आहे.

वाचतेय. फोटो आणि माहिते छानच!
माझ्याकडचं घरातल्याच ओल्या कचर्‍याचं खत आता तयार आहे. तर मी कुंड्यातच कारली दोडके दुधी घोसाळी लावण्याच्या विचारात आहे.
खरं म्हणजे खाली जागा आहे. पण लुई तिथे शू करतो. (शी साठी त्याला शरद बाहेर नेतो.) म्हणून या भाज्या खाली जमीनीत लावू नयेतसं वाटतं. बरोबर ना?
आणि कोणत्या भाज्या लावू शकते? अळूही लावायचं मनात आहे.

जागूडे मस्त रंग आहे हं गुलाबाचा!

अबोलीची पण मज्जा आहे हं..इतकी सारी फुलं म्हणजे...

जागु.. तू राहात असलेला परिसर किती छान ,निसर्गमय आहे.. वाटतंय एक घरच घेऊन टाकावं तुझ्या शेजारी.. Happy

अबोली.. कृष्णकमळ>>> वॉव.. लहानपणी घराच्या अंगणात होता वेल लावलेला.. आता फकस्त फॉटोत पाहतेय..

@ शांकली.. अगा दोन दिवसांपास्न कॅमेरा जवळ ठेवूनच हिंडतेय.. पण सूर्य महाशय चायनीज नववर्षा ची सुट्टी घेऊन कुठे गडप झालेत काय माहिती.. काढलेले फोटो खूप ब्राईट येत नाहीयेत त्यामुळे..
आज परत आजमावीन लक.. Happy

सुप्रभात मंडळी
शशांकली(दोघेही!!!), जागू, दिनेशदा, साधना आणि निगप्रेमी उत्तर द्या.............

इथे मुंबैत गोरेगावात शेणखत कुठे मिळेल

काय गं जाई, कसले प्रश्न विचारतेस?? गोरेगाव गोठ्यांसाठी फेमस आहे ना? मी आधी वेस्टर्न लाईनने प्रवास करायचे तेव्हा अंधेरी गेली की 'आता गोरेगावच्या म्हशी घुसतील गाडीत' ही कमेंट खुपदा कानी पडायची Happy

एखादा गोठेवाला बघ, त्याच्या गोठ्याबाहेर भरपुर शेणखत मिळेल. शेणखत बनवुन विकणे हा त्यांचा साईड बिझनेस आहे. एक टेंपो भरुन शेणखत जवळजवळ ८००-१००० रुपयांना जाते. तुला पोतेभर शेणखत आरामात २०-४० रुपयांना मिळेल. तेच नर्सरीवाल्याकडे गेलीस तर महाग मिळेल.

मानुषी,
फार माहिती नाही मला पण लुईची शु झाडांना चांगलीच असेल्..आणि मनात शंका पण नको यायला..
दिनेशदा आणि शशांकली सांगतिलचः-)

नमस्कार निगकर,
नविन भागाच्या शुभेच्छा.
गेल्या आठवड्यात वाशी मधे फुले-फळे-भाज्या यांचे प्रदर्शन होते, खूप छान फुलझाडे होती. मला शेवटच्या दिवशी जाता आले. पण ते प्रदर्शन बघताना निग ग्रूप ची आठवण आलीच. ग्रूप वर शेअर करण्याकरता मोबाईल ने काही फोटो पण काढले आहेत. वेळ मिळताच पोस्ट करीन.

माझ्याकडचं घरातल्याच ओल्या कचर्‍याचं खत आता तयार आहे. तर मी कुंड्यातच कारली दोडके दुधी घोसाळी लावण्याच्या विचारात आहे.
खरं म्हणजे खाली जागा आहे. पण लुई तिथे शू करतो. (शी साठी त्याला शरद बाहेर नेतो.) म्हणून या भाज्या खाली जमीनीत लावू नयेतसं वाटतं. बरोबर ना? >>>>
मानुषी - युरीनमधे काय अस्तं - युरीक अ‍ॅसिड - म्हणजे वेगळ्या युरीयाची गरजच नाही ना ? व शेणखत काय व लुईची शी काय - दोन्ही एकच - फक्त खतात रुपांतर होण्यासाठी जरा मातीत मिसळले गेले पाहिजे म्हणजे झालं.. कुठल्याही प्राण्याची विष्ठा ही मातीत कुजून जे होते ते शेणखतच..
गाय-म्हैस यांच्या विष्ठेत गवताचा भाग जास्त असल्याने त्याचा खत म्हणून जास्त उपयोग होतो इतकेच...

दुसरे असे की आपल्या बागेतल्या काय किंवा बाजारातून आणलेल्या भाज्या - पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायलाच पाहिजेत. ज्या भाज्या शिजवल्या जातात त्यातील सर्व जंतू (बॅक्टेरिया, जंत व इतर सूक्ष्मजीव) उष्णतेमुळे मरतातच. ज्या भाज्या आपण कच्च्या खातो (कोशिंबीर स्वरुपात) त्या पाण्याने भरपूर स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे झाले....

अजून एक असे की आपल्या शरीरात जी संरक्षण यंत्रणा आहे (इम्युन सिस्टिम) तिच्यावरही जरा भरवसा ठेवा की ... आपल्याला सहजासहजी कुठलेही इन्फेक्शन होत नाही याचे कारण ही इम्युन सिस्टिम.
प्रत्येक व्यक्तिची ही सिस्टिम वेगळी असते (कार्यक्षमता हे स्वरुप पहाता) त्यानुसार त्याने काळजी घ्यावी - आपण म्हणतो ना - अमुक अमुक व्यक्ति दगडही पचवू शकते... (म्हणजेच याची इम्युन सिस्टिम फारच स्ट्राँग आहे एवढेच...)
और कुछ चाहिये क्या ??

धन्यवाद शशांक
माझ्या वडिलांनी दिलेलं अनंताचं सुंदर रोप मी खूप दिवस जगवलं(जमिनीतच) पण लुई बरोब्बर त्यालाच पाणी घालायचा. ते जळून गेलं.
असो......पण म्हणजे खाली जमिनीत झाडं(भाज्या) लावायला हरकत नाही असं दिसतं!
---------------------------------------------------------------
मागच्या आठवड्यात मैत्रिणीच्या फार्महाऊसवर गेलो होतो(भोरला).
तिच्या घराच्या छातावर उजेडासाठी काच आहे त्यावर हा साप कधीचा मेलेला आहे.

DSCN1646.JPG

माझ्या वडिलांनी दिलेलं अनंताचं सुंदर रोप मी खूप दिवस जगवलं(जमिनीतच) पण लुई बरोब्बर त्यालाच पाणी घालायचा. ते जळून गेलं. >>>>> त्या रोपाला पाणी घालत नव्हता का तुम्ही ? बाजारातून आणून घातलेल्या युरीयाचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी रोपं जळून जातात हो..... (इथेच वर कुणी तरी अनुभव दिलेलाच आहे...) युरीया फार म्हणजे फारच कमी लागते व फार फ्रिक्वेन्टलीही घालून चालत नाही... याशिवाय त्या रोपाला (युरीया घातलेल्या) पाणीही व्यवस्थित द्यावे लागते - ते पाणी कमी झालं तरी रोप जळू शकतं....

मागे मायबोलीवर वाचून कंपोस्ट खत घरीच बनवायचे खूप मनात होते. गांडूळखताचा दुसरा पर्याय होता पण घरातून त्याला विरोध झाला असता म्हणून मग कंपोस्ट खत सोयीचे वाटले होते. साधनाने दिलेले फुकुओकांचे इ-पुस्तक वाचल्यापासून रासायनीक खते वापरणे पूर्ण बंद केले होते.

आता घरातल्या पालेभाज्यांचे देठ कुंड्यांवर पसरून टाकतो आणि आता कंपोस्ट खत बनवायची खास बास्केट मिळाली आहे. माझी झाडे छान हिरवीगार झाली आहेत पण फुलांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. नेटवर शोधल्यावर नैसर्गिक सकस मातीत वनस्पतीजन्य खताबरोबर प्राणीजन्य (हाडे, रक्त इ) खतही असावे लागते असे समजले. आता माझ्यासारख्याच्या शाकाहारी घरात हे कसे आणायचे?

सप्ताहिक सकाळ मधे आलेला हा एक लेख. कित्ती सुंदर नाकतोडा आहे पहा. तीनही रंगांच्या
नाकतोड्यांचे फोटो काढायला किती पेशन्स ठेवावा लागला असेल..

http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20130202/5248661750001498947.htm

Pages