निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf   ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
 
 
प्रज्ञा, तो बिया भाजताना खास
प्रज्ञा, तो बिया भाजताना खास वास येतो तो हि आलाच, आणि जागूच्या गजर्याचा पण !
ही काजूची नुस्ती माहितीच
ही काजूची नुस्ती माहितीच वाचतोय मी !!!! हे सगळं बघायला व खायला कधी मिळणार ????
सुरंगीचा गजरा मस्ताय ........
शशांक, एप्रिल / मे मधे काजूचा
शशांक, एप्रिल / मे मधे काजूचा सिझन असतो. कोकणात किंवा वर जव्हारकडे गेल्यावर झाडे नक्कीच दिसतील.
पेण / पनवेल परीसरात पण आहेत.
पेण-पनवेलला दिसतात काजूची
पेण-पनवेलला दिसतात काजूची झाडे. आमच्याकडे क्वचीतच आहेत. मी मागील वर्षी कलम लावले आहे. नुसते काजूफळ खाताना घशात बसते. मिठाबरोबर चांगल लागत. मी मागील वर्षी सुकवून खाल्ले खुप छान लागतात सुकवून.
काय सुंदर आहेत सुरंगीचे गजरे
काय सुंदर आहेत सुरंगीचे गजरे ... मी आजवर याच्या सुगंधाची फक्त कल्पनाच करते आहे. एका खास कोकणातल्या पुस्तकात `ओवळी;' असं नाव वाचलं होतं सुरंगीचं.
शांकली, हॉलीवूडसमोरचं झाड आता फुललं असेल का आता?
गुगल अर्थ वरुन घेतलाय हा
गुगल अर्थ वरुन घेतलाय हा फोटो. यात तूमच्या उजव्या हाताला दिसते आहे ती नायजेरियातली आमची फॅक्टरी ( सल्फ्यूरीक अॅसिड आणि अॅलम ) आणि तो रस्ता माझा नेहमीच्या जाण्यायेण्यातला. त्या रस्त्याच्या डावीकडे
एकसूरी लागवड दिसतेय ती आहे पाम ची. याच झाडाच्या फळापासून पाम ऑईल बनवतात.
हे तेल असे आरोग्यास चांगले असते. अनेक जीवनसत्वे असतात शिवाय कोलेस्ट्रॉल नसते. अनेक सौंदर्यप्रसाधनातही ते वापरतात. भारतात आपण या तेलाची आयात मलेशियातून करतो. आपल्याकडची लागवड तुरळक आहे.
या झाडाला लागवडीनंतर अनेक वर्षांनी फळधारणा होते. एका मोठ्या घडात नारिंगी / पिवळसर रंगाची सुपारीएवढी फळे येतात. चावायला खुप कठीण असतात. त्यावरच्या तंतूमय आवरणातच भरपूर तेल असते.
भरपूर म्हणजे चावल्यावर, आपल्या तोंडात केवळ तेलाचीच चव राहते. माझ्या घरासमोरही एक झाड होते. त्याचा घड उतरवला कि ओंजळभर फळे, माझ्यासाठी आणली जात. मी एखादेच खाऊ शकत असे. बाकी मेडला देत असे.
पण या झाडांची अशी लागवड हानीकारक ठरतेय. या झाडाच्या खोडावर थोडेफार तेर अळू वाढते पण बाकी
या झाडाखाली किंवा परिसरात कुठलेच झाड / झुडुप वाढत नाही. या लागवडीकडे मी रोज बघत असे, आणि
दहा / बारा फुटापलिकडचे दिसतच नसे. मी होतो त्या काळात तरी फलधारणा होत नव्हती.
दिनेशदा, काजुची माहिती,पाम
दिनेशदा,
काजुची माहिती,पाम बद्दलची छान माहिती मिळाली.
फोटो बद्दल धन्यवाद !
तुम्ही इतकं छान लिहिता, छान मांडणी करता या मुळे वरील वर्णन वाचताना फोटोत तुम्ही देखील दिसलाल आम्हाला.
गौरी ओवळी म्हणजे
गौरी ओवळी म्हणजे बकुळ.
दिनेशदा माझ्याकडील पामच्या झाडालाही बरेचदा फळे येतात. अगदी तुम्ही वर्णन केलत त्या प्रमाणेच. परवा जिप्सीने फोटो पण काढलेयत. तो टाकेलच नंतर.
त्याच्याकडून रॉयल्टी घे ! आणि
त्याच्याकडून रॉयल्टी घे ! आणि आता आणखी १ पोस्ट, म्हणजे हजारी गाठलीच.
हि माझी १००० वी पोस्ट
हि माझी १००० वी पोस्ट
आजच साबांकडुन निरोप आलाय
आजच साबांकडुन निरोप आलाय गुरुवारी काजुच्या बिया (ओले काजु) पाठवुन देते..
दक्षिणा असल्या सारखा १००१
दक्षिणा असल्या सारखा १००१ आकडा दिसत होता म्हणुन. १०००री पुर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व ही पोस्ट.
जिप्सी जागूकडे जाउन आलास ना आता फोटोंचे लवकर कोलाज कर नी दे जागूला १३ व्या भागाचा आरंभ करायला.
सर्व नि.ग. प्रेमींचे १००० री
सर्व नि.ग. प्रेमींचे १००० री बद्दल अभिनंदन!
हे सुरंगीचे गजरे कसे करत
हे सुरंगीचे गजरे कसे करत असतील राम जाणे! या फुलांना अगदी छोट्टुस्सा देठ असतो आणि तो गुंफून गजरा करायचा म्हणजे सगळं कौशल्य पणाला लागत असणार.
गौरी, माझी मैत्रीण सांगत होती की हॉलीवूड फोटो स्टुडियोपासची सुरंगी फुललीये म्हणून. मला अजून बघायला जायला जमलं नाहीये.
जागू, कट्टी फू पण गोड दिसतिये हं :डोमा:... आणि सुरंगी तर काय ...जातीच्या सुंदरांना आणखी वेगळं काय शोभून दिसणार??
प्रज्ञा, तू म्हणतेस ते अगदी खरं गं!!...
काजुपुराण मिसले मी.. मला ओले
काजुपुराण मिसले मी.. मला ओले काजु प्रचंड आवडतात.. कित्येक वर्ष झाली खाल्ले नाहीयेत.
आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले.
काजुच्या चिकाचे डाग कपड्यावर पडले तर अजिबात निघत नाहीत. त्यामुळे लहानपणी मामी स्वतःच विळीवर काजु कापुन किंचीत साखर आणि मीठ लावुन द्यायची. तरी दर वर्षी उन्हाळ्यात चोरुन काजु खायच्या नादात एखादा फ्रॉक खराब व्हायचाच.
ठाण्यात जांभळी नाक्याजवळच्या भाजी मंडईत काजु मिळतात का?
जागूताई, सुरंगीचे गजरे बघूनच
जागूताई, सुरंगीचे गजरे बघूनच घमघमाट जाणवला अगदी.
इथे कुठेतरी शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात मिरची माहीत नसल्याचा उल्लेख वाचला. त्यावरून सहज संत सावता माळी यांचा हा अभंग आठवला :
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी|
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||
ऊस गाजर रताळू | अवघा झालासे गोपाळू||
मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापिली पंढरी ||
सांवता म्हणे केला मळा | विठ्ठल पायीं गोविला गळा ||
सावता माळ्यांचा जन्म:इ.स. १२५० चा आणि समाधी १२९५ची.
महाराष्ट्रात पंढरपूरजवळच्या अरणभेंडी गावात त्यांचा जन्म झाला.
शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ (काही लोक १६३० मानतात) सालात झाला.
काजू पोर्तुगीजांनी महाराष्ट्रात १५६०च्या सुमारास आणले.
जागु! गजरे फार सही, मी
जागु! गजरे फार सही, मी पहिल्या.न्दाच पाहिले..
स्वाती छान माहीती आहे. शांकली
स्वाती छान माहीती आहे.
शांकली अग पर्वणीच चालू झालेय मला गजर्यांची. उद्या नणंद बकुळीचे गजरे घेउन येणार आहे.
प्राजक्ता धन्स.
चिंगी मी मागील आठवड्यातच काजूची भाजी खाल्ली.
@चिंगी, ठाण्यात जांभळी नाका -
@चिंगी, ठाण्यात जांभळी नाका - स्टेशन रोडवर (कुटिरोद्योगसमोर) मिळतील काजु,
जागू, आंबा आणि सुरंगी भारीच!
जागू, आंबा आणि सुरंगी भारीच!
सुप्रभात!!!!!!!!!!!!! ही
सुप्रभात!!!!!!!!!!!!!
ही ऑफिसमधल्या माळ्यंनी केलेली एक रचना. (फोटो मित्राने मोबाईलवरून काढलेला आहे.)

जागू, सुरंगीचा गजरा मस्त. ईतका ताजा-टवटवीत क्वचितच पहायला मिळतो. पाहूनच सुवास पोहचला.
मला अजून बघायला जायला जमलं
मला अजून बघायला जायला जमलं नाहीये.>>>>>>>>>>>शांकली कधी जाणार आहेस. मला पण घेऊन जा.
चिंगी मी मागील आठवड्यातच काजूची भाजी खाल्ली.>>>>>>>>>>>.जागू, किती जळवशील? आधी सुरंगी आणि आता काजू.
खूप सुंदर मधु निसर्गचित्र
खूप सुंदर मधु
निसर्गचित्र असल्याचा भास झाला
खूप छान
माझ्याकडचा, या वेळी डिसेंबर
माझ्याकडचा, या वेळी डिसेंबर पर्यंत येत होता

फार छान केलय हे मधू....
फार छान केलय हे मधू....
मधु, असे वाहते पाणी बघूनच मन
मधु, असे वाहते पाणी बघूनच मन प्रसन्न होते.
सुधीर, आता या रंगाचा सोनटक्का फार दुर्मिळ झालाय. याचा सुगंध पण किंचीत वेगळा असतो.
या रंगाचा सोनटक्का फार
या रंगाचा सोनटक्का फार दुर्मिळ झालाय. >> हेच विचारणार होते. लहानपणापासुन सोनटक्का पाहिला आहे तो पांढरा. पिवळा नाही पाहिला कधीच. छान दिसतोये.
मोनालि, पावसाळ्यात कंद लावला
मोनालि, पावसाळ्यात कंद लावला तर सहज जगेल. तिलारी घाटात हा नैसर्गिक रित्या वाढलाय. फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री या पुस्तकातला फोटोपण त्या घाटातलाच आहे.
जो_एस छान आहे प्रचि
जो_एस छान आहे प्रचि
निग प्रेमींपैकी कुणाला
निग प्रेमींपैकी कुणाला मुंबईची वृक्ष नर्सरी माहित आहे का? फेसबुकवर त्यांचे फोटो काय सुंदर आहेत! नर्सरी खरोखरच इतकी सुंदर असेल, तर मुद्दाम जाऊन बघायला हवी असं वाटातंय.
http://www.facebook.com/Vrikshanursery
Pages