निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेट्या ज्या झाडांची फळे खाऊन तू माजला आहेस, ती काय तू लावली होतीस का ?>>>>>>>>>+१०००

माश्याचं फिश (!) (?).....बोकडाचं ......, कोंबडीचं.... Uhoh ....:हाहा:

अनिल, प्राजक्त/ता माहीत नाही??????

जागूडे, / प्राजक्ता मधुमालती काय बहरलीय...प्राजक्ताच्या घरी मधुमालती, गुलाब, शेवंती आणि चंपा सुद्धा!!

आणि तुम्ही प्राजक्ताला ओळखत नाही........... Rofl Rofl
अनिल्..काय हे...!!!!!!!!!!! Wink
मधुमालती,,,सुंदर बहरलीये...
माशाचं फिश... Lol हीहीहीहीही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बेट्या ज्या झाडांची फळे खाऊन तू माजला आहेस, ती काय तू लावली होतीस का ?
सवाल खासच आणि विचार करायला लावणारा !

जुनी माणसे झाडे लावताना पुढच्या पिढीचा विचार जास्त करत होती हे दिसुन येतं, प्रश्न आहे कि सध्याची पिढी असा विचार करते का ?

प्राजक्ताच्या फुलांच्या झाडाला न ओळखल्याबद्दल निसर्गप्रेमींची (मनातल्या मनात) माफी मागितली आहेच ..
(शेतीत पाहिलेली चार पिकं सोडुन बाकी आमचं सगळं असं अज्ञानच आहे ...)

काल जागूच्या घरी धाड मारून आलो Happy
राधा, एकदम गोड आहे Happy सात महिन्याची असुनही हुशार आहे आणि दोन दातपण आलेत. Happy
नेहमीप्रमाणे जागूचा पाहुणचार बेस्टच :-). भरपूर फोटो काढले आहेत. सावकाश शेअर करेन. Happy
धन्यवाद जागू (खासकरून सुरमई आणि कोळंबीच्या फोटोसाठी. पाहिजे तसाच मिळालाय.)

राधा ला सातव्या महिन्यातच दोन दात आलेत?? त्रास नाही ना झालाफार???
मँगो चा आंबा टवटवीत आहे अगदी...
देवा...आता जिप्स्या नि ग वर येऊन जळवणार !!!!!!!!!!!!!!

काल जागूच्या घरी धाड मारून आलो

माझ्या घरावरुन गेलात तरी मला साधी हाकही मारली नाही... कट्टी सगळ्यांशी......

आंबा - Mangifera indica

काजू - Anacardium occidentale

बिब्बा - Semecarpus anacardium पण सगळे एकाच कुळातले - Anacardiaceae

हे आमच्या ऑफिसच्या झाडावरचे काजू. याला कोकणात काजीची बोंडे म्हणतात.
आपल्याकडे काजूची लागवड केली ती पोर्तुगीजांनी आणि तीसुद्धा गोव्यात. त्या लागवडीचे कारण वेगळेच होते.
गोव्यातील टेकड्यांवरच्या लाल मातीची खुप धूप होत असे, ती थांबावी म्हणून हि झाडे लावली. (तिथे) हि जाडे
पसरट होऊन जमीनीलगत वाढतात. आणि या कूळाची खासियत म्हणजे हि झाडे सगळी पाने कधीच गाळत नाहीत.
सध्या मात्र गोव्या बरोबरच कर्नाटक, केरळ आणि उत्तरेकडे डहाणू जव्हार परीसरात खुप झाडे आहेत. घाटमाथ्यावर बेळगाव, राधानगरी या भागातही खुप झाडे आहेत. हि लागवड मानवी हस्तक्षेपातूनच झालीय.
निसर्गतः बीजप्रसार फार होत नसावा.

या झाडाचे फळ हे पण खास असते. वर फोटोत बघताच आहात त्याप्रमाणे बी फळाच्या बाहेर असते. आत बोंडात सलग गर असतो. पण इव्होल्यूशन मधे हे फळ म्हणजे उशीरा शिकलेले शहाणपण असावे.
या झाडाला अगदी लहान अशी गुलाबी फुले येतात. यांना मादक गंध पण असतो, पण (आपल्याकडे ) त्याच
काळात आंब्याला पण मोहोर येत असल्याने, आपल्याला जाणवत नाही.

आणि मग फळ वाढू लागते ते पण वेगळ्या तर्‍हेने. आधी बी मोठी होते आणि मग त्या बीचा देठ फुगीर होऊ
लागतो आणि त्याचे फळात रुपांतर होते. आधी हिरवे पोपटी असणारे हे फळ कालांतराने लाल / पिवळे होते.
हे दोन्ही रंग एकाच झाडाच्या फळात दिसतात. ( बोरकर त्यांना वटारलेले डोळे म्हणतात. )

उशीरा शिकलेले शहाणपण मी म्हणालो ते यालाच. झाडाकडे आधी फळाची योजना नसावी. पण बीसाठी
कुणीच फिरकत नाही असे दिसल्यावर फळाची योजना केली असावी. अजूनही निसर्गात या फळाला कुणी
गिर्‍हाईक दिसत नाही. फळे पिकल्यावर बदकन खाली पडतात आणि तिथेच कूजतात. अशा पडलेल्या
बिया सहज रुजतात पण मोठ्या झाडाच्या सावलीत बिया रुजून उपयोग काय ?

वर उल्लेख केलेल्या सर्व भागात ही फळे उचलली जातात आणि थेट गोव्यात पाठवली जातात. तिथे अर्थातच त्यापासून फेणी करतात. अशी फेणी करायच्या भट्ट्या पेडणे गावाजवळ, हायवेलगतच आहेत. आपल्या राज्यात त्यांना परवानगी नाही.

वर लिहिल्याप्रमाणे बिया आधी मोठ्या होतात त्या वेळेपासूनच त्याला मागणी असते. या बियांत भरपूर
चिक असतो आणि आपल्या त्वचेवर तो पडल्यास फोड येतात. तरी या बियांमधला गर खुप चवदार असतो.
याला ओले काजू म्हणतात. देवरुख, रत्नागिरी पासून थेट मालवण पर्यंत आदिवासी बायका हे ओले काजू
बाजारात विकायला आणतात. या बिया हाताळून त्यांचे हात अगदी सोलवटलेले असतात. मी १ रुपयाला १००
गर या दराने ओले काजू विकत घेतले आहेत, पुर्वी. आता ते २/४ रुपयाला एक काजूगर या भावाने असावेत. तरीदेखील त्या बायकांच्या कष्टापुढे ते स्वस्तच म्हणावे लागतील. हे गर सुकवूनही ठेवतात.
वांग्याची भाजी, मसूराची भाजी, फणसाची भाजी यात ते घालतात किंवा त्याची स्वतंत्र भाजीही करतात.

पण हा झाला हौसेचा भाग. खरी मागणी असते ती मोठ्या गरांना. या काजूगरांचे ढीग आजरा, शंकेश्वर इथल्या
बाजारपेठेत दिसतात. त्यांना अगदी कमी भाव मिळतो. कारण त्यातून गर काढायची प्रक्रिया फार किचकट असे. माझे काका एक कारखाना चालवत. त्यात या बिया योग्य तपमानाला भाजाव्या लागत. मग त्यावर लाकडाने अगदी नेमका फटका मारुन शक्यतो अखंड काजूगर काढावा लागे. हे काम हातानेच करत आणि काळजी घेऊनही, नेमका भाजलेला आणि अखंड गर फारच कमी प्रमाणात हाती लागत असे.

सध्या मात्र वेगळ्या तंत्राने (स्टीम ) हे काजूगर काढले जातात. त्यामूळे सध्या आपल्याला टप्पोरे आणि शुभ्र काजू मिळतात. काजूची लागवड आफ्रिकेतही आहे. केनयात मोंबासाजवळ आहे आणि अंगोलातही
समुद्रकिनार्‍यालगतच्या प्रदेशात आहे. पण या लोकांना हे गर काढायचे तंत्र अवगत नाही.

नायजेरियातले लोक मात्र या कामात पटाईत आहेत. तिथे बिया भाजूनच गर काढतात पण तो फार चवदार असतो. तिथे दारूच्या ( रिकाम्या ) बाटल्यात हे गर भरून विकायला आलेले असतात. या बाटल्या सीलबंद असल्याने त्यातले गर शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात.

माझ्या आजोळी पण हौस म्हणून आम्ही बिया भाजत असू पण चुलीत किंवा शेकोटीत बी भाजायला टाकल्यावर ती पेट घेऊन कधी उडेल ते सांगता यायचे नाही. त्यामूळे आजी आजोबा, मला फार जपत.
आणि भाजूनही नीट गर काही हाती लागत नसे.

पण काकांचाच कारखाना असल्याने घरी भरपूर काजू येत. आम्ही असेतो सगळ्या भाज्यांत ते असतच शिवाय,
नारळाच्या दूधात वाटलेले काजू घालून, मोठी काकी खरवस करत असे. अप्रतिम चव असे त्याला.

मी अर्थातच कधी फेणी चाखली नाही, पण काजूच्या बोंडाचा ताजा रस मात्र अनेक वेळा प्यायलो आहे. हा रस चवीला खुपच छान लागतो पण तो स्फोटक असतो. तो भरलेली बाटली, थोडावेळ उन्हात ठेवली, तर त्याचे झाकण शँपेनच्या बाटलीच्या झाकणाप्रमाणे उडून जाते. याच बोंडांचा बाटलीबंद ज्यूस देखील मी प्यायलो आहे. कुठल्याश्या कोकण महोत्सवातच तो होता. पण नंतर कधी बाजारात दिसला नाही.

आम्ही लहानपणी मालवणला समुद्राच्या पाण्यात हि फळे कापून टाकत असू. मग ती खाल्ल्यावर खुप गोड लागत असत आणि मुख्य म्हणजे गळ्याला खाजत नसत. त्या काळात मालवणच्या किनार्‍यावरचे प्राणी, पारदर्शक स्वच्छ होते.

आमची कुर्गी शेजारीण काजूची बोंडे उकडून त्याचे भरीत करत असे.
झाडाखाली पडलेल्या बिया एकदोन पावसानंतर रुजतात त्याचा उल्लेख मी केला आहे. अशा मोड आलेल्या बियांची उसळही फार चवदार लागते. ती वेचणे मात्र फार जिकीरीचे असते.

दिनेशदा माझं बालपण जागवलत. Happy
मग फळ वाढू लागते ते पण वेगळ्या तर्‍हेने. आधी बी मोठी होते आणि मग त्या बीचा देठ फुगीर होऊ
लागतो आणि त्याचे फळात रुपांतर होते. आधी हिरवे पोपटी असणारे हे फळ कालांतराने लाल / पिवळे होते.
हे दोन्ही रंग एकाच झाडाच्या फळात दिसतात. >>>>>>>>>खूप वेळा आम्ही काजू हिरवा असतानाच काढायचो. मग बोंडूचा आकार वेगळाच व्हायचा. काजूची रिकामी जगा पण तो भरून काढायचा. पण असे फळ फारच केविलवाणे वाटायचे मला.:अरेरे: मग मी हा उद्योग सोडून दिला. Happy

आम्ही पण या काजूबिया हिरव्या असताना आणि भाजूनही खाल्लेल्या आहेत. हात तर फारच शोभिवंत झालेले असायचे. आम्ही बोंडू पण खायचे. काही झाडाचे बोंडू फार चविष्ट असायचे. साधारण साखरेच्या चवीचे होते. ते आम्ही खायचो. गेल्या वर्षीच काकूकडे गेलो होतो. तर तिने मुद्दाम आमच्या साठी बोंडू ठेवले होते. Happy

झाडाखाली पडलेल्या बिया एकदोन पावसानंतर रुजतात >>>>>>>अशा बिया दोन भागात वर यायच्या.(रोपावर) मग आम्ही त्या पण खायचो. जराशा तुरट लागायच्या. पण आम्हाला आवडायच्या. एक पाऊस पडून गेला की आमची काजूच्या झाडाखाली शोधमोहीम सुरू व्हायची. उसळ मात्र अजूनही खाल्ली नाही. Uhoh कित्ती मज्जा करायचो आम्ही. आता फक्त आठवणी. Sad

प्रज्ञा, काय काय आठवतय अजून? Wink

दिनेशदा, आमच्याकडचे बोंडू , तुमच्या फोटोतल्या पेक्षा खूपच छान असायचे. आकाराने, रुपाने, आणि अर्थात चवीने पण. Happy

शोभा, हे इथले अंगोलातले.. कोकणातले नव्हेत. ती सर कुठली यायला ? पण आठवणी तर येणारच ना !
आपल्याकडे या झाडावर लाल मुंग्या पण फार असतात. अनेकवेळा प्रसाद मिळालाय !

काजू म्हटलं की बर्‍याच लोकांना बी आठवते..मला बोंडू आठवतात..इतके आवडतात मला हे.. Happy
कोंकणीत 'मुट्टे' म्हणतात यांना..
आम्ही यांना मीठ लावून खातो.. कदाचित तो समुद्राच्या पाण्यात टाकण्याला पर्याय असावा.. मी तसेच झाडावरून काढूनही खाऊ शकते म्हणा.. Happy

<<<हे दोन्ही रंग एकाच झाडाच्या फळात दिसतात. >>>
हे मला माहीत नव्हतं पण..मी लहानपणापासून वेगवेगळी झाडं बघितली आहेत दोन्ही रंगांची..अगदी माझ्या घरची आत्ताची झाडंही तशीच आहेत. दोन लाल,एक पिवळं..

पिवळा काजू रसदार असतो.. काजूचं भरीत करण्यासाठी शक्यतो पिवळा काजू कच्चा असताना वापरतात..लाल असतो अगदीच मरतुकडा..पण चव त्याची चांगली..
काजूचा ताजा रस म्हणजे आमची 'नीरा'.. ताडाची नीरा मला माहीतही नव्हती..कपड्यांवर चांगलेच डाग पडतात तिचे.. Happy
कुजवलेल्या काजूची फेणी बनते. त्या प्रक्रियेसाठी वापरली जाणारी यंत्रणा बघण्यासारखी असते..
एकुणच काजूचे बोंडू हे भारी प्रकरण आहे..

दिनेशदा, काजूची माहिती मस्तच!! बर्‍याच गोष्टी माहीत नव्हत्या.

इथे वन डे एके दिवशी फॉक्सेसचा कोल्हा...गार्डनच्या बागेमधे फिरायला गेला हा खेळ चाल्लाय वाट्टं!! Happy

अबोली, खुप जणांना ही फळे खायची असतात हे पण माहित नसते.
शांकली, याची चव सर्वाना आवडलेच अशी नसते. तरीपण एकदा खाऊन बघायलाच हवीत. मुंबईत असतात विकायला, पुण्यात नाही बघितली कधी.

मी आफ्रिकेत आल्यापासून, झाडाला लागते ते फळ, अशी व्यापक व्याख्या केली, त्यामूळे खुप वेगवेगळ्या चवीची फळे चाखता आली. फळे म्हणजे गोड, हे समीकरणच इथे निकालात काढले आहे या लोकांनी.
आंबट / कडसर चवीची फळे पण आवडीने खातात.

र्‍हुबार्ब ( विठाई मालिकेत आहे ) हा तर ( अळूसारख्या ) एका झाडाचा देठ. पण सर्वजण त्याचा उल्लेख फळ म्हणूनच करतात. मस्त गुलाबी रंग आणि स्वाद यासाठी तो खाल्ला जातो. चवीला खुप आंबट असतो त्यामूळे
भरपूर साखर घालावी लागते. त्याचे जॅम, सलाड, आईस्क्रीम असे बरेच प्रकार करतात.

मस्तच माहिती मिळाते आहे काजूची.
दिनेशदा, म्हणजे काजू आपल्याकडचा नाही का?

माझीही भर काजूपुराणात ... हे काही फोटो. Happy
काजूचं झाडः

फुलं:

हे बाळकाजू:

हा जवळजवळ तयारः

काजूच्या कारखान्यातले फोटो -

उकडलेले काजू:

उकडलेले काजू एक एक करून फोडतांना:

काजू भाजायची भट्टी:

हो काजू ( तसेस बटाटा, मिरची ) पोर्तुगीजांनी आणले. . पण फोटो दिले ते छानच झाले. अनेकांना हि कल्पना नसते.

काजुपुराण्..........फारच रंगतदार झालंय! दिनेशदा, तुम्ही असं काजूं-आंबे वगैरे विषायी बोलायला लागलात की खरंच कधी कधी वाटतं 'का आपण मोठे झालो? ह्या सर्व बालपणीच्या आनंदाला मुकावं लागलं. नंतर पुण्यात आल्यावरचा काळ ईतका अक्षरक्षः वाघ मागे लागल्यासारखा गेला. आता थोडं थांबून विचार करावा म्हटलं तर आपण काय काय गमावलं ह्याचीच यादी एवढी वाढत जाते कि असं वाटतं नकोच तो विचार करणे. पण एक मात्र खरं मुलांना हा निरागस आनंद, हे निसर्गमय वातावरण अनुभवता येत नाही ह्याचे वाईटही वाटते.
शोभा, अगं मला काय आठवत नाही? जे मी लिहायचे ठरवत होते तेच सर्व नंतरच्या पोस्टमध्ये तू लिहलंयस ! मला ते पावसाळ्यात चुलीत काजूबिया भाजणे, त्या फोडून खाणे सर्व आठवते. त्या काजू भाजताना येणारा खमंग वास तर मी आताही अनुभवतेय.
<<<नायजेरियातले लोक मात्र या कामात पटाईत आहेत. तिथे बिया भाजूनच गर काढतात पण तो फार चवदार असतो. >>> नायजेरियातीलच का? आम्ही पण एकदम पटाईत होतो. त्यावेळी आमच्याकडे कॅमेरा नव्हता म्हणून नाहीतर पुराव्याने शाबीत केले असते Wink
Proud
दिनेशदा, तुमच्यी लिखाणात दुसर्‍यांचे मनातले विचार अगदि सहजपणे उतरवण्याचे, आणि वाचणार्‍याला 'अरे मला तर अगदि हेच म्हणायचे होते' असे वाटायला लावण्याची विलक्षण हातोटी आहे.

दिनेशदा, गौरी छान माहीती.

ह्यांनी कट्टी घेतली आहे.

खरच छान चाललय काजू पुराण. गौरी छान फोटो
दिनेशदा मस्त माहिती देताय
जागु कट्टी फू छान आल्ये...

खरं मुलांना हा निरागस आनंद, हे निसर्गमय वातावरण अनुभवता येत नाही ह्याचे वाईटही वाटते.>>>> अगदी खरं

Pages