निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबोली, या फुलाबद्दल मी एक लेख लिहिला होता. हे फुल बरेच लब्बाड असते. ते पिवळे पुंकेसर आणि परागकण चक्क फसवे असतात. खरे परागकण अगदी आत असतात.

जिप्स्या, पुण्याला कधी जातो आहेस ? शांकली दाखवेल त्या सगळ्या फुलांचे फोटो काढ एकदा. पुणे विद्यापिठ, एम्प्रेस गार्डन मधे बरेच नवे काहीतरी मिळेल. कात्रजच्या घाटातपण काही वेगळी झाडे आहेत.

जिप्स्या, पुण्याला कधी जातो आहेस ?>>>>>मी या महिन्याच्या शेवटी रजा टाकली आहे (२७ ते ३१ मार्च - पाच दिवस Happy ), शिल्लक सुट्ट्या संपवण्यासाठी (कोण म्हणतंय रे कि इतकं भटकुनही रजा शिल्लक कशा त्या?). शशांक/शांकली २९/३० मार्चला जमेल का?

धमाल चालली आहे ईथे. दोन आठवड्यानंतर आले. लग्नाच्या गप्पा मस्त. सगळयांच्या फोटोतून फुललेला वसंत तर फारच छान.

जिप्स्या तू काय जादूच्या कांड्या फिरवतोयेस्...तुझे फोटोसोडून इतर सर्वांचे फोटो व्यवस्थित दिस्तायेत मला Angry Sad Uhoh भ्या!!!!!!!
अर्री हिन्दी चीनी भाई भाई है ना...मला पण दाखव की फोटोज...

ओक्केओक्के...दिसले दिसलेसर्व आता..
मुरुड शेंग किती गोड आहे शेप... आणी ती ब्यूटी अळी... शेमट्,पांगारा,वाळा..वॉव्..अमेझिंग
वाळा आजतोवर वाळक्या स्थितीतच पाहिलाय्.लहानपणी उन्हाळ्यात मोठमोठे कूलर्स घरी असायचे त्यांच्या पाठीवर बांधलेला सुवासिक वाळा,उन्हाळ्याच्या सुट्टीत काढलेल्या दुपारच्या झोपांना अजून वास आहे त्याचा शिल्लक...

जिप्सी - अरे त्या उक्षी, शेमट च्या पानांचे, झाडांचे लांबून / जवळून असे सर्व फोटो टाक ना इथे.... कधी चुकून माकून दिसलंच तर ओळखणार कसं मग ? मी नावालाच साने मॅडमचा विद्यार्थी आहे - झाडं ओळखण्यात तुम्हीच सर्व "दादा" (आणि दादीही.. Wink Happy .. ) लोकं आहात ......

जिप्सी - अरे त्या उक्षी, शेमट च्या पानांचे, झाडांचे लांबून / जवळून असे सर्व फोटो टाक ना इथे>>>>शशांक, ते फोटो विक्रमने काढलेत. या शनिवारी/रविवारी जाईन येऊरला तेंव्हा नक्की पानांचे/झाडांचे फोटो काढेन. Happy

नक्की पानांचे/झाडांचे फोटो काढेन. >>> नुसतेच असे फोटो नको तर वैशिष्ट्यपूर्ण काही असेल - खोड, पानांची/ फांद्यांची रचना वगैरे तर त्याचेही टाक - मागे मी कहांडोळ चे फोटो टाकले होते त्याचे खोड एकदम निराळे आहे - ते बघूनच शांकलीने ओळखले व त्याचे स्पेशल फोटो काढ असं सांगितलं होतं (ही सर्व डॉ. डहाणूकर कृपा...)
किंवा सिसमच्या / शिसवीच्या पानांची नागमोडी रचना हे सर्व ते झाड नेमकं ओळखायला मदत करतात...... (हुश्श... मी दमलो.. शांकली असती तर तिने तुला अशी दहा-बारा उदाहरणे झटक्यात सांगितली असती व दिनेशदांनी तर एक पानभर.....)

जिप्स्या, वसंताची चाहूल जाणवलीच काय पण अगदी अनुभवायला येतिये! फार सुंदर फोटो!!

अबोली (पिशी) ऊर्फ विहीणबाई... फुलाला रिंधा म्हणतात. फार सुंदर रंग अस्तो यांचा आणि पानं सँड पेपर सारखी खरखरीत असतात. पण हे झुडुप प्रकारातलं आहे. याचं रान माजलं होतं...अगं ही रोपं जगताप नर्सरी वाल्यांकडे खूप महाग मिळतात. तू चालू कर नर्सरी!! Happy

मानुषी अ‍ॅडेनियम काय बहरलंय गं!! मस्त!!

जागू, मांजराचा फोटो अगदी समयोचित टाकलास हं!! Wink

<<<.अगं ही रोपं जगताप नर्सरी वाल्यांकडे खूप महाग मिळतात. तू चालू कर नर्सरी!! >>>
हुंडा द्यायचाय ना जबराट..त्याची तयारी म्हणून करायला हरकत नाहिये खरंच.. Wink

सुप्रभात!!

स्वयंपाकघरासमोरचे गुलमोहराचे झाड पूर्ण निष्पर्ण झाले आहे. नुसत्या काटक्या फांद्या आणि जुन्या शेंगा आहेत. सकाळी सकाळी बरेच पक्षीगण या झाडावर आले होते. कोकिळ, कावळे, चिमण्या, बुलबुल, शिंपी तर नेहमीचेच पण कोतवाल आणि हळद्याची जोडी होती. हळद्या तर फारच छान गात होता. निष्पर्ण झाडामुळे सगळे पक्षी दिसले. एकदम प्रसन्न वाटले.

are va paus. pan ha paus aambyacha mohor kharab karato.

मानुषी सुर्रेख रंग आहे फुलांचा..
इथे कालपासून पावसाची रिपरिप सुरुये... थंडीही वाढलीये Uhoh

pan ha paus aambyacha mohor kharab karato.<<< हो नां, तिच तर भिती वाटतेय, द्राक्ष आणि आंबे

स्वयंपाकघरासमोरचे गुलमोहराचे झाड पूर्ण निष्पर्ण झाले आहे. नुसत्या काटक्या फांद्या आणि जुन्या शेंगा आहेत. >>>>>>हेच अगदी माझ्याकडंच वर्णन. Happy

स्वयंपाकघरासमोरचे गुलमोहराचे झाड पूर्ण निष्पर्ण झाले आहे. नुसत्या काटक्या फांद्या आणि जुन्या शेंगा आहेत. >>>>>>हेच अगदी माझ्याकडंच वर्णन. Happy

मला एक सांगा, गुलाबाच्या फ़ुकांचे मांजराच्या पिल्लात कसे रुपांतर झाले? की मलाच तसे दिसतेय? Uhoh Lol

मांजरांनी टेकोवर केले Happy

इथले मांजरवर्णन पाहुन जागूच्या घरचे मांजर म्हणाले, इतरांची मांजरे राहुदे बाजुला, आधी मालकिणबाईंच्या मांजराचा नंबर पाहिजे, मला टॉपला टाकायलाच हवे, नाहीतर तुमचे लक्ष चुकवून मी राधाच्या वाटणीचे दुध पिऊन टाकेन, मग बसा मायबोली बघत............. मग काय करणार मालकिणबाई, दिला आपल्या मांजरीला टॉपचा फोटो.

'मला एक सांगा, गुलाबाच्या फ़ुकांचे मांजराच्या पिल्लात कसे रुपांतर झाले? की मलाच तसे दिसतेय''
Lol शोभे!!! हा सर्व साधनाच्या एस चा परभावे Happy

आमच्या एसला सगळ्याच गोष्टींची भिती वाटते. त्यामुळॅ लग्नात नवरी, करवल्या आणि व-हाडी मिरवताहेत आणि नवरा नवरीच्या खुर्ची खाली लपलाय असे दृष्य दिसेल.
>> 'बायकोच्या ताटाखालचे मांजर' हा वाक्प्रचार मराठीत आहे. आता या लग्नानंतर 'बायकोच्या खुर्चीखालचा बोका' असा वाक्प्रचार येईल. Happy

सर्वांना धन्यवाद!
अग्गोबाई.....जागू ..........ही कोण करवली का?.........जे शोभाला गुलाबाच्या जागी दिसतंय तेच?

Pages