निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
धन्स शांकली. हल्ली बुलबुल चे
धन्स शांकली. हल्ली बुलबुल चे जोडपे परत आमच्या झुंबरांवर आपल्या घराचा प्लॅन काढायला येताहेत.
तुझं झुंबर त्यांना आंदण
तुझं झुंबर त्यांना आंदण म्हणून देऊनच टाकलंयस ना तू!! म्हणून ते हक्काने येतात!!
जागू, श्रावणीसाठी ( आणि इतर
जागू, श्रावणीसाठी ( आणि इतर सर्वांनी लाहानग्यांसाठी ) हा प्रयोग कराच.
एखाद्या झाडावर किंवा एखाद्या अळूसारख्या मोठ्या पानाला पूर्णपणे कव्हर करेल अशी पारदर्शक प्लॅस्टीकची पिशवी घ्यायची. ती साधारणपणे चोवीस तास झाडावर बांधून ठेवायची ( सैलसर ) दुसर्या दिवशी त्या पिशवीत किती पाणी जमा होते ते बघायचे.
आपल्याला कल्पना येत नाही एवढे पाणी त्या पिशवीत जमा होते. हे पाणी अर्थातच पानाने बाहेर सोडलेले असते. जसे थंड हवामानात नदीच्या पाण्यावर धुके जमा होते तसे शेतावरही होते. हे धुके वरुन "पडलेले" नसते तर झाडांनीच निर्माण केलेले असते.
यावरुन एक गोष्ट सिद्ध होते, निसर्गात हे पाणी ( म्हणजे जर प्लॅस्टीकची पिशवी नसेल तर ) आभाळात जाते. आणि त्याचेच ढग बनतात. रेनफॉरेस्ट मधला पाऊस हा नेहमीच समुद्रावरुन आलेल्या ढगांचा नसतो तर त्यात झाडांचाही सहभाग असतो. म्हणून जंगले कमी झाली तर पावसाचे प्रमाणही कमी होते.
दिनेशदा.....खूप चांगला
दिनेशदा.....खूप चांगला प्रयोग!
काल लुई तगरीची खालची खालची पानं खात होता. मी तरी हे खाताना त्याला प्रथमच पाहिलं. एरवी गवत वगैरे खातोच.
सध्या एडेनियम ,जास्वंदी तगरी, कर्दळ, गुलाब मस्त फुललेत. कडूलिंबालाही मस्त मोहोर आलाय.
मला मदत हवी आहे. मला काही
मला मदत हवी आहे. मला काही वेली लावायच्या आहेत. तर कुंडीमध्ये ते रोप कसे लावावे? म्हणजे आधी खाली माती, मग ते रोप, मग परत माती असे, की आणखी काही. माती कोणती वापरावी? खत कोणते टाकावे? आणी केव्हा? याची माहिती मिळेल का?
आधी कुठेतरी ही चर्चा वाचल्याचे आठवत आहे. पण सापडत नाही.माझ्याकडे जाई, रातराणी याचे वेल आहेत. बॉट्लब्रश, दुरांडा ही रोपे आहेत. बॉट्ल ब्रश मोठा झाला की मग जमिनीत लावायचा आहे.
स्वाती आम्ही कुंडीत आधी
स्वाती
आम्ही कुंडीत आधी सगळ्यात खाली नारळाच्या छान पिंजलेल्या शेंड्या पसरतो, एखादा विटेचा छोटा तुकडाही तळाशी ठेवला तर त्यात पाणी शोषलेले रहाते. . मग त्यावर थोडे घरचेच खत.मग त्यावर माती असा सीक्वेन्स अस्तो.
आता माती म्हणशील तर माझ्या घराला अंगण आहे. तिथलीच माती मी वापरते. आणि अधून मधून घरच्याच ओल्या कचर्याचे खत त्यात टाकते.
खास ऐशुच्या आग्रहावरुन इथे
खास ऐशुच्या आग्रहावरुन इथे एसपुराण लिहित आहे.
बोलता बोलता एस मोठा झाला, त्याला लग्नाची मागणी येऊ लागली. घरासमोरच एका मांजरीच्या दोन जवान मुली आहेत, त्यांच्यासाठी बोलणी करण्यासाठी ती रोज आमच्या दारात येऊन प्रेमळ आउ - आऊ करत बसायची. एस ट्रामटाईज्ड असल्याने त्याला आम्ही सोडुन अजुन इतर कुठल्याही माणसा-प्राण्यांची भिती वाटते. त्यामुळे ती बया आली की हा लगेच घरात घुसून लपुन बसायचा. शेवटी हे स्थळ आम्हाला नाकारावे लागले. दरम्यानच्या काळात एस गच्चीवर जाऊन बसायचा. तिथुन त्याला ह्या दोन कन्यका रोज दिसत असत. त्याने मग त्याच्या बाजुने त्यांच्याशी डायलॉग सुरू केला. हा गच्चीवर आणि त्या दोघी खाली रस्त्यावर असा संवाद चालु झाल्यावर त्या आवाजाने ऐशुला इरिटेट व्हायला लागले. शेवटी नुसताच संवाद, पुढे काही नाही हे पाहुन त्या दोघींनी एसचा नाद सोडला आणि दुसरीकडे घरोबा केला.
हल्ली एसचे ह्रुदय पुर्णपणे तुटले असुन गेले तिन दिवस त्याने गच्चीची पहिली पायरीची चढण्याचे नाकारले आहे. 
इती एसपुराण समाप्त (हुश्श्.....)
सगळ्यांचे फोटो एकदम मस्त.....आणि कमेंट्स पण...
साधने !..............
साधने !..............:हहगलो:
साधना हे पुराण आत्तापुरतं
साधना हे पुराण आत्तापुरतं समाप्त आहे. पुढेही काही एपिसोड होतीलच ना! इथे सांग बरं!
साधना,
साधना,
हि पांढरी सावर. (फेसबुकवर एका
हि पांढरी सावर. (फेसबुकवर एका मित्राने टॅग केली होती. :-))
जागू, मस्त आलेत गव्हांकुर.
जागू, मस्त आलेत गव्हांकुर.


साधने,
जिप्स्या, पांढरी सावर छानच दिसतेय.
पांढरी सावर. >>> पहिल्यांदाच
पांढरी सावर. >>> पहिल्यांदाच पाहिली - धन्स रे जिप्सी....

(कदाचित अंजूने दाखवलीही असेल कधी तरी - पण एवढं कुठलं लक्षात राह्यला ????)
दिनेशदा, मागच्या एका पानावर
दिनेशदा, मागच्या एका पानावर तुम्ही गुलाबी केळफुलाविषयी उजुला विचारले होते.
विक्रम (ज्याच्याविषयी मागच्या भागात सांगितले होते) त्याच्या एका मित्राने ठाणे, कोपरीजवळ महानगरपालिकेची बाग जोपासली आहे. यात त्याने विविध प्रकारची झाडे (औषधी, दुर्मिळ) लावली आहे. रविवारी भांडूप पम्पिंग स्टेशनला फ्लेमिंगो पहायला जाऊन आल्यावर त्याच्या बागेत गेलो होतो. भरपूर फोटोज काढले आहे. जसा वेळ मिळेत तसे फोटो आणि माहिती इथे नक्कीच शेअर करेन.
त्याच बागेतील हे गुलाबी केळफुल:

(कदाचित अंजूने दाखवलीही असेल
(कदाचित अंजूने दाखवलीही असेल कधी तरी - पण एवढं कुठलं लक्षात राह्यला ????) स्मित>>>>>>>>>>>..हे वाचल्यावर शांकली, झापणार मग तुम्हाला.
.हे वाचल्यावर शांकली, झापणार
.हे वाचल्यावर शांकली, झापणार मग तुम्हाला. स्मित >>>>> बिचारीला कळतही नाही मग किती किती गोष्टींकरता झापायचं ते - दोन मुलींसारखाच एक अजून मुलगा आहे आपल्याला म्हणून सोडून देते झालं .... (त्यातही सा. बांनी ओटीत घातलेला म्हणून सांभाळते असंही सांगते मग.....)

आता लग्नाला २५-२६ वर्षे झाल्यावर कोण काय म्हणतो (बायको नवर्याला व नवरा बायकोला) हे कुठवर लक्षात ठेवणार ???
ही फुले कसली आहेत ते ऑळखलेच
ही फुले कसली आहेत ते ऑळखलेच असेल.
काल महा-शिवरात्री निमित्त चास-कमान ला गेलो होतो तेव्हा घेतलेले फोटो
पाठीमागे मका आणि हिरवे गार विलायती गवत

बेलवांगी (चेरी टॅमेटो )

अडुळसा

शशांकजी (झापण्याचा एक नमुना
शशांकजी
(झापण्याचा एक नमुना आम्हीही पाहिलाय म्हटलं. तेव्हाच तुमच्या दोघांच्या तब्बेतीच रहस्य उलगडलं .
) शांकली
घेच. 

व्वा! सश्या, फोटो मस्तच. खूप वर्षानी अढूळश्याच फूल पाहिल. विसरूनच गेलेल होते. कस असत ते. (आता मार मिळणार)
मस्त फोटो आहेत रे स्_सा /
मस्त फोटो आहेत रे स्_सा / पुरुषोत्तमा ......
अडुळसा - : Justicia betonica Family: Acanthaceae (Barleria family)
अबोली -: Crossandra infundibuliformis Family: Acanthaceae (Barleria family)
दसमुळी -: Eranthemum roseum Family: Acanthaceae (Barleria family)
गुलशाम/ नीलमुळी -: Eranthemum pulchellum Family: Acanthaceae (ruellia family)
या सर्वांची फुलं कशी सारखी आहेत पहा .......
कडुनिंबाची फुलं पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिली - काय सुवास असतो मस्त ...
शोभा - तुमच्या दोघांच्या तब्बेतीच रहस्य >>>> आम्ही दोघंही अगदी तब्येतीत असतो बघ....
जागू, मस्त आलेत गव्हांकुर.
जागू, मस्त आलेत गव्हांकुर. कोबीही रसरशीत


साधने, काय हे
जिप्स्या, पांढरी सावर छानच दिसतेय.
पंपींग स्टेशनाबद्दल बोलायला फोनते तुला.
शशांक, आज शांकली आरती घेऊनच उभी असेल दारात
जिप्स्या, त्या झाडाचा पुर्ण
जिप्स्या, त्या झाडाचा पुर्ण फोटो पाहिजे.
केळीचा तो मूळ वाण आहे. यात केळफुल आभाळाकडे तोंड करुन असते आणि केळी पण वरच्या दिशेनेच असतात. तूझ्या फोटोत एक मधमाशी पण दिसतेय.
पुढे केळीचे वजन आपण वाढवले आणि बिया नाहीशा केल्या. त्या वजनाने केळीचा लोंगर खाली झुकलेला दिसतो. सध्या त्याचे परागीवहन वटवाघळे करतात. त्यांना आकर्षून घेईल असा किरमीजी रंग आणि उग्र गंध त्याला लाभलाय.
ससा, मी पण काल कडुनिंबाची फुले टिपली होती. आमच्या कडे गेल्या हंगामातल्या पिक्या निंबोण्या आणि तुरळक फुलोरा, दोन्ही सध्या झाडावर आहेत.
या आमच्याकडच्या मिरच्या.
या मध्यम तिखट असतात. ( मी हाताळू शकेन अशा ! )
साधना, जीव कळवळला अगदी एसची
साधना,
)
जीव कळवळला अगदी एसची कहाणी वाचून. ( त्याचे नाव सलमान ठेवायचे का ?
स.सा., जिप्सी मस्त फोटो.
स.सा., जिप्सी मस्त फोटो.
जिप्स्या, त्या झाडाचा पुर्ण
जिप्स्या, त्या झाडाचा पुर्ण फोटो पाहिजे.>>>>नक्की. वेळ मिळाल्यावर जाऊन येतो पुन्हा एकदा. रच्याकने, हे झाड आपल्या नेहमीच्या केळीच्या झाडापेक्षा थोडे बारीक होते.
जिप्सी,स_सा,जो_एस सगळे फोटो
जिप्सी,स_सा,जो_एस
सगळे फोटो मस्त आहेत !
शशांकजी,
छान माहिती !
शोभा१२३,
खरंय !
दिनेशदा,

मिरच्या छान (मध्यम तिखट) आहेत.
या मिरच्या पाहुन मला लवंगी मिरच्या आठवल्या, पुर्वी पान मळ्यात याची काही झाडे हमखास दिसायची,मी गम्मत म्हणुन नुसत्या २-३ मिरच्या खायचो पण नंतर डोळ्यातुन पाणी आणि धुर यायचा,मग लगेच पेरु,ऊस,पान खाऊन उतारा व्हायचा
जीव कळवळला अगदी एसची कहाणी
जीव कळवळला अगदी एसची कहाणी वाचून. ( त्याचे नाव सलमान ठेवायचे का ? )
नको, मी सलमान प्रेमी आहे... पण एसप्रेमी नाही..
आता एसचा विषय निघालाच तर ऐशूने या वर्षभरात केलेली निरिक्षणे देतेय. मला मांजरांबद्दल ही माहिती नव्हती.
एस दिवसभर ऐशुच्या अभ्यासाच्या टेबलावर झोपलेला असतो, तो झोपेत चक्क बोलतो म्हणजे आउ-आउ असे मार्जारभाषेत बोलतो आणि चांगली लांबलांब वाक्ये बोलतो. कित्येकवेळा त्याचे पुढचे पाय तो जोरात धावत असल्यासारखे हलत असतात, जणु वेगात धावतोय. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे तो चक्क घोरतोही. मी हे प्रत्यक्ष पाहिल्याने माझा विश्वास बसला नाहीतर खरेच विश्वास ठेवला नसता.
मांजर किंवा इतर प्राण्यांना स्वप्ने पडतात का याबद्दल मी कुठे वाचले नाही पण ऐशूने वर्षभरातल्या निरिक्षणांवरुन निदान मांजराना तरी नक्कीच स्वप्ने पडतात हा निष्कर्ष काढलाय.
साधना, तुमचा हा एस कसा दिसतो,
साधना,
तुमचा हा एस कसा दिसतो, ते पाहु द्या एकदा !
साधना, खुप छान निरीक्षण आहे
साधना, खुप छान निरीक्षण आहे हे. कधी कधी लहान मुलेही झोपेत दूध प्यायल्यासारखे ओठ हलवतात.
पण त्याला लवकरच मैत्रिण मिळो. त्याच्या मानसिक आरोग्यासाठी गरजेचे आहे ते.
अनिल, तेवढ्या तिखट नाहीत या. आणि या झाडावर वरच्या दिशेने लागतात. देठ फार ताठ असतो. आपल्याकडच्या कशा खालच्या दिशेने वाढतात. तशा नाहीत. आपल्या मिरच्या इथे मिळतच नाहीत.
कित्येकवेळा त्याचे पुढचे पाय
कित्येकवेळा त्याचे पुढचे पाय तो जोरात धावत असल्यासारखे हलत असतात, जणु वेगात धावतोय. >>>
मांजर किंवा इतर प्राण्यांना स्वप्ने पडतात का याबद्दल मी कुठे वाचले नाही पण ऐशूने वर्षभरातल्या निरिक्षणांवरुन निदान मांजराना तरी नक्कीच स्वप्ने पडतात हा निष्कर्ष काढलाय. >>>> नक्कीच स्वप्ने पडतात - आमच्याकडील मांजरीच्या निरीक्षणावरुन मी हे म्हणतोय - या मांजरांची रॅपिड आय मूव्हमेंट (REM ) व्यवस्थित कळते आपल्याला.
सध्या आमच्याकडे असलेली मांजरी सगळ्यांच्या "डोक्यावर" बसलीये पार ....
मात्र आमची मांजरी जागेपणी बोलते, झोपेत बोलल्याचे मी तरी अजून पाहिले नाही - अंजू /मुली यावर जास्त प्रकाश टाकू शकतील...
मागे मी एक लेख लिहिला होता - मांजरांचे घर (म्हणजे आमचेच) त्यात मांजरांची भाषा कळणार्या व्यक्तिचा उल्लेख होता - ती म्हणजे "शांकलीच" - तिला बरोबर कळते त्यांची भाषा...
मांजरांचे घर (म्हणजे आमचेच)
मांजरांचे घर (म्हणजे आमचेच) त्यात मांजरांची भाषा कळणार्या व्यक्तिचा उल्लेख होता - ती म्हणजे "शांकलीच" - तिला बरोबर कळते त्यांची भाषा...>>>>>>>>>>>.शशांकजी संध्याकाळच्या आरतीची तयारी का?
Pages