निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
अर्रे मला का दिसत नाहीयेत
अर्रे मला का दिसत नाहीयेत जिप्स्याचे आजचे फोटोज्???>>>>>>>>>>>वर्षू, तुला दिसू नये. अस काही तरी त्याने मुद्दाम केले असेल :काडी:
साधना, फ्लॉवर्स ऑफ
साधना, फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीचा तिसरा भाग पण आलाय.
तो संग्रह अप्रतिम आहे हे खरेय पण छपाई करताना काही रंग बदलले गेलेत.
जिप्स्याच्या फोटोतले लाल फुल त्यात ( पहिल्या दोन भागात तरी ) बघितल्याचे आठवत नाही.
आणि एसचं जमलं तर पत्रिका पाठवायची बरं का !
आणि एसचं जमलं तर पत्रिका
आणि एसचं जमलं तर पत्रिका पाठवायची बरं का !>>>>>>>>>>तुम्ही येणार का लग्नाला.
धन्यवाद मंडळी आता हे घरातले
धन्यवाद मंडळी
आता हे घरातले
जो_एस, तुमच्याकडे पण आहेत का?
जो_एस, तुमच्याकडे पण आहेत का?
जिप्स्या..शोभे...
जिप्स्या..शोभे... :रागः


जो-एस्...इतक्या वर चढून थेट घरट्यातलेफोटो कसे काढलेस?? वॉव...
किती ते दुसर्याच्या प्रायवसी वर एनक्रोचमेंट:
शोभे आलो असतो, पण जेवणावळ
शोभे आलो असतो, पण जेवणावळ अजिबात शाकाहारी नसेल ना, म्हणून फक्त अक्षता टाकण्यापुरता येईन.
जो, मस्त फोटो.. हे बुलबुल आता फारच धीट झालेले दिसतात. शिवाय त्यांना घरात कोकिळेची भिती नसते ना !
पण जेवणावळ अजिबात शाकाहारी
पण जेवणावळ अजिबात शाकाहारी नसेल ना, म्हणून फक्त अक्षता टाकण्यापुरता येईन.>>>>>>>>>>हो म्हणजे मलाही फ़क्त अक्षता टाकून याव लागणार.
शोभा, वर्षू नील, दिनेशदा
शोभा, वर्षू नील, दिनेशदा धन्यवाद
किती ते दुसर्याच्या प्रायवसी वर एनक्रोचमेंट>>>:D

सिंहगड रोडवर, शारदा मठ अशा
सिंहगड रोडवर, शारदा मठ अशा नावाचा काही मठ / आश्रम आहे का ? तिथे एक दुर्मिळ ऑर्किड ट्री आहे असे वाचले होते. ( ऑर्किड कूळात एकही झाड नाही. हे झाड आपट्याच्या कूळातलेच आहे.) फार सुंदर फुले असतात त्याची. या दिवसात फुलली असतील.
अनिलला माहीत असेल ती जागा.
अरे वा..पसंत पडली तर बिलू..
अरे वा..पसंत पडली तर बिलू..

घरी गेले की पाठवतेच पत्रिका वगैरे तुम्हाला..
दिनेशदा, धन्स ! पाहिल नाही पण
दिनेशदा,
धन्स !
पाहिल नाही पण एकदा चक्कर मारतो त्या रस्त्याने....
पहायला नक्कीच आवडेल ..
जो_एस,
हे दुर्मिळ,खास फोटो सहजा सहजी मिळाले नसतील..
अनिल फार सुंदर आहेत फुलं! आणि
अनिल फार सुंदर आहेत फुलं! आणि आधी वाटलं की बुलबुल, घरटं आणि पिल्लं म्हटल्यावर वाटलं की ही नक्की जागूची पोस्ट आहे.
पण नीट पाहिलं तर कळलं की हे काम जो एसचं आहे! जो एस ........मस्त आहेत फोटो!.
सर्वच फोटो मस्त!
आणि इथे काय "मार्जार मॅरेज ब्यूरो" काढला की काय?
आम्हालाही द्या पत्रिका.............काही जमलं तर!
अनिल, घाई नाही.. सावकाश
अनिल, घाई नाही.. सावकाश !
अबोली,
आमचा एस नेमका मूषक योनीतला असायचा
तसं असेल तर कठीण आहे
तसं असेल तर कठीण आहे दिनेशदा..आमची बिलू अजून अगदी पारंपारिक विचारांची आहे.. कर्मठ मार्जारकन्या एकदम.. भक्ष्य गोष्टी नावापुरत्याही शिल्लक नाही ठेवत..
:p
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, एसला पसंत पडली पाहिजे हो ती.. आधीच दोन सुंदरी नाकारल्या आहेत त्याने म्हणजे मला जरा काळजीच वाटली बघा.. :p
पण तरी,बघायला हरकत नाही..
जमवू या हो.. माझी तर कामाची
जमवू या हो.. माझी तर कामाची जबाबदारी पण वाटून झाली !
मंगलाष्ट्के शशांक रचतील, तर मांडवाची सजावट शांकलीकडे, फोटोग्राफी जिप्स्याची, हळद प्रज्ञाकडची,
मुंडावळ्या शोभाकडच्या, प्रमुख पाहुण्या, वर्षू नील असतील.
जेवणावळीसाठी माशांची निवड जागू करेल, पण ते करण्याची पद्धत मात्र अंबोलीचीच असेल.
शकुनापुरते शाकाहारी जेवण लागेलच, ते मी करेन, त्यासाठी भाज्या अनिलकडून येतील.
लग्नानंतर रिसेप्शनसाठी जो_एस रानावनातला खाऊ आणतील. चौघडा असेल लुई नगरकर यांचा.
शांकलीकडच्या मनीमाऊंना करवलीचा मान देऊ..... निमंत्रितांची यादी वर आहेच.
दिनेशदा..
दिनेशदा..:हाहा:
दा, तुम्ही वर म्हणालात ते
दा, तुम्ही वर म्हणालात ते ऑर्किड ट्री म्हणजे कांचनाचाच वृक्ष आहे. डार्क गुलाबी (किरमिजी) रंगाचा आहे तो कांचन. फुलल्यावर फार सुंदर दिसतो.
मानुषी, माहितीसाठी खूप खूप
मानुषी,
माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.
सिंहगड रोडवर, शारदा मठ अशा नावाचा काही मठ / आश्रम आहे का ? तिथे एक दुर्मिळ ऑर्किड ट्री आहे असे वाचले होते.>> हो आहे ना. राजाराम पुलाजवळ शारदा मठ आहे. त्याची ऑर्किडची फुले कशी दिसतात त्याचा फोटो/ लिंक देउ शकता का?
कांचनाची फुले असतात तशीच पण
कांचनाची फुले असतात तशीच पण त्यात गुलाबी आणि डार्क गुलाबी असे दोन रंग असतात त्यामूळे ऑर्किड ट्री म्हणतात. मला वाटतं हाँगकाँग ऑर्किड असे पण नाव आहे.
मी नैरोबीला बघितली होती, पण आपल्याकडे नाहीत फारशी.
दिनेशदा, स्वाती.. मी वर
दिनेशदा, स्वाती.. मी वर लिहिलंय या ऑर्किडबद्दल. तो कांचन आहे.
शांकली, धन्यवाद.
शांकली, धन्यवाद.
दिनेशदा, मला तर शशांकजी,
दिनेशदा,

मला तर शशांकजी, पेन- कागद घेवून मंगलाष्टका लिहायला बसलेत असेच दिसायला लागले
कामाची वाटणी आवडली.
वरील फोटो मस्त आहेत.
<<<<आधी वाटलं की बुलबुल, घरटं आणि पिल्लं म्हटल्यावर वाटलं की ही नक्की जागूची पोस्ट आहे.
पण नीट पाहिलं तर कळलं की हे काम जो एसचं आहे>>> मानुषी, माझीही अगदि सेम हीच गंमत झाली.
दिनेशदांनी कामांची वाटणी
दिनेशदांनी कामांची वाटणी किती छान करून टाकली..
:p


मी नवीनच आहे इथे.. एस-बिलू लग्नाच्या निमित्ताने सगळ्यांची ओळख होऊन जाईल..
ही आमची बिलू लहानपणीची..फोटो बघूनच घ्या..
अरे बापरे!! मुलीला "मिश्या"
अरे बापरे!! मुलीला "मिश्या" आहेत.

<<<अरे बापरे!! मुलीला
<<<अरे बापरे!! मुलीला "मिश्या" आहेत>>>

म्हणूनच फोटो टाकला..उगाच फसवणूक करायची आमची 'पालिशी' नाही.. :p
उगाच फसवणूक करायची आमची
उगाच फसवणूक करायची आमची 'पालिशी' नाही>>>>>:फिदी: हे बेस्ट आहे.

मुलीला मिशा !!
मुलीला मिशा !! .................:हहगलो:
उगाच फसवणूक करायची आमची 'पालिशी' नाही>>>>>>>>>>:हाहा:
जिप्सी, अरे मुलाचं काही
जिप्सी, अरे मुलाचं काही ऑब्जेक्शन नसेल तर ........................:डोमा:
हो ना प्रज्ञा एस बिलु राजी,
हो ना प्रज्ञा

एस बिलु राजी, तो क्या करेगा जिप्सीजी
Pages