फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅन्टा फे ऑपेरामधे एका ऑपेरात जलपर्‍या सदृश कॅरेक्टर्ससाठीची डोक्यापासून पायापर्यंतची सगळी ज्वेलरी कॉ डि च्या डिझाइननुसार मी बनवली होती. केवळ मोत्यांची ज्वेलरी. ज्वेलरीत मोत्याशिवाय दुसरं काही दिसता कामा नये असा प्रकार होता. मोत्यांची बरीच पौंडांची पुडकी संपवली होती. वेगळ्या प्रकारचे बाजूबंद, कपड्यावरून शिवायची ज्वेलरी... बरंच काय काय...
पूर्ण वेशभूषेचा गेटपच एकदम मस्त होता. अर्टे नावाच्या १९२०-३० दरम्यान प्रसिद्ध असलेल्या डिझायनरच्या स्टाइलवर आधारीत होता तो गेटप.
फोटो आहेत, सापडले तर स्कॅन करून टाकेन.

फोटो आहेत, सापडले तर स्कॅन करून टाकेन.>>

नक्की टाक. फॅशनमधे इंटरेस्ट नसला तरी असे वेगळे प्रयोग पहायला आवडतील.

मोकिमी जरूर ये, मी बनवून घेतलेलं देईन तुला. मग तर तुला दोन दोन मिळतील, एक कानातल्याचं आणि बांगड्यांचं.
हे प्रेझेंट आहे ना रचनाकडून ते ठेवून घेईन माझ्यासाठी. Happy

आहाहा... पर्ल्स मेरा वीकनेस... !!!
सुंदर आहेत सगळीच डिझाईन्स...
पँट्स पण मस्त आहेत.. सुपर स्टायलिश.. Happy

नॉरमली आपण जे मोत्यांचे दागिने विकत घेतो...जस एक मोत्याची सिंगल माळ माझाकडे आहे ती मी २ वर्षापुर्वी १००० रु ला घेतली होति......ते हैद्राबादी मोती असावेत...मग खरे मोती कसे असतात??? कल्चर्ड मोती काय प्रकार आहे??? की हैद्राबादी मोतीच खरे मोती असतात???

हैद्राबाद जवळ एक गाव आहे "चंदनपेट" म्हणुन. तिकडे सगळे लोक परंपरेने चालत आलेला पाणबुड्याचा व्यवसाय करतात. सगळेच "गोताखोर" त्यांना उपजत ज्ञान असतं ते कोणता शिंपला मोत्याचा ओळखायचं. हैद्राबादी पर्ल्स हे गोड्या पाण्यातले मोती आहेत. तिकडे जे मोती मिळतात त्यंची आणि समुद्रातल्या मोत्यांची जातकुळी वेगळी आहे. समुद्रातले मोती अजुन वेगळेच असतात. एकदम पाणीदार. हैद्राबादी मोती वेगवेगल्या आकारात असतात व शक्यतो मी वर दाखवले तसे थोडे चपटे असतात एका बाजुला. त्यांच्या वर संस्कारण पण बरच करायला लागतं... साधारणतः
चमकदार रंग जसे हलका मोतिया, पांढरा, काळा, नीळसर काळा, पिवळसर, हलका गुलाबी ह्या रंगात मिळतात. मोत्याचा आकार रंग हे सगळं त्या त्या शिंपल्याच्या जातीवर अवलंबुन आहे.

( वरील माहिती माझ्या हैद्राबादी दिरा कडुन मिळालेली आहे. ते तिकडे सी.ए. आहेत व अनेक पर्ल्स चे एक्स्पोर्टर्स त्यांचे क्लाएंट आहेत)

अनिश्का मागच्या पानावरचा नेकलेस मस्त. super like
मो की मी - माझ्या कडे आहेत दोन्ही. सिल्क साडी वर खूप मस्त दिसतात.
मला सध्या गोल मोत्यापेक्षा जरासे ओबड धोबड पाणीदार मोती खूप आवडतात. बघितले आहेत , पण घेणे झाले नाही. आता घ्यावेतच.

हैद्राबादी पर्ल्सचा माझा अनुभव काही चांगला नाही.
मागच्या महिन्यात गेले होते तर आमच्या गाईड ने ज्या दुकानात नेले होते तिथे काही स्पेशल नव्हते. पुण्यात मिळते तेच. पण भाव मात्र काहीही. कदाचित tourist म्हणून असेल.
नंतर तर त्या गाईडने पुण्याच्या laxmi pearls मध्ये नेले. कर्म माझ!!!
मला जे स्पेशल हटके हवे होते ते कुठेच दिसले नाही.
तेच तेच घ्यायचे असेल तर पुणेच बेस्ट असे म्हणून मी परत आले.

मुलींनो मला ठूशी चे डिझाईन्स सांगा
माझ्या आईला ठूशी प्रकार फार आवडतो
आणि मला ती गळ्याशी लागणारी ठूशी आजिबात आवडत नाही
चांगली पण नाही दिसत ती (वैम)
आता आईच्या वादिसाठी एक सर्प्राईज ठूशी घ्यावी हा विचार करतेय
मला गळ्यालगतच्या आवडत नाहीत सो त्या घेतल्याच नाही जाणार माझ्याने
तेंव्हा प्लिज वेगळ्या वेगळ्या डिजाईन्स सांगा मला

ठुशी ही गळ्यालगतच असते. गळ्यालगत नसलेल्या दागिन्याला हार, साज, माळ असं काय काय म्हणता येईल. ठुशी नाही.
गाडगीळांकडे एक ठसठशीत ठुशी बघितली होती एकदा. डिट्टो कोल्हापूरच्या आंबाबाईच्या गळ्यातल्यासारखी.
काय राजेशाही दिसते ती.

सध्या मोत्यांसाठी पुणे किंवा नाशिकमध्ये कुठे हमखास छान डिजाईन्सवाले सेट्स (गळ्यातले + कानातले + जमले तर हातातलेसुद्धा) मिळतात? तुमचे अनुभव सांगितले तर खूप मदत होईल.

अच्छा
मागे मी गाडगिळांकडे गेलेले तेंव्हा त्या बाईने मला ठुशी म्हणुन जरास काही तरी वेगळं दाखवलेलं
म्हणुन मला वाटलं त्यातही प्रकार असतील
बघते आता Sad

thushi.jpg
(छाचि नेटवरून )

हा प्रकार नाही आवडत मला
दुसरे डिझाईन्स असतात का यात?
(असा माझा प्रश्न आहे)

हो पण चांगलं नाही ना दिसत ते
मी घेतलेलं गिफ्ट घातल्यावर मला पण वाटलं पाहिजे ना की येस्स्स... मस्त दिसतय

रिया, कोल्हापुरात अजून एक दागिना पाहिला होता. अगदी गळ्याशीच असतो. पारंपारीक दागिनाच आहे. नाव समजलं. नीरजाने दिलेल्या लिंक मध्ये आहे. टीक म्हणतात त्याला. छान दिसते. मला तो फार आवडला होता.

Pages