फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्शे अगदि खर आहे ....अंग़काठी ठस्ठशित असेल तर दागिने अजुन चांगले भारदस्त दिसतात..

फ्यशन बद्दल बोलताय म्हणुन इकडे विचरतेय, कोणाला इकदे एथनिक ज्वेलरि घालयला अवदते? म्हन्जे तिपिकल पत्रकर किन्वा क्रियेटइव लोक घाल्तत तसे. मी advertising मधे असल्यने मल जामच अवद्त आहे. टुम्चि मते कै?

डायमंड सलुन पाचपाखाडी किंवा अजुन एक आहे गजानन वडापावच्या कॉर्न्ररला नाव विसरले.. डायमंड मध्ये मयुर गायकवाड मस्त कापतो केस..त्याची अपॉंटमेंट घ्यावी लागते...!!

चला बघु तुम्हाला कुठल्या type च्या साड्या आवड्तात सांगा लव्कर लवकर ..
माझी सर्वात्त्त्त्त्त आवडती .... कांचिउरम ,,, हॅन्ड्लूम कॉट्न ...

चला त्या निमित्ताने नवनवीन साड्यांचे प्रकार तरी समजतील... टसर सिल्क वगैरे तर ऐकूनच माहीत होते... साड्यांची खरेदी पेंडींग असल्याकारणाने ठरवता येइल... दरवर्षीच्या पाडव्याला काय वसूल करायचं ते... Wink सोनं महाग झालंय बुवा खूप सो साड्यांवरच भागवावी लागणारे हौस!!!

SOUTH INDIA ....
TAMILNADU......... Kanchiuram silk
thajavur silk
madurai silk
coimbtore silk
arani pattu
chinnalaattu silk
chettinadu cotton
ANDHRA pRADESH....... pochampalli
venkatgiri
gadwal
guntur
narayanpet
mangalgiri
KERALA..................... balaramuram silk
kasavu
KARNATAKA................... ILKAL
mysore silk

UTTAR pRADESH...............
banrasi silk
tanchoi
jamawar

MADHYARADESH ..............
Chanderi
maheshwari
vafta

Chaatishgadh..........
kosa silk

ORRISA.......
sambalpuri silk and cotton
movga silk
bomkai/sonepuri silk and cotton
berhamuri silk
mattha and tussar silk
bata silk and cotton
tanta cotton

इथेदेखील माझी आवड ट्रॅडिशनल साड्यांचीच.
१. पैठणी,
२. बनारसी
३. इरकल.
मग त्यानंतर तमात सिल्क आणि कॉटनमधले पारंपारिक प्रकार.

BANGLADESH ......
tangail cotton
jamdani
muslin
mirpur silk
rajshahi silk

wEST BANGAL .......
shantipuram
baluchari silk
tant bengali cotton
myrshidabad silk
phulia cotton

MAHARASHTRA....
paithani

GUJRAT.....
bandhani
patola

RAJASTHAN....
kota doria

LUCKNOW...
chikankari

अरे बापरे एवढे सारे वेगवेगळे प्रकार... : अबब अचंबित बाहुली :
यातले कुठले कुठले प्रकार अगदी मस्ट हॅव कॅटॅगिरीतील?

पैठणी, कांजीवरम घेईन ७-८ महिन्यात असं टार्गेट आहे मा़झं.
पश्मिना सिल्क
भागलपुरी
कांजीवरम सिल्क
मदुराई कॉटन
कलकत्ता कॉटन
हे माझ्याकडे असलेले प्रकार. त्यातली पश्मिना सिल्क एकदम सुपर्ब आहे. मस्त बसते अंगाशी. दिवाळी गटगला नेसले होते मी.

किती तरी वेगवेगळ्या वरायटी आहेत न ...
मला वाटते every state ... ची एक एक तरी असावी ...
ड्रीम .. मला वाटते .. साउथ मधेय जे वेगवेगळे सिल्क आहेत न .. ते त्या त्या जिल्हातील फेमस सिल्क असावेत ..नाहितर सिल्क सेमच असते न ...त्यावर असणारी जरी काम डिजाइन अस काहितरी वेगळ असाव ..
महाराष्ट्रात नाहि का pathani...येवला ची फेमस तसेच paithan ची सुद्धा फेमस...

माझ्याकडे कांजीवरम आहेत २ .. नल्लि तुन घेतलेल्या आहेत ...
कांजीवरम माझा अगदि weak point....
ए तुम्हाला मुंबै मधेय कुठे अगदि ओरिजनल स्वस्त कांजीवरम मिळतात माहित आहे का > अगदि घर्गुती कुणी विकत असल्यास देखील चालेल .. म्हण्जे ते स्वत; तमिल्नाड चे आहेत व इथे आणुन विकतात असे ...
कारण नल्लि मधेय कमित कमी १०००० च्या वर छान अशी कांजिवरम मिळते ..
आठवत विद्या बालन ने एका फिलमफेअर ला काळ्या रंगाची कांजिवरम घातली होती .. कसली जाम महाग आहे ती ..
कांजीवरम च्या मोहामुळेच .. रेखा माझी all time fevo ....

मी गौरी, तुम्ही जी लिस्ट टाकली आहे त्यामधले प्रत्येक साडीचे फोटो गूगल करून पाहणार का? पाहिल्यास, तुम्हाला सिल्कमधे किती प्रकार आहेत आणि जरीडीझाईनमधे किती वेगळेपण आहे हे सहज लक्षात येइल.

महाराष्ट्रात नाहि का pathani...येवला ची फेमस तसेच paithan ची सुद्धा फेमस...>>> कृपया पैठणी असे लिहा. पठाणी म्हणजे अफगाणी लोक. Happy

मला ठाण्यात हेअरकट साठी खात्रीच पार्लर सुचवाना प्लीज.>>>>

सरलाज द ब्युटी वर्ल्ड... न्यु इंग्लीश स्कुल समोर, ऑफ राम मारुती रोड

आभिलाषा = पाच पाखाडी पिझ्झा हट च्या लायनीत ( खुप मस्त आहे)

सलॉन २३ = लुईसवाडी ( इकडे केस कापायला सगळी मुलं आहेत एकदम झकास कापतात)

खुद्द तमिळनाडूमधेदेखील उत्तम कांजीवरम याच रेंजमधे मिळते. कांजीवरम ही प्युअर सिल्क (शुद्ध रेशीमपासून) बनलेली असल्याने महागच असते. कृत्रिम सिल्कमधे स्वस्तातल्या साड्या मिळतात पण मग ती "शान" येत नाही.

मी जुन्या कथांत पँट नेसणे हा प्रकार सुद्धा वाचला आहे.
Wink

घातली म्हणा नेसली म्हणा काय फरक पडतो.
तुमच्या घरात हे योग्य त्यांच्या घरातच काय आजूबाजूला मागच्या दोन पिढ्याही साडी घालतच असतील.

मला व्यक्तीशः घाला म्हटलेलं आवडत नाही जाम खटकतं पण आता आजूबाजूला ऐकून सवय झालीय.

काळ जातो, जुने शब्द जातात नविन येतात. त्यालाच तर फॅशन म्हणतात.
Happy

उदा. आमची आज्जी जेवल्यानंतर हात धुतले असं म्हटलं तर रागवायची 'आचवलं' म्हणायचं म्हणे जेवल्यावर. हात काय पाय आहेत का धुवायला?

घालणे, नेसणे इत्यादी आहेत ना वेगवेगळी क्रियापदं मराठीत? मग वापरावीत की! आपल्याला कदाचित माहीत नसेल तर दुसर्‍याने सांगितली तर वाचावीत, वापरावीत वा दुर्लक्ष करावं. तसंही इथे कुणीही केवळ लिहू शकतो, तेच वापरावं अशी सक्ती नाहीच करू शकत.

पँट नेसणे या क्रियापदाला कारण आहे.
पारंपरीक भारतीय वेशभूषेत कमरेच्या इथली वस्त्रे नेसण्याची असत. नाडी बांधणे हे पण नेसण्यात मोजले जाई. त्यामुळे इंग्रजांच्या काळात कपडा बदलला पण क्रियापद बदलले नाही.

पूर्वीही कधी अंगरखा, चोळी अशी वस्त्रे 'नेसत' नसत. ती घातलीच जात.

तस्मात कमरेशी बांधून वस्त्र परिधान करणे हे नेसणे (धोतर, साडी, मांडचोळणा, तुम्मान इत्यादी). शिवलेले, खांद्यावर बसलेले वस्त्र परिधान करणे म्हणजे अंगावर घालणे किंवा अंगावर चढवणे (अंगरखा, चोळी, कुर्ता वगैरे). न शिवलेली वस्त्रे शरिराच्या वरच्या भागावर गुंडाळून परिधान करणे म्हणजे पांघरणे/ अंगावर घेणे (ओढणी, खेस, शाल, उत्तरीय). यासाठी हिंदीत ओढना हे क्रियापद परफेक्ट आहे. मराठीत नाही. डोक्यावर न शिवलेले कापड गुंडाळून डोके आच्छादणे म्हणजे बांधणे (फेटा, पागोटे, मुंडासे, ब्राह्मणी रूमाल), शिवून वा इतर पद्धतीने तयार केलेल्या वस्तूने डोके आच्छादणे म्हणजे परत घालणे वा चढवणे (मुगुट, बांधलेल्या पगड्या - पुणेरी पगडी, टोपी, शिरस्त्राण)

साडी घालणे हे तुम्ही स्कर्टसारखी शिवलेली साडी वापरत असाल तर एकवेळ ठिक आहे. अन्यथा ते चुकीचेच ठरेल.

यामधे कुणाच्या घरामधे काय योग्य हा मुद्दा नाहीये. कृपया आधी समजून घेणे.

नीधप, तू वरती नेसणे, घालणे यावरून किती छान माहिती दिली आहेस. अगदी आवडली. विशीष्ट कपड्यांसाठी योग्य ते क्रियापद, उपलब्ध असताना, वापरणे आवश्यक आहे हेही पटले.
रच्याकने, मांडचोळणा म्हणजे सलवार का?

Pages