...

Submitted by टोचा on 7 January, 2013 - 06:19

.............

Group content visibility: 
Private - accessible only to group members

These are not GOD loving people, these are GOD fearing people. Thats all Sad
oh my god!!!!!

तिने त्या आरोपींना भाऊ असे म्हणायला हवे होते

>>
अशा लोकांना कशाला भाउ म्हणावे?
तिने तसे म्ह्टले नाही असा द्रुष्टांत आसाराम दगडाला कसा झाला?
असे निर्लज्ज लोक त्यामुळे थांबतील का?

घटंम भिन्द्यात पटम छिन्द्यात
कुर्यादासभ रोहणं
येन केन प्रकारेण
प्रसिद्ध "Ass-a"राम भवेत

<< तिने त्या आरोपींना भाऊ असे म्हणायला हवे होते >> या कोण त्या नालायक आसारामने माझी मात्र मोठीच गोची केलीय ! इथली माझी आयडी बदलायला लागणार मला आता !!! Sad

"माझ्यावर टिका करणारे भुंकणारे कुत्रे आहेत." इति आसाराम बापू.

म्हणजे आपण सगळे कुत्रे आहोत, ते सुद्धा फक्त भुंकणारे चावणारे नाही.

मी बाकि आख्खा धागा किन्वा बरेच काही वाचलेच नाहीये, मात्र पुढील वाक्य वाचल्यावर एक शन्का आली मनात....
>>>> तिने त्या आरोपींना भाऊ असे म्हणायला हवे होते <<<<
तर हे वाक्य अन एकन्दरीत सल्ला/टिपणी वाचल्यावर अशी शन्का मनात आली की (अक्षराधारीत आकडेशास्त्राप्रमाणे Wink ) "बापू" किन्वा "बापूजी" उपनावाचे सगळे नग असलेच सल्ले देण्याकरताच प्रसिद्ध अस्तात का?
कारण अस्लाच सल्ला पूर्वीही कोण्या "बापून्नी", "त्यान्ना भाऊ माना, त्यान्च्या पायावर लोटाण्गण घाला, व ते राज्य करणार असतील तर मी त्यान्चेपुढे (हुजर्‍या म्हणून) हजर असेन" असा दिल्याचा संदर्भ आठवतोय! काय म्हणता मग? Proud या बापून्च्या बरोबरीने त्या बापूजीन्चीही पाद्यपूजा करणार का सगळेजण? की तेव्हा मात्र आळीमिळीगुपचिळी साधून बसणार? Wink

अयोध्या प्रकरणानंतर ( बाबरी मशीद) काही वर्षांनी एक लोकप्रभा प्रसिद्ध झाला. नेमके साल आणी तारीख, महिना आठवत नाही. तर या लोकप्रभा मध्ये अयोध्येतील साधु बाबा, बुवा आणी महंत यांच्याविषयी डोके गरगरणारी माहिती वाचली.

हे जे कोण अयोध्येत साधु बाबा फिरतात ना त्यात जवळ जवळ ४० टक्केवर ( चुक भूल देणे घेणे) बिहार, उ. प्रदेश, म. प्रदेश आणी काही ठिकाणी शिक्षा भोगुन आलेले किंवा पळालेले गुन्हेगार आहेत. म्हणजे ढोंगी साधु वगैरे. आणी महंत म्हणजे या साधुंवरचा गुरु. तो तर सॉल्लिड पैसेवाला असतो. त्यांच्यात महंत पद मिळायला रस्सीखेच असते, राजकारण, मारामारी असतेच. ते वाचले होते तेव्हाच स्वतःचे डोके बडवुन घ्यावेसे वाटले होते. या आसाराम बापुवरुन ते आठवले.

कुठे रामदास स्वामी किंवा स्वामी समर्थ आणी गजानन महाराजांसारखे गुरुदेव आणी कुठे हे पाचकळ, मुर्ख, अहंकारी, आत्मकेंद्रीत साधुजन्.

चौका कुठ्ला विशालभौ, सत्य जाणवले ते मान्डले,
अरे या बापूजीन्वर येवढे तोन्डसुख घेताय अन त्या बापुजीन्ना मात्र अशाच सल्ल्यान्करता "महात्मा" म्हणवुन डोक्यावर बसवुन घेताय, यातील भारतीय समाजाचा दुटप्पी ढोन्गी पणाच उघड होत नाही का?

बापूऽजीऽऽऽ, (सद्गदित स्वरात) तुम्ही या बिचार्‍यान्ना उदार अंतःकरणाने माफ करालच!
(अत्याधिक गद्गद्लेल्या स्वरात) शाब्दिक हिंसादेखिल अमान्य असणारे बापूजी तुम्ही, वरील शाब्दिक हिंसेला क्षमाच कराल याची खात्री आहे!
(गहिवरून येऊन हमसाहमशी रडणारा) आपलाच नम्र अहिंसक लिम्ब्या.
Proud

तुम्ही कुणी स्वतः ऐकलय का आसारामबापू काय म्हणालेत ते ? एक माणूस त्यांच्याकडे आला आणि बायकोची तक्रार करू लागला तेव्हां टाळी एका हाताने वाजत नाही असं ते म्हणाले. हे वाक्य दुस-या वाक्याला जोडून त्याची सनसनाटी बातमी बनवली. सगळे जण त्या बातमीत खरच लिहीलय असं समजून भुई धोपटत सुटलेत.

वेडया माणसांच्या वेडगळ बडबडिकडे एवढे लक्ष देण्याची काहि गरज नाहि

तसं कसं ? या निमित्ताने सगळे हिंदू साधू, बुवा, अध्यात्मिक संत, संस्कृती यावर तोंडसुख घ्यायची आयतीच आलेली संधी कशी दवडणार ? अबू आझमी बद्दल कुणी काही बोललेलं दिसत नाही Lol

जुन्या वळणाचा,
तुम्ही तिथे उपस्थित असल्यास आसारामांच्या सर्व संभाषणाचे टेक्स्ट ईथे देणार का..? सर्व संदर्भासकट? म्हणजे सर्व शंकांचे निरसन होवू शकेल...

'नविन' आयडी छान आहे...

आसाराम बापूंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते तसं काही म्हणाले नव्हते. वाक्यं तोडून मोडून जोडून बातमी बनवली गेली. हे पुरेसं आहे.

अबू आझमी बद्दल कुणी काही बोललेलं दिसत नाही >>> त्याच्या विरुद्ध बोलले कि मग सेक्युलरवाले येतील की तोड्फोड करायला भावना दुखावल्या म्हणुन!

बिचार्या बापुंवर गुन्हे दाखल केले आणी अभिजीत मुखर्जी बसला आहे २४० खोल्यामधे लोळत!

काही वर्षान्पूर्वी मायबोलीवरच माझावर अन लिम्बीवर ओढवलेला प्रसन्ग लिहीला होता. त्यानूसार, लिम्बीच्या गावाहून परत येताना, त्यावेळेस पुणे सातारा रस्त्याचे रुन्दीकरण सुरू होते, लिम्बी पुढे स्कूटीवर, मागे मुलगी, लिम्बीने हेल्मेट घातलेले, मी तिच्या मागून दहावीस मीटर अन्तरावरून स्कूटरने असे पुण्याकडे येत अस्ता, हल्लीच्या टोल नाक्याअलिकडे रस्त्याकडेला "काळूबाईचे" मंदीर आहे तिथे बरेच "भाविकान्ची " गर्दी होती, बहुतेक गर्दी टेम्पो/रिक्षा/वडाप वाल्यान्ची होती. तिथुन लिम्बी जात असता रस्ता क्रॉस करायला उभ्या राहिलेल्या तिन की चार जणान्पैकी दोघान्नी लिम्बीला बिचकवायचा प्रयत्न केलाच शिवाय हात मधे घालुन हेल्मेटची काच उचलायचा प्रयत्नही केला, अजुनही ते दृष्य नजरेसमोर आहे, माझ्या काळजाचा ठोका चूकला होता की लिम्बी गडबडली तोल गेला तर काय, मी लगेचच मागे आल्याने वेग वाढवून त्या टोळक्याच्या अन्गाला खेटुन गाडी घातली व डाव्या हाताने मुस्काटात भडकविण्यासाठी हात बाहेर काढला, टोळक्यातील ते दोघे बिचकलेच पण त्यान्नी हात चूकविला, एका अर्थाने ते बरेच झाले कारण त्यान्ना फटका पडला अस्ता तरी माझा तोल गेला अस्ता. पुढे जाऊन थाम्बायचा व टोळक्याकडे परतायचा विचार करत होतो पण लिम्बी जराही न थाम्बता सुसाट पुढेच जात राहिल्याने मला तिच्या मागे जावे लागले.
तर ही गोष्ट जेव्हा मी इथे मान्डली, त्यावरील तेव्हान्च्या प्रतिक्रिया साधारण अशा आशयाच्या होत्या की, लिम्ब्या बरे झाले तू थाम्बला नाहीस तेच, (टाळी वाजविण्याकरता दूसरा हात पुढे केला नाहीस) नाहीतर, नस्ती आफत ओढवून येवढ्या गर्दीतल्या "भाविक" हिन्दू धटीन्गणासमोर तुझे काय चालले अस्ते?
मला वाटते, की त्यावेळेस मला या शब्दात सहानुभूती दर्शविणारे देखिल वरील "बापुजीन्च्या" रान्गेतीलच तर नसावेत ना? कृपया येथिल एसी वा तत्सम ऑफिसमधे बसून कीबोर्ड बडवित बापूजीन्वर निरर्गल टीका करीत त्यान्ना हाणामारा म्हणणार्‍या जाणकारान्नी खुलासा करावा ही नम्र विनन्ती!
(शोध घेतल्यास तो धागा/ते वर्णन सापडू शकेल. मला मात्र ते शोधणे वेळेअभावी अवघड आहे)
मी थाम्बलो अस्तो, दोन चार हात त्या गुन्डान्बरोबर केले अस्ते, त्यात जखमी वा मृत झालो अस्तो, लिम्बी व लहान पोरीन्बरोबर काही विचित्र घडले अस्ते, त्यान्चे बालमनावर घडत्या घटनान्चे काही दु:ष्परिणाम झाले अस्ते, तर "थाम्बायची काही गरज होती का" असे बोलावे वाटणारे इथे कितीक आहेत त्यान्नी स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारून पाहून प्रामाणीकपणे तसे सान्गावे.
निदान पुढे कैलास (की जोशी वडेवाले?) भेळ वाल्याकडे थाम्बल्यावर तू पुढे का निघून आलीस, तिथे त्यान्ना "बघितले(?)" अस्ते की असे विचारल्यावर लिम्बीने तरी हेच म्हणले की "थाम्बायची काही गरज होती का? टाळी एका हाताने वाजत नाही". ही टाळी म्हणजे अर्थात "हाणामार्‍या/खूनखराबे" व पुढील सर्व दु:ष्कृत्यान्ना केलेले आमन्त्रण असेल असे ती तरी समजत होती. पुरषी अहंकारामुळे मी मात्र अजुनहि त्या गुन्डाना बदडून न काढता तसेच सोडून आलो याचे अजुनही दु:ख करतो. अन ते करताना हे विसरतो की मी आहे तो केव्हडा, माझी ताकद कितीकशी, मी आक्रमण सोडाच -प्रतिकार व संरक्षण तरी कितिकसे करणार, वगैरे वगैरे. अन याच अर्थाने मी जर पोरीन्ना सातच्या आत घरात बोलावले तर तो माझा भ्याडपणा असेल तर तो आहे, व कुणाला ते "स्त्रीजात" वगैरेच्या स्वातन्त्र्यावरील "बन्धन" वगैरे म्हणत बोम्बाबोम्ब करायच्या अस्तील तर जरुर करूदेत. असो.
कृपया जाणकारान्नी खुलासा करावा.
माझा आधीचा "बापूजी" नावाची माणसे असलेच सल्ले का देतात हा प्रश्न अजुन निरुत्तरीतच आहे! Proud त्याचेही उत्तर येथिल जवळपास तिनचारशे पोस्टमधील जाणकारान्नी करावे ही विनन्ती.

लोकहो,

आसारामबापूंचे नेमके उद्गार काय होते त्याचा शोध घेतला. तूनळीवर शोधाशोध केली. खूपश्या माध्यमांनी त्यांचे मूळ उद्गार दाखवले नाहीत. तरीपण मूळची म्हणता येतील अशी दोन चलच्चित्रे सापडली.

१. पहिले चलच्चित्र - टाईम्स नाऊ वाहिनी : https://www.youtube.com/watch?v=A-5yRetshKs

००मि.१५से. नंतर बापूंचे कथन सुरू होते. यात त्यांनी केवळ तर्क मांडला आहे की, जर मुलीने सरस्वतीदीक्षा घेतली असती तर ती या ना त्या प्रकारे वाचू शकली असती. पश्चातबुद्धीने असे तर्क मांडण्यात काही आक्षेपार्ह नाही. उदा. : अपघात झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी आपत्तीचिकित्सा (failure analysis) केली जाते. या चिकित्सेचा दोषनिर्देशनाशी काहीही संबंध नाही. बापूंनी मुलीचा दोष आहे असं कुठेही सूचित केलेलं नाही.

मात्र पुढे ००मि.४६से. या ठिकाणी निवेदिकेने blamed असा शब्द वापरला आहे. हा शब्द खोडसाळपणे वापरलेला वाटतो. अगा जे बोललेचि नाही ते बापूंच्या गळ्यात मारलेलं आहे.

आसारामबापूंचा तर्क कित्येक जणांस पटत नसेल. पण त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून झोडपून काढणं धिक्कारार्ह आहे. सवंग प्रसिद्धीसाठी ही बदनामी केल्याचा संशय येतो.

२. दुसरे चलच्चित्र - आयबीएन लाईव्ह वाहिनी : https://www.youtube.com/watch?v=ol1IilzG3LM

००मि.१५से. ते ००मि.२०से या कालावधीत निवेदिका म्हणते : He said that the 23 year old medical student was as much responsible for that ghastly incident as the six accused.

पुढे बापू म्हणतात : ... उन्होने जो गलती की...
इथे गलती म्हणजे अत्याचार हा अर्थ अभिप्रेत आहे हे उघड आहे.

यापुढे सरस्वतीदीक्षा घेतली असती तर वाचण्याचा संभव होता असा तर्क आहे. नंतर तिने त्यांचा हात पकडून त्यांना धर्मबंधू मानलं असतं, तसेच भगवंताचं नाव घेतलं असतं किंवा पाया पडली असती तर काय झालं असतं इत्यादि तर्क आहे. इथवर काही आक्षेपार्ह नाही. पराकोटीची भीती पडल्यावर अखेरचा उपाय म्हणून लोक हातापाया पडून जीवितवित्तादि वाचवतात.

त्याच भरात ०१मि.००से. या वेळेस म्हंटलं : गलती एक एक तरफसे नही होती.

या वाक्यावर वाहिनीचं चित्रण थांबतं. याच वाक्यावरून पुढे गदारोळ उडवला गेला आहे. इथे गलती या शब्दाचा पूर्वीचाच अर्थ घेतला आहे. हा साफ चुकीचा आहे. एका बाजूने गलती मुद्दाम केलेली आहे, तर दुसर्‍या बाजूने अजाणतेपणी झालेली आहे.

दुर्घटना टाळण्यात (मुलीला) आलेलं अपयश म्हणजे दोषास्पद वर्तन नव्हे. इतकंही प्रसारमाध्यमांना कळू नये!

गलती म्हणजे चुकीचं कृत्य असू शकतं तसेच गलती म्हणजे चुकीची धारणाही असू शकते. दोन्ही गलतीच आहेत. पण म्हणून प्रस्तुत दुर्घटनेत मुलीचा दोष आहे असं कुठेही सूचित होत नाही. मग as much responsible या शब्दप्रयोगाची काय संगती लावायची?

३. आसाराम बापूंच्या आश्रमाचा मालकीचं (म्हणून अधिकृत असं) चलच्चित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=0Yu4eYEyCV4

यात ०१ मि. ३० से. नी बापूजींच्या प्रतिमेची तुटक हालचाल स्पष्ट दिसते. 'गलती दोनो तरफसे होती है' हे वाक्य गाळलेलं दिसतं. अशी लपवाछपवी करण्याची काहीही आवश्यकता नाही. आजून काही विधाने छाटून टाकली तर नाहीत ना असा संशय येतो.

४. आश्रमाच्या प्रवक्त्या नीलमबाईंचं एबीपी वाहिनीवरील कथन इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=5NXxXDxzDlM

इथे त्यांचं स्पष्टीकरण खूप जणांना पटलेलं नाही. मात्र अखेरीस वार्ताहरीने म्हटलं की : ...हम लोगोंपे छोडते है की वे कौनसा मतलब निकाले.... त्यानुसार मी माझा अर्थ काढला आहे. वाचकांनी आपापला काढावा.

असो.

'अगा जे बोललेचि नाही' असा प्रकार मोहन भागवतांबद्दल नुकताच झाला. प्रसारमाध्यमांवर कितपत विश्वास ठेवावा ते भाऊ तोरसेकारांच्या या लेखातून कळतं.

असो.

कुणाला अधिक माहिती मिळाल्यास त्याची चर्चा करूया.

आ.न.,
-गा.पै.

माझी ताकद कितीकशी, मी आक्रमण सोडाच -प्रतिकार व संरक्षण तरी कितिकसे करणार, वगैरे वगैरे. अन याच अर्थाने मी जर पोरीन्ना सातच्या आत घरात बोलावले तर तो माझा भ्याडपणा असेल तर तो आहे, व कुणाला ते "स्त्रीजात" वगैरेच्या स्वातन्त्र्यावरील "बन्धन" वगैरे म्हणत बोम्बाबोम्ब करायच्या अस्तील तर जरुर करूदेत. असो.
>>

लिम्ब्या
सल्ला एकच असला तरी अस्थानी आहे. रात्री तोकडे कपडे घालुन बाहेर जाउ नको हे मी माझ्या मुलीला सांगणे ही एक गोष्ट. रात्री मुली असे कपडे घालुन फिरतात ही त्यांची बलात्कार्यांएवढीच चुक आहे असे समाजमान्य व्यक्तिंनी सांगणे ही दुसरी गोष्ट.
यात फरक असा की पहिल्या बाबतीत जो वैयक्तिक सल्ला असतो तो दुसर्या बाबतीत नाकारलेला हक्क असतो.
जसे वरील उदाहरणात तुला लिम्बीने सांगितलेले योग्यच होतेपण यावरुन तुला जर कोणि दुसर्याने सांगितले की विवाहीत पुरुषांनी कुटुंब बरोबर असताना सातच्या आत घरात यावे तर कसे वाटेल?
अर्थात तुझी तगमग पोचली.

गामा_पैलवान धन्यवाद तुमच्या परिश्रमांबद्दल. माहिती उपयुक्त आहे आणि आवडली.
<<इथे गलती या शब्दाचा पूर्वीचाच अर्थ घेतला आहे. हा साफ चुकीचा आहे>> "त्या मुलीने भाउ म्हणले नाही, विनवण्या केल्या नाहीत" ही तिझीच चूक हे विधान खूपच क्लेशदायक आहे. आणि त्यामुळे टाळी वाजली म्हणजे पुढील वाईट प्रसंग घडला, हे म्ह्णणे हे दु:सह्य आहे.

लिंबुटिम्बु - तुमच्याशी सहमत.
निलिमा - तुमच्याशी <<रात्री मुली असे कपडे घालुन फिरतात ही त्यांची बलात्कार्यांएवढीच चुक आहे असे समाजमान्य व्यक्तिंनी सांगणे ही दुसरी गोष्ट>> अधिकच सहमत.

सुसुकु,

>> "त्या मुलीने भाउ म्हणले नाही, विनवण्या केल्या नाहीत" ही तिझीच चूक हे विधान खूपच क्लेशदायक आहे.

आपल्या भावना समजू शकतो. आसारामबापूंनी तिची चूक आहे असं कुठेही म्हंटलं नाहीये. त्यांनी एव्हढंच सांगितलं की जर तिने दीक्षा वगैरे घेतली असती किंवा विनवण्या केल्या असत्या तर सुटू शकली असती. हा जरतरचा मामला आहे. दोषारोपण नाही.

संकट टाळण्याचे जे आसारामबापूंचे पर्याय होते ते तिला अंगिकारता आले नाहीत. ही त्रुटी म्हणजे तिची चूक नव्हे. (प्रसंग इतका भयंकर होता की तिला काही सुचणंही शक्य नव्हतं.) मात्र या त्रुटीमुळे त्या नराधमांना त्यांचा कार्यभाग साधता आला. तिच्या बाजूची ही त्रुटी (जिला ती जबाबदार नाही) आणि नराधमांच्या बाजूची वासना या दोन त्रुट्या एकत्र झाल्याने उपरोक्त दुर्घटना घडली. दोनो तरफकी गलती ती हीच.

आ.न.,
-गा.पै.

<पुढे बापू म्हणतात : ... उन्होने जो गलती की...
इथे गलती म्हणजे अत्याचार हा अर्थ अभिप्रेत आहे हे उघड आहे.

यापुढे सरस्वतीदीक्षा घेतली असती तर वाचण्याचा संभव होता असा तर्क आहे. नंतर तिने त्यांचा हात पकडून त्यांना धर्मबंधू मानलं असतं, तसेच भगवंताचं नाव घेतलं असतं किंवा पाया पडली असती तर काय झालं असतं इत्यादि तर्क आहे.>

आसारामबापू तुमच्यामाझ्यासारखे....चुकले....माझ्यासारखे तर्कबिर्क करीत नाहीत. त्यंना नक्की काय ते माहीत असते. त्या मुलीने सरस्वतीचे स्मरण केले असते तर तिला त्या बसमध्ये चढायचे नाही हेच कळले असते. पुढे बसमध्ये त्या मुलीने त्या सहा पुरुषोत्तमांची करुणा भाकण्याऐवजी त्यांना विरोध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला (त्यामुळे चिडून जाऊन त्या पुरुषोत्तमांनी तिची आणखी विटंबना केली) असे बातम्यांमधून समोर आले आहे(ज्यावर तुमचा विश्वास नसू शकेल). म्हणजेच मुलीने पाय धरून भैया म्हणले असते तर तिच्या केसालाही धक्का न लागता, उलट त्या पुरुषोत्तमांनी तिची साडीचोळी देऊन सुखरूप घरी पोचवणी केली असती.
आसारामबापूंच्या प्रवक्तीने बापूने लडकी की गलती १ प्रतिशत नही बल्कि ०.०१ प्रतिशत है यह कहा था असे टीव्हीवर म्हणलेले आहे.
गलती या शब्दाचा अर्थ गलती करणार्‍या व्यक्तीच्या जेंडरप्रमाणे बदलतो हे माहीत नव्हते. धन्यवाद.
आनगापै, आपण 'त्या' सहा पुरुषोत्तमांचे(ही) वकीलपत्र का घेत नाही?

भरत मयेकर,

१.
>> आसारामबापूंच्या प्रवक्तीने बापूने लडकी की गलती १ प्रतिशत नही बल्कि ०.०१ प्रतिशत है यह कहा था
>> असे टीव्हीवर म्हणलेले आहे.

प्रस्तुत धागा आसारामबापूंच्या वक्तव्यावर आहे, त्यांच्या प्रवक्तीच्या वक्तव्यावर नाही. तिने खरंच असं काही वक्तव्य केलं असेल तर ते खेदजनक आहे. मात्र बापूंना जे अभिप्रेत नाही ते त्यांच्या गळ्यात का मारलं जात आहे?

२.
>> आपण 'त्या' सहा पुरुषोत्तमांचे(ही) वकीलपत्र का घेत नाही?

ते सहा जण दोषी आहेत म्हणून त्याचं वकीलपत्र घेत नाहीये. त्यातूनही माझा उद्देश आसारामबापूंचे आक्षेपार्ह वक्तव्य शोधण्याचा आहे. न्यायदलाली करायचा नाही.

३.
>> आसारामबापू तुमच्यामाझ्यासारखे....चुकले....माझ्यासारखे तर्कबिर्क करीत नाहीत. त्यंना नक्की काय
>> ते माहीत असते.

जगदंबेचे महान भक्त शिवाजीमहाराज आगर्‍यात कैदेत पडल्यावर ही चूक आपण कशी केली याबद्दल खेद प्रकट केला होता. त्यांच्याकडून काहीच चुका झाल्या नाहीत का?

४.
>> त्या मुलीने सरस्वतीचे स्मरण केले असते तर तिला त्या बसमध्ये चढायचे नाही हेच कळले असते.
>> पुढे बसमध्ये त्या मुलीने त्या सहा पुरुषोत्तमांची करुणा भाकण्याऐवजी त्यांना विरोध करण्याचा पुरेपूर
>> प्रयत्न केला (त्यामुळे चिडून जाऊन त्या पुरुषोत्तमांनी तिची आणखी विटंबना केली) असे बातम्यांमधून
>> समोर आले आहे(ज्यावर तुमचा विश्वास नसू शकेल). म्हणजेच मुलीने पाय धरून भैया म्हणले असते
>> तर तिच्या केसालाही धक्का न लागता, उलट त्या पुरुषोत्तमांनी तिची साडीचोळी देऊन सुखरूप घरी
>> पोचवणी केली असती.

परत सांगतो, हा जरतरचा प्रकार आहे. ही पश्चातचिकित्सा आहे. अशी चिकित्सा सगळ्या दुर्घटनांत केली जाते. अशी चिकित्सा म्हणजे दोषनिर्देश नव्हे.

तसंच पुरुषोत्तम हा शब्द वापरायची गरज नाहीये. तुमचा उपरोध कळतो मला. पण सत्य इथे दडपून टाकलं गेलंय. ते शोधतांना उपरोध फारसा कामी येत नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages