...

Submitted by टोचा on 7 January, 2013 - 06:19

.............

Group content visibility: 
Private - accessible only to group members

मला ही बातमी पाहिल्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच कळत नव्हत .
आजकाल बाप आपल्या पोरीवर बलात्कार करण्याची उदाहरणे असताना भाऊ म्हटल्यावर अनोळखी वासनांध आपला विचार बदलतील अस ज्याना वाटते ते कुठल्या जगात जगतायत ते त्यानाच माहीत Sad

आपला देश आध्यात्मिक, संस्कृतीसंपन्न, सहिष्णु इ.इ. इ. आहे
त्याचे हे प्रतिनिधित्व करतात.
जनसामान्यांस उद्बोधन करतात.
समाजातील पापे क्षालन करतात.
लाजा वाटल्या पाहिजेत यांना आणि यांचे समर्थन करणार्‍यांना

सगळ्या बुवा बापू अम्माना आत्ता चेव येईल. तापल्या तव्यवर पोळी भाजायची सवयच त्याना.
अशा मूर्खांकडे दुर्लक्ष केले तर उत्तम. त्याना काही कंसिडरेशन देणे हेच त्यांची पब्लिसीटी करण्यासारखे आहे.

त्या बापूची कोण एक समर्थक आहे निलीमा दुबे...ती हीरीरीने बापूचा बचाव करतीये...आणि बाई एकदा बोलत सुटल्या की कुणालाही ऐकत नाहीयेत...अगदी अर्णब पासून सगळ्यांनी तिच्यापुढे हात टेकलेत....
त्या बाईचे म्हणणे की तिने जर मंत्र जपला असता तर तिला काहीतरी चांगल्या कल्पना सुचल्या असत्या...

देवा रे...ही लोकं कॉमन सेन्स कुठे विकून येतात देव जाणे....

आज डिटेलात बातमी वाचल्यावर अक्षरश: तीळपापड झाला माझा Angry त्या पोरीने भोगलेल्या यातनांची या असली विधानं करणार्‍यांना यत्किंचितही कल्पना नाहिये. नामस्मरणाने बुद्ध्या चांगल्या होत असत्या तर बुवाबाजी करणारे सगळेच चांगले असायला हवे होते. अगदी नुसता जपाचा बायोलॉजिकल उपयोग म्हणतेय मी. उलट बुवांबाजी करणार्‍यांकडूनच बायकांवर बर्‍याच वेळेला अत्याचार होतात हे आपण पेपरात वाचत आलोय कित्येक वर्ष.
सरस्वतीचं ध्यान केलं असतं तर म्हणे त्या मुलिला बसमध्ये चढायची बुद्धी झाली नसती असं एक बिनबुडाचं आणि ठार मुर्ख विधानही या माणसाने केलंय. Angry
धुवायला हवं असल्यांना.. angry1.gif

दक्षिणा, फारच सौम्य प्रतिसाद दिलात. धुवायला कसले? यांच्यावरही त्या आरोपींसहितच केस चालवायला हवी.

१. स्वतःचा उदो उदो करून घेण्याची हीन संधी साधणे

२. बलात्कार टाळण्यासाठीचे उपाय या नावाखाली अंधश्रद्धा रुजवणे

३. बलात्कार टाळण्यासाठी अत्यंत कुचकामी उपाय सुचवून समाजाची दिशाभूल करणे

इत्यादींना सरळ कलमे लावायला हवीत.

यांना गजाआड घालून रोज पिटले पाहिजे. दाढी धरून खेचत रस्त्यावर आणायला हवे. च्यायला त्यांचे ते टाळ्या वाजवणारे अनुयायी!

आपला देश बलात्कार्‍यांनीच भरलेला आहे असे वाटल्यास नवल नाही.

दक्षिणा....

तुझ्या प्रतिसादाला सहमती व्यक्त करीत असतानाच हेही सांगणे मला महत्वाचे वाटते की अशा बुवा साधूंच्या वक्तव्याचे समर्थन करणार्‍यामध्ये स्त्रियांही आहेत हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

म्हणजे स्त्री हीच स्त्रीची दुश्मन असू शकते का ?

अशोक पाटील

आशुचँप,

ही लोकं कॉमन सेन्स कुठे विकून येतात देव जाणे >> 'कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन' ना! काय करणार!

शरद यादव ह्यांनी ही असचं वक्तव्य केलयं.

त्यानी असं विधान खरंच केलं असेल तर या 'हंसारामला चोपूं 'अशीच प्रतिक्रिया होते ! पण या विधानामुळे त्यांच्या प्रचंड भक्तसमुदायातल्या निदान स्त्रीया तरी निषेध म्हणून त्यातून बाहेर पडतील का, हा खरा मनःस्ताप देणारा प्रश्न आहे !!!

भाऊसाहेब, अध्यात्माच्या नावाखाली चाळे करता यावेत याच हेतूने अनुयायी जमलेले असतात. कशाला कोण बाहेर पडणार? आठवडाभर बापू खलनायक म्हणून कुप्रसिद्ध होतील आणि मग पुन्हा मंत्रीगण त्यांच्या आश्रमाला भूखंड द्यायला सुरुवात करतील. पुन्हा अनुयायी वाढू लागतील. या आसाराम बापूच्या मानेवर कुर्‍हाड ठेवून त्याला तो जप करायला सांगितला पाहिजे, बघ म्हणाव वाचतोस की मरतोस!

असल्यांना जमावानं शारिरिक धडा शिकवायला हवा. तेव्हा म्हणा... भीक मागा... भाऊ, बाप, आई-बहीण... काय वाट्टेल ते. आणि बघा शरीरातलं, लज्जेतलं, डिग्निटीवगैरे मधलं काय काय वाचतं ते...
(मी ऑफिसात रडणारय आता)

या असल्या बापूबुवांना एक दिवस आर्थर रोड नाहीतर येरवड्याच्या तुरूंगामधे एखाद दिवस ठेवायला हवं. तेपण जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्यांसोबत. करा तिथे किती जप करायचाय आणि कुणाला भाऊदादाअण्णा म्हणायचे आहे ते म्हणा... बघू पुढचे परिणाम काय होतात ते!!!!!

बेफिकीरजी, आपली पोटतिडकीची प्रतिक्रिया मीं समजूं शकतो व त्याच्याशी मी बव्हंशी सहमतही आहे. पण << अध्यात्माच्या नावाखाली चाळे करता यावेत याच हेतूने अनुयायी जमलेले असतात >> हें मात्र १००% खरं नसावं; बरेचसे भाबडे लोकही विविध कारणानी असे अनुयायी होत असतात. पण असल्या विधानानेही जर त्यांचे डोळे उघडत नसतील तर मात्र तो भाबडेपणाही अक्षम्य ठरतो !

असारामांचे डोके फिरले आहे... मला त्या दिल्लीच्या नराधमां इतकाच या बुवा आणि बापूंचा राग येतो आहे. आसारामांचे वक्तव्य पिडीत मुलीवर घोर अन्याय करणारे आहे.

बरेचसे भाबडे लोक<<< सहमत आहे भाऊसाहेब!

=================================

त्या अनिरुद्ध की कोण त्याचा व्हिडिओ (भ्रमर यांनी दिलेला) पाहून चक्रावलोच. त्या माणसासमोर इतका मोठा जमाव असताना त्याच्या त्या 'माझा की कोणत्याश्या स्तोत्राचा जप केला असता तर बलात्कार व्हायची वेळच आली नसती' या विधानावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यात असंख्य स्त्रियाही होत्या. च्यायला या बायकांना तरी अब्रू म्हणजे काय कळतं की नाही हाच प्रश्न पडतो. फरफटत त्या माणसाला रस्त्यावर आणायला हवा होता.

@ दाद....

"...असल्यांना जमावानं शारिरिक धडा शिकवायला हवा....'

अहो, चित्रफित पाहिली मी....खूप मोठा म्हणावा असा जमाव तिथे होताच, पण त्या भाषणावर 'संमतीदर्शक' टाळ्या देत होता.

वाईट म्हणजे त्यात स्त्रियाही.....! कसा धडा शिकवायचा....आणि कुणाला ?

बेफ़िकीरजी एकदा अक्कल गहाण टाकली की हा बापू काय आणि तो बापू काय जे बरळतील त्याला टाळ्या पडतात. कहर म्हणजे अनिरुद्ध बापूला म्हणे मेडिकल मॅलप्रॅक्टिस केली म्हणून तो नोकरी करत असलेल्या हॉस्पिटल मधून काढून टाकला होता......आणि मग तो बापू जाहला!

खरंतर कालपरवा पासुन ह्या बातम्या, प्रवचनं बघितलय सगळं. अतिशय राग, दु:ख, कीव असं सगळं पार करत आताशीच शांत झालेय. अरे काय चाल्लय काय? काहीतरी विचार कराल की नाही? श्रद्धा, भक्ती सगळं बरोबरे पण हे जे चाल्लय त्याचा श्रद्धेशी काय संबंध आहे?
मुळात कुणी का असेना एक माणुस गुरू असु शकतो पण देवाचा अवतार किंवा डायरेक्ट देव कसा काय असु शकतो? बरं भक्त म्हणतात ते म्हणतात तो माणुस स्वतः असं कसं म्हणु शकतो? मी मधे पडेन किंवा मी वाचवेन असं हजारो लाखो लोकांना वचन देणं एक माणसाच्या आवाक्याबाहेर नाहीये का? त्यांच्या स्त्री शिष्यांना, भक्तांना गेला बाजार इव्ह टीझींगचाही त्रास होत नाही का? काहीही काय बोलायचं ते? तुमच्यावर इतक्या मर्यादेपर्यंत विश्वास ठेवणार्‍या लोकांशी प्रामाणिक रहायला नको? किमान स्वतःशी तरी?
आता आसाराम बापूंच्या मुलावरच शोषणाचे आरोप आसल्यामुळे ते असं बोलणारच. ते स्वतः केवळ एक वडील आहेत हेच ते सिद्ध करतायत.जे आपल्या शिष्य, भक्तांना स्वतःच्याच मुलापासुन वाचवु शकत नाहीत ते इतरांपासुन कसं काय रक्षण करणार? असल्या माणसांना काय बोलायचं?
अरे बाबांनो त्या नराधमांनी सरस्वतीचं स्मरण केलं असतं तर ते असं काहीतरी पाशवी करू शकले असते का? बाकी नामजप, स्मरण हे उपाय आणि त्याचे परिणाम आणि सगळ्यात महत्वाचं ते कुणी करायचं यावर हसावं की रडावं हेच कळेनासं झालंय.
हे म्हणजे हरलेला गेम खेळणं आहे. न खेळण्याचं ऑप्शन नाही, तुम्ही कराल ते सगळं फाऊलच आणि पलिकडच्यांना अंपायर सामिल.

सॉरी टू से पण असले बुवा लोक लोकांना मिसगाईड करतात. देवाच्या नावात सर्व काही आहे असं डोक्यात घुसवून घुसवून त्यांना वास्तवापासून दूर नेतात. आणि सगळे बुवाज हेच्च करतात हे मी ठामपणे सांगते. एखाद्या गोष्टीच्या (प्रॉब्लेमच्या) मूळाशी जाऊन त्याचं उच्चाटन करण्याऐवजी जप जाप्य/ध्यानाने सर्व साध्य होते असे भाबडे समज पसरवतात. Angry

अरे बाबांनो त्या नराधमांनी सरस्वतीचं स्मरण केलं असतं तर ते असं काहीतरी पाशवी करू शकले असते का? बाकी नामजप, स्मरण हे उपाय आणि त्याचे परिणाम आणि सगळ्यात महत्वाचं ते कुणी करायचं यावर हसावं की रडावं हेच कळेनासं झालंय.
हे म्हणजे हरलेला गेम खेळणं आहे. न खेळण्याचं ऑप्शन नाही, तुम्ही कराल ते सगळं फाऊलच आणि पलिकडच्यांना अंपायर सामिल
. >> +१

Pages