...

Submitted by टोचा on 7 January, 2013 - 06:19

.............

Group content visibility: 
Private - accessible only to group members

बेफिंची स्मायली पाहून चिनूक्सने दिलेल्या लिंक मध्ये नक्कीच काहीतरी मिस्स करण्याजोगं आहे असं दिसतंय.

सगळे बापू / बाबा टाईप लोकं, जे ह्या घटनेला कुठल्यातरी स्त्रोत्रामुळे ( स्वतःचा नामजप करून) आणि भाऊ / दादा असे म्हणून टाळता येईल असे म्हणत आहेत, त्यांच्यावर आपणच केस केली पाहिजे.

नुसतेच इथे लिहून फायदा नाही. कोण कोण सोबत येईल? मी देखील तयार आहे त्या बापूवर केस करायला. लोकांची अशी भावनिक दिशाभूल करणे हा गुन्हा आहे.

ह्या ठेकेदारांमुळे खरा हिंदू धर्म लयाला जात आहे. आणि हेच लोकं धर्मधुरीण होत आहेत.

या देशाच्या बोकांडी बसलेले सगळे बापू , बुवा , अम्मा घावूक स्वरुपात कायमच्या हिमालयात हाकलून द्या ...

आता तारे तोडण्यापेक्षा...मी म्हणते.... एखाद्या पुरुषाने मुलीचा वेष धारण करुन रात्री रस्त्यावर फिरा... आणि अनिरुद्ध बापु , किंवा आसाराम बापुने जो मंत्र सांगितला तो म्हणा... बघा बलात्कार होतो का ते.:P....नाही झाला तर...मंत्रात शक्ती आहे असे आपण समजु.....किंवा मग बलात्कार करणार्‍याला भाऊ म्हणुन बघा.... Proud

विनायक , आसारामबापू परवडले . यांची कलमे पाहून पोलिस वगैरे कशाला पाहिजेत याचा प्रश्न पडतो . आणखी एक बापूचालीसा अतिरेक्यांसाठी पण काढा म्हणाव .

आणखी एक बापूचालीसा अतिरेक्यांसाठी पण काढा म्हणाव >> केड्या का जीवावर उदार झालायस? आहे हा त्रास कमी पडतोय का तुला? Proud

राखी सावंत चा बापुना फटका : अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या वक्तव्याचा देशभरातील जनतेने निषेध केला असून आयटम गर्ल राखी सावंतही त्यात मागे राहिलेली नाही. राखीने तर बापूंच्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.

मला वाटते आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. थंडी वाढल्याने त्यांच्या बुद्धीचा पाराही खाली पडला आहे, अशा शब्दात राखीने आसाराम बापूंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. बापूंच्या वक्तव्याचा आपल्याला खूप राग आला आहे, असेही राखीने सांगितले. खरं तरं मी आसाराम बापूंना मानायची परंतु या वक्तव्यानंतर मला त्यांचा अतिशय राग आला आहे, असे राखी म्हणाली. तसेच बापूंच्या आश्रमात अनेक महिला असतात, त्यांनाही बापू असाच सल्ला देतील का ? , असा खणखणीत सवालही राखीने केला आहे.

अभिजीत मुखर्जी , कैलाश विजयवर्गीय आणि आता आसाराम बापू यांचेही नाव अशी बेताल वक्तव्य करण्यात जोडले गेले आहे. तसेच त्या मुलीच्या कुटुंबातील लोकांना सहानभूती देण्याऐवजी राजकारणी, साधू-बाबा, अशी बेताल वक्तव्ये करताहेत ही खेदाची बाब आहे, असे राखीने सांगितले

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17937511.cms

बापूंनी तोडलेले तारे : http://maharashtratimes.indiatimes.com/videoshow/17925001.cms

<<< या वरच्या वाचकंच्या प्रतिक्रीया पण वाचनीय आहेत

ह्या बापु , बाबांच्या आहारी लोक इतके कसे जाऊ शकतात ???

माझ्या मतानुसार जे लोक मनाने खंबीर नसतात, त्यांचा स्वतः पेक्षा महाराज किंवा बापूंवर जास्त विश्वास असतो, आणि ज्यांच्या कडे असले फालतू उद्योग करण्यास वेळ असतो, अशीच माणसे त्यांच्या जाळ्यात फसतात.

आणि ज्यांच्याकडे वेळच वेळ असतो ते या फसलेल्या आणि फसविणार्यांवर कॉमेंट करण्यात वेळ्घालवितात नै!

आणि ज्यांच्याकडे खूपच वेळच वेळ असतो ते या फसलेल्या आणि फसविणार्यांवर कॉमेंट करण्यार्‍यांवर कॉमेंट करण्यात वेळ घालवितात! Biggrin

आणि ज्यांच्याकडे खूपच वेळच वेळ असतो ते या फसलेल्या आणि फसविणार्यांवर कॉमेंट करण्यार्‍यांवर कॉमेंट करण्यात वेळ घालवितात Sad Sad :

माझ्या बरोबर कामा ला असणारे काही गुज्जू/भय्ये हे बापूच्या बोलण्याशी सहमत आहेत. त्यांच्याशी वाद करून मला माझेच केस उपटून घ्यावेसे वाटत आहे. Angry देवा तू कुठे आहेस? नक्की आहेस का?

>>त्या अनिरुद्ध की कोण त्याचा व्हिडिओ (भ्रमर यांनी दिलेला) पाहून चक्रावलोच.

पाहिली लिंक आणि प्रवचन.. काय म्हणावे कळत नाही. बापूंवर श्रध्दा असणारे याकडे "१००% आश्वासन" म्हणून पहातील तर ईतरांना ते नक्कीच तर्कशुध्द वाटणार नाही..
ज्या समस्या या मुळात मानसिक विकार, विकृती, कायदा सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा, याच्याशी निगडीत आहेत त्यावर ही असली प्रवचने/ऊपाय कशी काय स्विकारायची?

(मग जे बापू बाबा, ई. चे अनुयायी नाहीत त्यांचे या जगात काही खरेच नाही म्हणायचे! असो.. )

दुर्दैवाची बाब म्हणजे 'निर्भया' चे कुटुंबिय असेही त्या आसाराम बापूंचे भक्त होते आणि आता त्यांची पुस्तके जाळायला निघाले आहेत असे वाचले.. यातूनच काय तो धडा घ्यावा..

'बये दार ऊघड'..... !!!!

योग
इथे अनिरुद्ध बापूंवर अढळ श्रद्धा असणारी मंडळी आहेत......अगदी स्त्रियादेखील.......ते पण त्यांनी तोडलेले तारे ऐकल्यानंतरही.........आता बोला

>>योग
इथे अनिरुद्ध बापूंवर अढळ श्रद्धा असणारी मंडळी आहेत......अगदी स्त्रियादेखील.......ते पण त्यांनी तोडलेले तारे ऐकल्यानंतरही.........आता बोला

ते सगळं ठीक आहे हो... श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरे वैयक्तीक बाबी आहेत.. प्रवचनामध्ये जे म्हटले गेले त्याबद्दल माझी पोस्ट आहे!

मुंबई हल्ल्यात जे 'वाचले' ते जवानांच्या शौर्यामूळेच ना? त्यासाठी मेजर ऊन्निक्रिश्णन सारख्यांनी बलिदान दिले.. का ते लोक देखिल कुणाचा वा कसलासा चालीसा वाचत बसले होते..? अतीरेक्यांचा एके सत्तेचालीसा जास्ती पॉवरफुल होता ना..? तुकाराम ओंबळ्यांनी त्या दिवशी स्वताच्या पोटात अतीरेक्याची बंदूक रिकामी केरून घेतली पण त्याला सोडले नाही... स्वतः 'भगवान' श्रीकृष्णाने अर्जुनाला शस्त्र ऊचलायला बळ यावे म्हणून अख्खी गीता सांगीतली... (दंतकथा वा बोधकथा कसेही वाचा) आणि शेवटी दुष्टांचा व अधर्मींचा संहार करायची शक्ती व दृष्टि अर्जुनाला दिली... का आता जिथे जिथे अत्त्याचार होणार तिथे हे सर्व बाबा, बुवा, बापू 'प्रकटणार' आणि दुष्टांना शासन देणार आहेत का?

एव्हडेही कळू नये का टाळ्या पिटणार्‍या सुशिक्षीतांना..? अवघड आहे(च).

>>माझ्या मतानुसार जे लोक मनाने खंबीर नसतात, त्यांचा स्वतः पेक्षा महाराज किंवा बापूंवर जास्त विश्वास असतो, आणि ज्यांच्या कडे असले फालतू उद्योग करण्यास वेळ असतो, अशीच माणसे त्यांच्या जाळ्यात फसतात.

हे देखिल खरे नाही.... माझ्या माहिती, ओळखीत कितीतरी सुशिक्षीत, डॉक्टर्स, ईंजीनीयर्स, ई. सर्व अशा अनेक बाबा, बापू, बुवांचे 'भक्त' आहेत! सत्य साईबाबांच्या अंत्यदर्शनात कुणी कुणी सो कॉल्ड महान लोकांनी आसवे गाळली हेही सर्वांनी 'लाईव्ह' बघितले आहेच.. तेव्हा 'आपलेच दात आणि आपलेच ओठ'!

हे देखिल खरे नाही.... माझ्या माहिती, ओळखीत कितीतरी सुशिक्षीत, डॉक्टर्स, ईंजीनीयर्स, ई. सर्व अशा अनेक बाबा, बापू, बुवांचे 'भक्त' आहेत>>>>
त्यांची बिझनेस कनेक्शन्‌स्‌ हेही एक महत्त्वाचे कारण आहे. सो कॉल्ड महाराजांच्या रेफरन्सनमुळे त्यांच्याकडे गिऱ्हाइकांचा राबता असतो.

माझ्या मतानुसार जे लोक मनाने खंबीर नसतात, त्यांचा स्वतः पेक्षा महाराज किंवा बापूंवर जास्त विश्वास असतो,
----- प्रत्येक व्यक्ती कुठल्यातरी कारणाने पिडलेली असतात (आजार, कमालीची वाटणारी असुरक्षितता, नोकरी, नोकरीतील प्रश्न, बेकारी, लग्न, लग्नातील प्रश्न.... काहीं त्याचा सोशल नेटवर्किग साठी पण वापर करतात). काही त्याचा सामना करतात काही सामना न करताच "असेल माझा हरी तर देइल... ".

मुंबई हल्ल्यात जे 'वाचले' ते जवानांच्या शौर्यामूळेच ना? त्यासाठी मेजर ऊन्निक्रिश्णन सारख्यांनी बलिदान दिले.. का ते लोक देखिल कुणाचा वा कसलासा चालीसा वाचत बसले होते..? अतीरेक्यांचा एके सत्तेचालीसा जास्ती पॉवरफुल होता ना..? तुकाराम ओंबळ्यांनी त्या दिवशी स्वताच्या पोटात अतीरेक्याची बंदूक रिकामी केरून घेतली पण त्याला सोडले नाही...
------ योग, तुमचे विचार हे ज्यांना मेंदू आहे त्यांच्या साठी आहे.
ज्यांनी मेंदू गहाण ठेवलेला आहे (उदा ***** बापू भक्त...) अशा भक्तांसमोर बापू मिठ-मसाला लावुन "मीच उन्नीकृष्णना त्या क्षणी बळ दिले.... मीच तुकाराम ओंबळेंच्या शरिरात शिरलेल्या गोळ्या झेलल्या आणि त्यांना लढण्यास मदत केली... ". बापू म्हणेल तो शेवटचा शब्द अशा प्रकारे कंडिशनींग झालेली त्याबाबतीत कुठल्याही विचार न करता.... बापू वाक्य प्रमाण मानतात.

हे देखिल खरे नाही.... माझ्या माहिती, ओळखीत कितीतरी सुशिक्षीत, डॉक्टर्स, ईंजीनीयर्स, ई. सर्व अशा अनेक बाबा, बापू, बुवांचे 'भक्त' आहेत>>>>
त्यांची बिझनेस कनेक्शन्‌स्‌ हेही एक महत्त्वाचे कारण आहे. सो कॉल्ड महाराजांच्या रेफरन्सनमुळे त्यांच्याकडे गिऱ्हाइकांचा राबता असतो.
----- बिझनेस कनेक्शन्‌स्‌ अत्यंत महत्वाचे.

'बिझिनेस'साठी या पातळीवर उतरावे लागत असेल, तर त्याला धंदा म्हणा ना सरळ.
पावडर-कुंकू करून धंदा करायला बसणार्‍यांच्यात जास्त अक्कल असते असं म्हणावेसे वाटते..

बापू म्हणेल तो शेवटचा शब्द अशा प्रकारे कंडिशनींग झालेली त्याबाबतीत कुठल्याही विचार न करता.... बापू वाक्य प्रमाण मानतात.

>>> अश्यावेळी एकच वाक्य लक्ष्यात ठेवायचे... 'तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार' Wink

Pages