स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

हा बलात्कार इतका रानटी, निर्दयी, पाशवी होता म्हणून ह्याची निदान दखल तरी घेतली गेली, नाहीतर दर दिवशी शेकडो मुलींवर बलात्कार होतातचेत, पण आपला "आतला आवाज" काही जागा होत नव्हता.

खरंच, आज ना मला कुठले statistics मांडावेसे वाटतायत न कुठले दाखले द्यावेसे वाटतायत. माझा आजचा सूर खूप निराशावादी वाटेल तुम्हाला कदाचित, पण खरंच सांगते, विश्वास ठेवावा असं कारणंच उरलं नाहीये!

कारण हे सगळं घडत असताना, हे निषेध वगैरे व्यक्त होत असताना सुद्धा रोजच्या पेपरमध्ये किमान ५-६ बातम्या ह्याच प्रकाराताल्या होत्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विवाहितेवर अत्याचार, वृद्धेची विवस्त्र धिंड, लग्नाच्या आमिषाने बलात्कार, नवरा, दीर, भाऊ, बाप, सासरा, मित्र, सहकारी, अनोळखी, प्रतिष्ठित आणि इत्यादी ह्यांच्यापैकी नक्की कोण विश्वासार्ह आहे? खात्रीशीर रित्या नाही न सांगता येत? जर ही सुद्धा अधोगती नसेल, आणि अजूनही आपला आणि आपल्या civilization चा शेवट जवळ आलेला नसेल, तर आपण ह्या पुढे आणखी किती काय काय भोगणार आहोत ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही.

स्त्री ची अब्रू तिच्या लैंगिक अवयवांवर मोजली जाते, ते तिने किती नीट प्रकारे लपवून/सांभाळून ठेवलेत ह्यावर जोखली जाते. पुरुषाला मग बहुधा अब्रू वगैरे संकल्पना लागू होत नसाव्यात. किंवा होत असल्यात तरी फार लक्ष देण्याइतक्या महत्वाच्या नसाव्यात त्या. पुरुषाला हवी त्या क्षणी, हवी त्या पद्धतीने आणि हवी तिथे त्याची लैंगिक भूक शमवण्याची परवानगी कोणी दिली? कोणीच नाही, पण ती नाकारली ही नाही ना कोणी! म्हणजेच, एका अर्थी, समाज पुरुषाला हवं तसं वागण्याची मोकळिक देतोचे ना? म्हणजेच, समाजाचा एका अर्थी पुरुषांच्या ह्या स्वैर वागणुकीला पाठींबा आहे, अप्रत्यक्षरीत्या असेल कदाचित!अर्थात, हे सगळे माझे interpretations आहेत, तुम्हाला अमान्य असतील हि कदाचित, पण असो.

आज हि घटना समोर आली म्हणून, नाहीतर आपणही "रोज मरे त्याला कोण रडे" करून गप्प बसलो होतोच की!

बलात्कार झाला कि त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारून लोकं मोकळी होतात. पण एका so called सुसंस्कृत समाजात स्त्रीला तिला हवं तसं वागण्या-बोलण्याचे, हिंडण्या-फिरण्याची, पेहराव करण्याची मोकळिक नाहीये का? आणि हा तोच समाज आहे जो पुरुषाला ही सगळी मोकळिक देतो. भर रस्त्यावर पुरुषाने लिंग-प्रदर्शन मांडलं तरी लोकं हसून निघून जातात, उद्या स्त्रिया topless हिंडल्या तर अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का हा समाज? नाही ना? रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

सगळ्या पुरुषांना घालून-पाडून बोलायचा हेतू नाहीये माझा, पण स्त्रीला कमी लेखणार्या, तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी प्रकारची जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून हे नक्की लिहिलंय मी.

जन्माला आलेली मुलगी एक दिवसही सुरक्षित राहु शकेल ह्याची शाश्वती आहे कुठे? बलात्कार करायला ६ महिन्यांच्या मुली सुद्धा चालतात ह्या पशुंना. मग ह्या पेक्षा खरंच स्त्री-भ्रूण हत्या बरी नाही का? मी एक स्त्री आहे, त्यामुळे ह्या असल्या पाशवी प्रकाराचे पुरस्कर्ती नाहीये मी. पण जिथे जन्माला आल्यानंतर त्या जन्माची शिक्षा भोगावी लागणार असेल, तिथे जन्म न घेतलेला काय वाईट आहे?

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुदैवाने ती अशा दुसर्‍या अत्याचारापासून वाचली. >> प्रत्येक गोष्टीत काही रुपेरी झालर शोधण्याचा अट्टाहास मला पटत नाही आणि जमत नाही. ती जिवंत राहिली तर 'साक्ष' हा दुसरा अत्याचार, परत जर तो व्यक्ती सुटला आणि तिचा बदला-वदला घ्यायला आला तर तिसरा अत्याचार, समाज ती काही तिला वागणूक देईल तो चौथा अत्याचार, तिची शारीरिक क्षमता हा पाचवा अत्याचार ...ही यादी अब्ज पर्यंत वाढवू शकतो. पण तरीही ती सुटली ह्यात काहीही 'सुदैव' दिसत नाही.
ती मेली, देशाला एक दुसरी सुनिथा कृष्णन मिळण्याची शक्यता गेली. वाचली असती, काही काल आयुष्यात झाला असता त्रास तिला, तिच्या असण्याचा इतरांना काही काल त्रास झाला असता. पण पुढे बदलल असत सगळ. 'सुदैव' हा शब्दच मला ह्या संदर्भात भलता निराशावादी वाटतो आणि तिला काही भविष्य नाही ही बाब अधोरेखित करणारा वाटतो. "सुदैवाने सुटली" हा शब्दप्रयोग ज्यांच्या जीवनेच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात कोणी वापरला तर जरा तरी ठीक वाटतो.... असो...

सिमन्तिनी,
असहमत.

शिवाजी जन्मावा शेजारच्या घरी या धर्तिवरील प्रतिसाद वाटला तुमचा.

" देशाला एक दुसरी सुनिथा कृष्णन मिळण्याची शक्यता गेली. वाचली असती, काही काल आयुष्यात झाला असता त्रास तिला, तिच्या असण्याचा इतरांना काही काल त्रास झाला असता. पण पुढे बदलल असत सगळ."

हे अतीशय बालिश वाटलं वाचायला.

मी सर्जन आहे, तिला काय झालं होतं ते मला एक्झॅक्टली ठाऊक आहे, अन तुम्ही 'काही काल आयुष्यात झाला असता त्रास तिला' हे बोलताहात.. तुमचा देव तुम्हाला माफ करो.

मी सर्जन आहे, तिला काय झालं होतं ते मला एक्झॅक्टली ठाऊक आहे, अन तुम्ही 'काही काल आयुष्यात झाला असता त्रास तिला' हे बोलताहात.. तुमचा देव तुम्हाला माफ करो.
----- तिला काय झाले होते हे सामान्य जनतेला जेव्हढे समजायला हवे ते स्विकारण्याच्या पलीकडे आहे म्हणुन सर्व राग, संताप, दु:ख... आणि चिंताजनक अशी प्रचंड निराशा, या बाफचा विषयच बघा.

माझा इब्लिस यांना एक महत्वाचा प्रश्न. वैद्यकीय उपचारांसाठी तिला सिंगापुरला हलवणे गरजेचे होते का आणि कोणत्या प्रकारच्या उपचारांसाठी ?

या एका घटनेचे परिणाम दुरवर दिसतील असे मला वाटते जे घटने एव्हढेच चिंताजनक आहे. "आम्हाला मुलगी नको" असा निर्णय हजार/ लाखो जोडपे घेतील आणि तो निर्णय या नाही त्या प्रकारे अमलातही आणतील. Sad

'सुदैव' हा शब्दच मला ह्या संदर्भात भलता निराशावादी वाटतो आणि तिला काही भविष्य नाही ही बाब अधोरेखित करणारा वाटतो. "सुदैवाने सुटली" हा शब्दप्रयोग ज्यांच्या जीवनेच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात कोणी वापरला तर जरा तरी ठीक वाटतो.... असो...
----- सुदैवाने सुटली असे म्हणायचा कुणालाही हक्क नाही. तिच्या जिवाला त्रास झाला असता वा नसता हा भागच वेगळा. तिला होणार्‍या वेदनांमुळे आणि आपल्या मनाच्या कमकुवत पणा मुळे आपण सुदैवाने सुटली असा शब्द प्रयोग वापरत असू. पण तिची जगायची इच्छा होती... आणि एव्हढेच कारण बस्स होते तिला वाचवण्यासाठी १०० % प्रयत्न करण्याचे.

जो पर्यंत जिव आहे तो पर्यंत तिला वाचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवे होते. घडलेली घटना आत्यंतिक दुर्दैवी म्हणावी लागेल.

एक दुष्टचक्र सुरू झालय. उत्तरेकडच्या राज्यांत मुलींचे सरासरी प्रमाण कमी झाल्याने ज्या मुली जन्मल्या आहेत त्या असुरक्षित झाल्या आहेत आणि त्या असुरक्षित झाल्याने भावी पालकांना मुलगी नको असं वाटू लागलय.

<<<<या एका घटनेचे परिणाम दुरवर दिसतील असे मला वाटते जे घटने एव्हढेच चिंताजनक आहे. "आम्हाला मुलगी नको" असा निर्णय हजार/ लाखो जोडपे घेतील आणि तो निर्णय या नाही त्या प्रकारे अमलातही आणतील. >>>>>

आम्हाला मुलगी नाही याची खंत फार बोचत होती आजकाल...पण या घटनेने हजारदा तरी वाटून गेले...की जे होते ते ब-यासाठीच होत असावे Sad

-सुप्रिया.

या घटनेमुळे मुलगी नकोच असे विचार कृपया मनात आणु नका. जर असेच विचार आपण करु लागलो तर पुन्हा आपण मागे जात आहोत असे नाही वाटत का? हा देखील एक संक्रमण काळच आहे. सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळी त्रास सोसला नसता तर आता स्त्रिया ज्या मानाने जगत आहेत ते देखील दिसले नसते. समाज हा कोणताही बदल हळुहळु स्विकारतो. आताशी कुठे समाजाला स्त्रियादेखील कर्तुत्व गाजवु शकतात, स्वतःचे निर्णय स्वतः योग्यरितीने घेउ शकतात याची जाणीव होत आहे. कदाचित स्त्रियांना त्यांचे पुर्ण हक्क, मान मिळायला पुढील दोन तीन पिढया देखील जातील.पण तो मिळेपर्यंत तरी मुलगी नकोच असे बोलु लागलो, तर स्त्रीत्वाची ती आत्महत्या ठरेल.नुसते मुलगे जन्माला घातले म्हणजे प्रश्न कमी होणार नाहीत तर ते अजुन वेगळ्याप्रकारे निर्माण होतील.

सुप्रिया, लैंगिक हिंसाचारापासून मुलगेही सुरक्षित नाहीत.

ही एक प्रवृत्ती समाजात वाढत चाललीय जिच्या डायरेक्ट आणि इनडयरेक्ट परिणामांच्या सावटाखाली आपण कायमच राहणार भले आपण /आपल्याला/मुलगी असो नसो.
याहून वाईट 'आपला मुलगा या अशा जगात राहतोय तर आपले संस्कार हे असे प्रकार त्याने करू नये म्हणून पुरेसे पडतील का? ' हा प्रश्न मला पडत चाललाय.

हा एवढा गाजावाजा चाललाय तरी हे हिंसाचारी शांत आहेत का? इकडे माझ्या घराच्या ५० किमीच्या परिसरात दहा वर्षांखालिल मुलींना चुरडून मग विहिरीत / रानात टाकायच्या दोन घटना मागच्या आठवड्यात घडल्यात.
विहिरीत टाकणारा १५ वर्शाचा नी रानात टाकणारा २०.
कुणी काहिही म्हणो किंवा व्यक्ति/अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने कितीही गळे काढो पण माध्यमातून सतत आदळणारा लैंगिकता आणि हिंसाचाराचा मारा याला कारणीभूत आहे असा माझा ठाम विचार आहे.

याहून वाईट 'आपला मुलगा या अशा जगात राहतोय तर आपले संस्कार हे असे प्रकार त्याने करू नये म्हणून पुरेसे पडतील का? ' हा प्रश्न मला पडत चाललाय.
हा एवढा गाजावाजा चाललाय तरी हे हिंसाचारी शांत आहेत का?
कुणी काहिही म्हणो किंवा व्यक्ति/अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने कितीही गळे काढो पण माध्यमातून सतत आदळणारा लैंगिकता आणि हिंसाचाराचा मारा याला कारणीभूत आहे असा माझा ठाम विचार आहे.
<<<<<<

प्रचंड अनुमोदन

साती,

>> माध्यमातून सतत आदळणारा लैंगिकता आणि हिंसाचाराचा मारा याला कारणीभूत आहे

१००% अनुमोदन!

आ.न.,
-गा.पै.

माध्यमातून सतत आदळणारा लैंगिकता आणि हिंसाचाराचा मारा याला कारणीभूत आहे >>>

१००% अनुमोदन.

साति अनुमोदन

मै तो तंदूरी मुर्गी हू यार
गटक ले सईया अल्कोहोल से

हीडीसपणाचा कहर Sad

अशा गाण्यांच्या बाबतीत कुणालाच काही बोचत नसेल आणि दिवसरात्र अशीच गाणी दिसत असतील तर मुलांची (म्हणजे मुले आणि मुली दोन्ही) मनोवृत्ती दुषीत न झाली तर नवल...

एकंदर विषय खूपच संवेदनशील आहे., चर्चाही विस्तृत चालू आहे येथे . या विषयाची देशभर दखल घेतली गेली. अनेक माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हि जरी चांगली बाब असली तरीही एक गोष्ट वाईट अशी वाटते कि why only this case is taken as representative !?
या आणि याहून क्रौर्याच्या सीमा गाठणाऱ्या केसेस देशभर दररोज घडताहेत ... त्याविषयी काहीच नाही !?
हे असा आहे का कि दिल्ली मध्ये घडलं कि डोक्यावर घ्यायचं !
उदा.
केज्रीवालांची दररोजची नौटंकी
अण्णांची दिल्लीतली उपोषणे
त्याचा राष्ट्रीय मुद्दा करायचा आणि जेव्हा गल्ली मध्ये घडता तेव्हा किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करायचं !?
हे जे काही चालू आहे हे थोड media blasted नाही का वाटत !?

आणि या गोष्टी तात्कालिक चघळल्या जातात आणि नंतर कोणाला त्याचे पडलेले नसते ! काय अर्थ आहे मग या अशा उद्रेकाला !?
उदा.
बॉम्बस्फोट Vs सुरक्षा यंत्रणा
सीमापार दहशतवाद Vs गुप्तचर यंत्रणा
भूकंप / आपत्ती Vs बांधकामांचा दर्जा
भ्रष्टाचार Vs लोकपाल
कोरडा आणि ओला दुष्काळ / लांबलेल्या पावसाची कारणमीमांसा Vs सिंचन
या विषयातील आणि असे विकृत गुन्हे Vs कडक कायदा इ.

फिरून फिरून तेच तेच आणि तेच ! पण नेहमी नव्याने ....!!
हे मुद्दे कायम आणि in the absence of event का नाही लावून धरले जात !?
कुठे जातात मग फेस्बुकी गप्पा...

Chandanaache zaad todun kunitari holi keli mhnun chandanachi ropech jagu dyaychi nahit ??? He patle nahi.

साती, तो उपायच अयोग्य आहे कारण ते इंजेक्शनदेखील केवळ ३ महिनेच इफेक्ट करणारे आहे !
उदय, तो शब्द मी वापरला होता, चुकलेच माझे. तिच्या बाबतीत आता सर्वच शब्द पोकळ ठरले आहेत.

वरूण,

>> त्याचा राष्ट्रीय मुद्दा करायचा आणि जेव्हा गल्ली मध्ये घडता तेव्हा किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करायचं !?

अशा घटना गल्लीत घडत होत्या म्हणून दुर्लक्ष केलं. आता त्या दिल्लीतही घडायला लागल्यावर लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. भर राजधानीत लोक सुरक्षित नाहीत, मग कसलं आलंय कायद्याचं राज्य!

आ.न.,
-गा.पै.

भानुप्रियाजी,

<रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

सगळ्या पुरुषांना घालून-पाडून बोलायचा हेतू नाहीये माझा, पण स्त्रीला कमी लेखणार्या, तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी प्रकारची जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून हे नक्की लिहिलंय मी.

जन्माला आलेली मुलगी एक दिवसही सुरक्षित राहु शकेल ह्याची शाश्वती आहे कुठे? बलात्कार करायला ६ महिन्यांच्या मुली सुद्धा चालतात ह्या पशुंना. मग ह्या पेक्षा खरंच स्त्री-भ्रूण हत्या बरी नाही का? मी एक स्त्री आहे, त्यामुळे ह्या असल्या पाशवी प्रकाराचे पुरस्कर्ती नाहीये मी. पण जिथे जन्माला आल्यानंतर त्या जन्माची शिक्षा भोगावी लागणार असेल, तिथे जन्म न घेतलेला काय वाईट आहे?

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!>

प्रत्येक स्त्रीच्या मनातली चीड आपण सार्थपणे मांडलीत. मन हेलावले. बलात्कार करणारे माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचेही नाहीत.

सौ. वंदना बर्वे.

प्रमुख आरोपी राम सिंहने कारागृहातच आत्महत्या केली, कोणालाही तो आत्महत्या करेपर्यंत समजले नाही.

Sad

>>>>>या घटनेमुळे मुलगी नकोच असे विचार कृपया मनात आणु नका. जर असेच विचार आपण करु लागलो तर पुन्हा आपण मागे जात आहोत असे नाही वाटत का? हा देखील एक संक्रमण काळच आहे.

ते सगळ ठिक आहे सन्क्रमण वगैरे बोलायला चानग्ल्या गोष्टी आहेत पण मला मुलगी झाली तर तिनी या सन्क्रमणाचा त्रास का भोगावा? सन्क्रमण होउन जाउ दे मग मल मुलगी झाली तर उत्तमच आहे. नाही का?

मनुष्य हा ही एक प्राणी आहे. इतर सर्व प्राण्यांमध्ये असणारे गुण-अवगुण माणसात आढळतात. त्या अवगुणांचा प्रभाव कमी करणे हेच आपण करत असलेल्या चांगल्या संस्कारांचे कार्य आहे. पण कीतीही झाले तरी संस्कार हे बाह्यावरणच आहे. हे आवरण कमजोर असेल तर ते प्रभावशाली दुर्गुणांना आवरण्यास नक्कीच कमी पडत असेल. कीतीही कडक कायदे कानुन त्या दुर्गुणांना रोखण्यास असमर्थ असतात. कडक कायदे आणी त्यांची उत्तम अंमल बजावणी काही प्रमाणात दुर्बलांना त्यांच्यापेक्षा दुर्बलांवर अत्याचार करण्यापासुन काहीप्रमाणात परावृत्त करु शकेल,पण संपुर्ण अडवणे शक्य नाही. आणी काही बलवान लोक तर कायदे कानुन जुमानतही नाहीत. जगातील कोणता देश असा आहे ज्याचे कायदे आणी न्याय व्यवस्था असे गुन्हे रोखण्यात यशस्वी झाली आहे?

हे दुर्गुण आपल्या सर्वांना जन्मतःच मिळलेले आहेत.त्यात कुणीही अपवाद नाही. अगदी पुर्वी होउन गेलेल्या सर्व साधु, संत, महत्मा लोकांनाही अत्यंत कडक तपशर्या करुन त्या दुर्गुणांवर विजय मिळवावा लागला होता. आता या काळी कोण त्या साठी प्रयत्न / तप करण्यात वेळ घालवणार? म्हणुनच सर्व पुरुष हे कुणाही स्त्री साठी 'अनप्रेडीक्टेबल आणी धोकादायकच' असतात. त्यातही कुणी अपवाद नाही. आणी जर स्त्रीया पुरुशांपेक्षा शाररीक द्रुष्ट्या ताकदवान असत्या, तर आज असे अत्याचार पुरुषांवरही झाले असते.

'सर्व्हायवल ऑफ द फीटेस्ट' हा निसर्ग नियम आहे. आणी त्या नियमाला अपवाद करुन माणुस हा कमजोरांना सर्व्हाईव व्हायला मदत करत आहे.

हे जर पटत असेल तर:
आपल्या सर्व्हाव्हल ची काळजी कमजोरांनी स्वतःच घेतली पाहीजे. समाज मदत करु शकेल, पण त्यांच्यावर अवलंबुन रहाण्यात अर्थ नाही.

दुसरा मार्ग म्हणजे इतके बलवान व्हा की स्वतःच्या संरक्षणासाठी दुसर्यावर विसंबुन रहायला लागु नये.

हे विचार मागासलेले किंवा स्त्री विरोधी वाटु शकतील, पण आज आपण समाजात हीच परीस्थीती पहात नाही का?

::

हे लिहीण्याचा उद्येश हा या प्रकारात चुक स्त्री ची आहे असे सांगण्याचा मुळीच नाही. बलात्कारी नराधमांना डिफेंड करण्याचा तर अजीबात नाही. उद्येश हा की हे सर्व केव्हा थांबणार - तर कधीच नाही, नीदान आपल्या हयातीत तरी नाही हेसांगण्याचा आहे.

Pages