स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

हा बलात्कार इतका रानटी, निर्दयी, पाशवी होता म्हणून ह्याची निदान दखल तरी घेतली गेली, नाहीतर दर दिवशी शेकडो मुलींवर बलात्कार होतातचेत, पण आपला "आतला आवाज" काही जागा होत नव्हता.

खरंच, आज ना मला कुठले statistics मांडावेसे वाटतायत न कुठले दाखले द्यावेसे वाटतायत. माझा आजचा सूर खूप निराशावादी वाटेल तुम्हाला कदाचित, पण खरंच सांगते, विश्वास ठेवावा असं कारणंच उरलं नाहीये!

कारण हे सगळं घडत असताना, हे निषेध वगैरे व्यक्त होत असताना सुद्धा रोजच्या पेपरमध्ये किमान ५-६ बातम्या ह्याच प्रकाराताल्या होत्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विवाहितेवर अत्याचार, वृद्धेची विवस्त्र धिंड, लग्नाच्या आमिषाने बलात्कार, नवरा, दीर, भाऊ, बाप, सासरा, मित्र, सहकारी, अनोळखी, प्रतिष्ठित आणि इत्यादी ह्यांच्यापैकी नक्की कोण विश्वासार्ह आहे? खात्रीशीर रित्या नाही न सांगता येत? जर ही सुद्धा अधोगती नसेल, आणि अजूनही आपला आणि आपल्या civilization चा शेवट जवळ आलेला नसेल, तर आपण ह्या पुढे आणखी किती काय काय भोगणार आहोत ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही.

स्त्री ची अब्रू तिच्या लैंगिक अवयवांवर मोजली जाते, ते तिने किती नीट प्रकारे लपवून/सांभाळून ठेवलेत ह्यावर जोखली जाते. पुरुषाला मग बहुधा अब्रू वगैरे संकल्पना लागू होत नसाव्यात. किंवा होत असल्यात तरी फार लक्ष देण्याइतक्या महत्वाच्या नसाव्यात त्या. पुरुषाला हवी त्या क्षणी, हवी त्या पद्धतीने आणि हवी तिथे त्याची लैंगिक भूक शमवण्याची परवानगी कोणी दिली? कोणीच नाही, पण ती नाकारली ही नाही ना कोणी! म्हणजेच, एका अर्थी, समाज पुरुषाला हवं तसं वागण्याची मोकळिक देतोचे ना? म्हणजेच, समाजाचा एका अर्थी पुरुषांच्या ह्या स्वैर वागणुकीला पाठींबा आहे, अप्रत्यक्षरीत्या असेल कदाचित!अर्थात, हे सगळे माझे interpretations आहेत, तुम्हाला अमान्य असतील हि कदाचित, पण असो.

आज हि घटना समोर आली म्हणून, नाहीतर आपणही "रोज मरे त्याला कोण रडे" करून गप्प बसलो होतोच की!

बलात्कार झाला कि त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारून लोकं मोकळी होतात. पण एका so called सुसंस्कृत समाजात स्त्रीला तिला हवं तसं वागण्या-बोलण्याचे, हिंडण्या-फिरण्याची, पेहराव करण्याची मोकळिक नाहीये का? आणि हा तोच समाज आहे जो पुरुषाला ही सगळी मोकळिक देतो. भर रस्त्यावर पुरुषाने लिंग-प्रदर्शन मांडलं तरी लोकं हसून निघून जातात, उद्या स्त्रिया topless हिंडल्या तर अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का हा समाज? नाही ना? रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

सगळ्या पुरुषांना घालून-पाडून बोलायचा हेतू नाहीये माझा, पण स्त्रीला कमी लेखणार्या, तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी प्रकारची जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून हे नक्की लिहिलंय मी.

जन्माला आलेली मुलगी एक दिवसही सुरक्षित राहु शकेल ह्याची शाश्वती आहे कुठे? बलात्कार करायला ६ महिन्यांच्या मुली सुद्धा चालतात ह्या पशुंना. मग ह्या पेक्षा खरंच स्त्री-भ्रूण हत्या बरी नाही का? मी एक स्त्री आहे, त्यामुळे ह्या असल्या पाशवी प्रकाराचे पुरस्कर्ती नाहीये मी. पण जिथे जन्माला आल्यानंतर त्या जन्माची शिक्षा भोगावी लागणार असेल, तिथे जन्म न घेतलेला काय वाईट आहे?

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या बातम्या कमीच होत्या ना म्हणून अशी ही बातमी आज सकाळी वाचायला मिळाली. Angry

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17811496.cms

बाहेर समाजात, शाळा-कॉलेजात, नोकरीच्या ठिकाणी सुरक्षा नाहीच पण घरातही नाही? इतका कामांध का होतो पुरुष? आपल्या मुलीवर असले घाणेरडे अत्याचार करताना त्याला काहीच कसं वाटत नाही? का क्षमा करावी स्त्रीजातीनं????????? प्रचंड संताप होतोय.

सगळे पुरुष असे नसतात मान्य पण जर प्रत्येक लैंगिक अत्याचाराबद्दल लिंगविच्छेदनाची शिक्षा फर्मावली तर अर्ध्याहूनही अधिक पुरुष हिजडे होऊन फिरतील. Angry

You did not die due to multiple organ failure.
You died because of our Country's multiple system failure!

Rest in Peace!

Braveheart's body cremated amid tight security, fog at Dwarka Sector 24 amid heavy deployment of Delhi Police and RAF personnel. - DNA

<नंतर जेव्हा ती मुलगी स्वःताच्या पायवर उभी राहिल्याचे न्युज आली होती तेव्हा नंतर तिची डेथ होईल असे वाटले नव्हत>
प्रसिक, ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याच्या/चालल्याच्या बातम्या चुकीच्या होत्या.
http://m.indianexpress.com/news/%22-it-s-like-the-life-we-had-never-exis...

Last Friday, he saw claims on a TV channel of his sister having “taken a few steps, with brother’s help”, and “walking for the first time after the incident”. She was actually vomiting and complaining of a new abdominal pain that day. “That night, my mother and sister hardly slept. It was a long and bad night for us, and TV channels were flashing that she was on her feet. I was tired and angry,” he recounts.

मामीने दिलेली लिंक आत्ताच वाचली. हे असं कसं करू शकतं कोणी? मुली जर स्वतःच्या घरात पण सुरक्षित नसतील तर हा बाफ अगदी योग्यच आहे म्हणायचा.

मामीने दिलेली लिंक आत्ताच वाचली. हे असं कसं करू शकतं कोणी? मुली जर स्वतःच्या घरात पण सुरक्षित नसतील तर हा बाफ अगदी योग्यच आहे म्हणायचा. >> +१
काय घडतंय आणि कधी थांबणार हे सगळं ??? हताश झाल्यासारखं वाटतं अशावेळी Sad

Indian Medical Association ने अत्यन्त नाजुक परिस्थितीत असणार्‍या ऋग्णाला सिगापुरला नेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह व्यक्त केले आहे. तिला देशाबाहेर नेण्याचा निर्णय हा पुर्णतः राजकीय असेल तर या पेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असेल ? Angry

http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-Medical-Association-ques...

तिला देशाबाहेर नेण्याचा निर्णय हा पुर्णतः राजकीय असेल तर HM, PM, राणीसाहेब, यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा!

तिला देशाबाहेर नेणे योग्य की अयोग्य यासंदर्भातच फक्त वाद घालणारोत का आपण?
ती गोष्ट महत्वाची नाही असे नाही पण त्यापलिकडे काही नाहीये का या सगळ्या केसमधे.

१८ पूर्ण नाही म्हणून ज्याच्यावर जुव्हेनाइल कोर्टात केस चालवली जाणारे आणि त्यामुळे तो सगळं करूनच्या सवरून व्यवस्थित सुटणारे त्या भिकारड्या कार्ट्याबद्दल काही दिसत नाही?

नीधप,

तुमचा उद्वेग समजू शकतो. त्या एकाच्याच नव्हे तर सर्वाच्यासर्व नराधमांच्या देहांची चाळण झालेली आपल्यातल्या बर्‍याच जणांना/जणींना बघायला आवडेल. मात्र यासोबत सरकारी षंढपणाविरुद्ध जो लोकोद्रेक होतोय त्याला आपण पाठींबा व्यक्त करणेही तितकेच आवश्यक आहे.

अधिक स्पष्ट शब्दांत आरोप करता येऊ शकतो. ती जर जिवंत राहिली असती तर सरकारच्या नामर्दपणाचं जितंजागतं प्रतीक ठरली असती. नेमकं सरकारला तेच नको होतं म्हणून तिचा सरकारने जाणीवपूर्वक खून केला आहे. मी हा आरोप करत नाहीये, पण लोकं तसं बोलणारच.

तिच्याविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढत चालल्याची मला शंका येतेय. त्या पाचांव्यतिरिक्त आजूनही गुन्हेगार असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

ह्या गोष्टीमुळे एका ठळक जाणवले, की कायदा वगैरे गोष्टी होतील( व तो झालाच पाहिजे) पण पाशवी वृती बदलायला वेळ जाईल तोवर प्रत्येक स्त्रीने'च' स्वतःला जपले पाहिजे. त्यासाठी पुन्हा तिलाच समझोता करावा लागणार.समझोता तिच्या येण्या-जाण्याच्या वेळेवर. वगैरे वगैरे. स्त्रीची गळचेपी होतेच आहे व होइल अश्या विधानाने पण दुर्दैवाने तेच सत्य आहे.
प्रत्येक नाक्या नाक्यावर, घराघरातून असल्या छुप्या नाहितर उघड पाशवी वृतीचे पुरुष फिरत आहेत/असतात. त्यांची संख्या कशी कमी करावी हा प्रश्ण आहे.
हे म्हणजे रस्त्या रस्त्यातून फिरणारे कुत्रे( हा खरा तर कुत्र्यांचा अपमान आहे तरीही हे फक्त उदाहरण आहे) पकडून कसे नसबंदी करून सोडतात किंवा चावरे अस्तील तर मारून टाकतात अश्या उपायाची गरज वाटते.

Sad

भरत मयेकरंनी दिलेली लिंक वाचून घृणा वाटली नातेवाईक व मित्र परीवरांनी विचारलेल्या प्रश्णांची, कोणाला काय तर कोणाला काय...
गॉसिप करण्यर्‍यांना म्हणा कसलेच भान नसते... :रागः

लिंक मधील हे वाचून संताप झाला.. भारतीय मेंटालिटी.. की मित्र कोण होता... कधी पासून होता... लग्न झाले तर मूल होणार का नाही?

काय करायचे असते लोकांना हे प्रश्ण चर्चा करून? Sad
असल्या लोकांना वेळ जात नसतो म्हणून मजा वाटते का ?
----The flood of relatives and neighbours has not made things smooth either. “People want to know what she said, what she wrote in notes, how long she had known her male friend, who was accompanying her. Relatives want us to ask doctors if she will be able to get married and have children. My parents have become tired of answering questions,” he says.

Politicians have gone so far as to seek a meeting with the girl. “There is a risk of infection, we have said that repeatedly. But the requests continue to pour,” a senior administrative official at Safdarjung Hospital said.

लिहिण्याचे शब्दच संपलेत.... काय लिहू? या घटना अशाच किती काळ घडत राहणार? बाईचे कपडे, तिची चाल, तिचं दिसणं, तिचं बाई असणं, तिचं घरात / घराबाहेर वावरणं, तिने श्वास घेणं हाच आता गुन्हा आहे. बाईला भारतात जगण्याचा अधिकार नाही. माणूस वगैरे फार पुढची गोष्ट. एक पशू, प्राणी, जनावर म्हणूनही नाही.

पुरूषहो, बाकी काही बदलू नका. कायदे कदक करू नका. बलात्कार्‍यांना फाशी देऊ नका. फक्त आणि फक्त तुमची आणि तुमच्या मुलाची मानसिकता बदला. भक्षक बनू नका. संरक्षक बना. खरा पुरूषार्थ त्यामधे आहे.

गामा_पैलवान | 30 December, 2012 - 14:25
अधिक स्पष्ट शब्दांत आरोप करता येऊ शकतो. ती जर जिवंत राहिली असती तर सरकारच्या नामर्दपणाचं जितंजागतं प्रतीक ठरली असती. नेमकं सरकारला तेच नको होतं म्हणून तिचा सरकारने जाणीवपूर्वक खून केला आहे. मी हा आरोप करत नाहीये, पण लोकं तसं बोलणारच. >>>>>>>
या पोस्टीची दखल घेतली आहे.
लोकशाही आहे म्हणुन वाटेल ते बोलु नये
अश्या प्रकारावर राजकारण न करता हे प्रकार परत घडु नये या करिता काही करावे
काही पक्ष आता यावर गलिच्छ राजकारण करणार आहे. त्यामुलीला सिंगापुर ला घेउन गेले नसते तरी या लोकांनी राजकारण केले असते.
आता घेउन गेले तरी राजकारण करत आहेत
Angry

इतकी भयानक घटना झाली तरी ह्यांच्या कॉन्स्पिरसी थिअरीज संपायला तयार नाहीत,प्रेत नेले की काय नेले.
इट्स अ‍ॅज सिकनिंग अ‍ॅज द इन्सिडन्स.

इतकी भयानक घटना झाली तरी ह्यांच्या कॉन्स्पिरसी थिअरीज संपायला तयार नाहीत,प्रेत नेले की काय नेले.
इट्स अ‍ॅज सिकनिंग अ‍ॅज द इन्सिडन्स.>>>>>>>>> +१०००००००००००००

१८ पूर्ण नाही म्हणून ज्याच्यावर जुव्हेनाइल कोर्टात केस चालवली जाणारे आणि त्यामुळे तो सगळं करूनच्या सवरून व्यवस्थित सुटणारे त्या भिकारड्या कार्ट्याबद्दल काही दिसत नाही?
------- हा मुद्दा पण संतापजनक आहे. एक आरोपी १८ पेक्षा वयाने लहान आहे म्हणुन त्याच्यावरचा खटला बाल न्यायालयांत चालवला जाईल असे तज्ञ मंडळी म्हणत आहेत.

The Juvenile Justice (Care and Protection of Children Act) येथे बघायला मिळेल.
wcd.nic.in/icpsmon/pdf/jjrules2007.pdf

पान क्र. ४ वर मुलभुत तत्वे दिलेली आहेत. The act states that an offence committed by a person below 18 is an act of innocence.

From Page 4, The Juvenile Justice (Care and Protection of Children Act)
I. Principle of presumption of innocence:
(a) A juvenile or child or juvenile in conflict with law is presumed to be innocent of any malafide or criminal intent up to the age of eighteen years.
(b) The juvenile’s or juvenile’s in conflict with law or child's right to presumption of innocence
shall be respected throughout the process of justice and protection, from the initial contact to
alternative care, including aftercare.
(c) Any unlawful conduct of a juvenile or a child or a juvenile in conflict with law which is done for survival, or is due to environmental or situational factors or is done under control of adults, or peer groups, is ought to be covered by the principles of innocence.
(d) The basic components of presumption of innocence are:

(i) Age of innocence
Age of innocence is the age below which a juvenile or child or a juvenile in conflict with law
cannot be subjected to the criminal justice system. The Beijing Rule 4(1) clearly lays down that
“the beginning of the age of criminal responsibility shall not be fixed at too low an age level
bearing in mind the facts of mental and intellectual maturity”. In consonance with this principle,
the mental and intellectual maturity of juvenile or child or a juvenile in conflict with law below
eighteen years is considered insufficient through out the world.

कायदा या नराधामाच्या कृत्याला भाबडेपणा, अजाणातेपणा, निरागसता असे मानणार असेल तर या पेक्षा क्रुर थट्टा कोणती नसेल.

अशोक साहेब - कोर्टात निव्वळ आरोपीचे वय बघितले जाते का त्याने केलेल्या अपराधाचे गांभिर्य ? एखादी छोटी चोरी, मारहाण ठिक आहे, पण अशा गंभिर गुन्ह्यातही कायदा त्या अपराध्याला भाबडा मानतो का ? हा विषय तुमचा आहे म्हणुन तुम्हाला प्रश्न.

आगाऊ, नीधप आणि अजय जवादे,

>> इट्स अ‍ॅज सिकनिंग अ‍ॅज द इन्सिडन्स.

या गुन्ह्यात पाचपेक्षा जास्ती आरोपी असू शकतात. हे जास्तीचे आरोपी कधीच उघड होणारे नाहीत. म्हणूनच ते अधिक धोकादायक आहेत.

अप्रिय घटना घडून गेल्यावर कोणालातरी अन्वेषण करावंच लागतं. अगदी अमेरिकेतल्या सँडी हूक्स मधल्या चिमुरड्यांच्या हत्येनंतरही विश्लेषण करावंच लागतं. हे काम कोणी आनंदाने करीत नसतं. उपरोक्त अदृश्य गुन्हेगार नेमक्या याच त्रुटीचा फायदा घेतात.

आडवेतिडवे प्रश्न विचारून सत्ताधार्‍यांना खोपच्यात घेतलंच पाहिजे. नाहीतर लोकशाही नावापुरतीच उरेल.

आ.न.,
-गा.पै.

पुरुषांमधले क्षात्रतेज केव्हाच विझले आहे. घटना घडताना अटकाव करणे, छेडछाड करणा-यांना खडे बोल सुनावणे असे करू शकणारे पुरूष विरळा होत चाललेत. हे सर्व बाईलाच करावं लागतं. पुरूषांमधे काहीच दम नसल्याचे माहीत असल्याने मग मवाली अशा "उद्धट" बाईला धडा शिकवण्यासाठी "विचारमंथन" वगैरे करतात. त्यात "स्त्री" बळी जाते. "पुरूष" घटना घडल्यावर पोलीस, सरकार इ. वर आपले नाकर्तेपण ढकलून मोकळे होतात.

बैल छाप जर्द,

>> पुरुषांमधले क्षात्रतेज केव्हाच विझले आहे.

अनिच्छेने का होईना पण आपलं म्हणणं खरं आहे असं म्हणावंसं वाटतं. Sad

आ.न.,
-गा.पै.

उदय...

कायद्याच्या भाषेत Juvenile {अल्पवयीन} म्हणजे काय ? ते प्रथम पाहणे गरजेचे आहे. सांगितले तर तुम्हाला आणि अन्यांना आश्चर्य वाटेल पण घटनेतील या संबंधीची तरतुद "आपली" नसून ती चक्क युनोची आहे... जी जगातील सार्‍या सदस्य राष्ट्रांनी स्वीकृत केली आहे. त्याला अनुसरून आपल्या संसदेने २००० साली योग्य ती दुरुस्ती करून Juvenile Justice Act {JJA} पारित केला आणि त्याप्रमाणे "गुन्हेगार" म्हणून पोलिसांनी पकडलेला मुलगा अगर मुलगी जर वय १८ च्या आतील असेल तर त्याना Juvenile गटातील संबोधून तशाच स्वरूपाच्या गुन्ह्याकरीता 'अ‍ॅडल्ट' साठी लागू होणारी आयपीसीची कलमे लागू होणार नाहीत आणि मग साहजिकच त्या अंतर्गत विहीत केलेली शिक्षाही भोगावी लागत नाही. [विशेष म्हणजे मुलात आणि मुलीत वयाचा फरक केलेला नाही...जो पूर्वी १९८६ च्या तरतुदीत होता.]

समजा तो मुलगा अगदीच अल्पवयीन म्हणजे "१२" वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षाही कमी वयाचा आहे आणि त्याने आयपीसी व्याख्येतील गुन्हा केला असला तर त्याला कायद्याचे कोणतेच कलम लावता येणार नाही...कारण त्याला 'आपण काय करीत आहोत' याचे ज्ञान नाही असे सुप्रीम कोर्टाने मानले आहे. म्हणजे उदा. इथे कोल्हापुरात एका ११ वर्षाच्या भाच्याने आंब्याच्या वाटणीवरून रागाच्या भरात टेबलवरील सुरीने आपल्या मामाला भोसकले होते, तरी कायद्याने त्याच्या केसालाही धक्का लागला नाही...फक्त पालकांना ताकीद मिळाली...सुदैवाने मामाही वाचला होता. मात्र १२ ते १८ वर्षामधील Juvenile व्याख्येत बसलेल्या परंतु गुन्हा सिद्ध झालेल्यांची रवानगी शासनाच्या बालसुधार गृहात केली जाते. तिथे त्याला गुन्ह्याच्या गांभिर्यतेच्या आधारे १ ते ३ वर्षे सरकारी खर्चीने ठेवले जाईल....[सक्तमजुरी नव्हे]....आणि मग त्यानंतर त्यास पालकांच्या ताब्यात दिले जाईल.

[उदय....अर्थात मी आज या क्षणी अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतुदींना अनुसरून सविस्तर लिहिले आहे. 'निर्भया' च्या केसला ३ जानेवारी २०१३ पासून चक्रे मिळतील अशी चिन्हे आजतरी दिसत आहेत. देशात उसळलेला जनक्षोभ पाहता पकडलेल्या सर्वच आरोपींना प्रसंगी कायद्यातील सध्याच्या तरतुदीव्यतिरिक्त जास्त काही वा वेगळ्या शिक्षा होऊ शकतील असेच वातावरण आहे....त्या अनुषंगाने त्या अल्पवयीन मुलाचाही वेगळ्या शिक्षेसाठी विचार होईल असे म्हणता येईल....पण प्रथम त्याचा त्या प्रकरणात किती आणि कसा संबंध आहे हे सरकारी वकिलाना सिद्ध करावे लागेल....तेही फार किचकट काम आहे, पण त्याचा उल्लेख इथे नको.]

अशोक पाटील

भानुप्रिये: लिखाण भिडल! आमच्या मनातला संताप व्यक्त केला आहेस.
कडक कायदे, मग अगदी ईस्लामिक कायदे आणा, हाच जालीम आणि ताबड्तोब करण्या सारखा उपाय आहे. मानसिकता बदलण वगैरे खूप दुरच्या गोष्टी राह्यल्या.

परवाच एका पार्टीत एक बया घसा ताणून भारतीय बाईला दिलेला देवीचा दर्जा वगैरे बकवास करत होती. तीला म्हटल की आमच्या मुंबईत फोरास रोडवर अश्या खूप देविंची मंदिर आहेत. एकदा चल त्यांची उत्तरपूजा बघायला. हल्लाच चढ्वला मी तिच्या दांभिक अर्ग्युमेंट्सवर. नंतर वाईट वाटल की समाजातल्या प्रत्येक माणसाला आत्मपरिक्षण करायची हीच वेळ. ते सोडून असल्या दांभिक विचारांच्या मागे काय दडता?

जुवेनाईल म्हणून वय एवढाच निकष ठेवणे चुकीचे आहे. गुन्ह्याचे स्वरुप पाहून १४+ आरोपीवर अ‍ॅडल्ट म्हणून खटला चालवण्याइतपत कायदा लवचिक असायलाच हवा. युनोच्या गाईडलाइन्स असल्या तरी केस बाय केसबेसीसवरच या गाईडलाईन्सचा विचार होणे गरजेचे आहे.
अमेरीकेतील आमच्या शेजारच्या राज्यातील याबाबतच्या कायद्याची लिंक

https://www.ohiobar.org/ForPublic/Resources/LawYouCanUse/Pages/LawYouCan...
जुवेनाईल ट्रान्सफर लॉ संबंधी यु. एस. डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची लिंक
https://www.ncjrs.gov/pdffiles1/ojjdp/232434.pdf

अशा प्रकारचा कायदा भारतात असायलाच हवा. १६ वर्षाच्या व्यक्तीला आपण काय करतोय हे चांगले कळत असते. रेप सारख्या केसमधे तर नक्कीच!

११ वर्षाच्या मुलाचं समजू शकतो एकवेळ पण त्या मुलीवर झालेले अत्याचार निरागसपणे नकळत केले नव्हते त्याने. नक्कीच इनफ मोठा असणार तो हे सगळं करण्यासाठी. १७ वर्ष ६ महिने वयाचा म्हणूनही त्याला सूट मिळणार...

कायदा गाढव म्हणतात ते खरंच.

Pages