२५० ग्रॅ. बेसन, एक लहान वाटी खवा, बेसनापेक्षा किंचीत कमी साखर, वेलचीपूड, ३ टे.स्पू. तूप.
थोड्या तुपावर बेसन हल्का गुलाबी रंग येइपर्यंत भाजा. (खवा घरी करणार असाल तर दुध न लागु देता मध्यम गॅसवर सतत ढवळून तयार करून घ्या. एक पाकीट फॅट असलेल्या दुधाचा एक लहान वाटी खवा तयार होऊ शकतो.)
बेसन थंड्/कोमट झाले की त्यात खवा मिसळा. गुठळ्या होवू देऊ नका. ताटाला तूप लावून तयार ठेवा. वेलची पूड तयार करा.
साखर भांड्यात काढून तीत साखर फक्त ओली होईल एव्हढे पाणी अंदाजे घाला. वरील प्रमाणाला १/४ ग्लास पाणी लागले. हे भांडे गॅसवर ठेवा. मंद आचेवर ढवळत ठेवून दोनतारी पाक करा. बोटामध्ये पाक धरल्यास तारा दिसायला लागताच गॅस बंद करा. बेसन, वेलची-पूड, बेसन खवा मिश्रण घालून एकजीव करा. तूप घातलेल्या ताटात पसरा. थोडे कोरडे झाल्यावर वड्या कापा.
१. बाजारू खव्यात मिल्क पावडर्/मैदा मिक्स असू शकते. त्याप्रमाणे साखर अॅडजस्ट करावी. नाहीतर वडी अगोड होते.
२. आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स वापरू शकता. मिश्रण ताटात पसरल्यावर त्यावर ड्रायफ्रुट्सचा चुरा दाबून बसवावा.
फोटो टाका मग सांगते रेसिप कशी
फोटो टाका मग सांगते रेसिप कशी ते ?
अमृता फोटो नाहीये गं.
अमृता फोटो नाहीये गं. खव्यामुळे बर्फीचा रंग जरा क्रीमीश होतो, पण चव सही असते.
छान खमंग लागत असणार ह्या
छान खमंग लागत असणार ह्या वड्या.
हो दिनेशदा. खव्यामुळे ही
हो दिनेशदा. खव्यामुळे ही बर्फी जरा मऊसर बनते. ज्यांना खव्याची चव आवडते त्यांना नक्की आवडेल.
वड्यांचा फोटो टाकला आहे.
वड्यांचा फोटो टाकला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
मी खाल्ल्या आहेत पण
मी खाल्ल्या आहेत पण चिन्नुच्या हातच्या नाही.
मस्त लागतात. बंगळूरात ताज दुध खूप मिळायच तेव्हा तिकडे नेहमी बनवल्या जात.
चिन्नु फोटो छान आहे. तोंपासु.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
चिन्नु मकरसंक्रातीची तयारी चालू झाली का???
आरती काही विशेष तयारी नाही
आरती
काही विशेष तयारी नाही झाली गं. तू सांग काय चाललयं?
चिन्नू तोंपासु एकदम
चिन्नू तोंपासु एकदम
थँक्स दक्स! ही साबांची
थँक्स दक्स!
ही साबांची रेस्पी. प्रमाण विसरून गेले म्हणून पहायला आले
मस्त!
मस्त!
वड्या खमंग दिसताहेत. ही
वड्या खमंग दिसताहेत.
ही साबांची रेस्पी.>>> टिंब थोडा चुकीचा वाचला
थँक यू, मंजुताई. या रेस्पीने
थँक यू, मंजुताई.
या रेस्पीने जमल्या तर वड्या, नाहीतर लाडू होतात
श्री, 'कितने आदमी थे?' वाला सांबा का?
साखर थोडी कमी म्हणजे किती
साखर थोडी कमी म्हणजे किती घ्यायची? २ वाट्या बेसन असेल तर दीड वाटी चालेल का?
चिन्नु... वड्या केल्या...
चिन्नु... वड्या केल्या... छान झाल्या... मऊ नाही एकदम खुसखुशीत... पाकाची भिती होती पण जमला.. धन्यवाद
धन्यवाद स्वधा.
धन्यवाद स्वधा. या वड्यांची गंमत अशी की पाक नाही जमला तरीही बर्या होतात.
रोचीन, मेसेज वेळात पाहिला नाही, तरी साखर आपल्या आवडेल तशी घ्यावी. 2 वाट्या बेसनाला दीड पेक्षा थोडी जास्त साखर घ्या. खव्यामुळे या वड्या गोडमिट्ट होत नाहीत.
खवा बनवायला थोडा वेळ लागेल.
खवा बनवायला थोडा वेळ लागेल. बाजारातून आणायचा नसेल तर त्या ऐवजी पनीर टाकून बघितले तर? कोणी करून बघितले आहे का? मी try करून बघते.
नक्की try करून पहा आणि सांगा
नक्की try करून पहा आणि सांगा praj_n. माझ्या मते texture वेगळं येइल आणि साखर पण जास्त लागेल .
पाकाच्या एवजी बारीक साखर
पाकाच्या एवजी बारीक साखर टाकली तर चालतं का? पाक जरा टेन्शन चं काम आहे. वेळही लागतो .
पिठीसाखर घालून खूप एकत्र
पिठीसाखर घालून खूप एकत्र मळल्यासही काम होते.
पनीर -
पनीर -
पनीरची चव चांगली नसते. त्याऐवजी मिठाईवाल्यांकडे साधी पांढरी मावा बरफी कायम मिळते. ती अधिक भाजलेले बेसन एकत्र करायचे. साखर/पाक, खवा जरुरी नाही कारण मावा बरफी म्हणजे ओला खवा अधिक भरपूर साखर. खमंगपणा थोडा कमी येईल.
गाजर/दुधी हलवा करतानाही ही बरफी वापरता येते॥