माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या - २०१२

Submitted by साधना on 12 November, 2012 - 10:53

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

माझ्या ऑफिसातल्या हौशी कलावंतानी दिवाळीच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळ्या इथे देतेय.

खालची रांगोळी रंगवलेले तांदुळ वापर्पुन घातलीय.

खालच्या रांगोळ्या दस-यानिमित्त घातल्या होत्या -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, सुरेख!! मोरपीस अशक्य सुंदर. तसेच देवी कात्यायनी ही त्रिशूळाने भ्रूणहत्या व हुंडा या राक्षसांना मारते आहे ही कल्पनाही प्रचंड आवडली.

आईशप्पथ!! काय एकसे एक रांगोळ्या आहेत गं!!...
फारच सुंदर!!! खूप आवडल्या. तुझ्या ऑफीसमधे एकेक उत्साही आणि कलाकार मेंबर्स आहेत हं. सगळ्यांना हॅट्स ऑफ सांग. आणि फोटो पण मस्त काढलेस! ह्यातली तू काढलेली कोणती? तुझ्या कलीग्जना दिवाळीच्या शुभेच्छा सांग.

सर्वच रांगोळ्या मस्तच.
फुलांच्या रांगोळ्या आणि मोरपिस झकासच.

DSCN1478.JPG

१०फुट लांब आहे आणि ७.५ फुट रुंद --- माझे क्रिएशन Happy

DSCN1478.JPG

आणि ही रिसेप्शन मधे काढलेली फुलांची

दोन्ही रांगोळ्यांना विभागून पहीला नंबर दिला Wink

Pages