नमस्कार न्यु जर्सी (ईस्ट कोस्ट) कर्स,
सँडी येत आहे असे वाचले.
जर हे भारतीय वेधशाळेने सांगितले असते तर काही काळजी नव्हती. कारण त्यानी सांगितले वादळ येत आहे म्हणजे लखख उन पडते. (यावर उगाच भारत्/अमेरिका भांडणे कोणी करु नयेत. कारण काही दिवसापुर्वी त्यानी पुण्यातला पाउस संपला असे लिहिले आणि आमच्या बालेवाडीत वीजांच्या कडकडाटासह पाउस पडला आणि आमचा इन्वर्टर भिजला हा पुरावा आहे. असो)
न्यु जर्सीच्या वेदर चॅनेलचा मात्र अचुक अनुभव असल्यामुळे (त्यानी म्हटले आफ्टरनुन मधे स्नो सुरु होणार की १२:०१ ला पहिली स्नो फ्लेक जमिनिवर पडलेली पाहिली आहे) हे नक्की जरा डेंजरस असेल असे दिसतेय. कदाचित इनलँड ला कोस्टल एवढा धोका नसेलही पण तरी काळजी घ्या. आम्ही तिकडे असताना एकदा असेच स्टॉर्म येणार असे जाहिर झालेले पण ऐनवेळी त्याच्या "पाथ" मधे बदल होउन ते बाहेरच्या बाहेर निघुन गेले होते. यावेळीही तसे झाले तर बेस्टच.
बेस्ट ऑफ लक. टेक केअर..
धडाआआआआम धूम अन लखलखाट चालू
धडाआआआआम धूम अन लखलखाट चालू आहे ईथे...
काळजी घ्या लोक्स!
काळजी घ्या लोक्स!
काळजी घ्या सगळे.
काळजी घ्या सगळे.
सगळ्यांनीच काळजी घ्या आणि
सगळ्यांनीच काळजी घ्या आणि सुरक्षित ठिकाणी रहा.>>>+१
सगळे जपून रहा. आज कोजागिरी.
सगळे जपून रहा.
आज कोजागिरी. वार्याच्या आणि पावसाच्या मार्यात चंद्राचं दर्शन झाल नसलं तर आताच घेतलेला चंद्राचा फोटो पाठवत आहे.
काळजी घ्या लोक्स. इथे चेन्नईत
काळजी घ्या लोक्स. इथे चेन्नईत पण तुफान पाऊस आणि वारा. शाळा कॉलेजला सुट्टी.
केदार, एक अबोली >>>
केदार, एक अबोली >>> धन्यवाद
पॉवर कट
पॉवर कट
काळजी घ्या आणि माचूपिचूची
काळजी घ्या आणि माचूपिचूची आरती गायला विसरु नका
http://www.maayboli.com/node/2876
सर्वानी काळजी घ्या !!
सर्वानी काळजी घ्या !!
न्युयॉर्क चे
न्युयॉर्क चे टाईमस्क्वेअर................. शांत शांत .....
काळजी घ्या लोकहो.
काळजी घ्या लोकहो.
लोकहो, जमेल तसं, जमेल तेव्हा,
लोकहो, जमेल तसं, जमेल तेव्हा, प्लीज अपडेट!
सर्वांनी काळजी घ्या.........
सर्वांनी काळजी घ्या......... इथे बर्फाने थैमान घातले आहे. न्युयॉर्क, न्युजर्सीला तर प्रचंड नुकसान झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत थोडे तरी कमी होईल हीच अपेक्षा आहे.
झक्की कुठे असतात? त्यांची
झक्की कुठे असतात? त्यांची खबरबात ठीक?
काल लँडफॉल नंतर इकडे पाऊस,
काल लँडफॉल नंतर इकडे पाऊस, वार्याचा जोर खूप वाढला. आवाजामुळे झोप येत नव्हती. आता वारा कमी आहे, पण पाऊस आहे. वीज गेली नाही.
नारळ सोडा दर्याला, समदं ठीक
नारळ सोडा दर्याला, समदं ठीक होईल..
कुणाकडून काही कळले तर इथे
कुणाकडून काही कळले तर इथे पोस्ट करत रहा. सगळ्यांचीच काळजी वाटतेय.
इथे जरा पाउस झाला की आधी वीज
इथे जरा पाउस झाला की आधी वीज घालवतात.....
.
.
मॅनेजमेंट चांगली केली आहे प्रशासनाने.......... काळजी घ्या
कस्काय लोक? ठीक का सगळे? घरी
कस्काय लोक? ठीक का सगळे?
घरी पॉवर कालच गेले आणि ३-४ दिवस तरी कदाचित येणार नाहीत असं वाटतंय.
झोपण्यासाठी गादी सोडून ऑफिसमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत त्यामुळे फार काही प्रॉब्लेम होऊ नये.
आमच्याकडे सगळं व्यवस्थित.
आमच्याकडे सगळं व्यवस्थित. दिवे पण आहेत. वारं खूप कमी झालय.. चमन आणि सगळे आमच्या घरी या..
काळजी घ्या सगळे!! इकडे
काळजी घ्या सगळे!! इकडे अपडेट्स कळवत राहा.
इथे येऊन नियमीतपणे वाचतीये.
इथे येऊन नियमीतपणे वाचतीये. सगळे नीट रहावेत हीच प्रार्थना.
रात्री २ वाजता वादळ भयानक
रात्री २ वाजता वादळ भयानक घोंघावत असतांना घरातला कार्बन-मोनॉक्साईड अलार्म केकाटायला लागला. बाहेर जाऊन गाडीत बसणे हा एक ऑप्शन होता पण वादळ,पाऊस आणि अंधार बघता ते अशक्य होते.
मग सगळ्या खिडक्या ऊघडून देण्याशिवाय पर्यायच नव्हता.
सगळीकडे पसारा झाला पण मजा आली.
कार्बन मोनॉक्साईड वाढण्याची कारणे कुणाला माहित आहे का?
फायरप्लेस कायमच बंद असते आणि ईतर अॅप्लायंसेस पावर नसल्यामुळे बंदच होती.
दोन रात्री पूर्वीही असे झालेले. बॅटरीचा प्रॉब्लेम नसावा कारण कंटिन्यू बीपींग नाही होत, फक्त रात्रीच होते.
कुणाला ह्याबद्दल काही अनुभव आहे का?
बातम्यात पण निसर्गाचे रौद्र
बातम्यात पण निसर्गाचे रौद्र स्वरुप पाहुन थरार जाणवत होता. खुशाली कळवा.
चमन, माझ्याकडे बॅटरीचा
चमन, माझ्याकडे बॅटरीचा प्रॉब्लेम असतानाही मधेमधे वाजायचा...
बॅटरी बदलल्यावर बं द झाला आवाज
अरे देवा. चमन, मला हे
अरे देवा.
चमन, मला हे सापडले-
http://www.ncdhhs.gov/hurricanes/copoison.htm
नानबा, लोला, लिंक बद्दल
नानबा, लोला,
हीटर वगैरे अगदी ६२-६३ फॅ. असेल तरच लावतो.
लिंक बद्दल धन्यवाद.
मी त्या ट्वायलाईटमधल्या एडवर्ड सारखा थंड रक्ताचा असल्याने मला थंडीचा आजिबात त्रास होत नाही
शेजार्यांनी फायरप्लेस वगैरे काही उपद्व्याप केले की काय माहित नाही. CO त्यांच्याकडून कदाचित आला असण्याची शक्यता आहे. CO मोजणारे ऊपकरण ओनर घेऊन येतो म्हणाला. बॅटरीही बदलून बघतो.
पण खरंच CO फार डेंजरस आहे... नेमके काय होतेय काही कळण्याआधीच माणूस हतबल.
CO मोजणारे ऊपकरण ओनर घेऊन
CO मोजणारे ऊपकरण ओनर घेऊन येतो म्हणाला. > >चमन मी घरातले सगळे अलार्म ज्यात CO level दाखवतो असे घेतले. एक गेस गेम कमी तेव्हढाच. मागच्या ऑक्टोबरमधे हा प्रॉब्लेम झाला होता. पॉवर fluctuate होत होती जायच्या आधी आणि त्यामुळे furnance full capacity मधे चालली नाही म्हणे आणी म्हणून अलार्म trigger झाला होता.
६५ mph चे वारे हा काय प्रकार असतो ते काल अनुभवले. not an experience one want to have for sure. आणी तरी हे फक्त tropical storm level वर होते. haitI, cuba मधल्या लोकांबद्दल जबरदस्त सहानुभुती दाटून आली.
काल तीन ते सहा च्या दरम्यान sustained wind force 50 वगैरे होता नि gusts 65 पर्यंत जात होत्या
(ज्या जवळजवळ दर मिनीटाला एक अशा वेगात होत्या). landfall झाला कि हे सगळे पटकन कमी होईल असे meterioogis सांगत होता. तेंव्हा तो बोलून गेला " I hope it makes landfall rather quickly in NJ so we can have peaceful night." आणि मग मग त्याची ट्युब पेटली नि मग "I don't mean bad to anyone, just want this to go over" अशी सारवासारव केली.
सांभाळून रहा..कौतुक त्या
सांभाळून रहा..कौतुक त्या प्रशासनाचं इतकं अस्मानी संकट नियोजन व्यवस्थित केल्याबद्दल. खरे देशभक्त लोक हे.
Pages