सँडी येतोय..न्यु जर्सी(ईस्ट कोस्ट) कर काळजी घ्या..

Submitted by mansmi18 on 28 October, 2012 - 09:40

नमस्कार न्यु जर्सी (ईस्ट कोस्ट) कर्स,

सँडी येत आहे असे वाचले.
जर हे भारतीय वेधशाळेने सांगितले असते तर काही काळजी नव्हती. कारण त्यानी सांगितले वादळ येत आहे म्हणजे लखख उन पडते. (यावर उगाच भारत्/अमेरिका भांडणे कोणी करु नयेत. कारण काही दिवसापुर्वी त्यानी पुण्यातला पाउस संपला असे लिहिले आणि आमच्या बालेवाडीत वीजांच्या कडकडाटासह पाउस पडला आणि आमचा इन्वर्टर भिजला हा पुरावा आहे. असो)
न्यु जर्सीच्या वेदर चॅनेलचा मात्र अचुक अनुभव असल्यामुळे (त्यानी म्हटले आफ्टरनुन मधे स्नो सुरु होणार की १२:०१ ला पहिली स्नो फ्लेक जमिनिवर पडलेली पाहिली आहे) हे नक्की जरा डेंजरस असेल असे दिसतेय. कदाचित इनलँड ला कोस्टल एवढा धोका नसेलही पण तरी काळजी घ्या. आम्ही तिकडे असताना एकदा असेच स्टॉर्म येणार असे जाहिर झालेले पण ऐनवेळी त्याच्या "पाथ" मधे बदल होउन ते बाहेरच्या बाहेर निघुन गेले होते. यावेळीही तसे झाले तर बेस्टच.

बेस्ट ऑफ लक. टेक केअर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>landfall झाला कि हे सगळे पटकन कमी होईल
ते कसे म्हणे? Uhoh हे स्लो मूव्हिन्ग स्टॉर्म होते. landfall झाला की इन्टेन्सिटी कमी होते पण ते पटकन निघून जाईल असे काही नाही.

हे स्लो मूव्हिन्ग स्टॉर्म होते. landfall झाला की इन्टेन्सिटी कमी होते पण ते पटकन निघून जाईल असे काही नाही. >> नाहि तू पूर्ण storm चा विचार करतेयस. तो फक्त new england मधे येणार्‍या वार्‍यांचा विचार करत होता. आम्ही north east ला आहोत त्यामूळे ते तसे झालेय. winds are always more firece when hurricane is in the sea. With landfall, rotational speed drops and hence the wind speed. आणि तसेच झाले. सात-आठच्या मधे ६५ वरून गस्ट्स पन्नासच्या आत आल्या नि दहाच्या आसपास सगळे वारे शांतपण झालेले.

आमच्याकडे सगळं आलबेल. पावर आउटेज वगैरे झालं नाही. आज सकाळपासून नेटवर्क कनेक्टिव्हिटी नव्हती त्यामुळे टिव्ही, फोन, इंटरनेट बंद होतं पण आत्ता जरा वेळापूर्वीच सुरु झालंय सगळं.

क्वीन्समधे ८० घरं जळली. Sad भयानक स्टोर्‍या आहेत एकेक.

NYC हॉस्पिटलचं इव्हॅक्युएशन बघताना काटा आला. निओनेटल इंटेन्सिव केअरमधली बाळं १७ जिने खाली उतरवून दुसर्‍या हॉस्पिटल्समधे नेली. लहान - मोठे सगळे पेशन्ट्स ठीक आहेत हे ऐकून बरं वाटलं.

आम्ही तसे ठीकच. पण पॉवर डाउन कालपासून Sad
बरेच ट्रान्स्फॉर्‍मर्स जळाले ईकडे, झाडं, वायरी पडल्यायत त्यामुळे चालू ़ होण्याची खात्री नाही!
असो येइन परत...

We are in 07747 zip code no power still . But otherwise ok thanks to your well wishes

आता न्यूज पाहिल्या सँडीच्या. अस्वस्थ करणारे व्हिडीओज आहेत. भयानक नुकसान झालेय. भारताच्या किनारपट्टीलगत नीलम चा धोका आहे. किनारपट्टीला थडकणार का हे कळाले नाही.

इकडे रविवार रात्रीपासून न थांबता सतत पडणारा पाऊस आत्ता थांबला!
वेस्ट व्हर्जिनियामध्ये सॅंडीमुळे २ फूट स्नो झालाय, अजून पडतोय..

पॉवर(वीज) गेलेले लोकहो, stay warm.

भारताच्या किनारपट्टीलगत नीलम चा धोका आहे. किनारपट्टीला थडकणार का हे कळाले नाही.<< आज संध्याकाळी ठडकेल.

लोकहो, काळजी घ्या. अगदीच तहान लागल्यावर विहीर खनणे चालू आहे, पण तीन चार दिवस पॉवर गेली तर कसे मॅनेज करतात त्याच्या जरा टिप्स द्या. आमच्याकडे काल रात्रीपासून वीज नाही. Sad

काळजी घ्या सर्व जण.

आता 'आम्हाला पावर नाय' असे बिनधास्त म्हणता येईल तुम्हाला. Happy

गेल्या वर्षीचे आयरीन आठवले..
बेबी आयरीन मुळे आम्ही ५-६ दिवस अंधारात होतो ऑक्टोबर मध्ये.

नुकसानीच्या बातम्या भयानक आहेत. आता लवकरच सगळे सावरतील.

नंदीनी, घरात मेणबत्त्या, पाणी, खाऊ यांचा साठा तर कराच, पण शक्यतो सुरक्षित जागी जा.


.
.
आता घेतलेला फोटो............. भारताच्या किनार पट्टी जवळ "निलम" पोहचले

उदय, अंगोलावर पण ढग दिसताहेत. इथेपण वातावरण तसेच आहे !
गल्फ एरिया, तेवढा कोरडा दिसतोय.

काळजी घ्या सगळे जण...
भारताच्या किनार पट्टी जवळ "निलम" पोहचले>>> इथे असणारे पण काळजी घ्या प्लिज

आज ऑफीसात...
दिड दिवस नुसती बेक्कार परीस्थिती.
अंधार... थंड घर, कुबटल्यासारखे झाले बंद घरात, थंड जेवण, गॅस नाही. डोकं थंडीने जड.... आजही पॉवर नाही. वैताग आहे. मुलं बेजार करतात त्यात.
आजही वीज यायची लक्षण दिसत नाहीत. Sad

कोणी चहा देता का चहा से झाले... Sad
आज टी बॅगचा चहा उत्तम वाटला ऑफीसात....

खरोखर जीव दडपला इथल्या पोस्टी वाचुन!

एक सहज सुचले म्हणुन लिहीते आहे. कँपिंग करताना वापरले जाणारे एका शेगडीचे स्टोव्ह अशा वेळी उपयुक्त ठरु शकतील का? किमान अन्न गरम करायला वगैरे? हा स्टोव्ह ग्लुटेन/ब्लुटेनच्या छोट्याशा (साधारण कोल्ड ड्रिंकची कॅन असते तशा आकाराचा) सिलेंडरवर बराचवेळ चालतो.

नंदिनी, सगळे फोन, लॅपटॉप, टॅब्स चार्ज करुन ठेव. मेणबत्त्या हाताशी ठेव. देवाजवळ लावतो ते दिवे/निरांजनी तयार करुन ठेव.

Pages