सँडी येतोय..न्यु जर्सी(ईस्ट कोस्ट) कर काळजी घ्या..

Submitted by mansmi18 on 28 October, 2012 - 09:40

नमस्कार न्यु जर्सी (ईस्ट कोस्ट) कर्स,

सँडी येत आहे असे वाचले.
जर हे भारतीय वेधशाळेने सांगितले असते तर काही काळजी नव्हती. कारण त्यानी सांगितले वादळ येत आहे म्हणजे लखख उन पडते. (यावर उगाच भारत्/अमेरिका भांडणे कोणी करु नयेत. कारण काही दिवसापुर्वी त्यानी पुण्यातला पाउस संपला असे लिहिले आणि आमच्या बालेवाडीत वीजांच्या कडकडाटासह पाउस पडला आणि आमचा इन्वर्टर भिजला हा पुरावा आहे. असो)
न्यु जर्सीच्या वेदर चॅनेलचा मात्र अचुक अनुभव असल्यामुळे (त्यानी म्हटले आफ्टरनुन मधे स्नो सुरु होणार की १२:०१ ला पहिली स्नो फ्लेक जमिनिवर पडलेली पाहिली आहे) हे नक्की जरा डेंजरस असेल असे दिसतेय. कदाचित इनलँड ला कोस्टल एवढा धोका नसेलही पण तरी काळजी घ्या. आम्ही तिकडे असताना एकदा असेच स्टॉर्म येणार असे जाहिर झालेले पण ऐनवेळी त्याच्या "पाथ" मधे बदल होउन ते बाहेरच्या बाहेर निघुन गेले होते. यावेळीही तसे झाले तर बेस्टच.

बेस्ट ऑफ लक. टेक केअर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, ते आऊटडोअर वापरासाठी आहेत. बॅकयार्डमध्ये लावावे लागतील नाहीतर पुन्हा ते कार्बन मोनॉक्साईडचे आहेच प्रोपेन, ब्यूटेन सिलिन्डर असेल तर.

लोलाचे बरोबर आहे. परत बाहेर प्रचंड वारं वाहत असताना न्किंवा स्नो पडत असताना हे अतिशय जिकरीचे होते. हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे. normal grill वापरणे सोपे पडते अशा वेळी.

ओह्ह!
आमच्याकडचे अलार्म वेगळे असतील मग! म्हणजे फक्त फायर अलार्म असावेत. का.मो. चे नसावेत कारण घरात वापरुनही कधीच अलार्म झाला नाहीये (अजुनतरी)!

Pages