सँडी येतोय..न्यु जर्सी(ईस्ट कोस्ट) कर काळजी घ्या..

Submitted by mansmi18 on 28 October, 2012 - 09:40

नमस्कार न्यु जर्सी (ईस्ट कोस्ट) कर्स,

सँडी येत आहे असे वाचले.
जर हे भारतीय वेधशाळेने सांगितले असते तर काही काळजी नव्हती. कारण त्यानी सांगितले वादळ येत आहे म्हणजे लखख उन पडते. (यावर उगाच भारत्/अमेरिका भांडणे कोणी करु नयेत. कारण काही दिवसापुर्वी त्यानी पुण्यातला पाउस संपला असे लिहिले आणि आमच्या बालेवाडीत वीजांच्या कडकडाटासह पाउस पडला आणि आमचा इन्वर्टर भिजला हा पुरावा आहे. असो)
न्यु जर्सीच्या वेदर चॅनेलचा मात्र अचुक अनुभव असल्यामुळे (त्यानी म्हटले आफ्टरनुन मधे स्नो सुरु होणार की १२:०१ ला पहिली स्नो फ्लेक जमिनिवर पडलेली पाहिली आहे) हे नक्की जरा डेंजरस असेल असे दिसतेय. कदाचित इनलँड ला कोस्टल एवढा धोका नसेलही पण तरी काळजी घ्या. आम्ही तिकडे असताना एकदा असेच स्टॉर्म येणार असे जाहिर झालेले पण ऐनवेळी त्याच्या "पाथ" मधे बदल होउन ते बाहेरच्या बाहेर निघुन गेले होते. यावेळीही तसे झाले तर बेस्टच.

बेस्ट ऑफ लक. टेक केअर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज कोजागिरी आहे. Happy
भारतात काही वर्षांपासुन कोजागिरीला पाऊस पडतो, पण आज चक्क निरभ्र आहे वातावरण. म्हणजे चांदण पडणार तर. आणि तिकडे सँडी! असो, काळजी घ्या!

आमच्याकडे काल रात्रीपासून सतत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व वारे आहेत. आज सकाळपासून दोघांनीही जरा जोर धरलाय. आम्ही ६ ते ८ इंच पाऊस पट्ट्यात आहोत. सँडीचा डोळा अजून समुद्रावर आहे. उद्या सकाळी जमिनीवर येईल.

याहू वरचे अपडेट्स काळजी करण्यासारखेच आहेत. सगळेजण सुरक्षित ठिकाणी जा, आणि काळजी घ्या.

एभोप्र : या वादळांना नाव कशी/कशावरून देतात??? >>

नावे देण्याची साईट आहे. तिथे तुम्ही तुम्हाला वाटणारे नाव नोंदवू शकता. कदाचित ५०-६० एक वर्षांनंतरच्या वादळाला तुम्ही (नोंदवलेले) नाव मिळू शकेन कारण वेट लिस्ट खूप मोठी आहे. Happy

>>>अमेरिकेतील हळदीकुंकु आणी वाईन", "भिकार्‍यांना भीक द्यावी का?" "दहशतवाद", "बापू", वगैरे यू एस बी ड्राईव्ह वर कॉपी करून सोबत ठेवेन. उत्खननात सापडेल.>>><<<

हो, हे बर राहिल. मायबोलीची मूळं किती खोल आहेत हे कळेल नंतर नवीन लोकांना. तसेच जुन्यांनी किती महत्वाची कामगिरी केलीय ते ही कळेल व आशिर्वाद देतील. Proud

जोक्स अपार्ट,

इथे वाट लागलीय... नको तेवढा वारा व पाउस. वाईन घेवून निपचित पडावं . Proud

(इथे येवून 'वाईन' घेतल्याचा अनुभव लिहिन जगले वाचले तर... पुण्यवान आहेच तशी , त्यामुळे चिंता नाही २०१२ च्या भाकीताची.) तो बीबी तेवढा वर काढून ठेवा कुणीतरी. Proud

(बाकी, सिरियस नोट.. सर्वांनी काळजी घ्या... २०१२ वर्षे आहे)

लाईट फ्लिकर होतोय. त्याआधी माझी हि पोस्ट टाकते व पळते.

इकडे फायनली सगळे शट डाउन च केलेय टाउनशिप ने- कर्फ्यू च!
“There shall be no traffic traversing the area [all of Plainsboro Township] except for the movement of Police, Fire and EMS vehicles or any such vehicles that may be permitted by authorized officials of this Township.”

All residents are advised to remain in their homes."

All residents are advised to remain in their homes." >> काल ख्स्रिस्टी जवळजवळ रडलाच कि घरी राहा लोकहो म्हणून. लोक पण खरच चक्रमपणे वागतात.

>>काल ख्स्रिस्टी जवळजवळ रडलाच
Lol काहीपण असाम्या! Proud (रडलाच तर त्याच्या घरच्या खायप्यायच्या तयारीच्या काळजीनं असेल.)

वाईन घेवून निपचित पडावं . >> Proud आज कोजागरी, म्हणून माझ्याकडे मसाला दूध Happy

आता माझ्या ईथे सुद्धा वा-यापावसाने जोर धरलाय....वीज आहे तोपर्यंत बरं...नंतर वाट लागेल Sad

काळजी घ्या....या सॅन्डीपासून सर्वांची नीट सूटका होवो.

जोरदार वारं, पाऊस, उडणारा कचरा दिसतोय खिड्कीतून.
सकाळी खरंच वादळापूर्वीची शांतता म्हणतात ना तसेच वाटत होते.
चला कांदाभजीची तयारी करायला हवी. Happy

>>>आज कोजागरी, म्हणून माझ्याकडे मसाला >>><< रात्री उतारा म्हणून दूध. Happy

वीज गेली नाही तर बरं हिच प्रार्थना.

आली सँडी! सॉल्लेट वाटते आहे आत्त्ता बाहेर! भन्नाट वारा कन्टिन्युअस आहे त्यामुळे समुद्राला लागून आहोत असा फील येतोय! त्यात मधूनच वार्‍याचा जोर प्रचंड वाढून आता एखादी सुनामी येणार असा मोठ्ठा आवाज लांबून येत येत अचानक तोंडावर वार्‍याची लाट आपटतेय! अमेझिंग !

गप्प घरात बसा. Happy

सगळा बदाबदा पाऊस तर आमच्यावरच आहे. काल रात्रीपासून चालू आहे सतत. १० इंच होणार म्हणे.
sandy2.PNG

Pages