सँडी येतोय..न्यु जर्सी(ईस्ट कोस्ट) कर काळजी घ्या..

Submitted by mansmi18 on 28 October, 2012 - 09:40

नमस्कार न्यु जर्सी (ईस्ट कोस्ट) कर्स,

सँडी येत आहे असे वाचले.
जर हे भारतीय वेधशाळेने सांगितले असते तर काही काळजी नव्हती. कारण त्यानी सांगितले वादळ येत आहे म्हणजे लखख उन पडते. (यावर उगाच भारत्/अमेरिका भांडणे कोणी करु नयेत. कारण काही दिवसापुर्वी त्यानी पुण्यातला पाउस संपला असे लिहिले आणि आमच्या बालेवाडीत वीजांच्या कडकडाटासह पाउस पडला आणि आमचा इन्वर्टर भिजला हा पुरावा आहे. असो)
न्यु जर्सीच्या वेदर चॅनेलचा मात्र अचुक अनुभव असल्यामुळे (त्यानी म्हटले आफ्टरनुन मधे स्नो सुरु होणार की १२:०१ ला पहिली स्नो फ्लेक जमिनिवर पडलेली पाहिली आहे) हे नक्की जरा डेंजरस असेल असे दिसतेय. कदाचित इनलँड ला कोस्टल एवढा धोका नसेलही पण तरी काळजी घ्या. आम्ही तिकडे असताना एकदा असेच स्टॉर्म येणार असे जाहिर झालेले पण ऐनवेळी त्याच्या "पाथ" मधे बदल होउन ते बाहेरच्या बाहेर निघुन गेले होते. यावेळीही तसे झाले तर बेस्टच.

बेस्ट ऑफ लक. टेक केअर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो न्यू जर्सी स्टेट ऑफ इमर्जन्सी जाहिर झालेले आहे.
आज रात्रीपासून जोरदार वारा आणि पावसाची शक्यता आहे.

या हरिकेन्सला "गर्ली" नाव का देत असावेत?
बाकी काळजी आहेच, पाथ दिलाय त्याव्रुन वळेल वैगरे अस वाटत नाहि बाकी रामभरोसे !.

गर्ली असे नाही, A to Z नावे ठरवताना एक मुलाचे-एक मुलीचे असे देतात.
मागचा राफा होता (Rafael), म्हणून ही सँडी. अलिकडे मुली जास्त डेंजरस झाल्यात Proud आयरीन, इसाबेल, कॅट्रीना..

या हरिकेन्सला "गर्ली" नाव का देत असावेत? >>> प्राजक्ता मायबोलीवरचे प्रतिसाद बघता तुला हा प्रश्न पडायला नको होता Biggrin

माझे घ्रर न्यू जर्सी कोस्ट वरच आहे. जगलो वाचलो तर भेटू नाहीतर स्वर्गातल्या गटगला नक्की हजेरी लावेन.

vijaykulkarni | 28 October, 2012 - 22:53 नवीन
माझे घ्रर न्यू जर्सी कोस्ट वरच आहे. जगलो वाचलो तर भेटू नाहीतर स्वर्गातल्या गटगला नक्की हजेरी लावेन.
<<
अबे ओये!
तेरे कु कुच नै होने वाला. तेरेकू मांगतय तो एक बोक्ड्या और काट लेंगा तेरे लिये Wink बक्रीद के नाम पर.

on a serious note. i think u will be having proper emergency contingencies planned. take care.
charge all ur batteries. all mobiles and lappies, have enough energy resources available, and stay safe. good luck.

सर्वांनी काळजी घ्या.

विकु, नोह-२ व्हायचे असेल तर नीट डॉक्युमेन्टेशन ठेवा. म्हणजे नंतर दंतकथा का खरी? ती आर्क कुठे आहे? यावरून आर्किऑलॉजिस्ट्समधे मारामार्‍या नकोत Proud

मै Lol विकूज आर्क!
विकु, बोटीचे डायवर तुम्ही की आणखिन कोणी? आणखिन कोणी असेल तर ते मंगळसुत्र दाखवायचे लक्षात ठेवा. Proud

बोटित बसताना माबोवरचे गाजलेले बीबी "विबासं", "अमेरिकेतील हळदीकुंकु आणी वाईन", "भिकार्‍यांना भीक द्यावी का?" "दहशतवाद", "बापू", वगैरे यू एस बी ड्राईव्ह वर कॉपी करून सोबत ठेवेन. उत्खननात सापडेल.

on a serious note , चार दिवस वीज असणार नाही हे गृहित धरून सारी तयारी झालेली आहे.

सँडिग्रस्तांना, हरिकेन-टोर्नेडो-ब्लिझ्झर्ड फ्री अ‍ॅट्लांटात येण्याचं जाहिर निमंत्रण! Happy

विकु, Lol

यावेळी सँडी फ्लोरिडाला फक्त लाडिक चापटी मारून गेली. त्यामुळे सगळं अलबेल आहे. तिकडे थु.फो. अ‍ॅक्शन होण्यापूर्वी बस करून इकडे या.

काळजी घ्या लोक्स, इकडे बसून सांगायला काय जातंय म्हणा, पण काळजी घ्या!

(बिल्वा - ही लिंक दिल्याबद्दल आभार) Happy

Pages