मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

GTP= general time pass

थुत्तरफोड- बहुतेक मृण्मयी किंवा रॉबिनहूड. नक्की माहित नाही.

ड्युआयडीज कडुन असला (शाब्दिक) मार पडेल>> छे छे.
तिकडे संपादकानी / अ‍ॅडमिन ह्यानी काहि प्रतिसाद संपादीत केले आहेत.
तिकडेही तारे तोडणारे लोक होते.. Happy
पण हागु-मुतु-पादु ला लोक ड्यु आयडी घेत नव्हते.

जी टी पी म्हणजे जनरल टाइम पास बहुतेक.

नंदिनीला मिळालेला किताब सांगा!!>> नवीन लोकाना लागु देत काम.
क्लु आहे इब्लिसपणाचा बीबी.

इल्यापंती मंडळाचे सदस्य कोण?>> अध्यक्षाना विचार.. Wink

कि ड्युआयची आयडिया तेव्हाच्या आयडींना माहित नव्हती, त्यामुळे सगळे गुडी गुडी वातावरण होते.>> आँ?? बाप्रे!! Lol
एकदा जुनी आयडी अथ ते इतीपर्यंत वाचा सगळ्या नवीन आयड्यांनी - http://www.maayboli.com/hitguj/messages/board-topics.html

दिनेशदांनी दुसर्‍या एका धाग्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ड्युआयडींच्या आत्महत्येत कोणकोणते आयडी मरण पावले?

भारीच टाईमपास धागा दिसतोय. सवडीने वाचते. तोवर 'सगळ्या आयड्यांचे ताई-दादा मध्ये रुपांतर करणारा छोटासा आय डी कोणता?' (हा प्रश्न आधी विचारला गेला असल्यास माफ करणे)

जीटीपीवर कट्टा किंवा गगोच्या सध्याच्या रेटने पोस्टी पडायच्या. त्यावेळी सर्व्हर इतके शक्तीशाली नव्हते. म्हणून तो बंद करावा लागला होता.

त्यावेळी वगैरे म्हणलं, मंजूने दिलेला मेनू पाहिला की जुने सगळेच 'आमच्यावेळी' मोडात जातात Happy मीही Happy

कोणी तरी शमवा बरं, प्लीज. >>> ड्युआयडीच्या पराक्रमामुळे सेकंदाला ४ पोस्टींचा पाऊस पडायचा म्हणून.

सगळ्यात जास्त धागे बंद पाडले गेल्याचा विक्रम कोणत्या महान आयडीच्या नावावर जमा आहे? >> Rofl

हिमालय सफरवर लेख लिहणारा पहिला आयडी कोणता?

'आमच्यावेळी' मोडात जातात मीही > +१

एका प्रश्नाचे उत्तर आल्यावर मग पुढचा प्रश्न विचारा.

मायबोलीवर पहिली कादंबरी कोणी लिहिली?
>>> कार्ट्याने. (हा आयडी होता)

लिंका द्या लोक्स!>>>> +१ पण लिंक्स शोधायला खुप त्रास होइल ना? जुन्या माबोत नीट शोधता येत नाही ना? तरिही जमल्यास द्याच लिंका Happy

कोणत्या ड्युआयडीने स्वतःची ओरिजिनल आयडी आणि ड्युआयडी स्वतःच कबुल केला होता.
त्या ड्युआयडीने काढलेल्या धाग्यावरच जाहीरपणे.??
अज्जुकाला आठवत असेल. Happy

लिंक कशी देणार? मी माझ्या तल्लख स्मरणशक्तीवर विसंबून प्रश्नाची उत्तरे देत आहे.

मायबोलीवरून आतापर्यंत किती लग्नं जमली आहेत?
>> मामी, त्या जोडप्यांनी स्वतःहून कबूल केलं तर ठिक अन्यथा इतर आयडींनी अशी नावे देऊ नयेत. Happy

मायबोलीवरून आतापर्यंत किती लग्नं जमली आहेत?
>> मामी, त्या जोडप्यांनी स्वतःहून कबूल केलं तर ठिक अन्यथा इतर आयडींनी अशी नावे देऊ नयेत.
>>>>>>> बरोबर. एकदम मान्य. Happy

http://www.maayboli.com/node/2840

मिळालं अ‍ॅडमिन. धन्यवाद Happy

(Admin ला काळजी कोणी काहीच लिहीलं नाही तर काय करणार? backup plan स्वत:च्या कविता ?
मायबोलीकरांच्या सुदैवाने backup plan वापरावा लागला नाही.)
हे सर्वात भारी होतं.

लिंका दिलेले सगळे जुने बाफ आधाशीपणे वाचतो आहे. नवा असल्याने या ठिकाणी पार्टीसिपेट फार नाही करू शकत.
पण जुने वाचताना जाणवते, की किती सहजपणे, अन निखळ व रसपूर्ण गप्पा अन चर्चा होत होत्या. त्या काळी नेटकरी असूनही माबोवर नव्हतो, हे लक्षात येऊन चुकचुकतोय..
आजकाल असे बाफ निघत नाहीत कारण बहुतेक सगळे विषय होऊन गेलेले आहेत असे असावे.

Pages