मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ ला माझा नंबर!
रोजच्या रोज भरमसाठ गझला पोस्टून / पेस्टुन वात कुणी आणलाय?

सांगा सांगा आहे कोण?

स्क्रोल करुन वाचावा लागणारा लांबचलांब प्रतिसाद टंकणारा आयडी कोणता?

(उत्तर मला माहीत नाही याची नोंद घ्यावी :-))

दक्ष, मस्त धागा. मजा येणार. पण या पोस्ट्स वाहुन जाणार का? मी आता २ तासाने येइन तेव्हा मला सगळं वाचायचं आहे.

जाता जाता - दिवसभरात एकाचं तरी मुस्काड फोडणारा आयडी कोणता? Proud

पहिल्यापासून एकदाही नाव न बदलेला आयडी कोण ?

याचे उत्तर कुणाला यायची शक्यता कमीच आहे, पण हा मान दक्षिणेचा आहे ! मला कौतूक वाटते तिचे.

Pages