Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डीजे, एकदम पर्फेक्ट
डीजे, एकदम पर्फेक्ट प्रॅक्टिकल सल्ला आहे हा
डीजे, पण ते आत्ता. पुढे
डीजे, पण ते आत्ता. पुढे संसारत मुरल्यावर ५० लोकांचा स्वयंपाक करायला लागेल. त्यापेक्षा अबीरकडे एक मै और एक तू. अगदीच तीच्या बाबंच्याच घरात राहिले दोघे, तर बाबा आणि अबीर मिळून प्रेमाने करतील स्वयंपाक. काळे कुटुंबियांसारखे किचनमध्ये परफॉर्मन्स प्रेशर नसेल
स्वाती नो नो मी काही झालं तरी
स्वाती


नो नो मी काही झालं तरी अबिर ची बाजु घेणार नाही
काळे लोक राधा वर फिदा आहेत , सांगितलय कि सासूनी किचन मधे ढ असलीस तरी चालेल
राधा वर वेळ आली तर ठेवतील कुक कामाला , तशीही सुप्रिया काकि यंग आहे , पुरेल खूप दिवस
उलट शेफ ची बायको पाककृति करताना जास्तं प्रेशर वर्क आहे :फिदी
शिवाय अबिर राधा पेक्षा फिटनेस कॉन्शस म्हणजे ते पण टेन्शन त्याला मॅच असं फिट रहाण्याचं !
या उलट हा आळशी घना घरात असताना उलट राधा कायम सुपिरियर , निवान्तःफिदी:
थोडक्यात घधा ला पर्याय नाही !
या उलट हा आळशी घना घरात
या उलट हा आळशी घना घरात असताना उलट राधा कायम सुपिरियर , निवान्तःफिदी:>> हो ते आहेच.

पण अबीर स्मार्ट आहे ना म्हणून जीव तुटतो त्याच्याकरता. पण बाकी घनापुढे कष्ट कमी हे आहेच!
हे सुद्धा पटलं डिजे
हे सुद्धा पटलं डिजे
(No subject)
बरोब्रे डीजे. आणि ते कोणी
बरोब्रे डीजे.
आणि ते कोणी लिहीले आहे त्यांचे सौंसारातील अणभवाचे सर्टिफिकेट खारीज करण्यात येईल.

कुठला शेफ घरी रोजचा स्वैपाक करतो म्हणे, बायकोला आयते गिळायला द्यायला? आँ?
सोमणकाकुंना कारणे दाखवा नोटिस !!
भुंग्या
ते वाचून सुद्धा मळमळले. 
तर एकूण काय इकडे पार्टीबदल
तर एकूण काय इकडे पार्टीबदल झालाय. संपदा, अगो फॅन मोडातून टीकाकार मोडात गेल्यात आणि स्वप्ना, साधना टीकाकार मोडातून फॅन मोडात (हळूहळू) येताहेत
आणि ते कोणी लिहीले आहे
आणि ते कोणी लिहीले आहे त्यांचे सौंसारातील अणभवाचे सर्टिफिकेट खारीज करण्यात येईल.
कुठला शेफ घरी रोजचा स्वैपाक करतो म्हणे, बायकोला आयते गिळायला द्यायला? आँ?
सोमणकाकुंना कारणे दाखवा नोटिस !! >>>>>>? प्रचंड अनुमोदन!
डीज्जे फुल्ल अनुमोदन!
माठ्या घनाला राधानीच जरा ताळ्यावर आणावं. त्याचं खोटं रोमँटीक वागणं राधाला अगदीच गरीब बिच्चारी करून टाकतय. तिनं जरा त्याला अॅटीट्युड दाखवावाच कि नाटक ओके पण माझ्या भावनांशी खेळण्याचा हक्क नाही तुला. उडत जा.
मंजू
मंजू
रैना, अगं इथे आल्यावर इतक्या
रैना, अगं इथे आल्यावर इतक्या मस्त पोस्टी येतायत एकामागोमाग एक की लिहायला आलेलं विसरून जायला होतंय म्हणून निस्तंच आप्लं
श्रुती, तेच, लवकरच मॅडमचा
श्रुती, तेच, लवकरच मॅडमचा भडका होईल असे दिसतेय घनाच्या अतिरेकी प्रेम दाखवण्याच्या अॅक्टींग मुळे
काल तो भाटेकाकू येताना बघून, तिला बाजूला घेत तिची केसांची बट सावरत, "आय ल मिस यू बेब" म्हणाल्यावर ती बिचारी सिरिअसली रेसिप्रोकेट करते... राधा केविलवाणी वाटली त्यामूळे, विचित्र घना :राग
मग्ग क्काय मंजूडे, वेड
मग्ग क्काय मंजूडे, वेड पांघरून पेडगावला जाणं आता घनाने थांबवायला हवं ना ???
हो ते ३ हनीमुन पॅकेजेस गिफ्ट
हो ते ३ हनीमुन पॅकेजेस गिफ्ट मिळतात तो पॉइंट राहिलाच , घना राधाच्या रोमान्स मधे पब्लिक ल इतका इंटरेस्ट आहे कि घनाने नुसता गळ्यात हात जरी टाकला तरी सासु राधेला पाणी सुध्दा आयतं देइल , झालच तर रुम सर्व्हिस पण देइल
झालच तर रुम सर्व्हिस पण
झालच तर रुम सर्व्हिस पण देइल>>
भुंगाजी, छ्या! केकता असती
भुंगाजी,
छ्या! केकता असती भागात पाणी कमी पडले.
-----
केकता कपूर सादर करत आहे,
एक मराठी गरीब कुटुंब पण प्रेमाने खच्चून भरलेले. सगळे प्रेमात एकमेकांच्या. एक सोज्जवळ सून(इला भाटे).
दुसरी नाठाळ , काड्या लावणारी गालाल खळी पाडत.. तर तिसरी खट्याळ.. वगैरे.
इला भाटेचे लग्नाआधी प्रेम वगैरे असेल. तिचा लग्नाआधीचा मुलगा अबीर हे मध्येच कळेल. अबीरचे राधावर कॉलेजात प्रेम ,पण राधाचे जबरदस्तीने घनाशी लग्न. नफरतच्या आगीतून अचानक तिला मग प्रेमाचा सक्षात्कार. घनाला प्रेमाचा साक्षात्कार व्हायला वेळ लागतो.. जेव्हा होतो ते सांगायला येतानाच अपघात. स्मरणशक्ती जाणं. राधाने मग सांभाळणे. मग ह्या संधीचा फायदा घेवून अबीर डॉक्टर बनून घरी येतो(म्हणजे सर्व्गुणी मोठी सून इला भाटे आणते).
घनाला मेमरी येणारच नाही असे अबीर सांगतो... व लग्नाचा घाट घालतो. लग्नाचे फेरे पाहून अचानक घनाची मेमरी पुन्हा वापस. मग घना व राधा प्रेम स्विकारतात. तोवर अबीरचा दुसरा प्लॅन तयार. सगळे मग हनिमूनला पाठवायचा प्लॅन करतात. मग परत अपघात.. पन ह्यावेळी राधाची मेमरी जाते. व घना डोंगरावरून पडतो.
राधाला गरोदर असल्याचे कळते(?). कसे तर एका चुकीच्या क्षणी घनाचे परक्रम झाले असतात. ..कधी ते विचारु नका...
बाकी करा काय ते अॅड.
वरच्या गोष्टी ह्या गोष्टी घालूनच वाढवा,
पाहिजे तितक्या वेळा मेमरी लॉस(घरातील प्रत्येक व्यक्तीचा एकतरी ह्या हिशोबाने),
अपघात,
वेड लागणे,
सावत्र मुलगा असणे,
लग्नाधीच लफडं(कोणाचही नको, सोज्जवळ सूनेचे हवे/सासूचे चालेल),
जुळा घना असणे पण हा एकदम विरूद्ध,
जुळा अबीर,
कुंकवाची किंवा मंगळसुत्राची ताकद दाखवणारा एकतरी सीन
घ्या आता करा सुरुवात.
झालच तर रुम सर्व्हिस पण
झालच तर रुम सर्व्हिस पण देइल>>>>>>>>>>:हहगलो: ते तर पहिलं..... धाडकन रूम मधे कशी शिरते ही सासू खरंच
झंपी यात तुरूंग राहीला नां!
झंपी यात तुरूंग राहीला नां! कुणी तरी तुरूंगात जाणं कंपल्सरी आहे. पुन्हा मग गैरसमज त्याच्यातही कुहु आणि प्रभातचं पाऊल घसरणं मग तिच्या प्रेग्नंसीचा रिपोर्ट राधानं आपल्या नावानं घेणं (हो! घरकी बेटी की इज्जत वगैरे वगैरे) त्यातून पुन्हा गैरसमज मग त्यांचं निराकरण, मधेच परी आणि अभिर एकत्र येणं कारण परी सुध्दा काही तरी सूड घेण्यासाठी इत्यादी झालच तर पात्रांना डिज्जायनर नौवार साड्या, धोत्रं, आलवणं नेसवुन, खोपे, शेड्या, घेरा चिकटुन (पात्राचं वय आणि शेंडीची लांबी याचा विचार करण्याचाही विचार करू नये), मधे मधे अवघड मराठी बोलायला सांगुन वरचं सगळं करवुन घ्यावं.
जौद्या झालं.
हायला तुम्हाला काय केकताशिवाय
हायला तुम्हाला काय केकताशिवाय चैन पडत नाही की काय? चांगली थोडीशीच अ. आणि अ. सिरीयल चालू आहे तर पूर्ण अ. आणि अ. कशी करता येईल ह्याची चर्चा करताय
कालच्या भागात परत मुक्ताची अॅक्टींग लई भारी!
आणि हा घना तू झोप मी आहे बाजूला असं काय म्हणतो? म्हणूनच तिला झोप येत नाहीये हे कळत नाही का त्या माठ्याला??????
बाकी राजवाडे बा.फ. वाचतात हा संशय बळावला आहे. बरेच दिवस परी गायब आहे असं इथे कोणीतरी म्हटलं आणि लगेच काल परीची येंट्री!
मालिकेच्या प्रेमात सगळेचजण
मालिकेच्या प्रेमात सगळेचजण पडलेत
सगळेच
सगळेच
बाकी राजवाडे बा.फ. वाचतात हा
बाकी राजवाडे बा.फ. वाचतात हा संशय बळावला आहे. बरेच दिवस परी गायब आहे असं इथे कोणीतरी म्हटलं आणि लगेच काल परीची येंट्री!>>>>>>>>>>
हे एक नंबर होतं... विंबल्डन सारखं लाइव्ह दाखवतात काय ही सिरियल ताबडतोब तिथल्या तिथे बदल
सगळेच डिजे, एकदमच
सगळेच
डिजे, एकदमच पटेश..
दुसरी नाठाळ , काड्या लावणारी गालाल खळी पाडत.. तर तिसरी खट्याळ.. वगैरे.<<<
यातल्या प्रत्येकीच्या एंट्रीला किंवा टाळ्याबाज वाक्याला हैक्का, अंग्गाश्शी असे उदगार अत्यंत खोट्या मधाळ आवाजात आणि रिव्हर्ब मारून यायला हवेत तरच्च ती केकताची सिरीयल. नाहीतर मजा नाही.
विंबल्डन सारखं लाइव्ह दाखवतात
विंबल्डन सारखं लाइव्ह दाखवतात काय ही सिरियल ताबडतोब तिथल्या तिथे बदल >> अरे, काल तेच म्हणाले मी, 'रोज नया कुछ लिखता है तू" रोज च्या रोज काहीतरी जोडत जायचं
कटातला शिलेदार बहुधा 
सध्या ज्ञाना मिसिंग आहे
आई गं, सगळे सॉल्लिड सुटलेत.
आई गं, सगळे सॉल्लिड सुटलेत. ईथलं वाचुन गेले १५ दिवस बघतेय मालिका. प्रत्येक भाग बघुन हा बी बी वाचायला एवढी मज्जा येतेय.
बागेश्री, आता आजच्या भागात
बागेश्री,
आता आजच्या भागात ज्ञाना येईल बघ 
यातल्या प्रत्येकीच्या
यातल्या प्रत्येकीच्या एंट्रीला किंवा टाळ्याबाज वाक्याला हैक्का, अंग्गाश्शी असे उदगार अत्यंत खोट्या मधाळ आवाजात आणि रिव्हर्ब मारून यायला हवेत तरच्च ती केकताची सिरीयल. नाहीतर मजा नाही. >>> हे भारीय!
बाकी राजवाडे बा.फ. वाचतात हा संशय बळावला आहे. बरेच दिवस परी गायब आहे असं इथे कोणीतरी म्हटलं आणि लगेच काल परीची येंट्री! >>>> हे बरीक खरं हो! बापरे देवा! आम्हाला क्षमा कर. आम्ही काय लिहीलय ते आम्हाला ......
विंबल्डन सारखं लाइव्ह दाखवतात
विंबल्डन सारखं लाइव्ह दाखवतात काय ही सिरियल ताबडतोब तिथल्या तिथे बदल >>
अ.आणि अ. ची हौस
नीरजा, लै भारी
सगळेच अवघडेय
सगळेच
अवघडेय
सगळेच सुटलेत अगदी
सगळेच सुटलेत अगदी
Pages