Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घधा नामांकरणावर माझा कॉपिराइट
घधा नामांकरणावर माझा कॉपिराइट शिक्का मोर्तब करा>>>
घधा खरच जबरी आहे.
अरे हो, सध्या माऊली कुठे दिसत
अरे हो, सध्या माऊली कुठे दिसत नाहि....तो बहुदा दब्बागुल मधुन बाहेर पडल्यावर येइल....
कालचा भाग आवडला. मुक्ता आणि
कालचा भाग आवडला. मुक्ता आणि स्वप्निल सुरेख!
अभिरपण आवडला. त्याला सारखे इतके टाईट शर्ट का देतात? बिचार्याचा जीव गुदमतोय की काय असं वाटतं सारखं.
>>त्याला सारखे इतके टाईट शर्ट
>>त्याला सारखे इतके टाईट शर्ट का देतात? बिचार्याचा जीव गुदमतोय की काय असं वाटतं सारखं.
घना आणि अबिरच्या देहयष्टीतला फरक संदर्भासह स्पष्ट व्हावा म्हणून
तो अबीर मथुआजीचा कोणीतरी आहे
तो अबीर मथुआजीचा कोणीतरी आहे ना? मग तो सारखा कोणीच नाही असं का बोलतोय? माईआजी तर मथुआजीच्या घरीपण जाऊन आलीय ना बारशाला? मथुआजीपण घनाराधाच्या लग्नाला आलेली ना? मथुआजीचं पण निमित्त पुढे केलेलं ना राधाधनाचं लग्न साग्रसंगीत करण्यासाठी, तिला काही तरी शालु का पैठणी नेसायची होती म्हणुन. मग आजी आहे ना त्याला, आईवडील सेपरेट असतात हे कधीच माईआजीकडुन ऐकलेले आठवत नाहीय.
घना आणि अबिरच्या देहयष्टीतला
घना आणि अबिरच्या देहयष्टीतला फरक संदर्भासह स्पष्ट व्हावा म्हणून>>
मथुआजीचा कोणीतरी आहे - नातूच
मथुआजीचा कोणीतरी आहे - नातूच आहे असे नक्की नाही. आणि अगदी जरी नातू असला तरी जो मुलगा सहाव्या वर्षापासून हॉस्टेलला रहातोय त्याच्याबद्दल त्याच्या आजीला कितपत माहीती असेल? आणि त्या आजीच्या बहिणीच्या घरच्यांना?
घना आणि अबिरच्या देहयष्टीतला फरक संदर्भासह स्पष्ट व्हावा म्हणून >>
सा़क्षी, तो पेयिंग गेस्ट
सा़क्षी, तो पेयिंग गेस्ट म्हणून जी स्टोरी सादर करतोय, त्यानुसार ते एकटा पडलेला, एकटा वाढलेला इ. दाखवलंय.
बेबी जर सामील असेल तर' एकटा
बेबी जर सामील असेल तर' एकटा वाढलेला ' ही स्टोरी खरी असेल.
नाहीतर ती स्टोरी 'घनाचं एकत्र कुटुम्ब' अधोरेखित करण्यासाठी असावी.
अगं सस्पेन्स फुटेपर्यंत बरा
अगं सस्पेन्स फुटेपर्यंत बरा वाटतो, सराने नीट सांभाळलाय शेवटापर्यंत.... पण एकदा रहस्यभेद झाला की आचरट वाटतो. रात्री १२ वाजता जर आपल्याला कळले की गेले ३ तास आपण जे पाहात होतो त्याचा शेवट असा फालतु झाला तर राग येइलच ना.... तीन ठकसेन पकडायला एवढा द्राविडी प्राणायाम करायची गरज नव्हती.
कथा आता बोअर होत चालली आहे.
कथा आता बोअर होत चालली आहे. घना आणी राधाचे ब्रेक अप व परत दिलजमाई अजून कित्ती वेळा आहे ते
केवळ दिग्दर्शकच जाणे.
हा घना लहानपणी डोक्यावर पडला
हा घना लहानपणी डोक्यावर पडला होता का? राधा इतक्या उघड हिंटा देते आहे. काय बोअर मारताहेत हे लोक.
येस येस , आज मात्र लिमिट
येस येस , आज मात्र लिमिट झाली.
आपल्या भावनांशी प्रामाणिक असलेली राधा गोंधळून त्याच्याकडे बघते तेव्हा अगदीच 'बिच्चारी' वाटली.
त्याच्यापेक्षा मानव सुद्धा योग्य मॅच वाटतोय आता!
घना मला अजिबात क्यूट वगैरे
घना मला अजिबात क्यूट वगैरे वाटत नाहीये. मंद, मठ्ठ आणि स्वार्थी वाटतोय.
त्याच्या अमेरिका ऑब्सेशनमुळे मंद, एकंदरीत वागणुकीमुळे मठ्ठ आणि ज्याप्रकारे तो सगळं कळून सवरुन राधाच्या भावनांशी खेळतोय त्यावरुन स्वार्थी.
काल रात्री राधाच्या उघड हिंट्समुळे तो कावराबावरा होऊन मला झोप येतेय म्हणतो ते ठिक आहे, पण आज त्याचं राधाच्या खांद्यावर हात टाकून लाडात येणं, नंतर आपण नाही का आधी करत होतो तशीच आताही अॅक्टींग करतो आहोत असं तिला समजावणं, आई येत असताना उगीच तिच्या जवळ जाऊन मिस यू म्हणणं हे डोक्यात गेलं.
राधाने आता आपला पेहला पहला प्यार है.. पहली पहली बार है अॅटीट्यूड जरा आवरता घेऊन फर्म वागायला हवय त्या घनाशी.
शिवाय अबीरशी रागाने वागतोय तो, राधाबद्दल पझेसिव्ह होतोय हे आपण अजाणते किंवा नकळत करत नाहीयोत हे समजण्याइतका घोडा आहे तो. आणि ते कळूनही न कळल्यासारखे वागताना राधाच्या इमोशन्सशी खेळणे म्हणजे अतीच आहे.
घधा शब्द सॉलिड आहे बाकी दीपांजली
कसलं रुप तेरा मस्ताना अन कसलं
कसलं रुप तेरा मस्ताना अन कसलं 'बादल यूं गरजता है' !

इथे घधा फक्त 'सुरमई आंखियोमे नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे' मोड मधेच आहेत अजुन
घन्याच्या पाठ मोडीत पण तोच डॉयलॉग आणि वीज कडकडाटात पण तोच डॉयलॉग 'मी आहे बाजुला , तू झोप' ..
<< इथे घधा फक्त 'सुरमई
<< इथे घधा फक्त 'सुरमई आंखियोमे नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे' मोड मधेच आहेत अजुन
थोडक्यात काय, तर घधा गधे
थोडक्यात काय, तर घधा गधे आहेत. तो राधाच्या भावनांशी खेळतोय म्हणून आणि तिच्यासारखी हुशार मुलगी तरीही त्याला एवढा भाव देतेय म्हणून
...हे समजण्याइतका घोडा आहे
...हे समजण्याइतका घोडा आहे तो>> चुकतेस तू शर्मिला, घना घोडा नसून गाढव आहे
अगदी अगदी अगो. थोडक्यात काय
अगदी अगदी अगो. थोडक्यात काय तर आपण फॅन मोडातून टीकाकार मोडात गेलोय.
शूम्पी, हो हो गाढवच राधाचं
शूम्पी, हो हो गाढवच
राधाचं ते ड्रीमी एक्स्प्रेशनही आता बोरिंग वाटायला लागलय हा.
संपदा हो, आता राजवाडेंनी प्रक्र्ण फास्ट खेचलं नाही पुढे तर फक्त टीकाच येणार ऐकायला. त्यांना सवय आहे म्हणा त्याची
संपदा, बघ ना. 'मी आहे बाजुला
संपदा, बघ ना.
'मी आहे बाजुला , तू झोप' .. >>>
घना घोडा नसून गाढव आहे > घना
घना घोडा नसून गाढव आहे >:हहगलो:
घना मला अजिबात क्यूट वगैरे वाटत नाहीये. मंद, मठ्ठ आणि स्वार्थी वाटतोय.>> +१
मी मागे एकदा असंभवच्या वेळी
मी मागे एकदा असंभवच्या वेळी राजवाड्यांच्या ऑरकुट वॉलवर 'stop beating around the bush' असं काहीतरी तिरिमिरीत लिहून आले होते असं आठवलं. हल्ली मी सगळे एपिसोडस FF करत बघते त्यामुळे असं काही लिहायची खुमखुमी जिरली आहे
<< मी मागे एकदा असंभवच्या
<< मी मागे एकदा असंभवच्या वेळी राजवाड्यांच्या ऑरकुट वॉलवर 'stop beating around the bush' असं काहीतरी तिरिमिरीत लिहून आले होते असं आठवलं
है शाब्बास अगो. आता मी ते कार्य फेसबुकावर करावं का?
कर ना. शर्मिला म्हणते तशी
कर ना. शर्मिला म्हणते तशी त्यांना त्याची सवय आहे. ढिम्म फरक पडत नाही. सिरीयल संपायची तेव्हाच संपणार
राधाच्या कॅरॅक्टर ला जरा
राधाच्या कॅरॅक्टर ला जरा लाजणं सोडून अलिप्त वागवायला हवं राजवाडेंनी ! घना आणि त्याच्या फॅमिलीशी सुध्दा अलिप्तच !
घना काही राधाच्या पपांशी, प्राची आत्याशी इतका फ्रेंड्ली नाहीये !
रडक्या कुहुला तर 'काय झालं, बाळं रडत होतं, एक फटका मारून गप्प करा तिला' म्हणावसं वाटत होतं
प्लिज गायब करा तिचं महा इरिटेटिंग कॅरॅक्टर !
एक फटका मारून गप्प करा तिला'
एक फटका मारून गप्प करा तिला' म्हणावसं वाटत होतं >>
हे प्रभातचं वचन, लग्न मोडणं ट्रॅक आता उगीच पाणी घालणे प्रकार आहे, बाकी काही नाही. त्यापेक्षा तो माऊवाला काका ट्रॅक बराय. ते दुसरे वल्ली-वल्लभ जोडपं आणखी एक महाबोअर.
वल्ली-वल्लभ-कुहू एकाच उपकुटुंबातले आहेत ते शोभतय
हो, वल्ली-वल्लभ -कुहु
हो, वल्ली-वल्लभ -कुहु सगळ्यांना कोंडून ठेवा कुठे तरी.. अजिबात नको दिसायला ए ल दु गो मधे परत !
मी आत्ता "प्रिपेअर्ड" आहे.
मी आत्ता "प्रिपेअर्ड" आहे.
हे "प्रिपेअर्ड" आहे काय असत?
>>>>>>>>>>>>>>>>>>>
मेघवेड्या....... वेडाच्चेस !!!!!!!!!!!

कर ना. शर्मिला म्हणते तशी
कर ना. शर्मिला म्हणते तशी त्यांना त्याची सवय आहे. ढिम्म फरक पडत नाही. सिरीयल संपायची तेव्हाच संपणार
>>>>>>>>>>>>>>>>>
गेल्या आठवड्यात त्यांच्या घराजवळ भेटलेले राजवाडे..... मित्राने नेहमीचाच प्रश्न टाकला, काय चाललय सध्या नवीन.......... राजवाडे उवाचः "आहे तेच संपवतोय सध्या"
Pages