एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा येस्स 'गैर', मस्त पिक्चर होता तो Happy

इथे घनामाऊली आण राधामाऊली वगळता, इतर सर्व कटात असावेत मग, अग्दी 'निष्पाप ज्ञानाही>>>>> बागेश्री Lol

गैर........>>
हा चित्रपट पहायचा आहे. कुठे मिळेल?
>>>>>>>>>>>>>>
सगळे पिक्चर फुकटात नेटवर पाहणार्‍या कोणालातरी विचारा..... लगेच लिंक्स मिळतील Proud (काडी)

आजचा अबीर आणि आत्याचा प्रसंग छान वाटला. अबीर नक्कीच राधामध्ये गुंतत चाललाय. आज्जी बसणार चॉकलेट खात Proud राधाला अबीरवरचं प्रेम इनडायरेक्टली व्यक्त करण्यासाठी गाणं 'उधळीत ये रे गुलाल सजणा, तू शाम मी राधिका' Proud

बाकी राधा माहेरी असताना पावसाळ्यात विजा चमकत नव्हत्या का क्कॉय? अगदी हिंदी पिक्चरातल्या हिरविनीसारखी विजांना घाबरत होती. पुढच्या एपिसोडसाठी राजवाडेंना गाणं शोधायला नको - काका आणि शर्मिलाजींनी आधीच शोधून ठेवलंय - रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.

आणि हो, घनाच्या आईला म्हणावं थोडं घनाच्या बाबांकडे लक्ष दे. सारखं आपलं 'राधा, राधा' करत त्यांच्या बेडरूममध्ये तडक घुसत असते. शोनाहो!

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सुप्रसिध्द खाजगी गुप्तहेर श्रीयुत शेरलॉक होम्स ह्यांचा मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढण्यात आला. त्यांच्या खिशात 'माझ्या मृत्युसाठी श्री सतीश राजवाडे ह्यांना जबाबदार धरण्यात यावं' अशी चिठ्ठी सापडल्याने ह्या प्रकरणाचा तपास करणारे पोलिसही चक्रावून गेले होते. परंतु श्रीयुत शेरलॉक होम्स ह्यांचे परमस्नेही डॉक्टर वॉटसन ह्यांनी खुलासा केला आहे की सध्या झी मराठी वर चालू असलेल्या लोकप्रिय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्या मालिकेतल्या घना ह्या 'पात्रा'चे दोन्ही काका पोटापाण्यासाठी काय करतात हे शोधून काढायची कामगिरी होम्स ह्यांच्यावर होती. मालिका सुरु होऊन महिने उलटले तरी काहीही धागेदोरे हाती न लागल्याने श्रीयुत होम्स अतिशय निराश झाले होते. आणि निराशेच्या ह्या भरातच त्यांनी हे पाऊल उचललं असावं असंही डॉक्टर वॉटसन पुढे म्हणाले. 'घनाच्या दोन्ही काकांना घरात असेतो कोणी मारणार नाही' असा 'हिरण्यकश्यपू इस्टाईल' वर असावा अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

तरी श्रीयुत राजवाडे ह्यांनी हा तपशील लवकरात लवकर जाहिर करावा. हीच श्रीयुत होम्स ह्यांना खरी श्रध्दांजली होईल अशी टिप्पणी दुसर्‍या एका मराठी चॅनेलवरील मालिका लिहिणार्‍या लेखकाने आपले नाव जाहिर न करण्याच्या अटीवर केली.

श्रीयुत राजवाडे ह्यांस प्रोफेसर मोरियार्टी ह्यांजकडून सुपारी देण्यात आली असावी अशी अफवा मूळ धरू लागली आहे. ह्याबाबतीत मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

वविला घेऊन येतो कुहूला >>>>>>>>> छान! मी नक्की येतो मग Happy

मंजे, म्हणजे त्याला विबासं करायची गरज नाही Proud

काका आणि शर्मिलाजींनी आधीच शोधून ठेवलंय - रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.
<<
चुकलं गाणं , तेवढे पुढे नाही गेले अजुन घधा !(हे ब्रँजलिना सारखं 'ना आणि राधा ) Proud
योग्यं गाणं 'बादल यूं गरजता है डर कुछ ऐसा लगता है' .
पण सेवटचा सीन जरा इंटरेस्टिंग होतोय तोवर संपला पण एपिसोड :(.
आवडला मुक्ताचा आणि स्वप्नील चा अभिनय आज पण :).

राजवाडेला सुरवात चांगली जमते पण शेवट फसतो.... इथले वाचुन आताच गैर पाहिला आणि उगीच कशाला डोळे शिणवले असे वाटले.

एलदुगोचे असे न होवो हीच सराचरणी नम्र विनंती. लवकर काय ते प्रकरण तडीस लाव रे बाबा.... उत्सुकता संपण्याआधी मालिका संपव नाहीतर त्यातले साचलेपण तरी संपव.

कटात सामील असणारं तिसरं पात्र म्हणजे माऊली असणार किंवा परी (एवढ्यात दिसली नाहिये). तो अमानव पुन्हा दिसल्यावर माझा सिरियल बघण्याचा उरलासुरला उत्साह संपला आणि मग पुढे काय ते पाहिले नाही. कुहूला जोडीदार (सध्या) नसल्याने अबीरचा नंबर लागणार का? आता शंभरवेळा राधा आणि घनाचं प्रेमाचं बोलणं शेवटापर्यंत येता येता थांबतय म्हणून कंटाळा आला आहे. वाचताय ना एलदुगोवाले? राधाच्या आयुष्यात आधी पावसाळे आले नव्हते काय? असा प्रश्न पडला. नवीन लग्न झालेल्या मुलाच्या खोलीत घनाची आई किती भसाभसा शिरते.

सिरियलींमध्ये मोठ्ठं सुखी आनंदी एकत्र कुटुंब दाखवायची फॅशन आहे का सध्या?
कदाचित मूर्ख प्रभातला अक्कल यावी म्हणून आता कुहू फॅशनेबल कपडे/केस करणार का?
मी गेले २-३ इपिसोड पाहिलेच नाहीत. इथे वाचून फार काही मिस झालेलं दिसत नाही .
स्वप्ना Rofl
त्यांनी काय राधाला पाउस आणि वीजांची भिती वाटते असं काही लेम दाखवलं की काय?

अबीरच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लागलय. त्याचा आणि प्राची आत्याचा सीन बघा. तो खोलीत येताना
उजव्याच पायावर भार देऊन चालतोय.

आजच्या भागात राधा-घना ते दोघे एकमेकांना अप्रत्यक्ष कसे आवडायला लागले आहेत हेच कबुल करतात. राधाच इनिशेटीव्ह घेतेय आणि तिच घनावर प्रेम आहे हे ती वेळोवळी अप्रत्यक्षपणे घनाला सांगतेय.......घना जेव्हा सांगत असतो की बायको कशी हवी तेव्हा मुक्ताचे एक्स्प्रेशन्स मस्त होते.
आजच्या संवादांवरुन तो अबीर कोणाच्यातरी प्रेमात पडलाय अस वाटतय. राधा सोडुन कोणाच्याही प्रेमात पड म्हणाव त्याला. कुहु, परी, अगदी त्या उल्का आत्याच्या पडला तरी चालेल पण राधा नको. Happy

>>>हे खरंय, पण समहाऊ अबीर राधा आणि घना हे त्रिकूट इतकं छान आहे की मी त्यांच्यातले कोणतेही काँबिनेशन बघायला तयार आहे. बाकी मालिकांत इतकं सशक्त स्टारकास्ट नसतं
'दोस्ताना' काँबिनेशन झेपायचं नाही मराठी मालिकेला Wink Proud

आणि हो, घनाच्या आईला म्हणावं थोडं घनाच्या बाबांकडे लक्ष दे. सारखं आपलं 'राधा, राधा' करत त्यांच्या बेडरूममध्ये तडक घुसत असते. शोनाहो!>>>>> Lol

ट्विस्ट हा आहे कि आजीच्या कटात सामील चौथा माणुस कुहुचा ढोला बॉ .फ्रे. प्रभात Proud
या शिवाय अबिर हा अबिर नसून 'तोतया' आहे, हत्यार वगैरे म्हणतो म्हणाजे टेररिस्ट पण असु शकतो Biggrin
( गैर चा डिरेक्टर राजवडे आहेत हे कळल्या पासून मला जबरी धक्का बसलाय आणि त्या पायी वाट्टेल ते क्लायमॅक्स इमॅजिन करायला तयार आहे ).
जाउ दे, माला फक्त' घधा' च्या रोमँटिक श्टोरी मधे इंटरेस्ट आहे, बाकी काही का दाखवेनात !

काल अबीर उलटा लंगडत होता. ज्या पायाला लागलेलं असतं, त्यावर आपण कमी भार देऊन चालतो, तो बरोबर याच्या उलट करत होता Lol

घधा Lol

घधा जाम आवडले. हमारे इदर ऐसा एक प्रानी रहेता है. ते कुहू रडते आणि आई समजूत काढते ते फार बालिश होते. डोळ्यात हात पंप अन काय काय. असे अजून बोलतात काय?

<इथे वाचून फार काही मिस झालेलं दिसत नाही>

राष्ट्राध्यक्षपदावरून पाय-उतार झाल्यावर काय करावे हे सरकोझींना सुचत नव्हते तेवढ्यात युरोकप सुरू झाल्याने ते खूश झाले. फ्रान्सच्या सगळ्या मॅचेस अगदी स्टेडियममध्ये जाऊन पहायच्या असे त्यांनी ठरवले. पण हाय रे दिअवा. पहिल्याच मॅचला निघताना कार्लावहिनींनी इतका उशीर केला की पहिला हाफ संपता संपताच दोघे स्टेडियममध्ये पोचले. व्हीआयपी बॉक्समध्ये स्थानापन्न झाल्यावर कार्लावहिनींनी शेजारच्या सीटवर बसलेल्याला विचारले, 'काय हो काय स्कोर झाला?' '०-०' असे उत्तर आल्यावर त्यांनी पतिराजांना सुनवले, "बघा तुम्ही उग्गाSSच घाई करत होतात, आपलं काSSSSहीसुद्धा चुकलेले नाही."

भरत Lol

भरत Lol

काल काय 'रुप तेरा मस्ताना' झाले? इयु. विजा काय.
(पाहिला नाही भाग. वाचून असे वाटतेय)

Pages