एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही रूप तेरा मस्ताना झालेले नाही. मात्र दीपांजली म्हणतात तसे 'बादल यू गरजता है' झाले. घना-राधा दोघे स्वतःला आणि एकमेकांना धीर देताहेत की 'तसे'
काही व्हायचे नाही. कालच्या भागात दोघांनी एकमेकांना तुझा आदर्श जोडीदार कसा असेल हे विचारले (आपल्याला मुळात लग्नच करायचे नाही हे विसरले दोघेही) आणि सांगताना एकमेकांचेच वर्णन केले. त्यावेळी राधा अगदी षोडशेसारखी मोहरत होती तर हे सगळे लक्षात आल्यावर घना अगदी बावरून गेला.

गब्बुआत्या आणि अबीरमधला प्रसंग अगदी बाकीच्या सिरियलींसारखाच, प्रेडिक्टेबल होता. 'तुला जिने डिस्टर्ब केलेय, ती मीच तर नाही ना' असे गब्बुआत्याने त्याला विचारले . त्यामुळे अबीरला बरेच ऑप्शन्स आहेत.

भरत Proud

>>'तुला जिने डिस्टर्ब केलेय, ती मीच तर नाही ना' असे गब्बुआत्याने त्याला विचारले .
बाप रे! तेव्हा मला अबिरची खरंच काळजी वाटायला लागली. त्याने घरी एकटं रहाता कामा नये. आत्यावर पावसाचा भारी परिणाम झालेला दिस्तोय Proud

काल स्वप्नीलने कशी मुलगी हवी हे विचारताच 'तिला स्वतःची करियर असावी आणि ती तिच्या आवडीची असावी' असं म्हटलं. पण मग हा ठोंब्या अमेरिकेला गेल्यावर ह्याच्या मागून ती जायची नाही. उसगावातलीच मुलगी करायला लागणार त्याला.

पण मग हा ठोंब्या अमेरिकेला गेल्यावर ह्याच्या मागून ती जायची नाही. >> तेच तो गेले काही महिने सांगतोय स्वप्ना. Uhoh

भरत Lol धन्यवाद.

हा घना अमेरिकेला कुठल्या व्हिसावर जाणार आहे देव जाणे. २०१३ साठीची एच१बीची कॅप संपली आहे. बहुतेक ओ-१ व्हिसावर जाणार असेल.

O-1 (extraordinary ability) admits into the United States of persons with extraordinary ability in the sciences, arts, education, business and athletics, or extraordinary achievement in motion picture and television production, and their essential support personnel.

Because he is well-versed in the art of 'Doing Nothing' Happy

बेकायदेशीरपणे जाणार असेल तर मात्र बोटीच्या तळाशी मावायला त्याला बरंच वजन कमी करावं लागेल

काल घना राधाला म्हणाला कि तुला हव तर तू खाली येऊन माझ्याशेजारी झोप. आत्ता गेल्या वेळसारख होणार नाही. मी आत्ता "प्रिपेअर्ड" आहे.
हे "प्रिपेअर्ड" आहे काय असत?

स्वप्ना ___________/\___________
>>बाकी राधा माहेरी असताना पावसाळ्यात विजा चमकत नव्हत्या का क्कॉय?
>>भीमरुपी महारुद्र पाठ केलं असेल
>>शेरलॉक होम्स

क ह र आहेस Rofl Rofl Rofl Rofl Rofl

भरत Lol

ही मालिका रहस्यमय नसल्याने बहुदा शेवट गंडणार नाही अशी अपेक्षा. पण निर्मात्याला मालिकेत पाणी घालायची बुद्धी सुचली तर काही खरं नाही. राजवाडे मालिकेत पाणी घालत नाहीत असा असंभवच्या वेळचा अनुभव आहे. निर्मात्याने आग्रहच धरला तर ते मालिकाच सोडून देतात.

काल राधा तिला कसा नवरा हवाय हे सांगताना "आणि त्यानेच त्याचे माझ्यावर प्रेम आहे हे सांगावे" हे कसले मस्त होते. स्वप्नीलची प्रतिक्रीया मात्र अगदीच मठ्ठ होती त्यावर. Happy

कालच्या अबीर आणि आत्याच्या प्रसंगात थोडीशी जुन्या सुकन्याची झलक दिसली - सीनच्या शेवटी ते डोळ्यातले पाणी दाखवताना. नाहीतर रटाळच असतो तिचा अभिनय हल्ली.

<<<<<<<<<<राधासारखी मुलगी विजांना घाबरते हे जरा अतीच वाटतं!>>>>>>>>>>>>
नाही असु शकतं... किंवा अजुन काही असु शकेल.. भावनाआँको समजो टाइप्स... Wink

घधा हा शॉर्टफॉर्म लईच भारी आहे Biggrin
स्वप्ना, भरत Rofl

आणि बादवे, तो येडा घना राधाला भिती वाटते म्हणून खाली झोपायला काय बोलवत होता ??? एssवssढा मोठ्ठा बेड आहे त्याची काय आरती करणार का हे दोघे खाली झोपून??? Uhoh

राजवाडे मालिकेत पाणी घालत नाहीत असा असंभवच्या वेळचा अनुभव आहे.>>>>>>>>> माधव, पण त्याच्या पुढच्याच राजवाडेच्या गुंतता हृदय हे मधे सुनामी आणली होती त्याने आणि सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालं होतं Proud त्यामुळे त्या राजवाडे चा काssssही भरवसा देत येत नाही आजकाल

>>आणि बादवे, तो येडा घना राधाला भिती वाटते म्हणून खाली झोपायला काय बोलवत होता

तसाच बाका प्रसंग आला आणि 'भीमरुपी' आठवलं नाही तर जमिनीवरून सरकत सरकत धूम पळता येईल ना त्याला. बेडवर असला तर धपकन खाली पडेल आणि घरच्यांचा रेकॉर्ड लक्षात घेता सगळे क्षणार्धात धावत येतील एव्हढा मोठा आवाज ऐकून Proud

बाका प्रसंग>>>>>>>> Lol
अग्नीला सा़क्षी वगैरे मानून लग्न करायचं आणि असे बाके प्रसंग आले की पळता भुई थोडी Lol (हो काल भुईवरच झोपायच्या गोष्टी होत्या ना :फिदी:)
कित्ती कॉप्लिकेटेड सगळं Lol

सगळे पिक्चर फुकटात नेटवर पाहणार्‍या कोणालातरी विचारा..... लगेच लिंक्स मिळतील (काडी)> अरे शोधला डाउनलोड करायला. पण मिळालाच नाही. आता आपली मरठीवर बघते मिळतो काय.

रीमा, तुनळीवर आहे बघ. मी काल तिथेच पाहिला. youtube.com/movies

पण नाही बघितलास तरी काहीही बिघडणाअर नाही, उलट ३ तास वाचतील. अशक्य आचरट नी मुर्खपणाने भरलाय. असले पोलिस फक्त कुठल्यातरी अज्ञात बेटावर सापडतील. मुंबैच्या पोलिसांना घरी जायला वेळ मिळत नाही असे पेपरात येते, तिथे असले टिपी कुठुन करणार बिचारे.............

मला ..background music of "eka lagnachi dusari goshta" चे हवे आहे
play on piano ...... .......... कुठे मिळेल.......... ???????????????

अशक्य आचरट नी मुर्खपणाने भरलाय. >>>>>>>>> साधना Lol एकदा बघायला बरा वाटला होता.... खूप अपेक्षा ठेऊन पहायला बसली असशील तू.

Pages