Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो फोटो घनाच्या बाल
तो फोटो घनाच्या बाल मैत्रीणीचा असतो , ती अॅक्सिडेन्ट मधे जाते लहान वयात .
घना, राधा आणि अबीर.. तीन
घना, राधा आणि अबीर.. तीन पात्रं(च) असतील माई आजीच्या प्लॅनमधली.. आणि प्रत्येकाला माईआजीने एक काम दिलं असणार..
म्हणजे अबीरला राधा आणि घनाचं लग्न जुळवायचं
राधाला घनाने अमेरिकेला जाऊ नये नि इथेच प्रेम महत्त्वाचे मानून रहावे.. हे पटवायचं
आणि घनाला.. लग्न जुळवणे राधा आणि अबीरचं.. कारण नाही तरी तो तिला सोडूनच जाणारे ना? मग जाण्यापूर्वी त्याने खात्री करावी की राधा त्याच्यात गुंतली नाहीये.. टाईप्स...!
आणि तिघांना माहीत नाहीच्चे की काय होणार नक्की ते.. त्यामुळे.. त्यांचे वैयक्तिक विचार आणि दिलेल्या कामगिर्या ह्यातून सध्याची मिसळ बनलीये!
राजवाडे बरोबर का?
शनिवारचा मिसलेला एल्दुगो
शनिवारचा मिसलेला एल्दुगो टीव्हीवर रिपीट कधी असतो?
स्वप्ना तू अगदी, अगदी अशक्य
स्वप्ना तू अगदी, अगदी अशक्य आहेस
मानुषी शनिवारचा भाग आज सकाळी
मानुषी शनिवारचा भाग आज सकाळी साडेसात, साडे बारा व दुपारी एकदा असतो.
ओक्के अमा........पहाते मिळाला
ओक्के अमा........पहाते मिळाला तर!
अबीर, श्रूती, स्पॅनिश
अबीर, श्रूती, स्पॅनिश फ्रेंन्ड -शिव्या बाबारे किती तो व्याप

घनामाऊली निघाली अमिरिकेला! तिकडे अबीर बरोबर आताच 'डिस्ट्रोईड' का काय ते झालाय
.. ह्या टर्न नंतर राधाचा डिसिजन लवकरच समोर येईल आता 
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना बाकी ही मालिका
स्वप्ना
बाकी ही मालिका अतिशय - प्रचंड - भयानक - महान कंटाळवाणी होत चालली आहे (आधी पेक्षा).
माझ्या मते पहिले काही एपिसोड
माझ्या मते पहिले काही एपिसोड लेख क ठीक होता. नन्तर गोण्धलला. आता तर ताकात पाणी घालुन कुठेही कट पेस्ट केल्यासारखे चाललेय. केव्हा बन्द करताहे त हे त्या झी टीव्ही ला माहित.
हायला, कुहू आजच्या
हायला, कुहू आजच्या एपिसोडमध्ये जाम डोचक्यात गेली. काय ते पदर चेहेर्यासमोर धरून खिदळणं, लाजणं....अगदी गुडघ्याला बाशिंग आहे. कानाखाली 'जाळ' काढावासा वाटला.
घनाने बहुतेक 'there is many a slip between the cup and the lip' हा वाक्प्रचार ऐकला नसावा. पाचात शॉर्टलिस्ट झालाय म्हणून उडतोय. वर त्याचा मित्र म्हणतो की केलेलं काम वाया जात नाही. हो बाबा, केल्याने होते आहे रे, पण आधी केलेचि पाहिजे ना? हा माणूस कधी काम करतो? लॅपटॉप मांडीवर घेऊन बसला की झालं का काम? राजवाडे, पुढच्या मालिकेच्या वेळी नीट आरअॅन्डडी करून हिरोचा व्यवसाय ठरवा हो.......
आज राधाने अगदी शेपूच्या भाजीगत मिळमिळीत होत घनाला मला तू हवा आहेस म्हणून सांगितलं. त्या शेवटच्या वाक्याच्या वेळेला 'आणि मला' नंतर एव्हढा पॉज होता की वाजपेयीसुध्दा एक झोप काढून 'चहा झाला का गो' म्हणत उठले असते. मला तर ती ' तुझ्याकडून एक बाळ हवंय' असं म्हणते का काय असं वाटायला लागलं होतं.
छन्न पकैय्या छन्न पकैय्या
छन्न पकैय्या छन्न पकैय्या छन्नके उपर कैरी
राधाका दिल तोडके पछताओगे गिरिधारी
मालिकेला नवा टर्न म्हणजे
मालिकेला नवा टर्न म्हणजे बहुतेक घनाची बालमैत्रिण मेलेलीच नसणार. ती कडेवर एक पोर घेऊन येणार आणि घनाला म्हणणार 'ये तुम्हारी अमानत है'. मग मिनिटभर सगळ्यांच्या चेहेर्यांचे क्लोजअप्स. घनाची आई 'अरे देवा, घना काय रे हे?' म्हणून बेहोश. आज्जींना हार्टअॅटॅक. आणि अमानवाला 'अमानवी' आनंद!
तो फोटो घनाच्या बाल
तो फोटो घनाच्या बाल मैत्रीणीचा असतो , ती अॅक्सिडेन्ट मधे जाते लहान वयात .
>>>>>>>>>>
"ती" परत येतेय
(स्वप्ना, मी हे लिहेपर्यंत तुझी पोस्ट आली तेंव्हा "अपने खयाल कितने मिलते जुलते है" वगैरे वगैरे...... बरं का
)
हायला, कुहू आजच्या
हायला, कुहू आजच्या एपिसोडमध्ये जाम डोचक्यात गेली. काय ते पदर चेहेर्यासमोर धरून खिदळणं, लाजणं....अगदी गुडघ्याला बाशिंग आहे. कानाखाली 'जाळ' काढावासा वाटला.
>>>>>>>>>>>>>
स्वप्ना
कुहूच्या नाही गं, दिग्दर्शकाच्या......!! का त्या निश्पाप जीवाला असं छळतेस 
आज राधाने अगदी शेपूच्या
आज राधाने अगदी शेपूच्या भाजीगत मिळमिळीत होत>>>> अक्षी बरोबर बघा!! तिच्या सारख्या तडक फडक मुलीची ष्टाईल अशी असूच शकत नाही. डायरेक्टर ने मोठीच मिष्टेक मारली आहे.
मला तर ती ' तुझ्याकडून एक बाळ
मला तर ती ' तुझ्याकडून एक बाळ हवंय' असं म्हणते का काय असं वाटायला लागलं होतं.
>>>>>>>>>>>>>>>>>>
अशक्य हसतोय........ मालिकेतला हाच टर्न असणार.
घनाला राधा आवडत असूनही तो तिला प्रयत्नपूर्वक दूर ठेवतोय कारण त्याला असं कळलय की लहानपणी झालेल्या एका सायकल अपघातामुळे
तो बाप होऊ शकत नाही. राधाला त्याचा भूर्दंड नको म्हणून तो तिला दूर करतोय या नात्यातून


आणि राधाला ते कळत नाहिये. सरतेशेवटी घनाच्या कपाटातून एक वैद्यकिय रिपोर्टची फाईल मिळणार त्यात हा उलगडा होणार आहे
घना बरसत का नाही याचा उलगडा असा होणार....!!!! (विश्वसनीय सुत्रांकडून
)
बाकी आजच्या त्या राधाच्या
बाकी आजच्या त्या राधाच्या प्रसंगात बॅग्राऊंडला "येरे घना येरे घना न्हाऊ (माखू) घाल माझ्या मना"
हे गाणं कसं नव्हतं ब्वा,,,,,!!!!
"येरे घना येरे घना न्हाऊ
"येरे घना येरे घना न्हाऊ (माखू) घाल माझ्या मना"
हे गाणं कसं नव्हतं ब्वा,,,,,!!!! >>>>>>>>> हे नाही रे ..... आज http://www.youtube.com/watch?v=o7fA5DfrOAs "हवास मज तू हवास तू" चा दिवस होता.
जस्ट इमॅजिन, राधा घनाच्या कमरे भोवती हात घालून त्याला गरागरा गिरक्या घ्यायला लावत बॉल डान्स करतेय... जे नेहमी जोडीतली मुलगी करते त्या सारख त्याला करायला लावत हे गाण गातेय...
फायनली राधानेच प्रामाणिकपणे
फायनली राधानेच प्रामाणिकपणे घनाला आपल्या मनातल सांगितल एकदाच. पुढच्या भागत तर ती घनाला त्याच्या प्रेमात पडल्याच कबुल करते. सही राधाच कॅरॅक्टर मस्त खुलवलय मुक्ताने. एवढ करुन सुद्धा घना ताणायला लागला तर मात्र राधा deserve better आणि राधाने घरच्यांपासुनसुद्धा काहीही लपवुन ठेवायला नको.
त्यात राधाच दुसर लग्न होऊन ती नवरयाबरोबर अमेरिकेत सेटल्ड झालेली दाखवल तर ४ चांदच....जाम मजा येईल 
राधा घनापसुन दुर (डिओर्स) गेलेली दाखवायला पाहिजे + घनाचा अमेरीकेचा व्हिसा रिजेक्ट होताना दाखवल पाहिजे आणि घनाची स्थिती "तेलही गेले तुपही गेले हाती आले धुपाटणे" सारखी दाखवायला पाहिजे
बघु आता राजवाडे शेवट कसा करतोय ते.
ठिक वाटला आजचा भाग. थोडी
ठिक वाटला आजचा भाग. थोडी डिग्निटी (आणि ग्रेस) ठेवलेली वाटली त्या admission मध्ये. चीप किंवा अगदी फिल्मी कृत्रिम दोन्ही टाळले, ते आवडले.
केसांमुळे विचित्र दिसतो तो स्वप्नील कधीकधी. आज तर अगदीच.
आजच्या भागातला वल्लभ काकांचा आणि इतरांचा प्रसंगही छान होता.
परवाच्या भागातला कुहु-ज्ञाना संवाद मस्त होता.
बाई बाई ! इथे म्हण्जे कुहूवर
बाई बाई ! इथे म्हण्जे कुहूवर टीका करायची अगदी चोरीच झाली म्हणायची !
का त्या निश्पाप जीवाला असं
का त्या निश्पाप जीवाला असं छळतेस>> +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००१
स्वप्ना, तू हळूहळू 'हिंसक'
स्वप्ना, तू हळूहळू 'हिंसक' बनत चालली आहेस, नको गुंतूस एवढी ह्या मालिकेत
राधासारखी करारी मुलगी अशी का
राधासारखी करारी मुलगी अशी का झाली याचे उत्तर तिनेच काल दिले (इथले वाचून दिले का?). अगदी पटले.
कालच्या भागानंतर राधाकडून सगळी पावले उचलून झाली आता उरला फक्त घना. त्याची गाडी कोणत्या रुळावरून जाणार हे त्या प्रभातच्या प्रसंगात घनानेच सांगून ठेवले आहे - 'कुहू दुसर्याची झालेली पहावेल तुला?" असं तो प्रभातला विचारतो. त्याच प्रश्नाचे उत्तर त्याला राधाच्या बाबतीत द्यावे लागणार आहे.
आजच्या भागातला वल्लभ काकांचा
आजच्या भागातला वल्लभ काकांचा आणि इतरांचा प्रसंगही छान होता.
>>
हो हो. मला फार आवडला तो सीन.
कुहू प्रभातचे लग्न मोडण्याचे
कुहू प्रभातचे लग्न मोडण्याचे नाटक घनाकडून प्रेमविषयक संवाद वदविण्यासाठीच होते.
स्वप्ना, मागच्या पानावरची
स्वप्ना, मागच्या पानावरची तुझी गाणी एकदम सही.
वरच्या पोस्टशी सुद्धा सहमत. मी काल ( कि परवा बरं?) १०-१५ मिनिटं पाहिली सिरियल तेव्हा कुहुचं साडी सिलेक्शन चालु होतं. कुहुचं पात्र किती इरिटेटिंग दाखवलं आहे. तिच्या कविता, तिचं येडपट वागणं आणि लाजणं सहनशक्तीचा अंत पहाणारं होतं. मुक्ताने खरंच कानाखाली जाळ न काढता तिला इतक्या शां॑तपणे कसं समजुन घेतलं? बदलली मुक्ता खरंच बदलली.
(भुंग्या प्लीज नोट मी स्पृहाला काहीही म्हणत नाहीए. मी कुहुद्वेष्टी आहे मात्र.:) )
पण कुहूची ती कविता ज्यात ती
पण कुहूची ती कविता ज्यात ती मी मेंदीलावून चालले दूर देशी, तोडल्या सार्या वेशी ती छान आहे.
विशेषतः राधाला असे दूर देशी जाता येणार आहे कि नाही ह्या संदिग्ध मनःस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकच.
तिच्या कविता, तिचं येडपट
तिच्या कविता, तिचं येडपट वागणं आणि लाजणं सहनशक्तीचा अंत पहाणारं होतं. <<<
पण ते खोटं नाही वाटत. तो तिचा स्थायीभाव वाटतो. खरंच वाटतं ते. स्पृहा करते पण अत्यंत कन्व्हिन्सिंग.
Pages