Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, वल्ली-वल्लभ -कुहु
हो, वल्ली-वल्लभ -कुहु सगळ्यांना कोंडून ठेवा कुठे तरी.. अजिबात नको दिसायला ए ल दु गो मधे परत !
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ए कोंडून काय गं......
. त्यापेक्षा कुहूसकट वल्ली-वल्लभला सन्मानाने घेऊन जातो मी


फक्त कान पिळायला तो ज्ञाना नको आणि घना पण नको
घनाचा आता मात्र जरा जास्तच
घनाचा आता मात्र जरा जास्तच अतीपणा वाटतोय. राधाच कॅरॅक्टर सुंदर खुलत चाललय. एकटेपणाची सवय झालेल्या, आईवीना असलेल्या मुलीला एवढे प्रेम करणारी माणस मिळतात आणि मग तीच हरवलेल लहाणपण जाग होण, स्वभावात जाणवणारा प्रेमळपणा, घनावरच प्रेम, समंजसपणा आणि मुख्य म्हणजे आता मिळवलेली सगळी माणस जपुन ठेवण्यासाठी चाललेली धडपड मुक्ताने मस्त दाखवलीय अॅक्टींगमधुन.
त्याच्याच भाषेत म्हणायच तर एकदम जोकींग 
राधा उघड उघड घनाला तीच्या भावना स्वतःहुन सांगतेय ते मस्त दाखवलय. घनाच कॅरॅक्टर फार गंडलय. घरच्या एवढ्या साध्या लोकांची जी तो फसवणुक करतोय ते जरा अतीच आहे आणि कशासाठी तर अमेरीकेत जॉब करण्यासाठी
घना किती चाचरत बोलतो...
घना किती चाचरत बोलतो...
जा घेऊन भुंग्या , परत सोडु
जा घेऊन भुंग्या
, परत सोडु नकोस सेट वर !
घना मला अजिबात क्यूट वगैरे
घना मला अजिबात क्यूट वगैरे वाटत नाहीये. मंद, मठ्ठ आणि स्वार्थी वाटतोय.
त्याच्या अमेरिका ऑब्सेशनमुळे मंद, एकंदरीत वागणुकीमुळे मठ्ठ आणि ज्याप्रकारे तो सगळं कळून सवरुन राधाच्या भावनांशी खेळतोय त्यावरुन स्वार्थी. >>>>> +++++++ १
राधाच्या कॅरॅक्टर ला जरा लाजणं सोडून अलिप्त वागवायला हवं राजवाडेंनी ! घना आणि त्याच्या फॅमिलीशी सुध्दा अलिप्तच ! >>>>>>> +++++++१
राधा ने घनाला जास्त भाव न देता अबीर बद्दल जरा विचार करावा असं वाटतं:
शर्मिला, घनाबद्दल
शर्मिला,
घनाबद्दल +१०००००००००
डिजे,
घधा
एक्दम कर्रेक्टेय.
'मी आहे बाजुला , तू झोप' .>>>
'मी आहे बाजुला , तू झोप' .>>> 'तू झोप मी जागा आहे' पेक्षाही भारी टॅगलाईन
आगावा
आगावा
शर्मिलाजी घनाबद्दल अनुमोदन.
शर्मिलाजी घनाबद्दल अनुमोदन.
एल ओ एल पोस्टी. ते तो बायकोला दिखाऊ आय मिस यू वगेइरे म्हणतो. अन मग आई येते
आई लगेच लक्षच ठेवून असते मग तो अवघड्तो लाजतो हे वय वर्शे १७ परेन्त ठीक आहे. नॉट फॉर अॅडल्ट्स. पिट्स यार. !!
मला घधाच्या कथेत सगळ्यात
मला घधाच्या कथेत सगळ्यात गंडलेली गोष्ट हि वाटते कि ठीक आहे तुम्ही Contract Marriage केल आहे आणि तुमच सगळ वेगळ आहे वगैरे. पण घधामध्ये कुठलीही सेक्शुअल केमिस्ट्री नसावी किंवा त्यांनी 'या' गोष्टीपासून अगदीच "छे सेक्स बिक्स काय हे तर माझ खेळण्या-बागडण्याच वय आहे" अस बाळबोध वागण मला खूप खोट वाटतय. म्हणजे या गोष्टीचा त्यांही विचारही केला नसण हे अति होतय. माझ्या मते आज कुणीही Contract Marriage केल तर ते मजा म्हणून सेक्स वैगेर करून निवांत असतील आणि सोडायचं तेंव्हा एकमेकांना सोडून देतील म्हणजे जर ते सगळ्या गावाला गंडवून आपण Contract Marriage करू शकतो अशा Mentalityचे असतील तर.
दुसर म्हणजे नक्की मालिका विनोदी करायची आहे का खरी-खुरी प्रेमकथा हे नक्की कळत नाही आहे. उदा. कुहू-प्रभात ब्रम्हचारी प्रकरण विनोदी म्हणून चांगलच आहे पण जेव्हा ते खरच गंभीर प्रोब्लेम म्हणून दाखवायला जातात तेंव्हा सरळ फास्ट-फोरवर्ड करण्याच्या लायकीच होत सगळ.
(पण भुंगा प्रभात ब्रम्हचारी असल्यावरून खुश दिसतो आहे :स्मित:)
घना मला अजिबात क्यूट वगैरे
घना मला अजिबात क्यूट वगैरे वाटत नाहीये. मंद, मठ्ठ आणि स्वार्थी वाटतोय. >> अगदी अगदी. त्यातला मंद आणि मठ्ठ भाग स्वप्नील छान वठवतो. स्वार्थीपणा ही त्या पात्राला मनस्विनीने दिलेली डूब आहे
पण काल चक्क मला स्वप्नीलची रीअॅक्शन आवडली - 'मी अभिनय करत नव्हते' या राधाच्या वाक्यावरची.
आहे तेच संपवतो आहे>>>>>>>>>
आहे तेच संपवतो आहे>>>>>>>>>
आज त्याचं राधाच्या खांद्यावर हात टाकून लाडात येणं, नंतर आपण नाही का आधी करत होतो तशीच आताही अॅक्टींग करतो आहोत असं तिला समजावणं, आई येत असताना उगीच तिच्या जवळ जाऊन मिस यू म्हणणं हे डोक्यात गेलं>>>>>>>>>>>>
त्या कर्तबगार, करारी, स्वयंसिद्ध राधाला मी मिस करतेय आता. अगदीच पालेभाजी झालेय तिची सध्या 
अगदी अगदी ग शर्मिला... कुठे गेली ती सुरवातीची करारी राधा, कंबख्त इश्क ने निकम्मा कर दिया वरना वो भी लडकी थी काम की असं वाटतंय तिच्याकडे बघून, आणि इतक्या कर्तबगार मुलीने जीव ओवाळून टाकावा या लायकीचं तरी आहे का घना चं पात्र?? त्यापेक्षा खरंच तो अबीर बरा मग
'मी आहे बाजुला , तू झोप' हे
'मी आहे बाजुला , तू झोप' हे म्हणजे 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' छाप झालंय.
राधा, सगळं बघणार ऐकणार आणि
राधा, सगळं बघणार ऐकणार आणि एके दिवशी सॉल्लिड्ड भडकणार आहे घनावर, असं जाणवतंय... मग तिचा फायनल ड्राफ्ट वाला अवतार समोर येईल- पार पाणउतारा, उगाच शहाणा बनणार्याचा
इतक्या कर्तबगार मुलीने जीव
इतक्या कर्तबगार मुलीने जीव ओवाळून टाकावा या लायकीचं तरी आहे का घना चं पात्र?? त्यापेक्षा खरंच तो अबीर बरा मग
सहमत.. आज प्रेमात आहे तोवर ठिकाय, पुढे पश्चाताप होईल....
ईला भाटे बाई - घनाची आई
ईला भाटे बाई - घनाची आई प्रचंड डोक्यात जातीय. तिचे ते लाडे लाडे डायलॉग सुरू झाले की तिला फाडकन तोन्डात मारावीशी वाटते. राधानी घनाला सोडून अबीरशी लग्न केले असे दाखवले तर काय मज्जा येईल. ईला भाटे बाई हार्ट अॅटॅक येऊनच पडतील. अबीरला बघून त्यापण कीती जास्त डीस्टर्ब झालेल्या दाखवल्यात. कीती ती त्यांच्या खाजगी आयुष्यात लूड्बूड.
राधानी अबीरशी लग्न केल्यास घनाच्या घरातल्या इतर सगळ्यांच्या प्रतिक्रीया बघायला पण मज्जा येईल. असे जर दाखवले तर अत्तपर्यंतचे सगळे अपराध माफ राजवाडेंना. पण असे काही होणे या जन्मात/ मालिकेत शक्य नाही
राजवाडे उवाचः "आहे तेच
राजवाडे उवाचः "आहे तेच संपवतोय सध्या"
अरे देवा... नविन मिळेपर्यंत जुने पुरवुन पुरवुन संपवणार की काय????????????
राधाचे नशिबच खराब. ६
राधाचे नशिबच खराब. ६ महिन्यापुर्वी अबीर भेटता तर आज राधा-अबीर्-पपा-आत्या सगळे मस्त एकत्र राहिले असते, अबीरने exotic जेवण बनवले असते, प्राचीआत्याने त्याची तोंड फाटेतो स्तुती केली असती, राधा पपांजवळ राहिली असती आणि सुखात आयते जेवली असती. तिकडे घना 'अमेरिका माझी पॅशन आहे' असे लिहिलेला तंत्राचा टिशर्ट घालुन लोकांच्या हार्डडिस्का फॉर्मट करत लॅमिंग्टन रोडवर बसला असता आणि काळे कुटूंबीय 'बरे आहे, अमेरिकेपेक्षा लॅमिंग्टन रोड बरा' हा मंत्र घोकत बसली असती. एवढा उशीर का केला त्याने????????
<<राधाचे नशिबच खराब. ६
<<राधाचे नशिबच खराब. ६ महिन्यापुर्वी अबीर भेट>> साधना १००००००००++ अगदी अगदी .
काळाने केलेली चूक आता राधाने दुरुस्त करावी अबीरशी लग्न करून
साधना, मग मालिकेत काय दाखवले
साधना, मग मालिकेत काय दाखवले असते ?
परत विचार करता: या प्लॉटवरूनपण केकता, विरेंद्र वगैरे महान लोकांनी मालिका बनवली असती याबद्दल मला शंका का यावी?
साधना , अगदी अगदी !
साधना , अगदी अगदी !
तिकडे घना 'अमेरिका माझी पॅशन
तिकडे घना 'अमेरिका माझी पॅशन आहे' असे लिहिलेला तंत्राचा टिशर्ट घालुन लोकांच्या हार्डडिस्का फॉर्मट करत लॅमिंग्टन रोडवर बसला असता आणि काळे कुटूंबीय 'बरे आहे, अमेरिकेपेक्षा लॅमिंग्टन रोड बरा' हा मंत्र घोकत बसली असती.<<<

पण मुक्ता आणि उ का ही जोडी मस्त दिसते हे खरं हा.
साधना त्यातले 'सुखात आयते
साधना
त्यातले 'सुखात आयते जेवली असती' हे फार्फार टेम्प्टिंग आहे 
या प्लॉटवरूनपण केकता,
या प्लॉटवरूनपण केकता, विरेंद्र वगैरे महान लोकांनी मालिका बनवली असती
>>>>>>>>>
केकता असती तर
)........ मग कथेला वेगळेच वळण. 
अबीर हा घनाच्याच बाबांचा मुलगा आहे वगैरे दाखवलं असतं....... ईला भाटे फिट येऊन पडल्या असत्या........ अबीरची आई अवतरली असती पुढच्या भागात.... ती असती "सुमुखी पेंडसे / स्मिता जयकर / नीना कुलकर्णी" ईत्यादी (नीना कुलकर्णी असतील तर कर्ली हेअर इज मस्ट, त्याशिवाय तो सोज्वळ चेहरा खलनायिका कसा दिसेल
किंवा,
कुहूला दिवस गेलेले दाखवले असते........ प्रभात पळून जातो आणि मग अबीर त्याची नैतिक जबाबदारी घेऊन कुहूला स्विकारतो वगैरे उदात्तीकरण झालं असतं
विरेंद्र असता तर

कुठली ना कुठली एक कपाळाला मळवट भरलेली स्त्री राधाला येऊन काळेंच्या घरात भेटत राहिली असती...... तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला तिला मदत करत..... समस्त काळे देसाई परिवाराला ही स्त्री येते कुठून त्याचा थांगपत्ता लागला नसता.......
राधा परत येते तेंव्हा घना पंख्यावरून गुलाबाची फुलं उधळतो, त्याऐअवजी विरेंद्रने अचानक पंखा सुरू होऊन पिंजर घरभर पसरते आणि राधा-घना सकट सगळे भयचकित होताना दाखवलं असतं....
आत्याचा नवरा मग एका मांत्रिकाला घेऊन काळेवाडीत शिरला असता.... त्याने सांगितलं असतं की किमान पुढचं एक वर्ष घना राधा यांच्यात नवरा बायकोचे संबंध येता कामा नयेत.... काळेवाडीवर वाईट सावट आहे........ एका स्त्रीचा शाप वगैरे.
(No subject)
भुंग्या आता रात्री मूल झोपत
भुंग्या
आता रात्री मूल झोपत नसेल तर आईबाबा त्याला लवकर झोप नाहीतर केकता/विरेंद्रची मालिका लावेन अशी भीती घालायला लागणार आहेत.
भुंगा अहोरात्र टिव्ही समोर
भुंगा अहोरात्र टिव्ही समोर पडिक असल्याकारणाने आता भुंगीण त्याच्यासमोर कर्ली हेअर लाऊन अवतीर्ण होणारसे वाटते
साधना अगदी षट्कार. खूपच
साधना अगदी षट्कार. खूपच हसलेय.
साधना अगदी षट्कार. खूपच
साधना अगदी षट्कार. खूपच हसलेय.
अत्ता पण आयतच खाते पितेय कि
अत्ता पण आयतच खाते पितेय कि राधा , म्हणून तर टिकलिये अजुन

कॉफी सासरे करतात, डबा सुप्रिया काकु , डिनर सासु करते शिवाय घना बरोबर पाणी पुरी झोडता येते , घरी कायम आइस क्रिम पार्टी असतेच !
एवढं सगळं एकटा अबिर नाही करणार, तो फक्तं सॅलेड्स करतो आणि उलट मुक्ताला स्वयंपाक येत नाही म्हणून हसत होता!
त्यामुळे माझं मत काळे किचन ला
Pages