निसर्गाच्या गप्पा (भाग ९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 June, 2012 - 14:36

निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.

सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.

महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्‍यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.

एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.

(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

अनुक्रमणीका:
पान १ -

प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.

माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...

माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती

पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय

पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख

पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...

पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.

पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new

पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new

पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड

पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा

पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325

पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल

माहीती : बिब्बा

लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html

पान १३

प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित

पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल

पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm

पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन

पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001

पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,

पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता

पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/

पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134

पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090

पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I

पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512

पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,

पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,

पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्‍या-गिधाडे, वारी

पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक

पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/

पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/

पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली

पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली

पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\

पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु,
अरे वा ! ९ वा भाग चालु झाला देखील !
फोटो छान आलेत ..

सर्व निसर्गप्रेमींना सुदुपार ! नमस्कार !
पावसाळ्याच्या तोंडावर हा भाग सुरु होत आहे, त्यामुळे इथली सगळी पानं हिरव्यागार फोटोंनी नटुन जातील हे नक्की ...

नवल म्हणजे, घरापासून नदी खुपच लांब आहे. (मावशीचे घर बाजारपेठेतच आहे.) अनेकवेळा सांगूनसुद्धामला इतक्या वर्षात, कुणीही तिथल्या नदीवर नेले नाही. कुठे सापडलो, ते पण कुणी सांगत नाही!!
दिनेशदा,
ती कटु आठवण पुन्हा येऊ नये यासाठी कदाचित तो योग येत नसावा.

.परत हरवेन, असे वाटत असेल
निसर्गापासुन 'हरवलेल्या' शेकडो लोकांना तुम्ही वाट दाखवत आहात...
आणि तुम्ही हरवले जाल अशी जगात अनोळखी जागा कुठे आहे का ?

अनिल, तूच हरवतोच अधून मधून !
जागू, काल आमच्याकडे एका वेगळ्या जामचे झाड बघितले. आकाराने गोल, आकार बोरा एवढा. रंग लाल हिरवा. चवीला साखरेसारखा गोड. फोटो काढलाय. रात्री टाकतो इथे.

तुम्ही हरवले जाल अशी जगात अनोळखी जागा कुठे आहे का ?>>>>> + ओवी --->

अवघे विश्वचि माझे घर | ऐसी जयाची मति स्थिर | किंबहुना चराचर | आपणचि जाहला || ज्ञाने.

शनीवारी, मी मोदी गणपती मंदिरात प्रदक्षिणा घालत असताना, दोघी तिथे आल्या आणि त्यांचा संवाद ऐकून त्या निग.मैत्रिणी आहेत असं मला वाटल. नंतरच्या प्रदक्षिणेला बोलू. अस ठरवल तर त्या निघूनच गेल्या.
त्याचा संवाद पुढील प्रमाणे होता.
पहिली हातातल्या पिशव्या सांभाळत काहीतरी काढत असते. (जागा : बाभलीच्या झाडाखाली)
दुसरी : फ़ोटो ना?
पहिली : हो ना.
दुसरी : अग मी कालच गोरख चिचेच झाड फ़ुललेल पाहिले. अग चल आपण तिकडून फ़ोटो काढू. नीट येतील.
मी परत तिथे येई पर्यंत त्या गेल्या होत्या. Sad
इथल्या कोनी असाल तर मला सांगा ग. मी एकीचा चेहरा जरासा बघीतला. दुसरीचा नाही बघीतला. Happy

निसर्गापासुन 'हरवलेल्या' शेकडो लोकांना तुम्ही वाट दाखवत आहात...
आणि तुम्ही हरवले जाल अशी जगात अनोळखी जागा कुठे आहे का ?>>>>>>>>>.अनिल, १००००००००००००००००००००% अनुमोदन.

दिनेशदा,हे माझे स्वरचित काव्य नसून मागे मी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सवर प्र. के. घाणेकरांचा एक लेख वाचला होता. त्यातील ह्या ओळी मनात घर करून बसल्या होत्या त्याच ईथे दिल्या, देतानाच कवीचे नाव द्यायला हवे होते, पण कोर्टात पळायचे होते व नेमक्या ओळी कुठल्या आहेत ते आठवत नव्हत म्हणून घाणेकरांचे नाव दिले नव्हते.

हर्‍या भर्‍या वसुंधरेवर, निळे निळे गगन,
ढगांची पालखी आभाळात, उडवतो पवन!
इथल्या नाजूक नाजूक फुलांचा संसार,
त्यांचा कोण आहे किमयागार?

हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन,
के जिसके बादलोंकी पालकी, उडा रहा पवन...
दिशाये देखो रंगभरी, दिशाये देखो रंगभरी,
चमक रही उमंग भरी,
ये किसने फुल फुल पे किया सिंगार है?
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है???

काय लोक्स तुम्ही, भरत व्यास यांचे हे शुद्ध हिंदीतले काव्य विसरलात????

आमच्याकडे रातराणी अशी भरभरून फुलते पण अजिबात सुगंध नसतो. मी मुद्दाम रात्री जाऊन बघितले (मला तर माझ्या नाकाचीच शंका आली )

तशीच हि घोसाळी - गिलके
असेच वेलीवर जून होऊन सुकून जातात, फक्त अंग घासण्यासाठीच वापरतात.

आज जागूला सांगितले ते जाम, हा झाडावरचा फोटो. अपुर्‍या उजेडामूळे नीट आलेला नाही.

याचा लंबगोल आणि पांढरट प्रकार मी गोव्याला खाल्ला होता. पण हा गोल आणि खुप गोड आहे.

शशांक फर्स्ट एड साठी उपाय छान सांगितलेस!!
बिचारा हत्ती.. Uhoh
फार छान माहितीपूर्ण धागा ..
जाम चा आकार तर आपल्याकडल्यासारखाच आहे .. Happy
आई गं..इतकी सुरेख रातराणी..बिन सुगंध?? अर्र्र!!!

सुप्रभात.

दिनेशदा रातराणीला सुगंध नाही ????????
जाम पहिल्या फोटोत मला छोटी डाळींबे वाटली Happy
घोसाळी आपल्यासारखीच आहेत.

तशीच हि घोसाळी - गिलके
असेच वेलीवर जून होऊन सुकून जातात, फक्त अंग घासण्यासाठीच वापरतात. >>>> हे अंग घासणे काय प्रकार आहे बरं?

जागू - कमळ घरचंच ना - सुर्रेख आहे अग्दी.....

शशांक वरचे कमळ सगुणा बागेतलच. घरी काल टब मध्ये लावले. फुल फुलताहेत पण साइझ कमी झालेय. थोड्या दिवसांनी जोम धरेल.

शशांक.. शॉवर घेताना ,बॉडी स्क्रबर म्हणून वाळकी दोडकी, गिलकी चा उपयोग केला जातो..
जागु..ते कमळ आम्ही दिवाळीच्या दिवसात रंगीत कागदाचे करायचो तसं दिसतंय .. रंग पण सेम टू सेम Happy

ही नेरळची उल्हास नदी. पाणी अगदी स्वच्छ. छोटे छोटे मासे आहेत आत. कडेला पाय सोडून बसले की पायाला गुदगुल्या करतात. काहीजणं मुद्दाम पेडीक्युअर करण्यासाठी पाय टाकुन बसलेले.

वॉ>>>व्........जागु.......... थांकुथांकु ............... दिल खुश हो गया!!
.. बापरे किती वर्षात पाहिलं.. इतकं सुरेख उमललेलं कमळ.. Happy
इकडे बिनवासाची ,जांभळी कमळं पाहिलीयेत.. ती ही आकाराने लहानखुरी!!!

ऐ हे फोटो मला आधी नाही दिसले ते...
पेडीक्युअर करणारे मासे.... Happy
श्या!!!इथे भरपूर महागड्या स्पाज मधे अशी व्यवस्था आहे.. त्यापेक्षा या नदीत पाय बुडवून बसण्याची मज्जा काही औरच!!!
ढग भरून आल्यामुळे नदी काळपट दिस्तीये ना??

उल्हास नदी मस्तच!!
सुकलेल्या घोसाळ्यां पासून बनवलेली स्किन स्क्रबर्स अगदी छान हॅण्डल वगैरे असलेली मी पण इथे मॉल मधे पाहीलीत पहिले मला कळलच नाही की हे नेमक काय आहे. पण ते जाउ दे या निमित्ताने बहिणाबाईंची "खोपा" कविता पुन्हा आठवली.

खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा... पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा..
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ.... तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???
http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...

दिनेशदा, मस्त जाम. पण रातराणीला वास नाही म्हणजे अजबच. Happy
जागू, अग काय सुंदर कमळ आहे ग. रंग तर अप्रतिम. आता त्यात अडकलेला भूंगा पण तुला पहायला मिळेल Wink

ते नदीच इतक स्वच्छ पाणी खूप महिन्यानी पाहिल. सिमला, कुलु-मनालीला पाहिल होत. आमच्या इथल्या मुठा नदीच पाणी रोज जाता-येता बघते, आणि हीला नदी म्हणाव, की गटार म्हणाव असा विचार दररोज मनात येतो. आणि हीला पाहून रोज आठवते ती कोकणातली नदी. अहाहा! खळ्खळ वहाणारी, स्वच्छ पाणी, मोठे मोठे दगड असलेली, आणि तू म्हणालीस तस, पाण्यात पाय ठेवला की गुदगुल्या करणारे मासे.
गेले ते दिन गेले. Sad

जागू, मी तुला म्हणाले ना? मला कशाचीही (निसर्गाची)आठवण झाली की, इथे कोणीतरी फोटो डकवतातच. दोन दिवसांपूर्वी मला घोसाळ्यांची आठवण झाली होती. कोकणात वडीलानी लावलेले वेल, आणि त्याला लागलेली घोसाळी डोळ्यासमोर आली. आणि आज इथे मला घोसाली दिसली. Happy

हीला नदी म्हणाव, की गटार म्हणाव असा विचार दररोज मनात येतो. आणि हीला पाहून रोज आठवते ती कोकणातली नदी. >> ह्याला माणसाच्या भाषेत प्रगती असे म्हणतात. Sad

मुम्बईतल्या नद्या २००५ च्या पूरानन्तर माहीत झाल्या. नहितर आम्हि त्याला नालेच म्हणत असू. पोयसर चा नाला, दहिसरचा नाला... मिथी नदी?????

Pages