आला पावसाळा रंग बदला

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2011 - 13:39

मानवी जीवनात आला पावसाळा म्हटल की डोळ्यासमोर येते ती पावसाळ्याच्या तयारीची धांदल. पावसापासुन संरक्षण करण्यासाठी आपण छत्र्या, कोट, पावसाळी चप्पल, घरांची डागडूगी अशी धांदल चालु होते. पण काही प्राण्यांची पावसाळ्याची चाहुल लागताच स्वसंक्षणासाठी रंग बदलण्याची लगबग दिसते. अर्थात हे रंग बदलण्याची किमया त्यांना नैसर्गिक आहे. आपल्यासारखी त्यांना विकत घ्यावी लागत नाही. त्यातीलच हा एक प्राणी.

उन्हाळ्यात कसातरीच दिसणारा हा सरडा आता पहा कसा रंगित आणि सुंदर दिसतोय.

अजुन आमचा रंगपालट बाकी आहे.

आम्हाला असे कुठेही चढता येते

चढलो कि नाही ?

फोटो झक्कास आला पाहीजे हा.

मी नाही तुला घाबरत.

कसा दिसतो मी ?

झाले फोटो काढुन ? जाऊ का आता, मारतो उडी, टाटा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सरडेभाऊंनी काय मस्त मस्त पोझेस दिल्या आहेत! >> पण जागुतैला कोणकोणत्या पोझ मध्ये त्रास घेउन हे फोटो घावे लागले ते कुणी जाणेल का...? अरेरे.

ते धावणे..ते थांबणे...मग उच्चीत पोझची वाट पाहत ताटकळत राहणे...!

छान गं जागुतै...खुपच हौशी आहेस.. Happy

मी कालच सापाची मावशी पाहीली इथे.

आभास धन्स.

अग माहेरी गेले होते तेंव्हा आयताच दिसला. आणि किळस वाटायला काय मी त्याची रेसिपी टाकलेय Lol

ऐ थांकु परत लिंक दिल्याबद्दल.. मी मिस केले होते हे फोटोज..
सर्वांचे , म्हंजे सर्वांच्या सरड्यांचे फोटो मस्त आलेत ..
फोटो काढेस्तोवर,पेशंस ने थांबलेत मॉडल्स