निसर्गाच्या गप्पा (भाग ९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 June, 2012 - 14:36

निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.

सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.

महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्‍यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.

एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.

(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

अनुक्रमणीका:
पान १ -

प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.

माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...

माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती

पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय

पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख

पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...

पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.

पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new

पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new

पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड

पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा

पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325

पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल

माहीती : बिब्बा

लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html

पान १३

प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित

पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल

पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm

पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन

पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001

पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,

पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता

पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/

पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134

पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090

पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I

पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512

पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,

पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,

पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्‍या-गिधाडे, वारी

पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक

पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/

पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/

पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली

पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली

पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\

पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या लहान तामणाला जॅपनीज गुलाब असेही म्हणतात. अगदी लहान फुल येते त्याला. ठाणेबेलापुर रोडवर रस्तादुभाजकावर लावलीत ही झाडे. साधारण दोन अडिज फुट वाढतात. फांदी लावली तरी लागतात. मी एकदा लावलेली.. Happy

मी एक गुलाबाचे रोप लावले होते. विकणार्‍याने ते मला गावठी गुलाब म्हणून दिले. पण आता ते वेलीसारखं पसरलय. त्याला फुले आली नाहीत. मला सर्वजण तोडून टाक म्हणून सांगत आहेत. काही करता येईल का?

मी अमी, काही गुलाबांच्या बाबतीत असे होते. फक्त रोप भराभरा वाढते पण एकही फुल येत नाही. मी नेरुळला राहात होते तेव्हा असेच एक रोपटे आणुन जमिनीत लावलेले. ते अस्ताव्यस्त वाढुन वर छताला जाऊन पोचले, पण तीन वर्षात एकही फुल काही आले नाही. असल्या रोपांना म्हणे कलम करताना वापरतात. तु सरळ तोडुन टाक...

शोभा,नितिन सुरेख फोटोज!!
जिप्सी.. सुंदर कोलाज... Happy
दिनेश दा ची हत्तींबद्दल ची माहिती पण सुपर्ब!!

आज लेकीनं मला ही मस्त माहिती दिली. तिला शाळेत एका मैत्रिणीकडून कळली. आम्ही मग गुगलवर शोधलं आणि ही खालील लिंक मिळाली :

http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm

कित्ती मस्त कल्पना आहे ना? किंबहुना अशा ३-डी कार्ड / कलाकृती बनवण्यास शिकवणारं पुस्तकही मी काही दिवसांपूर्वीच मॅजेस्टीक मधून घेतलं होतं. श्री माधव खरे लिखित How to Make Paper Pop-ups.

अशा कलाकृती बनवून त्यात थोडी माती पसरून मेथी-दाणे लावायचे. सुंदरशी भेट आणि मेथीची भाजी करून खाता येईल. Happy

मामी छान लिंक आहे.

अमी, साधना आपण जी बाजारातून कलमे आणतो कधी कधी ते कलम जगत नाही पण ज्या मुळ झाडावर कलम केलेले असते त्याला कोंब आला असेल तर ते मात्र जगते. पण माझ्याकडे असे बर्‍याचदा झाल आहे. पण त्या गुलाबाचा काहीच उपयोग नसतो. त्याला फुले येतच नाहीत.

जिप्स्या मस्त रे कोलाज.

जागु तुझे बरोबर आहे. मी गुलाब घेताला फुल बघुन घेतलेले पण ते घरामागे जमिनीत लावल्याने त्याच्याकडे रोजच्या रोज बघत नव्हते. त्याच्या वरचे कलम मरुन गेले असणार आणि मुळ गुलाब फोफावला असणार.

ह्या गुलाबावरुन आठवले. नेरुळला मी कॉलनीच्या ज्या भागात राहात होते त्याच्या बाजुने हाय टेंशन इलेक्ट्रिक वायर्स गेल्यामुळे ती एक बिल्डींग फक्त तळमजल्याचीच होती, आणि तित फक्त चारच बि-हाडे होती, ज्यातली दोन दारे कायमची कुलुपबंद असत. आमच्या शेजारी मुसलमान होते. त्यांच्या नी आमच्या बागेत उंच भिंतीचे कुंपण होते. त्यांची मुले ऐशुच्याच वयाची होती आणि त्यांच्यामुळे ऐशुचे हिंदी भाषाज्ञान संवर्धनही चालु होते. एकदा बकरी इदसाठी त्यांनी बकरे आणलेले. त्यांचे ते बकरे मधल्या भिंतीवर पाय ठेऊन उभे राहात आणि माझी अस्ताव्यस्त वाढलेली गुलाबीण खात. एकदा ऐशुने ते पाहिले आणि लगेच शेजायच्या यासिनला बोलावुन आणले आणि तिच्या हिंदीत समजावले - तुमारा बकरा हमारा झाड खाता है, तुम उसका चिकन करके उसको खा जाव....

जिप्सी मस्तच रे. तुझा मुंगळा आवडला.>>>>> साधना मुंगळा कुठे आहे ? तू गांधील माशीविषयी बोलतीयेस का जी हलव्याचा दाणा खाण्यात गुंग झालीये ??? (त्या गरुडाच्या प्र चि च्या डोक्यावर)

बाकी ऐशूचे हिंदीतील संवाद भारीच......

दिनेशदांच्या हत्तीवरील माहिती वाचताना आठवलं - मागे बहुतेक श्री. निनाद बेडेकरांनी फक्त हत्तीविषयी लिहिलेलं एक सदर दर आठवड्याला सकाळ वृत्तपत्रात येत होतं - खूप माहितीपूर्ण व हत्तीविषयीच्या गमतीजमती सांगणारं असं -
त्यातील एक गोष्ट - एक माहूत त्याच्या रांगणार्‍या बाळाला हत्तीच्या हवाली करुन काही कामाकरता काही तास बाहेर जातो - तो हत्ती उत्तम प्रकारे बेबीसिटिंग करतो त्या बाळाचे - एका ठराविक अंतरापर्यंत ते बाळ रांगायला त्या हत्तीची परवानगी होती - त्या अंतरापुढे ते बाळ गेलं की अलगद सोंडेने उचलून तो हत्ती परत त्याला आपल्या पायांमधे आणून ठेवायचा - असे दोन तीन तास तो हत्ती त्या बाळाला सांभाळताना कोणी लेखकाने केलेले बहारदार वर्णन - बेडेकरांनी उद्धृत केले होते - अशी मस्त माहिती असलेले ते सदर दर आठवड्याला वाचताना भान हरपून जायचे........

१९८८ -९० च्या काळात मी माझ्या लहान मुलीला घेऊन पेशवेबागेत प्राणी दाखवायला जात असू तेव्हा हत्तीचे निरीक्षण करण्यात तासच्या तास जात - पार्ले ग्लुकोजचे एक बिस्किट किती लांबून आम्ही त्याच्याकडे फेकायचो - त्याच्या पायात असलेल्या गवतातून काही सेकंदात तो हत्ती ते बिस्किट शोधून गट्टम करत असे - केवढेसे ते बिस्किट व केवढा तो हत्ती - पण अक्षरशः त्या गवताच्या गंजीतून तो जेव्हा ते सोंडेने शोधून काढायचा तेव्हा फार म्हणजे फार मजा वाटायची व किती उपासमार करत असतील त्याची असेही वाटायचे.......

सर्वांनी टाकलेले फोटो व माहिती मस्त आहे........

माझ्या पुतण्याला लहानपणी, ह्याला काय म्हणायचं ? असे विचारायची सवय होती. मी आणि तो सोबत जात असताना, समोरून हत्ती आला, अर्थात त्याने ह्याला काय म्हणायचं ? विचारलं. थोड्या वेळाने परत तेच विचारलं. तर मी म्हणालो, सांगितलं ना हत्ती म्हणून, तर तो म्हणाला अजून संपला कसा नाही. त्याच्यामते रस्ता, पूल, जिना वगैरे चालताना जितका वेळ लागतो, तेवढे ते मोठे ! त्यामूळे त्याने इतके चालूनही एक हत्ती संपत नाही, म्हणजे काय ?

============

तूमच्या घरात गणित शिकणारी / आवडणारी मूले असतील तर यू ट्यूबवर BBC The Story of Maths हि चार
भागातली मालिका अवश्य दाखवा. निसर्ग आणि गणित याची अनोखी सांगड घातली आहे, त्यात.

<<<<जिप्सी मस्तच रे. तुझा मुंगळा आवडला.>>>>
<<<<<साधना मुंगळा कुठे आहे ? तू गांधील माशीविषयी बोलतीयेस का जी हलव्याचा दाणा खाण्यात गुंग झालीये ??? (त्या गरुडाच्या प्र चि च्या डोक्यावर)>>>>
ओहो, शशांकजी, साधना त्या माशीविषयी बोलतेय का, मला वाटले, जिप्सीने मुंगळ्यावर एखादि कविता केलेय व त्यावर ही बोलतेय. Proud

ओह्ह ती गांधीलमाशी आहे काय?? मला वाटले जिप्स्याच्या कॅमे-यातुन मुंगळा एवढा मोठा दिसतोय.. >>>> या माश्या एखादा घन पदार्थ कसा खातात हे कळत नव्हते - मागे एकदा कँटीनमधे जेवताना बघितले एक साधी माशी एका साखरेच्या कणाशी झटताना - मी शांत बसून बघत होतो - त्या माशीने तिच्या तोंडातून काही द्रव बाहेर टाकला ज्यामुळे तो साखरेचा कण काही क्षणातच विरघळून द्रवरुप झाला - माशीने तिच्या तोंडातील स्ट्रॉ सदृश भागाने ती द्रवरुप साखर ओढून घेतली - ज्या ठिकाणी साखरेचा कण होता तिथे आता त्याचे नामोनिशाण उरले नव्हते....... सगळे साफसूफ....

साधी मुंगी, गांधील माशी चावल्यास एक साधा उपाय आहे - ओलसर माती घेऊन जिथे ती माशी चावली आहे तिथे थापायची - अक्षरशः अर्ध्या - एक मिनिटात वेदना कमी होऊ लागतात - आपल्या त्वचेवर जे रसायन त्या मुंगी/माशी कडून टोचले गेले आहे ते ही ओली मातीअ‍ॅड्सॉर्ब करते व आपल्याला रिलिफ मिळतो - ती माती चांगली ४-५ मिनिटे ठेवल्यावर पूर्ण वेदना थांबतात - मात्र मधमाशीचा डंख असल्यास तेथील काटा काढून टाकल्याशिवाय रिलिफ मिळत नाही.... कोरडी माती असेल तर हातावर घेऊन आपल्याच थुंकीने ओली करुन लावणे... (लाज /किळस वगैरे सोडून....) नंतर जेव्हा पाणी मिळेल तेव्हा धूउन टाकता येते सगळे - पण सर्वप्रथम ते वेदनादायी रसायन शरीराबाहेर काढणे अतिशय आवश्यक आहे हे मुख्यत्वाने लक्षात घेणे..... (मी स्वतः एकदा विंचू दंशावर हा उपाय केला होता - यशस्वीरित्या.... बाकी मंडळींना डॉ. कडेच जायला सांगेन.....)

एखादा अ‍ॅलर्जिक डंख वा सुरवंट अंगावर चिरडला गेल्यास सरळ डॉ. कडे जाऊन अँटी अ‍ॅलर्जिक इंजेक्शन घेणे चांगले... या अ‍ॅलर्जीने शरीरावर रॅशेस (गांधी) येतात (एखादी गांधी आली तर घाबरुन न जाणे - शरीरभर गांधी आल्या तर डॉ. कडे जाणे ) - कारण या जशा शरीरावर येतात तश्याच श्वास नलिकेत येऊन आपला श्वास घुसमटण्याची शक्यता खूप असते म्हणून डॉ. कडे जाणे चांगले...

पण साधी मुंगी वा गांधीलमाशीकरता (यांच्या डंखाकरता) वर दिलेला उपाय सगळ्यात उत्तम.

निसर्ग गप्पा ९ च्या पावसाळी शुभेछा.

महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद.>>> छानच.

माझ्या घरासमोर आन्ब्याच्या झाडावर बुलबुल पक्षाने घरटे केले आहे. झाड अगदिच २०-२५ फूट आहे. आजुबाजुची झाडे जास्त वाढली असल्याने या झाडाला फक्त टोकाला ३०-४० पानान्चा झुपका आहे. त्यातच घरटे लपले आहे. बुलबुल ची जोडी मात्र कधीच सरळ घरट्यात जात नाही. आजुबजुच्या झाडान्वर, कुंपणावर टप्प्या टप्प्यान्वर बसुन मग एक जण घरट्यात जातो. पहारेकरी जोडीदार नेहमी पेक्षा वेगळा आवाज काढून राखण करत असतो. एकुणच हालचाली बघण्यासारख्या असतात.

अभिनंदन.

जागू, शशांक उतारे मस्तच.

दिनेशदा, मागच्या भागात मी जी बिबट्याबद्दल लिंक दिली तो लेख याच डॉ. विनया जंगले यांनी लिहीला आहे.

शशांक हा उपाय माहीत नव्हता.
जागू, मस्त फूल.

मोनाली, ती उरणमधे बिबट्या आला ही बातमी आठवतेय. (त्यावरुन जागूची मस्करी पण केली होती )
पण त्या बातमीत, डॉ विनया, जखमी झाल्या याचा उल्लेख नव्हता बहुतेक ! काय धाडसी आहेत त्या !
काल गुलबक्षीच्या बिया गोळा केल्या, बघूया आणता येतात का.

मी अमि -

गुलाबावर कलम करणे शक्य असते का? म्हणजे माझ्या सारख्या नवशिक्या व्यक्तिसाठी शक्य आहे का? स्मित >>>>>

तुमच्या आसपास चांगले माळीकाम जाणणार कोणी असल्यास त्या व्यक्तिकडून शिकून घ्या - नुसते पुस्तक वाचून वा माहितीवरुन ते शक्य होत नाही - एखाद्या रोपवाटिकेत (नर्सरीत) जाऊन तेथील माळ्याकडून प्रात्यक्षिकासह शिकून घ्या - तसे सोपे असते हे कलम प्रकरण .....

Pages