निसर्गाच्या गप्पा (भाग ९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 June, 2012 - 14:36

निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.

सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.

महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्‍यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.

एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.

(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

अनुक्रमणीका:
पान १ -

प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.

माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...

माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती

पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय

पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख

पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...

पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.

पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new

पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new

पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड

पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा

पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325

पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल

माहीती : बिब्बा

लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html

पान १३

प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित

पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल

पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm

पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन

पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001

पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,

पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता

पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/

पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134

पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090

पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I

पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512

पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,

पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,

पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्‍या-गिधाडे, वारी

पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक

पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/

पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/

पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली

पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली

पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\

पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय मधुमकरंद ते पांढरे कांचन आहे.

शशांक माझी आजी पण आधी काही फोडी वगैरे आली तरी तुळशीतली लाल माती फोडीवर लावायची.

काल बाजारात फिरत असताना पाहिले, एका माणसाने हत्तीला पार्लेजीचा पुडा वरच्या प्लॅस्टीक कव्हर सकट दिला Angry बिचार्‍या हत्तीने लगेच तो खाल्ला पण Sad

त्याला प्राणी मित्र म्हणावे का शत्रु काही सुचेना Sad

काल बाजारात फिरत असताना पाहिले, एका माणसाने हत्तीला पार्लेजीचा पुडा वरच्या प्लॅस्टीक कव्हर सकट दिला राग बिचार्‍या हत्तीने लगेच तो खाल्ला पण अरेरे >>>>> ही अतिउत्साही व विचित्र माणसे काहीही करु शकतात - पण त्या हत्तीच्या माहूताच्या तरी लक्षात यायला पाहिजे होते हे........ बिचारा हत्ती.....

हर्‍या भर्‍या वसुंधरेवर, निळे निळे गगन,
ढगांची पालखी आभाळात, उडवतो पवन!
इथल्या नाजूक नाजूक फुलांचा संसार,
त्यांचा कोण आहे किमयागार?

तरी लक्षात यायला पाहिजे होते हे....>>> माहुत पुढे येईपर्यंत हत्तीने ते गिळले पण.

असो, त्या आधीच हत्तीने खाल्लेले मोसंब रेचकाचे काम करेल अशी आशा बाळगायची दुसरे काय.

छान सुरवात नवव्या भागाची.
उतार्‍यामुळे आणि जिप्सीच्या कोलाजमूळे अजूनच सजले आहे हे पान.
सर्वांचे फोटो छान, नेहमीप्रमाणे दिनेशदांनी दिलेली माहिती मस्त.
शशांक, माझी आजी आम्हाला सांगायची हा उपाय, ईट रियली वर्क्स.
नितीन, माझ्या ईथे बागेत ताम्हणाची रोपे उतरली आहेत, हवी असल्यास मी ठेवू शकेल काढून.
मोनाली Sad

काल बाजारात फिरत असताना पाहिले, एका माणसाने हत्तीला पार्लेजीचा पुडा वरच्या प्लॅस्टीक कव्हर सकट दिला राग बिचार्‍या हत्तीने लगेच तो खाल्ला पण >>>> वर्तमानपत्रात मागे एक बातमी वाचली होती - एका गायीच्या पोटातून क्ष किलो प्लॅस्टिक वगैरे ऑपरेशन करुन काढले..... अजून एक बातमी - कुठल्यातरी समुद्रकिनारी अचानक मेलेली कासवे सापडली - प्लॅस्टिक तोंडात/ पोटात अडकून राहिले होते बिचार्‍यां‍च्या --- हे प्लॅस्टिक कुठे आणि कसा त्रास देणारे आपल्याला कळतच नाही............

हॅपी फिट हा अ‍ॅनिमेशन पट आठवतोय, त्यातल्या एका पात्राच्या गळ्यात बियर च्या कॅन्सची प्लॅस्टीकची रिंग
अडकलेली असते. बिचारा तीच मिरवत असतो.

समुद्रातली मासे पकडायची जाळी, कधी कधी मासे तोडतात किंवा इतर बोटींच्या चाकात अडकून ती तूटतात. त्याचे तूकडे समुद्राच्या मध्य भागात पसरलेले असतात. कासवांची मान त्यात अडकते. कासवाची शरीररचना बघता, त्याचे पुढचे पाय मानेपर्यंत पोहोचूच शकत नाहीत, शिवाय जाळ्यात अडकल्याने तो मान कवचात ओढू पण शकत नाही. मग उपासमारीने, आणि थकल्याने तो मरतो.

हत्ती प्लॅस्टीक नाही पचवू शकणार तरी पण त्याची पचनशक्ती अफाट असते. कवठासारखे फळ तो अख्खेच गिळतो. चिंचा आणि चिंचेचे पाणी त्याला अतिप्रिय. बाभळीच्या शेंगा जसी त्याला खुप आवडत असल्या तरी
माकडाप्रमाणे तो त्या पूर्ण चावत नाही. त्याच्या विष्ठेतून पडलेल्या बाभळीच्या बिया, जास्त सहजपणे
रुजतात.

पूर्व आफ्रिकेत या बाभळी आणि गवत यात स्पर्धा असते. बाभूळ वाढेल तिथे गवत नसते आणि गवत असते तिथे बाभूळ नसते. तरीपण हे सर्व क्षेत्र काही काळ गवताळ तर काही काळ बाभळीखाली असते, आणि ही माळीगिरी हत्ती करतो. त्याच्या डोक्यात कधी कधी काहीतरी येते, मग तो सगळी बाभळीची झाडे पाडून टाकतो. तिच्या बिया लांबवरच्या गवताळ प्रदेशात नेऊन टाकतो. त्याच्या विष्ठेत बाभळीच्या बिया सहज रुजतात, आणि त्या गवताळ प्रदेशात बाभळीचे वन माजते. एरवी गवत अशी, बाभूळ रुजायला मोकळी जमिन ठेवतच नाही.

हत्ती प्लॅस्टीक नाही पचवू शकणार तरी पण त्याची पचनशक्ती अफाट असते. कवठासारखे फळ तो अख्खेच गिळतो. चिंचा आणि चिंचेचे पाणी त्याला अतिप्रिय. बाभळीच्या शेंगा जसी त्याला खुप आवडत असल्या तरी माकडाप्रमाणे तो त्या पूर्ण चावत नाही. त्याच्या विष्ठेतून पडलेल्या बाभळीच्या बिया, जास्त सहजपणे रुजतात.>>>>.. बर्‍याच झाडांच्या बिया कुठल्या ना कुठल्या प्राणी -पक्ष्याच्या विष्ठेतून पडल्या तरच उगवतात - याची दोन कारणे शास्त्रज्ञांना मिळाली - १] या प्राण्या-पक्ष्यांच्या पोटात काही विशिष्ठ एन्झाईम्स असतात ज्यामुळे त्या बियांवरचे आवरण निघून जाऊन त्या रुजण्यालायक होतात तर कधी कधी २] या बियांचे पोटात इन्क्युबेशन (विशिष्ट तापमान) गरजेचे असते रुजण्यासाठी.......
काही ठिकाणी हे विशिष्ठ प्राणी नष्ट झाल्याने या विशिष्ठ झाडांचे पुनरुत्पादनच खुंटले.......

निसर्गात कुठे कुठे काय चालू असेल हे शोधण्यात जन्मच्या जन्म जातील, पण निसर्गाच्या सगळ्या किमया समजल्या असे होणार नाही ......

मला वाटलं, उजुचे स्वतःचे काव्य आहे !

=======

नैरोबीला आल्यावर २ महिन्यातच मला नैरोबी फ्लाय नावाची माशी चावली होती. खरं तर ती चावत नाहीच पण तिचा नुसता स्पर्शदेखील घातक ठरतो. लाल काळ्या रंगाची आणि बासमतीच्या दाण्याएवढ्या आकाराची
असते ती. अंगावर बसली (आणि ती साधारण गाल, मान, खांदा इथेच बसते ) कि आपण झटाकायचा प्रयत्न करतो. बस तेवढे पुरेसे असते. तिचा स्पर्श जिथे झाला असेल त्याच्या आजूबाजूचा भाग लाल होतो, आग होते.
पाण्या / साबणाने धुतले तरी काही फरक पडत नाही.
त्यावर लावायला इथे एक मलम मिळते त्याने थोडा आराम पडतो, पण ७/८ दिवस त्रास होतोच.

बिचारा हत्ती ! Uhoh
जागू, किती तलम पाकळ्या आहेत त्या पांढर्‍या कांचनच्या !
दिनेशदा, मला गुलबक्षीच्या बिया पाहिजेत.

नैरोबीला आल्यावर २ महिन्यातच मला नैरोबी फ्लाय नावाची माशी चावली होती. खरं तर ती चावत नाहीच पण तिचा नुसता स्पर्शदेखील घातक ठरतो. >>> दिनेशदा - हा आपला भारतीय उपाय (माती लावणे) याला उपयोगी पडतो का तपासला पाहिजे - कोणावर तरी करुन..... मात्र ही माती लगेच लावावी लागते - मधे वेळ निघून गेला की त्या रसायनाचा प्रभाव चालू होतो व मातीचा उपयोग कमी... असे व्हायला नको.....

दिनेशदा,हे माझे स्वरचित काव्य नसून मागे मी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सवर प्र. के. घाणेकरांचा एक लेख वाचला होता. त्यातील ह्या ओळी मनात घर करून बसल्या होत्या त्याच ईथे दिल्या, देतानाच कवीचे नाव द्यायला हवे होते, पण कोर्टात पळायचे होते व नेमक्या ओळी कुठल्या आहेत ते आठवत नव्हत म्हणून घाणेकरांचे नाव दिले नव्हते. आज उन्हाळी सुट्टी संपून कामाचा पहिलाच दिवस असल्यामूळे कोर्टात सगळ्याच मॅटर्सला तारखा पडल्या व आयताच हाफ डे मिळाला , त्यामूळे लेक खूष!
<<<<<निसर्गात कुठे कुठे काय चालू असेल हे शोधण्यात जन्मच्या जन्म जातील, पण निसर्गाच्या सगळ्या किमया समजल्या असे होणार नाही ......>>>>> अगदी अगदी.

हल्ली सोनमोहोर व बहावा सोडले तर अजुन एक पिवळ्या झाडांचे झुडुप दिसत आहे. तो फुलांचा गुच्छ बहाव्यासारखा उलटा लटकत नसुन खाली फुले व वरच्या दिशेने मध्यभागी बंद कळी दिसते ठाण्याकडे येण्यासाठी कळवा स्टेशन सोडले की जराशा अंतरावर एकाच ठिकाणी हे भरपुर झुडुप आहेत. कोणी नाव सांगु शकेल का?

मोनालीप -निसर्गाच्या गप्पा (भाग - ८) वर पान क्र. २८ वर आपण विचारलेल्या फुलाचे (कँडल बुश) प्रचि.

ह्या झाडांपाशी पोहोचन हे एक दिव्यच होत, ही सुंदर फुल कचर्‍याच्या /मातीच्या ढिगार्‍यात होती प्रचि काढे पुरती दमछाक झाली, रस्त्याने जाणारी लोक थांबुन मी नक्की काय करतोय हे पहात होती आणि याला वेड लागलय या नजरेनेच पहात होती. Happy त्या बिचार्‍यांना काय माहीती नि.ग. ची मजा Wink

नितीन. धन्यवाद. तुम्ही त्या कळव्याच्या ट्रॅकच्या इथल्या जागेवर जाउन फोटो काढला काय? का दुसरीकडे कुठे सापडले हे झाड? त्या वेबसाईटवर मिळाल्येल्या प्रचीपेक्षा हे प्रची खुपच नीट्स आलेत. Happy

मोनालीप ते प्रचि विरारला काढलेत. Happy
उजु धन्यवाद , सध्या दिनेशदांनी सांगितल्या प्रमाणे ताम्हणाच्या बिया गोळा केल्या आहेत त्यांना रुजवण्याचा प्रयत्न करतो. Happy

श्री. निनाद बेडेकरांनी फक्त हत्तीविषयी लिहिलेलं एक सदर दर आठवड्याला सकाळ वृत्तपत्रात येत होतं तो हत्ती उत्तम प्रकारे बेबीसिटिंग करतो शशांकजी - अगदी त्यावर एक त्याच पुस्तकही प्रकाशित झालय गजकथा माझ्या संग्रही आहे Happy
माती पसरून मेथी-दाणे लावायचे. सुंदरशी भेट आणि मेथीची भाजी करून खाता येईल. मामी - कल्पणा खरच खुप सुंदर आहे. Happy

तुमारा बकरा हमारा झाड खाता है, तुम उसका चिकन करके उसको खा जाव.... - साधनातै Lol
हत्ती अजून संपला कसा नाही - दा Lol

जिप्स्या - सुंदर कोलाज Happy लगे रहो....

जागू ते कुमुद अप्रतिमच आहे. त्याचेच झाड नाही दिले म्हणजे हळहळायला होणारच. खूप पूर्वी वाचले होते - कमळाचे दोन प्रकार असतात - कमलिनी आणि कुमुदिनी. बहुदा पहिले सूर्यविकासी असते तर दुसरे चंद्रविकासी. पण दोन्ही कमळेच. पण जागूच्या फोटोमधल्या पाटीत कुमुद म्हणजे कमळ नाही असे म्हटले आहे. Uhoh

पेट्रीया सुंदरच आहे.

जिप्स्या तुझा कोलाज मस्तच (नवल काय म्हणा त्यात Happy )

शशांक, विनोबांचा उतारा मस्तच. गीता प्रवचने = गीताई ? हत्तीच्या बेबी-सिटींगचा किस्सा पण आवडला. बेडेकरांचे ते लिखाण पुस्तकबद्ध झाले आहे का? असल्यास नाव देणार का इथे.

बेडेकरांचे ते लिखाण पुस्तकबद्ध झाले आहे का ? माधव - त्या पुस्तकाचे नाव आहे गजकथा.

सगुणा बागेत अगदी हुबेहुब दिसणारा पायर वृक्ष आढळला. जर ती पाटी नसती तर माझी कदाचीत हा पिंपळ नाही म्हणून खात्रीच पटली नसती. पण नंतर निरखून पाहील्यावर थोडा पानांमधील फरक लक्षात आला तो म्हणजे पानांच्या कडांमध्ये.

Pages