शैव मत

Submitted by अंबरीष फडणवीस on 22 May, 2012 - 06:03

शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.

इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.

नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.

आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.

शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..

मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना

श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.

या पंथाच्या तीन मुख्य शाखा..

१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.

१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.

शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.

शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.

प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.

पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.

२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.

३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).

अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग

I. मंत्रमार्ग

मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार

अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.

कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.

या मताचा गोषवारा असा.

१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.

काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..

काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).

ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.

मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.

मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.

असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.

कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.

कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.

अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.

II. अतिमार्ग

अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.

हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.

पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.

कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.

बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.

उपसंहार

गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.

एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.

http://agphadnavis.blogspot.com/2012/05/blog-post_19.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पण खरंच १९व्या शतकात जी भाषांतरे झालीत ती योग्य भाषांतरे आहेत का? साध्या साध्या शब्दांचे उदाहरण घ्या. धर्म, मूर्ती, अर्थ, देव, आर्य, (इतर बरेच आहेत) यांचे पॉप्युलर इंग्रजी प्रतिशब्द योग्य आहेत का?>>

तुम्हाला अजूनही असं वाटतं का अम्बरीष की त्या भाषांतरांवर अवलंबूनच पुढच्या देशी-विदेशी विद्वानांनी काम केलंय? त्यांना स्वतःला संस्कृत येत नव्हतं आणि मूळ ग्रंथ कधी पाहिले नाहीत म्हणून? खोंदा सारख्या विद्वानांनी अगदी एकेका शब्दावर/ संकल्पनेवर पुस्तकं-आर्टिकल्स लिहिलीत... तुमच्यापर्यंत फक्त १९व्या शतकातली भाषांतरं पोचलीत म्हणजे तेवढंच काम झालंय असं नाहीये.
खोंदा, मॅक्डोनेल, ब्लूमफील्ड, कीथ, दांडेकर, काशीकर, थिटे, विट्झेल, बहुलकर, भट्टाचार्य, पारपोला, पॅटन... आणखीही अनेक.... असंख्य लोकं आहेत विसाव्या शतकातल्या वैदिक विद्वानांच्या प्रभावळीत. तरीही यात नव्या उभरत्या पिढीची नावं घेत नाहीये मी. असो.

रुद्राचा शब्दशः अर्थ रडवणारा असाच आहे.. निसर्गातील ज्या रौद्र शक्ती आहेत, अशा प्राणघातक शक्तीना उद्देशून तोशब्द होता. आजही रौद्र शब्द आपण याच गोष्टींचे विषेषण म्हणून वापरतो. रौद्र वादळ, रौद्र महापूर वगैरे. रुद्र हा रोगांचाही देव मानला जात होता. त्याच्यामुळे माणसाना विषेषतः मुलाना धोका व्हायचा. म्हणून रुद्राच्या प्रभावातुन वाचण्यासाठी प्रार्थना आहेत.

ऋग्वेद ७.४६

स हि क्षयेण क्षम्यस्य जन्मनः साम्राज्येन दिव्यस्य चेतति ।
अवन्नवन्तीरुप नो दुरश्चरानमीवो रुद्र जासु नो भव ॥२॥

स्वर्गपृथ्वीतील लोकाना ऐश्वर्य देणार्‍या रुद्रा आमच्या रोगव्याधी नष्ट कर.

या ते दिद्युदवसृष्टा दिवस्परि क्ष्मया चरति परि सा वृणक्तु नः ।
सहस्रं ते स्वपिवात भेषजा मा नस्तोकेषु तनयेषु रीरिषः ॥३॥

तुझे आकाशातून उद्भवणारे विद्द्युल्लता शश्त्र आमच्या मुलाबाळांवर पाडू नकोस. तुझ्या हजारो औषधी आम्हाला प्रदान कर.

रौद्र शक्तींवर असलेले नियंत्रण हा रुद्र आणि शिव यातला समान धागा.. औषधांवर नियंत्रण हेही दोघांमधले साम्य. शंकराचेही एक नाव वैद्यनाथ आहे. असे समान धागे सापडल्याने शिवगणसमूह वैदिकानी आपलासा केल्यानंतरच्या काळात रुद्र आणि शिव या दोन्ही देवता एकच मानल्या जाऊ लागल्या.. त्रिंबक हाही शब्द पूर्वी अग्नीला उद्देशून वापरला आहे.. ( त्र्यंबक म्हणजे तीन पिता असलेला. अंबा म्हणजे माता, अंबक म्हणजे पिता.. अग्नी साकार होण्यासाठी लाकुड-हवा- ठिणगी म्हणजे पृथ्वी-वायू-तेज अशा तीन महाभूतांची गरज असते. म्हणून अग्नीला त्र्यंबक म्हटले जात होते. असे कुठेतरी वाचले आहे. पण अंबक या शब्दाचा आज प्रचलित अर्थ डोळा असाच सापडतो. अंबक या शब्दाचा पिता असा अर्थ अन्य कुठे मिळाला नाही. हे नेमके कुठल्या पुस्तकात वाचले तेही आता आठवत नाही. कुणाला कुठल्या पुस्तकात त्र्यंबक शब्दाचा अर्थ अग्नी असा सापडल्यास शोधून पहा. ) नंतर हाच शब्द त्रिनेत्र या अर्थाने शिवाला चिकटला , आज हाच अर्थ प्रचलीत आहे.

सर्वश्री अंबरिष आणि जिल्लेइलाही....

तुम्हा दोघांचेही विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. माझ्या प्रतिसादात मी सुरुवातीलाच कबूल केले आहे की मी 'रुद्र' अर्थाविषयी मांडलेले मत हे एका अभ्यासकाचे नसून सामान्य वाचकाचे आहे. त्यामुळे त्याबद्दल मी तुमच्या खुलाशाला, जो दोघानीही सप्रमाण इथे दिला आहेच, स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.

जिल्लेइलाही यानी 'त्र्यंबक' चा उल्लेख केला आहे. ते एक रुद्राचेच विशेषण असून तीन माता या अर्थाने (विश्वाची तीन भागात विभागणी झाली असल्याने....आकाश, पृथ्वी, पाताळ) सुचविणारे ते नाम आहे.

मलाही अंबकचा अर्थ 'डोळा' असाच सापडला होता, मात्र अग्नीला त्र्यंबक म्हटल्याचे माझ्या वाचनात कुठे न आल्याने वा त्या दृष्टीने मी कधी शोध घेतलाही नसल्याने आता या क्षणी तुम्ही (तसेच अंबरिषही) तसे म्हणत असाल तर नक्कीच त्याला काही आधार असणार.

अशोक पाटील

वरदाजी - खोंदा, मॅक्डोनेल, ब्लूमफील्ड, कीथ, दांडेकर, काशीकर, थिटे, विट्झेल, बहुलकर, भट्टाचार्य, पारपोला, पॅटन... आणखीही अनेक.... असंख्य लोकं आहेत विसाव्या शतकातल्या वैदिक विद्वानांच्या प्रभावळीत. तरीही यात नव्या उभरत्या पिढीची नावं घेत नाहीये मी. असो.

धन्यवाद वरदाजी, हि मंडळी आणि यांचे पेपर्स आणि काही पुस्तके (विशेषतः विट्झेल) यांचे वाचले आहेत. याच बरोबर तलेगिरी काझानास, दानिनो आणि इतर हि वाचले आहेत. श्रीकांत तलेगिरी आणि विट्झेल यांच्यातील वाद तर प्रसिद्ध आहे आणि इंटरनेट वर उपलब्ध आहेत. तलेगीरींचे बरेच साहित्य देखील वाचून आहे.

१९४० च्या आधीचे साहित्य आणि भाषांतर हे फारच जास्त वांशिक भेदाने इम्प्रेस्ड वाटते. बी.बी लाल आणि इतर पुरातत्वखात्याच्या उत्खननानंतर गोष्टी हळूहळू बदलू लागल्या. आता नवीन जेनेटिक शोधांमुळे देखील खूप नवीन माहिती येऊ लागली आहे. आर्य बाहेरून आले, त्यांनी आक्रमण केले इत्यादी गृहीतके जी पूर्वी अंतिम सत्य मानली जायची आणि अजून हि मुलांना शाळेत शिकवली जातात, ती आता अंतिम सत्य राहिली नाहीत, केवळ एक गृहीतक राहिली आहेत जी फार झपाट्याने पाठबळ गमावत आहेत.

या थियरी ने भारताचे अतीव नुकसान केले आहे. याला कारण हि १९व्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या उत्तरार्धात बरेच संशोधकीय ग्रंथ राजकीय आणि सांप्रदायिक भावनेतून लिहिल्या गेली आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर तामिळनाडू मध्ये जी.यु.पोप यांनी केलेले अनेक भाषांतरे आणि त्यावरून पूर्णलिंगम पिल्लई वगैरे मंडळींनी लिहिलेली वांशिक विद्वेष चेतवणारी पुस्तके यांचे पर्यावसान एल.टी.टी.ई सारख्या आणि द्रमुक सारख्या संघटना आणि पक्ष यांच्यात झाली. अश्या कल्पनांना त्याच थरावर देखील उत्तर देणे आवश्यक आहे.

जुन्या स्कूल च्या काही संशोधकांना तलेगिरी वगैरे मंडळी अस्पृश्य वाटतात. आपले या बद्दल काय मत आहे हे माहिती नाही. पण विट्झेल चे प्रशंसक (वास्तविक हा शब्द अध्यापनक्षेत्रात वापरणे चूक आहे, पण दुसरा योग्य शब्द सुचत नाहीये) असलेले लोक तलेगिरी बद्दल भरपूर अद्दातद्दा बोलतात (आणि बरेचदा उलटेही होते).

त्र्यंबक म्हणजे तीन डोळे हे मी देखील वाचले आहे. अंबा म्हणजे आई..

अंब याचे खालील प्रमाणे अर्थ शब्दकोशात दिलेले आहेत.

meanings of "amba" [1]

m.{a-stem}

1.a father;

2.sound;

3.one who sounds

#05926

meanings of "amba" [2]

n.{a-stem}

1.the eye;

2.water

इथे धातूचा नामरूपात अर्थ "डोळा" असाच आहे.

इतर बरीच विशेषणे रुद्रास तैत्तिरीय संहितेत दिली आहेत. वर दिल्याप्रमाणे नीलग्रीव, शिव आणि इतर बरेच. If it looks like a duck, swims like a duck, and quacks like a duck, then it is a duck. रुद्रास शिव जर स्वतः वेद म्हणत असेल, सर्व गुण जे आज आपण चिकटवतो त्यातले बरेचसे करीत असेल, तर वैदिक रुद्र आणि शंकर यात उगाच फरक का करावा?

अर्थात शंकर हे रुपक आहे (विष्णूसारखेच).. काळासोबत त्याला नवीन गुण लाभत गेले, आणि हि दोन (देवी तिसरी) काळासोबत सर्वसमावेशक होत गेले. विष्णूही वैदिक साहित्यात फारसा उल्लेखित नाही. वेदातील त्रिविक्रमाची गोष्ट हि फक्त विष्णूची म्हणता येईल. बऱ्याच ठिकाणी विष्णूला देखील "आदित्य" म्हंटले नाही. इतर ठिकाणी म्हंटले आहे.

लोक हळूहळू family oriented देविदेवता पुजू लागली. आणि हळूहळू वेदातील देवता शिव आणि विष्णू यांचे पौराणिक रूप उत्क्रांत होऊ लागले. हि एक कंटिन्यूटी ची कडी आहे. हिला तोडता येत नाही.

अनेक पद्धती होत्या. शैवमताच्या अनेक अपौराणिक शाखांप्रमाणेच वैष्णव मताच्याची अनेक शाखा होत्या ज्या नष्टप्राय झाल्या गेल्या १००० वर्षात. वासुदेव या दैवातेची पूजा नामशेष झाली. नरसिंह जवळपास नामशेष झाला. वामन नामशेष झाला, त्रिविक्रम (वामनाचा मेमेटिक पूर्वज) देखील नामशेष झाला. खुद्द विष्णू फार कमी पुजल्या जातो. राम आणि कृष्ण सांप्रत काळातली पॉप्युलर दैवते. कृष्णातही राधाकृष्ण आणि बाळकृष्ण पुजल्या जातात. अनेक पंथ आहेत. वैष्णव मताच्या विविध प्रवाहावर वेगळ्या धाग्यात बोलू.

हे सगळे एका जिवंत समाजाचे लक्षण आहे. उगाच त्रागा करून अमुक लोक २००० वर्षांपूर्वी वासुदेवाची पूजा करायचे आणि आता पांडुरंगाची पूजा करतात, म्हणून पांडुरंगास विष्णू म्हणायचा अधिकार अमुक वर्गास नाही, असे जर कुणी म्हंटले तर हे लाहोरी लॉजिक आहे. हि पाकी मनोवृत्ती आहे.

असो. शैवमतावर चर्चा चालू देत...

माधवजी,

११ रुद्राचा उल्लेख श्रुतीत शतपथ ब्राह्मणात, बृहदारण्यक उपनिषदात आणि छांदोग्य उपनिषदात प्रामुख्याने येतो. ऋग्वेदात ७व्या मंडळात रुद्राला निसर्गाचा देव म्हंटले आहे.

बृहदारण्यक उपनिषदात १० रुद्र म्हणजे ५ प्राण (प्राण, अपान, उदान, समान, व्यान) आणि ५ उपप्राण (नाग, दत्त, क्रीकाल, कूर्म, धनंजय )आणि महारुद्र म्हणजे आत्मा अशी तात्विक माहिती दिलेली आहे. शतपथ ब्राह्मणात महारुद्र राजा असून इतर रुद्रगण त्याचे सहचर आहेत. हे ११ रुद्र म्हणजे जिवंत असल्याची निशाणी. आयुर्वेद देखील यावर आधारित आहे. सरतेशेवटी शंभू वैद्यनाथ आहेच.

हे वैदिक संदर्भ झाले.

स्मृतीत यांचे अनेक संदर्भ आहेत. रामायणात ३३ देवता (कोटी- प्रकार) सांगितल्या आहेत. त्यात १२ आदित्य, ११ रुद्र, ८ वसू आणि २ अश्विनी कुमार.

कितीही ओढाताण करा, वेदातला रुद्र हा वैदिकांचा देव आणि शिव हा अवैदिक देव हेच वास्तव आहे.. नंतरच्या काळात हे एकरुप झाले. शिव जर पहिल्यापासून वैदिकांचाच देव असता तर शंकराच्या, शिवाच्या, हनुमानाच्या देवळात ब्राह्मण पुजारी नसते का दिसले? पण या देवळातून मुख्यतः गुरव- ब्राह्मणेतरच अधिक असतात. कारण हे देव प्रामुख्याने अवैदिकांचेच होते.

केवळ शिवच नव्हे.. तर बहुतांशी अगदी ८० % कुलदैवते असतात. तीही प्रामुख्याने शंकर शक्ती यांच्याशीच जास्त करुन संबंधित असतात.. अशा देवळाम्मध्येही ब्राह्मणेतरच प्रामुख्याने पुजारी म्हणून असतात.. वैदिक देवाना इंद्र, वरुण, अग्नी, इ ना कुणीही कुलदैवत म्हणून भजत नाही..

आज सगळे हिंदुच आहे.. कुणीही कुठलाही देव भजावा, पुजावा.. त्यात दुमत नाही.. भक्ती असावी, पण इतिहास अबाधीतच ठेवला जावा.

भक्ती वेगळी, इतिहास वेगळा.... नो कन्फ्युजन.

If it looks like a duck, swims like a duck, and quacks like a duck, then it is a duck.

होय होय... बदकच... पण दोन बदके असू शकतात.. त्यांचे वेगळे, तुमचे वेगळे... तुम्ही त्यांच्या बदकावर मालकी सांगू नये.. Proud

कितीही ओढाताण करा, वेदातला रुद्र हा वैदिकांचा देव आणि शिव हा अवैदिक देव हेच वास्तव आहे.

पुरावा काय? जर तुम्ही म्हणता वेदकालीन लोक रुद्र या देवतेची पूजा करीत आणि तो रुद्र म्हणजे शंकर नाही, तर त्या वेळेसचे पुरावे द्या.. वेद सोडून इतर कुठले साहित्य तुम्हाला उपलब्ध आहे जे हे म्हणते कि शंकर रुद्र नाही ते? इतिहासाची ओढाताण कोण करतंय? सगळे तत्कालीन साहित्य म्हणते कि आधुनिक शंकर वैदिक रुद्रापासून इवोल्व झाला आहे. इतर अवैदिक असंख्य गोष्टी यात जुळत गेल्या. १९व्या शतकापर्यंत कुणीच असे का म्हणत नाहीत? जी.यु.पोप (१८३०-१९०८) च्या नंतर हे का वारंवार सांगायचा प्रयत्न होतोय?

जामोप्या,

>> वेदातला रुद्र हा वैदिकांचा देव आणि शिव हा अवैदिक देव हेच वास्तव आहे..

अवैदिक म्हणजे नक्की काय? वेद न मानणारे की वैदिक परंपरा न मानणारे?

आ.न.,
-गा.पै.

मला इथे फार खोलात जायला सध्या वेळ नाही. माझं मत थोडक्यात लिहिते -

१. विट्झेल आणि तलगेरी वादाच्या तपशीलात न जाता एवढंच म्हणते की विट्झेल गेली अनेक दशकं वैदिक साहित्याचं अध्ययन करतोय. त्याचं प्रशिक्षण त्यात आहे. तलगेरींना किती संस्कृत (वैदिक) येतं त्याबद्दल मला शंका आहे. आणि तलगेरींचं म्हणणं जर खरं असेल तर आख्खं वैदिक विद्वानांचं जग एका बाजूला आणि तलगेरी एका बाजूला हे शक्य नाही. (एवढी एकी कधीच कुठल्याच विद्वानांत नसते Proud ) दर दोन वर्षांनी जगात इंटरनॅशनल वैदिक कॉन्फरन्स होते. त्यात नाना विषय-वाद चर्चेत येतात. तिथेही जर तलगेरींना कधी कुणी पाठिंबा दिला नाहीये तर त्याचा अर्थ त्यांच्या अर्ग्युमेन्टमधे तेवढा दम नाही असं माझं मत आहे. यात जुन्या स्कूलचा वगैरे प्रश्न नाही. पण कुठलंही संशोधन जर खोडून काढायचं असेल तर मुळात त्या क्षेत्रातलं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण गरजेचं असतं. तिथे अनेको दशके फक्त आणि फक्त वेद आणि संस्कृत घेऊन जगणारी लोकं (अगदी विट्झेलच्या विरोधात असणारीही) त्याच्या मताला पाठिंबा देताहेत व ती मेथडॉलॉजी स्वीकारतात.

२. दानिनो वगैरेनी नक्की काय मूलभूत संशोधन केलंय? पुरातत्व किंवा संस्कृतमधे? शून्य. फक्त प्रकाशित साहित्यावरून अभ्यास करून आर्टिकल्स खरडण्याला संशोधन म्हणत नाहीत.

३. आर्यांच्या 'मातृभूमी' वरून धमासान युद्ध हा खरा कळीचा मुद्दा आहे. मुळातच आर्य इथले का बाहेरचे त्यावरून वेदांचं आपल्या सांस्कृतिक वारश्यातलं महत्व कमीजास्त होत नाही. ज्यांना राजकारण करायचंय ते कुठल्याना कुठल्या मुद्यावरून करणारच.
आर्यन इन्वेजनची थिअरी पुरातत्वशास्त्रासाठी अनेक दशके आधीच बाद ठरलीये. उगाचच त्यावरून मेल्या मढ्याला धोपटण्यात अर्थ नाही. अर्धभटक्या टोळ्यांचं स्थलांतर अशा चौकटीतून त्याकडे सहसा पाहिलं जातं (स्थलांतर म्हणजे आक्रमण नव्हे). बी बी लाल यांची सर्व अर्ग्युमेन्टस पुरातत्वात मान्य नाहीत हे ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांच्या नंतरही अनेक कामं झाली आहेत.
सिंधुसंस्कृतीचा वैदिक धर्माशी संबंध लावणारा एकही थेट पुरावा अजून हाताला लागलेला नाही. जे सिंधुसंस्कृतीत सध्या उत्खनन करतात, विश्लेषण करतात त्यांचं यावर एकमत आहे. यात कुठेही राजकारणाचा भाग नाही. जर असं निर्विवाद सिद्ध करता आलं तर आमच्यापेक्षा आनंदित आणखी कुणीच होणार नाही.

<<१९व्या शतकापर्यंत कुणीच असे का म्हणत नाहीत? जी.यु.पोप (१८३०-१९०८) च्या नंतर हे का वारंवार सांगायचा प्रयत्न होतोय?>> कारण विदेशी संशोधक येण्याआधी आपल्या समाजाने स्वतःच्या इतिहासाचा, वाङ्मयाचा, संस्कृतीचा, धर्माचा तटस्थ अभ्यास कधीच केला नव्हता. नाही का? वेदांचा अभ्यास हीही परकीयांचीच देणगी आहे महाशय!

असो. आणखी लिहिण्यासारखं आहे. पण वेळ मिळाला की स्वतंत्रपणे लिहेन.

>>> आर्यन इन्वेजनची थिअरी पुरातत्वशास्त्रासाठी अनेक दशके आधीच बाद ठरलीये.

या वाक्याचा नक्की अर्थ काय? भारतात आर्य हे इराण, उत्तर ध्रुव इ. बाहेरच्या प्रदेशातून आलेले नाहीत व ते इथलेच होते असा पुरातत्वशास्त्रज्ञांचा दावा आहे का?

ते आक्रमण नसून स्थलांतर असू शकतं/ असावं असा या वाक्याचा अर्थ आहे. मूळ पोस्टमधे लिहिलं आहेच.
आर्य नक्की कोण कुठले हे उत्तर फक्त पुरातत्वशास्त्र देऊ शकत नाहीये. कारण आर्य भाषा बोलणारे ते आर्य अशी त्यांची व्याख्या केली जाते. तेव्हा हे हिस्टॉरिकल लिन्ग्विस्टिक्स च्या कक्षेत जास्त येतं. शिवाय आपल्याला जोपर्यंत आर्य-वैदिक भाषा बोलणार्‍या लोकांचा ढळढळीत निर्विवाद पुरावा पुरातत्वात मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पुराव्याशी, संस्कृतीशी वैदिक आर्यांचा 'हेच ते' म्हणून संबंध लावता येत नाही.

असो, अवांतर प्रतिसाद. कारण वेद हा या बीबीचा विषय नव्हे.

या विषयावरची जुन्या हितगुजवरची चर्चा इथे आहे. माझा प्रतिसादही तिथे आहे. ११ वर्षांनंतरही माझ्या मतात फारसा फरक पडलेला नाही Happy

वरदा +१ विशेषतः विट्झेल बद्दल.

या वाक्याचा नक्की अर्थ काय? भारतात आर्य हे इराण, उत्तर ध्रुव इ. बाहेरच्या प्रदेशातून आलेले नाहीत व ते इथलेच होते असा पुरातत्वशास्त्रज्ञांचा दावा आहे का?

असा नाही. आर्यन इन्वेजन ऐवजी आर्यन मायग्रेशन.
सिंधुसंस्कृतीचा वैदिक धर्माशी संबंध लावणारा एकही थेट पुरावा अजून हाताला लागलेला नाही

हे सर्वांना मान्य होईल तो सुदिन.

>>सिंधुसंस्कृतीचा वैदिक धर्माशी संबंध लावणारा एकही थेट पुरावा अजून हाताला लागलेला नाही

>>हे सर्वांना मान्य होईल तो सुदिन.

याचा अर्थ ते नाहीच असा नाही. फक्त पुरावा हाती लागलेला नाही इतकंच Happy

प्रा. ढवळीकरांनी 'आर्य' शब्दाची चुकीची व्युत्पत्ती दाखवून दिली आहे. तो शब्द अलीकडच्या काळात प्रथम भाषेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात वापरला जाउ लागला. संस्कृतचा अभ्यास करणार्‍या माणसांच्या (यात मुख्यत्वे युरोपीय माणसे होती) असे लक्षात आले की संस्कृत आणि युरोपीय भाषा यात बरेच साम्य आहे. मग अशा साम्य असलेल्या भाषांच्या समुहाला त्यांनी आर्य भाषा (aryan languages) अशी संज्ञा दिली. इथपर्यंत ठीक होते.

पण मग असा सिद्धांत तयार झाला की या आर्य भाषा बोलणार्‍या लोकांचा एकच वंश होता आणि त्या वंशाला आर्य हे नाव दिले गेले. हे चूक होते. वेदांची भाषा संस्कृत असल्याने या आर्यांनी वेद लिहिले असाही सिद्धांत आला. मुळात आर्य असा वंशच अस्तित्वात नसताना त्यांना वेदाचे निर्माते समजणे चूकीचे आहे.

वास्तव हे आहे की वेदांची निर्मिती भारतात झाली. वेद न मानणारे (नास्तिक) अनेक समुह होतेच हे अंबरीशने सांख्यांच्या लेखातच लिहीले आहे. अशा वेदांना न मानणार्‍या लोकांचे साहित्य आज उपलब्ध आहे का आणि त्यात शिव या देवतेचे काय स्थान होते? अवैदिक अशी एकच संस्कृती नव्हती तर वेद न मानणार्‍या लोकांचे वेगवेगळे समुह होते. प्रत्येक समुहाचे आपले असे वेगळे तत्वज्ञान होते. तर त्यापैकी कुठल्या समुहात शिव ही देवता होती?

वरदा,

तुमच्या लेखाचा तुम्ही दिलेला दुवा वाचला. मला पुरातत्त्वातलं फारसं कळंत नाही. पण कुतूहल जरूर आहे.

१.
>> Whatever people might like to believe, we can not stretch the dates of compilation of
>> Rgveda before 1500 BC, let alone that of Yajurveda.

हे मत कशातून आलं?

२.
>> The fact remains that the existence of proto-IndoAryan/IndoEuropean languages is
>> noted from Iran to Turkey, of Hittites, Kassites and Mittanis.

या प्रोटोलँग्वेजमध्ये (अभिभाषेत) लिहिलेला एखादा शिलालेख वा पुस्तक वा कागदपत्र मिळालेले आहे काय? नसल्यास, अशी एखादी भाषा अस्तित्वात होती हे कशावरून ठरवलं?

३.
>> This is because according to the linguists, the term Arya in the vedas denotes a
>> person who speaks the aryan language and NOT any physical attributes.

ही आर्यभाषा कोणती? वरील अभिभाषा तर नव्हे? आर्य या शब्दाचा भाषामूल अर्थ कितपत ग्राह्य धरावा? आर्य हा शब्द विशिष्ट जीवनप्रणालीदेखील दर्शवीत असावा. "कृण्वन्तो विश्वमार्यम्" या घोषणेतून जगभर आर्यभाषेचा प्रसार करायचा आहे असा अर्थ सूचित होत नाही. आर्य जीवनपद्धती सर्वत्र फैलावून जगास (म्हंजे देशोदेशींच्या लोकांस) उन्नत बनवू असा अर्थ मात्र सूचित होतो. आर्य हा शब्द nobel या अर्थीही वापरला गेला आहे.

४.
>> Aryans who appear on the Indian scene rather suddenly in around 1500 BC

इथे अचानकपणे कोणत्या अर्थी म्हंटलं आहे? पुरातत्त्वशास्त्राच्या की भाषिक दृष्टीने? या विधानाचा वरील क्र.१ मधल्या मुद्याशी संबंध आहे का?

आ.न.,
-गा.पै.

<< या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.>>

<<आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता>>

<< ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते>>

कोण मानतं? नावं? त्यांचं संशोधनातलं योगदान? कुठला पुरावा दाखवतात? मग या आधी झालेली उत्खनने, शास्त्रीय कालमापनातून मिळालेल्या तारखा, पुरापर्यावरणीय संशोधन, पुरातत्वीय सर्वेक्षणं-उत्खननं यातून उभे राहिलेले उत्तर आणि पूर्व आणि वायव्य भारताचे सांस्कृतिक कालखंडाचे तपशील (रीजनल कल्चरल क्रोनोलॉजीज), विविध शिलालेख -त्या लिपीचा, मजकूराचा वाचन आणि अभ्यास, नाणकशास्त्राचा सखोल अभ्यास, संस्कृत साहित्याचा अभ्यास, इतर संशोधन हे सगळं कुठे टाकून देणार? कारण हे सगळं काही या मतांशी मेळ खात नाही.
शिवाय पुरातत्वात रोज, दरवर्षी नवी माहिती येत असते, जुनी गृहितकं बदलत असतात. ती तुम्हाला माहित आहेत का? रामायण घडलं असा कुठला पुरातत्वीय पुरावा आहे? महाभारत घडलं असावं अशी किंचित शक्यता दर्शवणारा पुरावा किती त्रोटक आणि अंदाजपंचे आहे ते माहित आहे का? कृष्णाचा ऐतिहासिक पुरावा कुठंय?प्राचीन संस्कृत वाङ्मयात किती कृष्ण आहेत माहित आहे का? कृष्ण देवतेची डेवलपमेन्ट वेगवेगळ्या शतकात कशी झाली, त्याच्या आयुष्याचे वेगवेगळे भाग कसे जोडले गेले हे लक्षात आहे का? जेव्हा तुम्ही कुठल्याही ग्रंथाचा पुरावा वापरता तेव्हा त्या ग्रंथात किती कालस्तर आहेत, किती प्रक्षिप्त असू शकतं, जे लिहिलंय त्याची सत्यासत्यता कशी पडताळून पहातात इ. माहिती आहे का (मेथडॉलॉजी ऑफ टेक्स्चुअल क्रिटिसिझम)? ज्या व्यक्तीने तो संदर्भ दिलाय त्याची ग्राह्यता पडताळता येते का? आणि हे सगळं करता येणार नसेल, आपण जे 'संशोधन' वाचतोय त्याची ग्राह्याग्राह्यता कळणार नसेल तर त्या पुराव्यांविषयी आपण बोलू नये हे संशोधनातले सर्वमान्य संकेत आहेत.

तुम्हाला रुद्र-शिव या बद्दल लिहायचंय तर विषयाला धरून लिहा ना प्लीज.

धर्माचा इतिहास हा { वेद - उत्तर वैदिक यज्ञसंस्था आणि लोकधर्म - बौद्ध, जैन व इतर संन्यासी पंथ - सॅवियर गॉड्सची संकल्पना - मूर्तीपूजा - वैदिक अवैदिक परंपरा आणि लोकधर्म यातून देवाणघेवाण होऊन उदयाला आलेले नवे देवदेवता, जुन्या देवतास्वरूपात, त्यांच्या कार्यात झालेले मूलगामी बदल आणि या सगळ्या परंपरांना सामावून घेऊन एकत्र करणारी पौराणिक परंपरा - त्यांचे पुराण ग्रंथ - थोडक्यात आपण आज ज्याला हिंदु धर्म म्हणून ओळखतो त्याचं प्राथमिक स्वरूप } असा सुमारे इ.स.पू. १५०० ते इ.स. चं ६-८ वं शतक या कालखंडातला अत्यंत व्यामिश्र, व्यापक आणि बहुपेडी प्रवास आहे. शिवाय तत्कालीन राजकीय-सामाजिक-आर्थिक घडामोडींशी अत्यंत निकटचा संबंध असणारा. एवढंच लक्षात असू द्यात.

साती आणि तिच्यासारखेच प्रश्न पडणार्‍या इतरांनाही. मी वरती विचारलेले प्रश्न कुणाही एका आयडीला जाब विचारणारे नाहीत तर एकुणातच ऐतिहासिक संशोधन वाचताना काय चौकटीत वाचावं लागतं हे सगळ्यांना कळवण्यासाठी आहे. इथे प्रत्येक वेळी कुणीतरी (अगदी प्रामाणिक हेतूने असले तरी) अर्धवट माहिती/ वाचनावर, प्रशिक्षण नसताना त्यांना आकर्षक वाटतील ती मतं उचलून घेऊन लेख लिहिणार, त्यावर नेहेमीचे यशस्वी कलाकार नेहेमीचा गदारोळ करणार (दोन्ही बाजूंनी). आणि शंकानिवारणासाठी माझ्यासारखं कुणी बसायचं म्हटलं तर आम्हाला प्रत्येक तपशील त्यातल्या चुका घेऊन कुणी काय म्हणलंय रे म्हणून लांबलचक प्रतिवाद करून सर्वमान्य संशोधक मत मांडायचं हे अत्यंत वेळखाऊ काम आहे. मला सध्या माझ्या संशोधनाबाहेरच्या विषयात हे उद्योग करायला वेळ नाहीये खरंच. आणि माझं काय जे चाल्लंय त्यावर मी लिहितेच.

तेव्हा मी अशा धाग्यांवर न लिहायचं जे माझं धोरण होतं ते चालू ठेवत आहे. बाकी सर्वांना चर्चेसाठी शुभेच्छा! Happy

काही लोकाना देव कोणता याच्याशी मतलब नसतो. सध्या बाजार कुणाचा चांगला चालतो, तो देव आपला असा आक्रोश करायची सवय असते,

आधी इंद्र, वरुण, अग्ने यांचा बाजार चालायचा.

मग विष्णू, गणपती यांचा बाजार चालायला लागल्यावर कुठल्या तरी एक दोन ऋचात त्यांचा उल्लेख आहे, हे या चलाख लोकाना समजले.. लगेच या लोकानी आपले देव टाकले आणि ते यांच्या देवळात गेले.

मग बुद्धाचा बाजार चालतो म्हटल्यावर त्यालाही अवतार केला.

आता शिव आमचाच म्हणून कंठशोष, का? तर त्याचा बाजार चांगला चालतो म्हणून.

मग अल्ला, येशू यांचा बाजार दिसायला लागला, लगोलग , येशूचे हिंदुत्व या नावाने सावरकरांच्या बंधुनी पुस्तक काढले.. काबा म्हणजे शिव असे ओकांचे पुस्तक आले. ताजमहाल आमचाच म्हणून गोपाळ गोडसेचे पुस्तक आले.

ज्या धर्माचे लोक भरपूर आहेत, त्यावरच यांची पुस्तकं निघतात हे एक आश्चर्य... ज्यु धर्म आमचाच पंथ, पारशी प्रेषित आमच्याच देवाचा अवतार किंवा जैन धर्म आमच्याच देवाने काढला अशी पुस्तके हे काढणार नाहीत.. कारण सोपे आहे. ज्यु, पारशी, जैन हे काही जास्त लोकसंख्या असलेले धर्म नाहीत... मग कशाला पुस्तके लिहायची??? Proud Biggrin

अशा ब्रह्मसमंधांचा बाजार तर जनतेने कधीच उठवला आहे. तरीही अधून मधून अडाणी जनता याना बळी पडते. Proud Rofl

Pages