या वेलीवर पहिले वहिले.....

Submitted by मानुषी on 7 July, 2011 - 02:01

माझ्या बागेतल्या वेलीचं( की झाडाचं) हे पहिलं वहिलं फूल!
जाणकार नाव सांगतीलच!

DSCN0490.JPGDSCN0488.JPGDSCN0485.JPGDSCN0479.JPG

गुलमोहर: 

अभिनंदन मानुषी हे वेलीप्रमाणे वर चढत जाते. अगदी उंचही होते झाडाचा आधार मिळाल्यावर. टॅबेबुयाचाच प्रकार असेल. दिनेशदा, साधना नक्की नाव सांगतील.

हं...अवल सकाळी सकाळी डोळे उघडल्यावर हे असं अचानक समोर आलं ना की याच ओळी सुचल्या! पहाते पुढेही काही जमतंय का!
धन्यवाद सर्वांना!

हे अमांडा ना ? या फूलाचे वर्णन डॉ डहाणूकरांच्या शब्दात, एखाद्या लहान मूलाने प्रसाद घे म्हंटल्यावर हात पूर्ण उघडावा तसे...
ही फूले झाडावरुन गळून पडली तरी उमललेलीच असतात.

.

मानुषी मस्त फोटो.. हे अलामांडाच आहे. ह्याला फळे येत नाहीत. फक्त फुलेच येतात.

बिट्टीला फुले येतात व नंतर त्रिकोणी हिरव्या रंगाची फळे लागतात. फुल फोटोत दिसते तेवढेच फुलते. पुर्ण फुलत नाही. खाली दिलाय तो रंग हल्लीहल्ली दिसायला लागला. वर अलामांडाचा आहे तो पिवळाधम्मक रंगच सगळीकडे दिसतो. यात पांढरा रंगही मी पाहिलाय. याची पानेही फोटोत पाहुन घ्या. हे सहसा कुंडीत दिसत नाही. मुद्दाम कुंडीत लावण्याइतके महत्व याला अजुन कोणी दिलेले नाहीय Sad साधारण ५-८ फुट उंचीचे झाड असते पण आंब्यासारखे घनदाट वगैरे नसते. नेटकाच पसारा असतो. बहुतेक सोसायट्यांच्या कुंपणात हे झाड दिसतेच दिसते.

हा एक फोटो -

अश्या प्रकाराचच एक फुल मला माहित आहे हेच आहे का कि तसच दिसणार ते मला माहित नाही पण खात्री करायची असेल तर बघ हे फुल तोडलंस ना मागल्या बाजूने मधुर रस असतो कारण गावी मी भरपूर अश्या फुलांचे रसाचा आस्वाद घेतला आहे.