निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात.

उजू खरच नक्कीच जा. मी वेळ मिळताच धागा टाकते त्यात अ‍ॅडरेस पण देते. निसर्गपुर्ण असे रीसॉर्ट आहे ते.

गौरी तुला फोटो परत काढायला मिळाला तर पानांचा पण टाक.

त्या जलपर्णीपासून बायोगॅस करायचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, गुरांना पण ती आवडत नाही. कोल्हापूरच्या
रंकाळ्याचा तर तिने बलीच घेतला आहे. क्रेन लावून ती काढतात तरी ती कमी होत नाही.

आपल्याकडेच नाही तर बाकिंच्या देशात पण तिने उच्छाद मांडला आहे. नायजेरियात तर ती खाडीत पण वाढतेय.

आकाशात कबुतरे >>>> नाही काही - सगळी कबुतरे साधनाच्या घराच्या आसपास असतात - किती आवडतात साधनाला ती - मा बो वर सगळ्यांना माहित आहे त्यांची दोस्ती...;) Wink

ही साधनासाठी कबुतरे.

फोटो लांबून काढल्यामुळे बरोबर नाही पण साधनाला आवडेल अशी खात्री आहे. Lol

अरे, कबुतरांवरही ही वेळ यावी???????????//

एनी वेज, मला कबुतरे इतकी आवडतात की आता त्यांच्यावर खास लक्ष ठेवण्यासाठी मी एक बेबी बोका घरात आणलाय. तो दिवसभर गच्चीत बसुन कबुतरांवर लक्ष ठेवतो, खुप प्रेमळ आहे, पण अजुन त्याला प्रेम कसे दाखवायचे ते माहित नाहीय. पण शेवटी त्याचे नॅचरल इन्स्टिंक्ट्स त्याला शिकवतीलच कबुतरांवर किती आणि कसे प्रेम करायचे ते..... Happy

गिरीकंद, तुम्ही पाहिलेली ब्राम्हणी घार किंवा तिचे पिल्लु असु शकते. योग्याने टाकलेत फोटो तिचे.

वरच्या फोटोत नसणारी सगळी कबुतरं बहुतेक माझ्याकडे येतात. Sad
कबुतरांच्या उपद्रवामुळे मांजर पाळावं असा मोह मलाही होतोय ... पण सातव्या मजल्यावरच्या उघड्या बाल्कनीतून ते धडपडलं तर काय म्हणून काळजी वाटते.

.. पण सातव्या मजल्यावरच्या उघड्या बाल्कनीतून ते धडपडलं तर काय म्हणून काळजी वाटते.>>> गौरी. मांजर धडपडले नाही तरी ते कबुतर मारुन घरातीलच आपल्याला पोचता न येणार्‍या कोपर्‍यात जाते. ते ताव मारते पण नंतर त्याचे सांडलेले उष्टे खरकटे काढायची तयारी आहे का? असेल तरच ही हिम्मत कर. (या गोष्टीचा २ वेळा अनुभव आला आहे त्यामुळे कबुतर चालेल पण मांजर आवर अशी अवस्था होते.)

लेकीच्या घरी पण बोका आहे. त्याला तयार कॅट फूड देते ती. पण अधून मधून तोंडाला चव येण्यासाठी तो
चिमण्या मारतो ( सराव असावा म्हणूनही करत असेल.) आणि मग त्या चिमण्या ओट्यावर मांडून ठेवतो.
(लेकिला उद्योग !)

माझा एक शेतकरी मित्र आहे - त्याने त्याच्या मामांच्या घरातला एक गमतीशीर किस्सा सांगितला. ते मामाही शेतकरीच - सहाजिकच बैल-गायी, म्हशी, कोंबड्या, कुत्री, मांजरं असे सगळे बैजवार...
कोंबड्या म्हटल्या की त्यांची अंडी -पिल्ले हे सर्व आलेच त्याबरोबर. कोम्बडी आणि मांजरे यांचे सौख्य (!) सर्वांना माहित आहेच पण इथे मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांच्याकडे असलेले दोन मोठ्ठाले बोके हे त्या कोंबड्यांच्या पिल्लांचे रक्षण करतात इतर शिकारी प्राणी-पक्ष्यांपासून ...... आता बोला ......

म्हणजे मांजर आणलं तर सध्या जिवंत आणि घराबाहेर आहेत ती कबुतरं मेलेली आणि घरात सापडणार ... त्यांच्यापासून सुटका नाही. Sad

शशांक, नवलच आहे. कोंबड्यांनी शांततेचा करार केलेला दिसतोय !

लेकिकडचा बोका, कोंबड्यांना घाबरतो. चांगल्याच गलेलठ्ठ आहेत त्या.

हे सगळे वाचून, बघून मुक्तेश्वर कुलकर्णी सुखावतील - सारखं ती झाडं, फुलं, पानं काय बरं बघायची......;) Wink

सध्या आमच्याकडे मांजराची दोन पिल्ले आलीयेत - त्यामुळे अंजू व दोन्ही कन्यका "आनंदी आनंद गडे...." या मूडमधे आहेत.....

हे आयुष रिसॉर्ट मध्ये वडासारखे झाड होते पण वड नाही.

त्याला पारंब्याही होत्या.

ही पाने.

हे आयुष रिसॉर्ट मध्ये वडासारखे झाड होते पण वड नाही.>>>> जागू - ते नांद्रुक (नांदरुक किंवा नांदरुख) असेल Ficus retusa / Ficus microcarpa

जागू वरची पाने वडाच्या पानापेक्षा जरा मोठी आहेत का आकाराने ? असेच एक (वडाचेच समजत होते मी इतके दिवस) झाड करिश्मा सोसायटी च्या समोर (संगम प्रेस रोडला) पाहिले आहे. कोणाला माहित असेल तर नक्की सांगा कसले आहे ते.

धन्स शशांक.
मला आयुष रिसॉर्टचा धागा काढायचा आहे. त्यासाठी मला नावे हवी आहेत तुमच्या सगळ्यांच्या मदतीने. आता खालील प्राण्यांची आणि पक्षांची पण नावे सांगा.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

मस्त प्रची. गौरी अळीफूल मस्तच, सोनालि, दिनेशदा, (सर्वांचीच) Happy
जागू, धन्यवाद. कुठल्यातरी बागेतच असल्यासारख वाटलं. Happy
वडासारखे झाड होते पण वड नाही.>>>>>>>>>>>>माझ्या ही वाटेवर हे झाड आहे. त्या दिवशी मी ही ठरवल होतं फ़ोटो काढून इथे डकवायचा असं. पण...........................(हे भगवान, मला माझी स्मरणशक्ती परत कर. )त्या झाडाला पण लांब लांब पारंब्या आल्यात. हे ’रबर ट्री’ तर नाही. (एक अज्ञानी पश्न) Happy
नेहमी असं होत, की एखादा फोटो डकवयचा विचार केला, की माझ्या आळशीपणातून तो मी डकवेपर्यंत, कोणीतरी डकवलेला असतो. Happy

सारस पक्षाचे नाव आलेच आहे तर सारस म्हणजेच क्रौंच का?

९ - चिंकारा नसावे. इंपाला वाटताहेत ती. जागू तू सरळ हरीण लिही. म्हणजे चुकायला नको Happy
८ - White deer

माझ्याकडेही मांजराचे पिलु आणि आता त्या पिल्ला अर्थात माता होऊन झाले पिल्लु आहे,
मी ते पाळले नाही पणं अंगणात दिसले सहज दुध टाकत गेलो, आता पहाटे दार उघडल्या बरोबर हे टांगे खाली शेपटी फिरवित म्याव म्याव करते तिचे पिल्लु आता रुळायला लागले. मला पाळायचे नाहीच आहे. पण नियमित दुध टाकतो २ टाईम. कधी कधी खुप घान वास येतो त्यानी पक्षी मारुन आणला की

Pages