शरीरात आत्मा असतो का?

Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50

प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नारायण, नारायण

आत्मा असतो असे मानणार्‍यान्नी तो आसतो असे सिद्ध करुन दाखवावे

आत्मा नसतो असे मानणार्‍यान्नी तो नसतो असे सिद्ध करुन दाखवावे

आपापले पुरावे घेऊन आणखी वर्षभराने पुढच्या अक्षय्य तृतीयेला इथेच या

एक आत्मा होता बेफिकीरांच्या कथेत......क्रमशः भेटीला यायचा << अजुनहि आहे >>>>> जर कथा क्रमशः असेल तर हे सिद्ध होते की आत्मा अमर आहे. एनीवन वान्ट टू चॅलेन्ज ????? Proud

आत्मा बित्मा काही नसते .

आहे हे फक्त शरीर ....म्हणुनच

यावद्जीवं सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत
भस्मीभ्तेच देहेच पुनरागमनं कुतः ||

जोवर जिवंत आहात तोवर राडा ऐश करुन घ्या भले कर्ज काढुन माज करा कारण एकदा देह जळाल्यावर परत यावं लागणार नाहीयेच ......कारण नित्य सनातन असा आत्मा अस्तित्वाच नाहीये Proud

म्हणुनच म्हणतो डॉक्टर ...चीयर्स Biggrin

असतो पण सिद्ध करून दाखवण्यासाठी मला आधी मरावे लागेल आणि मग तुमच्या भेटीला यावे लागेल. Wink

असतो पण सिद्ध करून दाखवण्यासाठी मला आधी मरावे लागेल आणि मग तुमच्या भेटीला यावे लागेल<< त्याला भुत (काल्पनिक) म्हणतात, भुत आणि आत्मा मधे फरक काय? Happy

अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने ),

इथे मायबोलीवर लोकं येतात टवाळक्या करायला ...असल्या सीरीयस विषयावर काय बोलायचे ...आपण रेफरन्सेस देवुन बोलु लागलो की आपल्यालाच यड्यात काढतात .... त्यापेक्षा आपणही काहीच्याकाही प्रतिसाद देणे अन त्यांच्यात सामील होणे सोपे आहे

बाकी तु सीरीयस असशील तर हे घे

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं.|
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे ।
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने. |
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ॥

http://www.manogat.com/node/7819

जो दिसत नाही तो आत्मा << ओके Happy आणि जो आत्मा (दिसत नाहि) दर्शन देतो (अर्थात शरिराशिवाय)<< म्हनजे दोन्हिहि दिसत नाहित :अओ:: ते भुत

>>महेश, काही आत्मे शरीरातून बाहेर पडून म्हणे पर्यटन करुन परत शरीरात परत येतात.
मंदार पण मला तर काही आत्मे कायमचे माबोवर मुक्कामाला येऊन छळत असताना दिसतात, ते का नाही जात परत त्यांच्या शरिरात.
एक वेताची छडी घेऊन म्हणावेसे वाटते, "बोल का धरलयस माबोला" ? Wink

>>जो आत्मा (दिसत नाहि) दर्शन देतो (अर्थात शरिराशिवाय)<< म्हनजे दोन्हिहि दिसत नाहित
दोन्हीही दिसत नाही काय ? सांगितल ना जो आत्मा दर्शन देतो तो भुत.
तुमच्याकडे शिते आहेत का ?

Pages