शरीरात आत्मा असतो का?

Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50

प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुर्ख लोक आत्मा वगैरे मानतात......

अत्यंत बुध्दीमान तर्क, इतरांचा अनुभव याला किंमत न देता लोकांना जाहिर मुर्ख ठरवतात. ज्यांनी यावर सप्रयोग संशोधन केल आहे पुस्तक लिहल आहे अश्यांच नाव घ्यायला इथे चोरी आहे.

त्यांच नाव घेतल रे घेतल की हा धागा वहायला लागेल. मग हा मुद्दा सोडुन इतर मुद्यावर इथे बसुन त्यांना आव्हाहन केली जातील.

किंवा कुणा एकाच सुध्दा याविषयावर ज्ञान न वाढता हा धागा गाडला जाईल.

उदयन साहेब ह्या असल्या धाग्यावर लोक लिहायला नाखुष असतात कारण वरची विधाने आपल्याच मायबोलीकराविषयी आदर न प्रकट करता त्यांना हीन लेखतात.

इथे आत्मा नसतोच हे तरी सिध्द झाले आहे का ? हे विचारायची सोय नाही. जसा इंडियन पिनल कोड मधे पोलीसांनी आरोप ठेवला कि तो खोटा आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त गुन्हेगाराची असते तद्वत आम्हा आत्म्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांची गत झाली आहे.

जसा इंडियन पिनल कोड मधे पोलीसांनी आरोप ठेवला कि तो खोटा आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त गुन्हेगाराची असते तद्वत आम्हा आत्म्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांची गत झाली आहे.<<

अहो,
ती जबाबदारी पोलीसांची अस्ते. आरोपीने तोंडातून अवाक्षर काढले नाही तरी चालते. अन हो. 'आरोप' 'सिद्ध' होईपर्यंत तो 'गुन्हेगार' ठरत नाही.

गामा_पैलवान | 26 October, 2012 - 11:42

अत्रुप्त आत्मा,

>> आज पर्यंत आत्म्याबद्दल तपासणी म्हणून केलेले सर्व प्रयोग सपशेल फसलेले आहेत,

हे जरी खरं धरलं तरी पुनर्जन्माची कितीतरी प्रकरणं उघडकीस आलीयेत त्यांचं काय?

आ.न.,
-गा.पै.>>>>>>>>>>>>>>.. ती तुमच्या सारख्या लोकांनी तपासायचा प्रयत्न कधी केला आहे काय???

मुळ लेखातला मुद्दा - आत्म्याला डायमेन्शन नसतात म्हणुन त्याचे अस्तित्व मानायचे कसे. मग मनाला तरी कोठे डायमेन्शन्स असतात ? जर सायकेट्रीस्ट हे मानतात म्हणुन मानायचे असेल तर जर एखाद्या सायकेट्रीस्ट ने पुनर्जन्म असतो असे सिध्द केलेले असेल तर मानणार का ?

जर शरीर जळुन्/मातीत जाऊन संपते ते मागील जन्माच्या गोष्टी पुढच्या जन्मात कश्या आठवतात ?

जर शरीर जळुन्/मातीत जाऊन संपते ते मागील जन्माच्या गोष्टी पुढच्या जन्मात कश्या आठवतात ?>>>>online storage cloud computing वगैरे तिकडेपण असावे मरण्याअगोदर तिथे डेटा सेव करायचा (किंवा होत असावा) आणि नंतर Aक्सेस करायचा ... Proud Proud Proud

नानबा | 27 October, 2012 - 02:40 नवीन
गामा पैलवान हे गामा_पैलवान झाले, हाही पुनर्जन्मच मानायचा का?
>> आंबा, जामोप्या... -> शेळी-> ताई -> आंबा हा सिक्वेन्स ऑफ पुनर्जन्म, निदान तुमचा तरी विश्वास हवा होता.>>>>>> नानबा ,
जामोप्या हे अवतारी बाबा आहेत. त्यांचे पुर्नजन्म होत नाहीत ते फक्त 'अवतार' घेतात,कधी फळात ,तर कधी शेळीत कधी रानडुक्कर तर कधी हत्ती.जामोप्या ,आपण अवतार घेऊन कारभार करण्यात देवादिकांनाही ऐकणार नाही...

>>online storage cloud computing वगैरे तिकडेपण असावे मरण्याअगोदर तिथे डेटा सेव करायचा (किंवा होत असावा) आणि नंतर Aक्सेस करायचा
ह्म्म्म चुकून का होईना पण खरे बोलून गेलात... :गंभीर चेहरा:

ए माझी पण चिमूटभर भर... भाषांतराचे कष्ट घेतले नाही, आत्म्याला काय फरक पडतो !

http://hindi.webdunia.com/news-international/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B8...

कैसा अनुभव होता है जब आत्मा निकलती है..?
लंदन, बुधवार, 31 अक्टूबर 2012( 18:01 IST )
Share on facebookShare on twitterMore Sharing Services

FILE
प्राणी की तंत्रिका प्रणाली से जब आत्मा को बनाने वाला क्वांटम पदार्थ निकलकर व्यापक ब्रह्मांड में विलीन होता है तो मृत्यु जैसा अनुभव होता है। इस महत्वपूर्ण सिद्धांत का प्रदिपादन दो प्रख्यात वैज्ञानिकों ने किया है।

इस सिद्धांत के पीछे विचार यह है कि मस्तिष्क में क्वांटम कंप्यूटर के लिए चेतना एक प्रोग्राम की तरह काम करती है। यह चेतना मृत्यु के बाद भी ब्रह्मांड में परिव्याप्त रहती है। उन्होंने मृत्यु का करीबी अनुभव करने वाले लोगों के अनुभवों के आधार पर इसे समझाने का प्रयास किया है।

डेली मेल की खबर के अनुसार एरिजोना विश्वविद्यालय में एनेसथिएसिलॉजी एवं मनोविज्ञान विभाग के प्रोफेसर एमरेट्‍स एवं चेतना अध्ययन केन्द्र के निदेशक डॉ. स्टुअर्ट हेमेरॉफ ने इस अर्ध धार्मिक सिद्धांत को आगे बढ़ाया है।

यह परिकल्पना चेतनता के उस क्वांटम सिद्धांत पर आधारित है, जो उन्होंने एवं ब्रिटिश मनोविज्ञानी सर रोजर पेनरोस ने विकसित की है। इस सिद्धांत में माना गया है कि हमारी आत्मा का मूल मस्तिष्क कोशिकाओं के अंदर बनी ढांचों में होता है, जिसे माइक्रोट्यूबुल्स कहते हैं।

दोनों वैज्ञानिकों का तर्क है कि इन माइक्रोट्यूबुल्स पर पड़ने वाले क्वांटम गुरुत्वाकर्षण प्रभाव के परिणामस्वरूप हमें चेतनता का अनुभव होता है। वैज्ञानिकों ने इस सिद्धांत को आर्केस्ट्रेड ऑब्जेक्टिव रिडक्शन (आर्च.ओर) का नाम दिया गया है।

इस सिद्धांत के अनुसार हमारी आत्मा मस्तिष्क में न्यूरॉन के बीच होने वाले संबंध से कहीं व्यापक है। दरअसल इसका निर्माण उन्हीं तंतुओं से हुआ, जिससे ब्रह्मांड बना था। यह आत्मा काल के जन्म से ही व्याप्त थी।

अखबार के अनुसार यह परिकल्पना बौद्ध एवं हिन्दुओं की इस मान्यता से काफी कुछ मिलती जुलती है कि चेतनता ब्रह्मांड का अभिन्न अंग है। इस मिलती-जुलती धारणा पश्चिमी दर्शन आदर्शवाद में भी देखी जा सकती है।

इस परिकल्पना के साथ हेमराफ कहते हैं मृत्यु जैसे अनुभव में माइक्रोट्यूबुल्स अपनी क्वांटम अवस्था गंवा देते हैं, लेकिन इसके अंदर के अनुभव नष्ट नहीं होते। आत्मा केवल शरीर छोड़ती है और ब्रह्मांड में विलीन हो जाती है।

हेमराफ ने साइंस चैनल के वार्महोल वृत्तचित्र में कहा कि हम कह सकते हैं कि दिल धड़कना बंद हो जाता है। रक्त का प्रवाह रुक जाता है। माइक्रोट्यूबुल्स अपनी क्वांटम अवस्था गंवा देते हैं। माइक्रोट्यूबुल्स में क्वांटम सूचना नष्ट नहीं होती। यह नष्ट नहीं हो सकती। यह महज व्यापक ब्रह्मांड में वितरित एवं विलीन हो जाती है।

उन्होंने कहा कि यदि रोगी बच जाता है तो यह क्वांटम सूचना माइक्रोट्यूबुल्स में वापस चली जाती है तथा रोगी कहता है कि उसे मृत्यु जैसा अनुभव हुआ है।

हेमराफ यह भी कहते हैं कि यदि रोगी ठीक नहीं हो पाता और उसकी मृत्यु हो जाती है तो यह संभव है कि यह क्वांटम सूचना शरीर के बाहर व्याप्त है। संभवत: यह सूचना आत्मा की तरह अनिश्चितकाल तक व्याप्त रहती है। (भाषा)
संबंधित जानकारी

Arizona University/Dr Stuart Hemerof/Sir Roger Penrose.. यानी सांगितले म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणार. कृष्ण बिष्ण..गीते बीतेत सांगतात त्या भाकडकथा आहेत. कृपया त्यावर कोणीही विश्वास ठेवु नये Happy

२१ ग्रॅम हा प्रयोग मायबोलीकरांनी वाचला आहे का ? http://en.wikipedia.org/wiki/Duncan_MacDougall_(doctor)

१९०१ सालच्या या प्रयोगात मरणासन्न अवस्थेतले सहा रुग्ण यांच वजन आणि मृत्युनंतरच वजन यात सरासरी २१ ग्रॅमचा फरक दिसला. जे आत्म्याचे वजन आहे असे मानले जाऊ शकते. हे वजन ज्या काट्याचा लिस्ट काऊंट १ ग्रॅम आहे अश्या काट्याने केलेला आहे.

यातला गमतीचा भाग असा की आता २००३ साली काहींच्या मते ६ हा सॅपल साइझ कमी म्हणुन हा प्रयोग १०० टक्के बरोबर नाही असे म्हणले जात आहे.

दुसरा प्रयोग याच लिंकवर असा सापडतो की याच व्यक्तीने हाच प्रयोग १५ कुत्र्यांच्या बाबतीत करुन त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यु नंतर वजनात काहीच फरक सापडला नाही.

जर आणखी कमी लिस्ट काऊंट असलेल्या काट्याने प्रयोग नं २ करुन पाहिल्यास काही तथ्य सापडेल.

नितीनचंद्र त्याच विकीच्या लिंक मधे शेवटी पुढील वाक्ये आहेत.

His results have never been attempted to be reproduced, and are generally regarded either as meaningless or considered to have had little if any scientific merit.[1][2]

आत्म्याचे वजन १३ ग्रॅम असते.

पुढचा जन्म माशीचा मिळाला तर त्या दोन ग्रॅमच्या माशीत हा १३ ग्रॅमचा आत्मा कसा जातो?

आमचे येथे नवकायाप्रवेशनिकडीनुसार, चढउतारासगट, आत्मिक वजन व्यवस्थापन करून मिळेल.

उदय साहेब.

मला हेच म्हणायचय. ते नुसत लिहलय. प्रयोगांती सिध्द केलेल नाहीये. जर प्रयोग केले असतील तर त्याचा संदर्भ नाही. मला एकच मुद्दा पटला तो म्हणजे संख्या शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक असलेल्या सॅपल साईझचा.

बाकी ज्यांना चर्चेत भाग न घेता केवळ विनोद करायचे आहेत. आपल स्वागत आहे.

आंबा१ | 2 November, 2012 - 07:25

आत्म्याचे वजन १३ ग्रॅम असते.

पुढचा जन्म माशीचा मिळाला तर त्या दोन ग्रॅमच्या माशीत हा १३ ग्रॅमचा आत्मा कसा जातो?

माणसाचा 13 ग्रॅमचा आत्मा आकाशतत्त्वाच्या मेन सर्व्हरमध्ये विलीन होतो व कर्मानुसार पुन्हा माशीचा जन्म घेताना; 60 किलो माणसाचा आत्मा 13 ग्रॅम तर 2 ग्रॅम माशीचा किती ? या त्रैराशिकाने; 0.00043 ग्रॅमचा होऊन आकाशतत्त्वाच्या मेन सर्व्हरमधून ह्या संसाररुपी मायाजलात पुनश्र्च पदार्पण करतो.

His results have never been attempted to be reproduced, and are generally regarded either as meaningless or considered to have had little if any scientific merit.[1][2] >> प्रयत्नच न करता खोटं म्हणण्यात काय पॉईंट? हा तर अशास्त्रीय अप्रोच झाला.

>>प्रयत्नच न करता खोटं म्हणण्यात काय पॉईंट? हा तर अशास्त्रीय अप्रोच झाला.
जिथे तिथे विरोध करणार्‍या सार्‍याच लोकांचा हा असाच तर अ‍ॅप्रोच आहे गेल्या काही काळापासुन.
पुर्वीचे अभ्यासू विरोधक दिसणे फार दुर्मिळ झाले आहे.

हा धागा कधी बंद पडू शकणार नाही कारण आत्मा अमर हैं ! Wink

जामोप्या, आत्माच्या लेव्हल्स असतात त्यानुसार डेन्सिटी आणि मास येत असावे. माणुस उत्कृष्ट अवस्थेचा प्राणि असल्याने त्यांची soul density जास्त असावी.

माणसाचा 13 ग्रॅमचा आत्मा आकाशतत्त्वाच्या मेन सर्व्हरमध्ये विलीन होतो व कर्मानुसार पुन्हा माशीचा जन्म घेताना; 60 किलो माणसाचा आत्मा 13 ग्रॅम तर 2 ग्रॅम माशीचा किती ? या त्रैराशिकाने; 0.00043 ग्रॅमचा होऊन आकाशतत्त्वाच्या मेन सर्व्हरमधून ह्या संसाररुपी मायाजलात पुनश्र्च पदार्पण करतो.

हरिहराण्णा,

समीकरण चुकीचे आहे.

माशी काय आणि माणूस काय, जेंव्हा त्याची गर्भावस्थेत निर्मिती होते, तेंव्हा प्रत्येक सजीव एकपेशीय असतो.... नंतर त्याची वाढ कमीजास्त होते.

जेंव्हा एकपेशीय सजीव निर्माण होतो, तेंव्हाच तुमचा तो आत्मा त्यात घुसत असणार ना?? मग माणसाचा आत्मा १३ ग्रॅमचा असेल तर माशीचाही तितकाच असायला हवा ना?

६० किलो आणि दोन ग्रॅम हे अ‍ॅडल्ट लाइफमधले नंतर प्राप्त झालेले वजन आहे. सुरुवातील दोघे एकपेशीयच होते.

आंबाभाऊ,

अहो आहे म्हटल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळतेय ना? कशाला तुम्ही माथापच्ची करिंग? १३ ग्रॅम तर १३. अर्धा ग्रॅम माझापण देतो हवा असेल तर Wink
त्यांना आत्मा असल्याने मनातल्यामनात का होईना नरकाची भिती आहे. तीही गेली तर मोकाट सुटतील ना? Wink

महात्मा इब्लिस.

अर्धा ग्रॅम माझापण देतो हवा असेल तर >> इब्लिसचा तुम्ही एका बाफवर सांगितलेला अर्थ बघता, तुमचा अर्धा ग्रॅम घ्यायला भीती वाटणार ना आत्म्यांना Light 1

आंबाएकाप्पा !
धन्यवाद ! तुम्ही सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचे तुम्हीच दिले की हो! म्हणजे समस्त प्राणीमात्रांच्या आत्म्याची कॅटॅगरी एकच असते हे तुम्हीच सिद्ध केले की! त्यामुळे मग आता जन्माच्या वेळी 13 ग्रॅम का 2 ग्रॅम हा विषयच राहत नाही. आता मरताना त्याचे वजन का वाढत असणार तर ते प्राप्तजन्म भोगून शिल्लक राहिलेल्या वासनेमुळे वाढत असणार. त्यासंदर्भात वासनादेह नावाची संकल्पना देखील ऐकण्यात आहे. जेवढा वासनादेह पुष्ट तेवढे वजन जास्त. युरेका ! युरेका !!

...........तीही गेली तर मोकाट सुटतील ना?
अगदी बरोबर आणि मग ते इब्लिसरुपाने अवतीर्ण होतील!
(कारण आपणास आत्म्याचे अस्तित्व मान्य नाही.... त्यामुळे नरकाची भीती तर फारच दूर....मग त्याचे पर्यवसान तुमच्या म्हणण्यानुसार मोकाटगिरीत का बरे नाही होणार?)
ता. क. सर्व गोष्टींची उकल तुम्हीच करत आहात हे एका दृष्टीने फार बरे झाले.

हरिहरा,
मला स्वतःवर कण्ट्रोल ठेवण्यासाठी आत्मा, सत्यनारायण, नरक, स्वर्ग, अमृत, अप्सरा, सोमरस, जन्माचा फेरा इ. इ. 'कॅरट-स्टिक' प्रकरणाची गरज लागत नाही. मी स्वतःच्या वागण्यावर स्वतःचेच नियंत्रण ठेवतो.

हे असे स्वयं-नियंत्रण करण्यात (तुमच्यासारख्या देवभोळ्या आत्म्यांची) अडचण ही असते, की त्या प्रकारात स्वतःच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते. ती परमेश्वराची लीला, किंवा गतजन्माचे संचित असे म्हणून जबाबदारी दुसर्‍यावर ढकलता येत नाही, अन मी ढकलतही नाही.

हे असे सेल्फ-सफिशियंट वागायला वेगळ्या प्रकारचे 'गट्स' लागतात. ते तुमच्या ध्यानी येणे कठीण. तेव्हा तुमच्या दृष्टीने मी मोकाट आहे असे समजा Wink

रच्याकने. 'हरिहर' म्हणजे नक्की काय होते हो? जरा सांगाल का? आधीही हा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय. तुम्ही सोयीस्कर बगल दिली आहेत.

( मेल्यानंतरच्या नरकाची भीती अन स्वर्गाची इच्छाही नसलेला : इथेच स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता ठेवणारा : ) इब्लीस!

ईब्ल्या Biggrin

Biggrin

वासनेमुळे आत्म्याचे वजन वाढत नाहि तर मोक्षकाळ दुर जातो.
त्यामुळे तो अनेक योनीत शरीररुपी जन्म मरणाच्या फेर्यात आड़कुन पडतो.

Pages