शरीरात आत्मा असतो का?

Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50

प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "अज्ञाताचे विज्ञान" नावाचे पुस्तक वाचा त्यामधे दिले आहे या विषया संदर्भात.
----- मला हे नेहेमी अज्ञानाचे विज्ञान दिसते... Sad मग खडे, गोटे आणि डोळ्याअंचा बाफ आठवतो.

गामा छान पोस्ट... आपण सहज, सोप्या आणि समजेल अशा शब्दात प्रक्रिया (शुद्ध मराठीत प्रोसेस) समजावली, धन्यवाद.

जिवंत डास किंवा फकडी जेव्हा आपल्या पोटात जातो तेव्हा तो पोटांत गेल्यावर गतप्राण होतो... मग आपल्या शरिरांत दोन- दोन आत्मे असायला हवेत का ? एका अभ्यासा नुसार ८-१२ किटकुले मनुष्य प्राणि खातो.
http://wiki.answers.com/Q/Does_each_human_eat_one_pound_of_insects_a_yea...

आत्मा असतो यावर माझा संपुर्ण अविश्वास आहे. शरिर जन्म घेते, शरिर मृत पावते - येथे चक्र संपते. आत्मा अमर आहे, पुर्नजन्म या निव्वळ कथा आहेत.

जोशीं आता झोपताय की बसु तुमच्या मानगुटीवर् ???
---- त्यांच्या मानगुटीवर अगोदरच बरिच इच्छुक मंडळी (त्यांचे चहाते :स्मितः) बसलेली आहेत.

भुता......
मरठीत सांग
किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं.|
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे ।
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने. |
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ॥
...........मराठीत सांग ..............

भुता......
मरठीत सांग
किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं.|
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे ।
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने. |
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ॥
...........मराठीत सांग ..............

तुम्ही आत्मा कशाला म्हणता त्यावर मानणे किंवा न मानणे अवलंबून आहे. मला तर वाटतं एखाद्या व्यक्तीच्या कॉन्शसनेस (consciousness) ला आत्मा असं नाव दिलय. शरीर कार्यरत व्हायचं थांबलं की त्याबरोबर ते (consciousness) ही राहत नाही (बौध्द धर्मात बहुतेक माणसाचा देह नष्ट झाला तरी हे कॉन्शसनेस राहते असं मानतात)
जाणिवांचा उगम अर्थातच मेंदुत आहे. जसा मनुष्य प्राणी आणि त्याचा मेंदू इवॉल्व होत गेला तसे त्याच्या जाणीवा सुद्धा इवॉल्व होत गेल्या. इथे जाणीवा म्हणजे मुळ जाणीवा नाही पण इतर जाणीवा ज्या फक्त माणसामध्येच जास्त प्रखर आहेत. आत्मा जर शरीराला जाणीवा देत असेल तर मग पुर्वी जेव्हा माणूस इवॉवल्ड नव्हता तेव्हा कमी आणि आता जास्त असं का?
ह्याला ही उत्तर म्हणून परत हे सगळं लिहून ठेवलेलं होतं आणि देवाचा माणसाकरता असलेल्या ग्रँड प्लॅन कडे वगैरे झुकू शकतं पण आपल्याला सध्या ज्ञात असलेली माणसाची एवोल्युशन प्रक्रिया बघता त्यावर विश्वास ठेवायला जड जातं.

आत्मा या संकल्पनेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना आत्म्याचे स्वरुप विचारल्यास ते गूढवादाकडे नेणारी उत्तरे देतात.त्यांची उत्तरे अशी असतात कि त्यांतुन कसालाही बोध होत नाही.सुक्ष्मशरीर, चेतनाशक्ती, परमात्म्याचा अंश वगैरे शब्दांची भेंडोळी फेकत राहतात.

मामी, ज्यांचं म्हणणं आहे की असतो त्यांच्यासाठी तो असतो आणि
ज्यांचं म्हणणं आहे की नसतो त्यांच्यासाठी तो नसतो
Proud

आत्माराम भेंडे आणि चंदु आत्मा, हे दोन्ही कलाकार पुरुष होते.
आत्मा नाव असलेली कुणी स्त्री मला माहीत नाही.
तात्पर्य, बाईला आत्मा नसतो !
आत्मा हा शब्द पुल्लिंगी आहे पण
गति, मति, बुद्धी, शक्ती, स्फ़ुर्ती, रया, धारणा, नाडी, युक्ती हे सगळे शब्द स्त्रिलिंगी आहेत !!

>>आत्मा हा शब्द पुल्लिंगी आहे पण
गति, मति, बुद्धी, शक्ती, स्फ़ुर्ती, रया, धारणा, नाडी, युक्ती हे सगळे शब्द स्त्रिलिंगी आहेत !!

एका यशस्वी पुरुषा मागे अनेक स्त्रिया असतात असे आपल्याला ध्वनित करायचे आहे काय? Wink Proud

बघ सिंव्हा , मी म्हणालो होतो ...मायबोली सीरीयस गप्पा मारायची जागा नव्हे Happy

असो

पण अजुन सीरीयस वाचायचे असेल तर हे वाच ..
http://en.wikipedia.org/wiki/Meditations_on_First_Philosophy
( मी ही नुकतच वाचायला घेतलय )

>>त्याच असतात<<
>>गति, मति, बुद्धी, शक्ती, स्फ़ुर्ती, रया, धारणा, नाडी, युक्ती <<
फक्त ते वाचताना उजवीकडून डावीकडे असे वाचावे! Happy

विजय Lol

>>बघ सिंव्हा , मी म्हणालो होतो ...मायबोली सीरीयस गप्पा मारायची जागा नव्हे

कोण बोलतंय Rofl

>>बघ सिंव्हा , मी म्हणालो होतो ...मायबोली सीरीयस गप्पा मारायची जागा नव्हे
कोण बोलतंय

>>> थांब तुझ्या मानगुटीवरच बसतो .....का त्यापेक्षा बोलावु मोहिनीला Proud

खरे आत्मा असतो का? पाहायचे असेल तर सोनिया गांधीला विचारा, त्याच्या अंतरात्म्याने पंतप्रधान होऊ नये असे सांगीतले

ब्रह्मांड निर्मितीचा अजुन शोध लागला नाही
माणुस माणुसच का? बाई बाईच का
आत्मा आत्माच का? तो खात्मा झाल्यावरच बाहेर पडतो की काय?
नसत्या उचापती आहेत.
मर्म कोणाला माहीत नाही
ठेविले तैसेची राहवे
चिती असु ध्यावे समाधान !

मामी, ज्यांचं म्हणणं आहे की असतो त्यांच्यासाठी तो असतो आणि
ज्यांचं म्हणणं आहे की नसतो त्यांच्यासाठी तो नसतो
------ हो पण काळानुसार मत बदलत गेले तर आत्मा बाहेर जातो आणि परत येतो का? मायबोलीवर तर दर आठवड्याला (कधी दिवसाला) मत बदललेले प्रतिसाद दिसतांत. सोमवारी एक तर त्याच्या अगदी विरुद्ध शुक्रवारी. त्यांच्या अत्म्यांबद्दल काय?

मंदार_जोशी | 25 April, 2012 - 04:14 नवीन

>>आत्मा हा शब्द पुल्लिंगी आहे पण
गति, मति, बुद्धी, शक्ती, स्फ़ुर्ती, रया, धारणा, नाडी, युक्ती हे सगळे शब्द स्त्रिलिंगी आहेत !!

एका यशस्वी पुरुषा मागे अनेक स्त्रिया असतात असे आपल्याला ध्वनित करायचे आहे काय? डोळा मारा फिदीफिदी

दिनेशदा | 25 April, 2012 - 04:19 नवीन

मंदारा, मग अयशस्वी पुरुषांमागे कोण असतात ?

मंदार_जोशी | 25 April, 2012 - 04:28 नवीन

त्याच असतात फिदीफिदी
>>>

अयशस्वी पुरुष अनेक स्त्रियांच्या मागे असतो Proud Proud

Pages