शरीरात आत्मा असतो का?

Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50

प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरीरात आत्मा असतो का?>>>> नक्कीच असतो.असे म्हणतात की आपल्याला जेव्हा स्वप्न पडतात तेव्हा काही काळासाठी आपला आत्मा शरीराबाहेर गेलेला असतो .बर्याचदा स्वप्न अत्यंत विचित्र पद्धतीची पडतात याला कारण आत्मा आप्तेष्टांच्या शोधार्थ भटकत असतो. अश्यावेळी आपल्याला अनोळखी प्रसंग, व्यक्ती स्वप्नात जाणवतात. लहान मुलास स्वप्न पडल्यानंतर त्याचा आत्मा जेव्हा परत शरीरात येत असतो तेव्हा 'समज' नसल्यामुळे लहान मुल गोंधळु शकते. त्यासाठी लहान मुलांना तीट लावण्याची पद्धत आहे जेणेकरुन स्वतःचे शरीर ओळखता यावे.

शरीरात आत्मा असतो का?>>>> नक्कीच असतो.असे म्हणतात की आपल्याला जेव्हा स्वप्न पडतात तेव्हा काही काळासाठी आपला आत्मा शरीराबाहेर गेलेला असतो .बर्याचदा स्वप्न अत्यंत विचित्र पद्धतीची पडतात याला कारण आत्मा आप्तेष्टांच्या शोधार्थ भटकत असतो. अश्यावेळी आपल्याला अनोळखी प्रसंग, व्यक्ती स्वप्नात जाणवतात. लहान मुलास स्वप्न पडल्यानंतर त्याचा आत्मा जेव्हा परत शरीरात येत असतो तेव्हा 'समज' नसल्यामुळे लहान मुल गोंधळु शकते. त्यासाठी लहान मुलांना तीट लावण्याची पद्धत आहे जेणेकरुन स्वतःचे शरीर ओळखता यावे.

त्यासाठी लहान मुलांना तीट लावण्याची पद्धत आहे जेणेकरुन स्वतःचे शरीर ओळखता यावे.

Proud

आत्म्याला तीट लावलेला समजतो, त्या आत्म्याला आप्ले बेडशीट, चादर, कपडे यांचे रंग समजत नाहीत का? ते ओळखून आपले शरीर त्याला ओळखता येत नाही?

मांजर, कुत्रे यांचेही आत्मे झोपेत बाहेर पडतात ना? त्याना तीट कोण लावते?

मांजर, कुत्रे यांचेही आत्मे झोपेत बाहेर पडतात ना? त्याना तीट कोण लावते?
------ कुत्र्यांना आत्मे नसतात हे विद्वानांनी सिद्ध केले आहे... Happy . तशी विकीची लिंक वर दिलेली आहे त्याच लिंक मधे मानवाच्या आत्म्यांचे वजन २१ ग्रॅम असते हे सप्रमाणांत दाखवलेले आहे.

लहान मुलास स्वप्न पडल्यानंतर त्याचा आत्मा जेव्हा परत शरीरात येत असतो तेव्हा 'समज' नसल्यामुळे लहान मुल गोंधळु शकते. त्यासाठी लहान मुलांना तीट लावण्याची पद्धत आहे जेणेकरुन स्वतःचे शरीर ओळखता यावे.
------ अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे... यावर ज्ञानतपस्वींचे एक पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे... सर्वासाठी हे पुस्तक वाचनिय आहे. एका मजेशिर उदाहरणात तर तिन आत्मे एकाच शरिरासाठी भांडत होती. त्यांना नक्की कुठल्या शरिरां मधे शिरायचे हेच माहित नव्हते कारण शरिर सोडतांना लावलेलें तिट पुसल्या गेले होते. चिंतेची गोष्ट म्हणजे त्यांच वेळी या अखंड विश्वात ( केवळ पृथ्वीवर नाही) दोन मानवी शरिरे आत्म्या विना तडफडत होती.

किती वेळ मानवाचे शरिर आत्म्या शिवाय राहू शकते ? कंटाळा किंवा विट आल्यास आत्म्याला शरिर बदलता येते का म्हणजे आत्म्यांची अदला बदल ? यावर विद्वान मंडळींचे मौलिक विचार वाचायला आवडतील.

मै.............और मेरा आत्मा..........
अक्सर यही बाते करेते है
तु नही होता......तो क्या होता.....
.
.
.
.
और तु हो के भी क्या हुआ है ....... Wink

वीट आला की तीट लावायचे नाही. म्हणजे आत्मा नीट दुसर्‍या देहात जाईल.

-- झीट येऊन पडलेला धीट
आंबा.

बेफिकिर, ५ कवाफी झाल्या. आता गझल रचा.

The ‘I’ casts off the illusion of ‘I’ and yet remains as ‘I’. Such
is the paradox of Self-Realisation.
- Maharshi Ramana

These answers are not for discussions and can only be answered by realized souls.

प्रत्यक्ष परमात्म्याला प्रश्न पडला म्हणजे तो नक्कीच गहन असणार..!
पण काय करणार? उत्तरे ठरलेलीच असतात.

निळे झेंडेवाले नाही म्हणणार.... आणि
भगवे हो म्हणणार....

परमात्मा तरी काय करणार म्हणा...!

1. दारू पिलेला माणूस चालताना जसा माझा माझ्या स्वतःवर किती कंट्रोल आहे हे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत (डुलकी खात) चालत असतो. पण तेच सकाळी भानावर आल्यावर चालताना असे जाणीवपूर्वक प्रयत्न त्याला करावे लागत नाहीत. कारण तेव्हा त्याचा लहान मेंदू कार्यरत झालेला असतो. तसे तुम्हीदेखील कधी भानावर येता ह्या वेड्या आशेवर आहोत. परमेश्र्वर तुम्हाला लवकरात लवकर जागे करो!
2. कायम दुसऱ्याला डागण्या देणाऱ्यास एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण नाही. आणि जर एवढे झोंबत असेलच तर आपणदेखील संयमी प्रतिक्रिया द्यावी. कायम, "कोण कुठे चुकतो' अशा वासावर कायम राहणे बरे नव्हे. स्वतः एखादा तरी धार्मिक लेख लिहा म्हणतो मी.
3. आता हरिहरच्या अर्थाचा येथे काय संबंध, एकतर हा प्रश्न कोठे विचालेलेला आहे हे मला माहीत नाही. आणि मला वाटते मायबोलीवर नावे ठेवण्याची पद्धत आहे; अर्थपूर्ण नावे ठेवण्याची पद्धत नाही. सकृतदर्शनी "हरिहर' हा शब्द देवादिकांविषयीचा असल्याने तो तुमच्या अभ्यासाचा किंवा चिकित्सेचा विषय असू शकत नाही. (आणि मी सोइस्कर बगल दिली म्हणता पण तुम्ही ती घेतली कशाला. "बगल देणे' म्हणजे न्हाव्याकडे डोके भादरून झाल्यावर हळूच काख वरती करणे.)
4. मला एक कळत नाही वेगळ्या प्रकारचे गटस्‌ आहेत तर वारंवार धर्म किंवा धार्मिक मध्ये डोकवण्याची इच्छा का होते. मला तर वाटते पूर्वजन्मीचे संस्कार या जिवात्म्याला गप बसू देत नाहीत. अधूनमधून ते डोके काढतात. मागील जन्मी या जिवात्म्याने देवभोळेपणाची परिसीमा गाठली असणार त्यामुळे आता इहजन्मी स्वकर्तृत्वावर परमविश्र्वास असणारा जन्म प्राप्त झालेला असला तरी धर्माविषयीचे कुतूहल गप्प बसू देत नाही. सारखे धर्म वा धार्मिक मध्ये डोकावावे वाटते. अर्थात हा सर्व जन्मोजन्मीचा फेरा असून एका जन्मात सुटणारे हे कोडे नव्हे. आणि या जीवाला त्याचे अज्ञान आहे त्याला तो तरी काय करणार. आजारी माणसाकडे जसे आपण सहानुभूतीपूर्वक पाहात त्याचे लाड पूरवत असतो वा त्याचे बोल खपवून घेत असतो तसे याच्या प्रतिक्रियेकडे पाहिले पाहीजे.

?

प्रोफेसर त्यापेक्षा लिहुनच द्या ना, काय आहे ते. आमचे नेट जरा स्लो आहे, त्यामुळे डाऊनलोड तर सोडा, साधे व्हिडीओ पण दिसत नाहीत्.:अरेरे:

हरिहर

VERY WELL SAID !!

बाकी काहींच्या डोक्या वरून पाणी गेलय !!!

हरिहर, डागण्या अन धर्म.

डागणी योग्य जागी बसलेली दिसते आहे. आनंद झाला. अर्थ उमजून तुम्ही वाक्य लिहिले असावे असे वाटते.

आता दुसरा वाक्प्रचार घेऊ Wink
बगल देणे.
अभ्यास वाढवा. काखा वर करणे अन बगल देणे. हे एकत्र आहे. पितरांना 'देणे' देणे शक्य नसेल तर दक्षिणेस तोंड करून काखा वर करून दाखवणे, व माफी मागणे, की मजकडून श्राद्धकर्म शक्य नाही (मजकडे काखोटिस मारलेले द्रव्य नाही) याला बगल देणे, किंवा काखा वर करणे असे म्हणतात.

तुम्ही म्हणता ते 'धर्म' नावाचे कर्मकांड लाथ मारून दूर केले अन जानवे खुंटीस टांगले ते उगीच नाही. समजून उमजून केलेले आहे.अन व्रतबंध झाला त्यालाही तपे लोटली आहेत. हरिहरचा अर्थ तर तुम्हास ठाउक नाहीच, शोधायची इच्छा अन चिकाटिही नाही. धर्माच्या नावावर जे उकळता येईल ते उकळणे, अन फेसबुकावरिल पोस्टी वाचून 'हिंदुत्व' हिडिसपणे मांडणे हाच भोंदू धंदा तुम्हाला येतो. या भोंदूपणालाच आमचा चिरंतन विरोध आहे. सोपा शब्दार्थ समजत नसेल तर न्हाव्यासमोर बगला वर करण्यास बगल देणे म्हणता तुम्ही. भादरून झाले की सांगा, हसावे का तुम्हाल आता?

दारू पिणार्‍याचा तोल अन धर्माची अफू झोकलेल्याचा तोल यांत फरक आहे. तुमच्या अफूमुळे तुम्हाला सभ्य लोकही दारू प्याल्यासारखे वाटू लागतात हे माझे नव्हे, तुमचे दुर्दैव आहे.

कधीतरी तुमचा स्वतःचा हिंदू धर्म समजून घ्या. नुसते 'हिंदुत्ववादी' होऊ नका. माझ्या सारखे खरे हिंदू होऊन बघा. अन गर्वाने नव्हे, तर अभिमानाने म्हणा 'मी हिंदू आहे!'

****
ड्यांबीस,
तुम्हाला फाट्यावर मारून लै दिवस झाले. पण हे लिह्ण्याचे कारण म्हणजे 'झिलतोड्या' अशी पदवी आजपासून तुम्हाला प्रदान करतो. पोवाडा म्हणणार्‍याने 'अफजलखान लै बिन-डोकं' असं म्हटलं, की जिरं रं र जीरं रं जी जी म्हणतो, तो झिलतोड्या Wink
हबिनंदन. ही आयडि उडाली की झिलतोड्या अशी घ्या नवी Wink

इब्लिस,

तुम्ही म्हणालात की कधीतरी तुमचा स्वतःचा हिंदू धर्म समजून घ्या. तर हरिहर अगोदर म्हणालेत की धर्माविषयीचे कुतूहल (तुम्हाला) गप्प बसू देत नाही.

हरिहर यांच्या कुठल्याही वक्तव्यात भोंदूगिरी दिसून येत नाही. तर मग विरोध आलाच कुठे? Uhoh

आ.न.,
-गा.पै.

कधीतरी तुमचा स्वतःचा हिंदू धर्म समजून घ्या. नुसते 'हिंदुत्ववादी' होऊ नका. माझ्या सारखे खरे हिंदू होऊन बघा. अन गर्वाने नव्हे, तर अभिमानाने म्हणा 'मी हिंदू आहे!'
<<
<<

Rofl

Lol

Rofl

<<<<<<<< अफजलखान लै बिन-डोकं' असं म्हटलं, की जिरं रं र जीरं रं जी जी म्हणतो, तो झिलतोड्या >>>>>>>>>>>

झिलतोड्या म्हणा किंवा काहीही म्हणा मात्र अफझल खानला डोक होत अस ईथे कोणीही म्हणणार नाही.

आपली ग्यारेंटी आहे.

ईब्लिस ,

<<<<<<<<<<<<कन्फ्यूजन, इर्रिटॅबिलिटी अन न्यूरोमस्क्युलर हायपरॅक्टिविटि, या गोष्टी मिळवण्यासाठी हिप्नोटायझिंग साऊंड्स पासून, चँट्स, व वेगवेगळ्या केमिकल्स (बहुतेकदा अ‍ॅरोमॅटिक) चा वापर पुजार्‍यांनी केलेला आहे. गांजाचा धूर, कापराचे जाळणे (थोडा जळतो, बाकि सब्लिमेट होतो), धूप, चंदन.. बंद गाभारे.. wel, one can imagine, and one can relate it to one's own experience. Interprete it as you want. Divine experience, or just drug induced high. >>>>>>>>>>>>

हे ज्ञान तुम्हीच पाजळले होते विसरलात ??
आणि वर ...........

<<< दारू पिणार्‍याचा तोल अन धर्माची अफू झोकलेल्याचा तोल यांत फरक आहे. तुमच्या अफूमुळे तुम्हाला सभ्य लोकही दारू प्याल्यासारखे वाटू लागतात हे माझे नव्हे, तुमचे दुर्दैव आहे. >>>>>>>

तुम्ही म्हणता ते 'धर्म' नावाचे कर्मकांड लाथ मारून दूर केले ..............>>>>>>
अरेरे काय दुर्देव या जिवात्म्याचे कित्येक जन्माच्या फेऱ्यानंतर याला भारतभूमीमध्ये जन्म लाभला. त्यातही मराठीसारखी मातृभाषा लाभली. पुढे जाऊन उच्चकुलीन असल्यामुळे व्रतबंधही झाला. आणि याला काय बुद्धी झाली असेल हो! तो तरी काय करणार बिचारा ! कारण हा सर्व मायेचा खेळ आहे. (धार्मिकग्रुपमध्ये असले बुळबुळीत झालेली आणि तुमच्या दृष्टीने अंधश्रद्धेने लडबडलेली वाक्येच तुम्हाला ऐकावी लागणार. त्याला आमचा नाइलाज आहे.)
एक अगाऊ पण प्रेमळ सल्ला - या जिवात्म्याने केवळ "राम-कृष्ण-हरि' असा उच्चार जरी केला तरी वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो. पण वेळ यावयास हवी. पुराणात एक कथा आलेली आहे- एका पाखंडी म्हातारीने बेलाचे पान कुतुहलापोटी खाल्ले. आवडले नाही म्हणून थुंकून टाकले. ते नेमके पडले शिवपिडींवर. झालं! ती मेल्यावर तिला शिवलोकात नेण्यासाठी भोळ्या सदाशिवाने आपले दूत पाठविले. तसे परमेश्र्वर दयाळू आहे. जसे शंकराचार्यांच्या वचनानुसार कुपुत्त्र होऊ शकतो पण कुमाता कधीही होऊ शकत नाही. त्यामुळेच त्या दयाळू परमेश्र्वराने माझ्या नावाची योजना केले असणार. "हरिहर" चा नक्की अर्थ काय याची ओढ या जिवात्म्याला लागलेली आहे. वाल्याच्या "म राम रा' सारखे नकळत का होइना तो हरिहर हरिहर असे टाइप करत आहे. छान! प्रगती आहे ! अशीच प्रगती ठेवली तर आम्हाला मागे सारून पुढे जाणार बहुतेक.

फेसबुकावरिल पोस्टी वाचून 'हिंदुत्व' हिडिसपणे मांडणे हाच.........>>>

आता पोस्टी वाचून मी कोठे बरे हिडीसपणे धर्म मांडला हे मी विचारण्या अगोदरच इतरांनी विचालेले आहे. त्यावर तुमचे प्रत्युत्तर नाही. त्यामुळे हा विषय मी नव्याने मांडत नाही.

दारू पिणार्‍याचा तोल अन धर्माची अफू झोकलेल्याचा तोल यांत.............>>

साफ चूक. अफू खाल्लेला माणूस स्वतःच्या मस्तीतच असतो. त्याला जगाची फिकीर नसते. दुसऱ्याने दारु पिली काय किंवा गोमूत्र पिले काय त्याला काही फरक पडत नाही. हा! विद्वानांनी धर्मास अफूची उपमा दिलेली आहे हे मात्र मान्य. आपला हिंदूधर्म एवढा परिपूर्ण आहे की खऱ्या हिंदू व्यक्तीस दुसरीकडे डोकावण्याची आवश्यकताच वाटत नाही, एवढा तो सहिष्णू आहे की दुसऱ्या धर्माचा द्वेषही करावा वाटत नाही. त्यामुळे आम्ही आमच्याच मस्तीमध्ये आहोत. तुम्ही किती जरी दूषणे दिली तरी फरक पडत नाही. त्यामुळे 'धर्माची अफू झोकल्यानंतर सभ्य लोक दारु पिल्यासारखे वाटू लागतात' हे तुमचे वाक्य नशेत लिहील्यासारखे वाटते.

अभ्यास वाढवा. काखा वर करणे अन बगल देणे. हे एकत्र आहे. पितरांना 'देणे' देणे शक्य नसेल ....>>>>>

मोल्सवर्थच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशातील पृष्ठ क्र. 560 मधील मधल्या कॉलममध्ये "बगल' या शब्दाचे विश्र्लेषण दिलेले आहे. ते असे -
बगल f ( P....फारसी शब्द) The armpit. 2. The Triangular piece under the arm of an अंगरखा,.................................................................(असा अर्थ देऊन पुढील प्रमाणे उदा. दिलेली आहेत.) बगलेंत घालून चतुःसमुद्रांचे स्नान करून यावें To account very lightly, बगलेंत मारणें To clap under one's arm, बगलेंत असणें g. of o. To be under the patronage of ; also within the grasp or power of, बगलेंत धरणें To take into one's patronage, बगल दाखविणे or बगला वर करणे To declare one's own bankruptcy, बगलेतून गोष्ट काढणे To create a matter out of one's own hand, to invent.
आता तुम्ही जो शब्दप्रयोग वापरला "बगल दिली', अर्थात "बगल देणे' याचा उपरोक्त शब्दकोशामध्ये दिलेला नाही. त्यामुळे तो संदर्भानुसार घ्यावा लागतो. तुम्ही जो अर्थ विशद करून सांगितला त्याला "बगल दाखवली' असे म्हणतात. व त्याचा अर्थ "दिवाळखोर' असा होतो. एखादी गोष्ट सोईस्करपणे टाळली म्हणजे "दिवाळखोरी' घोषित केली याचा काही संदर्भ लागत नाही. म्हणूनच "बगल दिली' ह्याचा अर्थ तुम्हाला समजेल अशा भाषेत विशद करून सांगितला. कारण धागा (विशेषकरून धार्मिक धागा) दिसायचा अवकाश की तुम्ही लगेच तो भादरावयास घेता. ज्याप्रमाणे रस्त्यावर चप्पल दुरुस्तीसाठी बसलेला आल्या-गेल्यांच्याकडे बघतो आणि लगेच त्याच्या पायाकडे पाहतो त्याप्रमाणे तुमचे झालेले आहे. दिसला धागा घे भादरायला. म्हणून "बगल दिली' याचा अर्थ तुम्हाला समजेल असा करावा लागला. अर्थात त्यापूर्वी मी शब्दकोश पाहिलेला होता. कारण मला माहीत होते की माझ्या या धाग्यावर तुम्ही लगेच भादरायला घेणार. त्यामुळे आता येथून पुढे जरा विचार करून भादरा. नाहीतर http://www.maayboli.com/node/37469 या धाग्यावर (मग पैसे खूपच कमी असतील तुमच्याकडे अरेरे .....) या वाक्यामुळे जशी (हेच मी जरा 'इनोदी' स्टायलिने लिवायला गेल्तो. लोकास्नी राग आला. माझे चुकले असे म्हणतो. धन्यवाद!) तुम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागली तशी (आपल्यासारख्या विद्वानाला) ती वारंवार करावी लागू नये हीच सदिच्छा.

तात्पर्य - तुम्हीदेखील अभ्यास वाढवा. वरवर अभ्यास करू नका तर सखोल करा. मुख्य म्हणजे कितीही जरी अभ्यास केला तरी शिंगे फुटे देऊ नका. नाहीतर जेवढी शिंगे वाढतील तेवढीच ती जास्त फसण्याची शक्यता असते. स्टिफन हॉकिंज्‌ सारख्या विद्वानाला देखील आपले म्हणणे माघार घ्यावे लागले आहे.

दुसरे म्हणजे यापुढे मला एखाद्या फालतू गोष्टीवर एवढे सविस्तर लिहायला तुमच्यासाठी वेळही नाही आणि तेवढा उत्साहही नाही. त्यामुळे मी तुम्हाला वेळोवेळी प्रत्युत्तर देऊ शकेनच याची खात्री नाही. तथापि जर मी ते देऊ शकलो नाही याचा अर्थ "शेपूट घातली' असा घेतला जाऊ नये ही नम्र विनंती.

आता हा विषय सोडून धाग्याच्या मुख्य विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे.
.
.
(बाय द वे - पोस्टीमध्ये चित्रांकित डोळा मारणे, हसणे इ. इ. हे कसे साध्य करावे या संदर्भात कृपया कोणीतरी मला मार्गदर्शन करावे. म्हणजे अधिकाधिक आकर्षक पोस्टी तयार करता येतील. 'बाफ' म्हणजे काय हेही कृपया सांगावे.)

हरीहरजी खालची लिंक बघा.

http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

आपण जेव्हा लिहीतो तेव्हा या खालच्याच चौकोनाखाली Textual smileys असे निळ्या रंगात आहे, त्यावर click करा.

बाफ म्हणजे बातमी फलक. मी जुन्या माबोवर होते तेव्हा बीबी म्हणायचे याला. म्हणजे बुलेटीन बोर्ड.

Pages