Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23
मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो स्वप्नाली, माझी दोन्ही
हो स्वप्नाली, माझी दोन्ही मशिन खूप आवाज तर करतातच आणि आत्ताचं मशिन हलतही खूप.
अजूनही पक्क्या निर्णया पर्यंत
अजूनही पक्क्या निर्णया पर्यंत आले नाही, पण LG घ्यावा अशी ८०% मानसिक तयारी झाली आहे.
कारण त्याची Inverter Direct Drive Technology.
<व्हर्लपुलची कस्टमर सर्विस
<व्हर्लपुलची कस्टमर सर्विस चांगली नाही असे ऐकले आह>
माझा अनुभव उलट आहे. खूप चांगली सर्व्हिस आहे. आतापर्यंत दोन्ही (फ्रीज - वॉ म) मिळून तीनदाच गरज पडली. आणि चांगली सर्व्हिस मिळाली.
सुदैवाने मला व्हर्लपुलची
सुदैवाने मला व्हर्लपुलची सर्व्हिस घेण्याची वेळ अजून आली नाहिये( कारण फ्रिज आणि वॉम दोन्ही प्रचंड नविन आहे.) पण डिलिव्हरी मी उशिरा घेतली डिलर कडून तर रोज मला त्यांचे डेमो साठी फोन येत होते. त्याउलट ओनिडा चा मावे घेतला तरिही डेमोला कोणिच आले नाही ८-१० दिवस.. मी फोन करूनही त्या माणसाने फलाणा-टिमकाना वेळेलाच येईन असं निक्षून सांगितलं होतं.
मी व्हर्लपुल सर्विस बद्दल
मी व्हर्लपुल सर्विस बद्दल फक्त ऐकले आहे.
तुम्हाला चांगली सर्विस मिळाली असेल तर चांगलेच आहे
IFB बेस्ट . मी ५ वर्ष
IFB बेस्ट . मी ५ वर्ष वापरतेय. एकदाही कस्टमर सर्व्हिस्ला बोलावल नाही. साबणाची पावडर फ्रन्ट लोडिन्गची वापरणे. सहा महिन्यातुन एकदा क्लेन्सिन्ग पावडर ने ३० म. रिकाम मशिन फिरवणे. वगैरे पथ्य. पाळली की झाल. कफ्स आणि कॉलर साठी त्यान्च एक लिक्विड आहे ते लाउन ५ मि. ठेवायच.माझा मुलगा फुट्बॉल खेळतो तेही मळके कपडे स्वच्छ धुतले जातात. बॅलन्सिन्ग केल असेल तर आवाज्पण नाही. पाणी विज पण कमी लागते.
गोदरेजवाल्यांचा आम्हाला फोन
गोदरेजवाल्यांचा आम्हाला फोन आलाय. एक्स्चेंज ऑफर इत्यादी. आधीचं किमान १५ वर्ष तरी जुनं आहे.
दुकानात जायला लागणार नाही हा फायदा म्हणून बाबा विचार करतायत.
गोदरेजची बरी आहेत का वॉम?
की एल्जी किंवा आयएफबीच बघावे?
ओळखीतल्या कुणाकडूनही गोदरेजचा
ओळखीतल्या कुणाकडूनही गोदरेजचा अनुभव ऐकला नाहीये. पण गोदरेज घ्यायचं असेल तर त्यातले फ्रंट लोडींगवाले मॉडेल्स बघ.
फ्रंट लोडिंगवाले २७ के च्या
फ्रंट लोडिंगवाले २७ के च्या वर आहेत. बाबांशी बोलून बघते. पण कुणी गोदरेज वापरलेले असतील तर सांगा.
नी, आयएफबीचीही अशीच काही ऑफर
नी, आयएफबीचीही अशीच काही ऑफर सुरु आहे. कोणत्याही कंपनीचे जुने वॉम देऊन नवीनवर १०००० पर्यंत सूट अशी काहीतरी.
चेक कर.
नक्की गोदरेज वाल्यांचाच फोन
नक्की गोदरेज वाल्यांचाच फोन होता का ते तपासा (डीलर कडुन असावा बहुधा). बाय बॅक स्किम मध्ये घेत असणार तर पहिल्या तुमच्या वॉशिंग मशीन चे भाव काय मिळणार ते ठरवुन घ्या, मॉल वाले सहसा बाय बॅक स्किम मध्ये पहिला त्यांच्या नवीन वॉशिंग मशीन चे पुर्ण पेमेंट करावयास सांगतात आणि नंतर आपल्या घरात येऊन आपल्या वस्तु चे मुल्यांकन करतात आणि मन मर्जी करतात.
४-५ लहान डीलर कडुन पहिल्या आपल्या कोणता वॉशिंग मशीन हवा त्याचे भाव काढायचे आणि नंतर जुनं वॉशिंग मशीन काढायचे आहे असे सांगायचे व त्याचे किती भाव किती येईल ते विचारायचे.
नी, गोदरेजवाले जुने मशिन
नी, गोदरेजवाले जुने मशिन घेतल्यावर किती सुट देतात हे बघ आधी. प्राची म्हणतेय त्याप्रमाणे आयएफबी वाल्यांची पॉलिसी पण बघून घे.
जर तिथे पाण्याची कमतरता वैगरे काही प्रश्न नसेल तर एकट्या बाबांसाठी टॉप लोड घ्यायलाही काही हरकत नाही. त्यांचे कपडे काही खूप मळत नसणार. खूपच मळके कपडे असतात त्यावेळी टॉप लोड मध्ये हाताने घासावे लागतात म्हणून फ्रंट लोड घेणं ठिक आहे, पण तशी आवश्यकता नसेल तर उगीच जास्त पैसे गुंतवायची काय गरज?
आम्ही गेल्या वर्षी नविन मशिन घेताना, ९ वर्ष जुन्या व्हर्लपुलच्या सेमी ऑटोमॅटीक मशिनवर बाय बॅक मध्ये किती सुट मिळेल याची चौकशी केली होती. बहूतेक दुकानदारांनी १.५-२k पेक्षा जास्त मिळणार नाहीत सांगितल्यावर, जुन्या मशिनवर अजून ५०० रु खर्च करुन ते आमच्याकडच्या ड्रायव्हर काकांना वापरायला देवून टाकलं.
आपल्या भरवश्या च्या दुकानात
आपल्या भरवश्या च्या दुकानात सर्वात शेवटीला जायचे आणि त्याला सांगायचे की बाबा रे असे असे आहे आणि असे असे करायचे आहे.
कंपनीचेच आहे. डिरेक्टली
कंपनीचेच आहे. डिरेक्टली कंपनीकडून खरेदी आहे. त्यांचा माणूस येऊन बघून गेला. जुन्या वॉम चे इव्हॅल झाले. नवीनच्या प्राइसेस सांगितल्या. इव्हॅल बद्दल काही प्रॉब्लेम वाटत नाहीये.
आता इथे दुकानांच्यात जाऊन बघून येणारे गोदरेजच्या आणि इतर कंपन्यांच्याही किंमती इत्यादी.
हो अल्पना फ्रंट लोड वर
हो अल्पना फ्रंट लोड वर बाबांनी एका क्षणात फुली मारलीये
बाकी धन्स सगळे. कुणाला गोदरेजचा अनुभव असेल तर प्लीज लिहा मात्र.
एरवी मार्केटमधे वॉम चे कुठले ब्रॅण्डस जोरात आहेत?
मी इलेक्ट्रोलक्स टॉप लोडिंग
मी इलेक्ट्रोलक्स टॉप लोडिंग फुल्ली ऑटोम्याटिक घेतलेआहे सध्या. १३०००.०० मस्त चालले आहे.
पन एल जी ट्रॉम फ्रंट लोडिंग मस्त आहे. माझे एक्स मशीन. जे आत्ता हैद्राबादमधी लोकांची सेवा करत आहे.
IFB किंवा सिमेन्स फ्रन्ट
IFB किंवा सिमेन्स फ्रन्ट लोडींग घ्या.
फ्रंट लोडींग घ्यायचे नाहीये.
फ्रंट लोडींग घ्यायचे नाहीये. टॉप लोडींगच हवे आहे.
आम्हाला पण मशीन चेंज करायची
आम्हाला पण मशीन चेंज करायची आहे. आधिची मशीच १२-१५ वर्ष वापरली, आताची सॅमसंग ची जेमतेम ५ वर्षात खालुन साफ गंजली आहे. यावेळी रस्ट प्रुफ मशीन घ्यायचा विचार आहे. आशा मशिन्स मिळतात म्हणे बाजारात. कोणाला माहीत आहे का ह्या बद्दल काही!
रस्ट प्रूफ म्हणजे, रस्ट प्रूफ
रस्ट प्रूफ म्हणजे, रस्ट प्रूफ कलर असतो माझ्यामाहीतीप्रमाणे. किंवा प्लॅस्टिक बॉडी चा विचार करू शकता.
नुकतेच आय. एफ. बी. चे
नुकतेच आय. एफ. बी. चे समोरच्या दाराचे धुलाईयंत्र घरी आले आहे. त्यांचा तंत्रज्ञ डेमोसाठी येण्यापूर्वी त्याच्या रोपणपूर्व गरजा (pre-installation requirements) काय आहेत, त्या जाणून त्यांची पूर्तता करून ठेवावी (पाण्याच्या तोटीचा प्रकार / आकार, इलेक्ट्रीक पॉइंट किती क्षमतेचा वगैरे..) म्हणून त्यांच्या ग्राहकसेवेत विचारणा केली तर त्यांना तांत्रिक काहीच माहिती नाही असे उत्तर मिळाले. जिथून घेतले तिथे सांगितले होते की, आयएफबीला फोन केल्यावर ही सगळी माहिती सांगतील.
आयएफबी च्या साइटवर हा नंबर
आयएफबी च्या साइटवर हा नंबर मिळालाय- 1860 425 5678 / 3900 4321. पहा प्रयत्न करून. बहुतेक टोल फ्री नंबरवर माहीती मिळावी...
मी माझ्या प्लंबरला आणि
मी माझ्या प्लंबरला आणि इलेक्ट्रीशिअनला बोलवून रोपणपूर्व गरजा पूर्ण घेतल्या होत्या. त्यांना पुरेशी कल्पना असते त्याची. पाण्याची जोडणी शक्यतो माळ्यावरच्या टाकीतून घेऊ नये.
गजानन | 24 June, 2012 - 18:57
गजानन | 24 June, 2012 - 18:57 नवीन
इतकं गंदं पट्टक मराठी कश्यापायी लिव्ता हो? विन्ग्रजीतून अर्थ लिवाय्ला लाग्तोय तर डाय्रेक्ट विंग्रजी लिवा कि!
उग्ग हाय उपस करून :
"त्यांचा तंत्रज्ञ डेमोसाठी येण्यापूर्वी त्याच्या रोपणपूर्व गरजा (pre-installation requirements) काय आहेत, त्या जाणून त्यांची पूर्तता करून ठेवावी (पाण्याच्या तोटीचा प्रकार / आकार, इलेक्ट्रीक पॉइंट किती क्षमतेचा वगैरे..) म्हणून त्यांच्या ग्राहकसेवेत विचारणा केली तर त्यांना तांत्रिक काहीच माहिती नाही असे उत्तर मिळाले."
"डेमो" साठी मर्हाटी रडली वाट्टं तुमची? प्रदर्शन, इक्रीपूर्व प्रदर्शन, अस्ले काही अग्निरथस्थानक स्टाईल नवे शब्द पाडा! इच्चीगमभन! रोपणपूर्व गरजा म्हणे...
(रोपणापूर्वीच (समोरच्या दारातून) सटकलेला) इब्लिस.
इबळीस मिसळपाव वरून आलात की
इबळीस मिसळपाव वरून आलात की काय ? पन पाईण हाय तुम्च्या म्हनन्यात
योगेश, धन्यवाद. झालं
योगेश, धन्यवाद.
झालं प्रात्यक्षिक आणि सगळं. माधव, नाही माळ्यावरच्या टाकीतून नाही. थेट नळालाच जोडणी केलीय, त्यामुळे काही अडचण नाही सध्या.
इब्लीस, बरे बरे (म्हणजे OK OK). जरूर प्रयत्न करीन. आणि तुम्ही म्हणता तसे 'डेमो' पुढे माझी गाडी अडली होती.
व्हर्लपुल टॉप लोडींग मशिन
व्हर्लपुल टॉप लोडींग मशिन चांगले आहे. (सर्विसही चांगली आहे).
मी IFB चं फ्रंट लोडिंग मशिन
मी IFB चं फ्रंट लोडिंग मशिन घ्यायचा विचार करतोय. त्यानुसार काही प्रश्न. काही प्रश्न टॉप लोडिंग साठी पण लागू होतील.
१) मी पाहिलेली फ्रंट लोडिंग मशिन्स मध्ये एकच ड्रम होता, याचा अर्थ वॉशर+ ड्रायर एकातच असतात की आणखी काही विकत घ्यावं लागतं? स्टीम ड्रायर मोड असतो का?
२) मशिन मध्ये पाणी थेट बेसिन्/बाथरुम मधील नळातून सोडता येते की आणखी काही नवीन जोडणी करावी लागते? pre-installation requirements काय आहेत, (पाण्याच्या तोटीचा प्रकार / आकार, इलेक्ट्रीक पॉइंट किती क्षमतेचा वगैरे..) मी सध्या भाड्याने राहतोय, तिथे मला असे काही बदल करता येणार नाहीत.
३) टॉप लोडिंग मध्ये पण 'Agitator' शिवाय अस्णारी मॉडेल्स उपलब्ध आहेत, त्यांचा फायदा काय?
४) टॉप लोडिंग आणि फ्रंट लोडिंगच्या किंमतीत जवळपास १० हजारांचा फरक आहे मग लाँग रन मध्ये फ्रंट लोडिंग फायदेशीर ठरतात काय?
SAMSUNG CHE GHYA
SAMSUNG CHE GHYA
आयएफबी फ्रंट लोडींग फुल्ली
आयएफबी फ्रंट लोडींग फुल्ली अॅटोमॅटिक वापरतोय ३ वर्ष, अजुन तरी काही प्रोब्लेम नाही. जर मशीन आवाज करत असेल तर लेवेल पुन्हा एकदा अॅड्जस्ट करा. हलत असेल तर मोटर व ड्रमचा रबर बेल्ट सैल झाला नाही ना हे बघा, असल्यास बदलुन घ्या. इन्स्टॉलेशन्च्या वेळेस मागे ड्रम सुरक्षेसाठी दोन स्क्रु लावलेले असतात ते काढलेले आहेत ह्याची खात्री करा. असेही आयएफबी वाले ४ वर्षाची १००% गॅरंटी देतात.
Pages