सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांची बोट चुकून त्यांना समुद्रातच विसरून येते >>>>>>

मी पहिल्यांदा वाचलं , त्यांची बोट चुकून (ते) त्या समुद्रातच विसरून येतात. Uhoh
मनात म्हटलं " अशी काय ही माणसं "

इथे जामोप्यांनी सजेस्ट केलं म्हणून खामोश (विधू विनोद चोप्रा) पाहिला. सही सिनेमा आहे. पण जिचा खून होतो तिच्या कानातले सापडतात तो संदर्भ नंतर कुठे स्पष्ट केला गेला नाहीये. त्याचा उलगडा झालाच नाही मला. कुणी विस्कटून सांगेल काय. इथे रहस्याचा भेद होणे अपेक्षित नसेल तर संपर्कातून कळवा.

नक्की आठवत नाही.. पण त्या कानातले एक कुणाच्या तरी खोलीत कार्पेट्वर की खाली सापडते, असे काहीतरी आहे..

नक्की आठवत नाही.. पण त्या कानातले एक कुणाच्या तरी खोलीत कार्पेट्वर की खाली सापडते, असे काहीतरी आहे..
>>>
सोनी राजदान च्या कानातल्याचा जोड असतो. एक तिचा मृत्यु जिथे झाला त्या बोट हाऊस मधे व दुसरे सुषमा सेठ च्या खोलीत उशी खाली सापडते. पण मग त्याचे काय? त्यातून काय बोध होतो? शंकेची सुई सुषमा सेठकडे फिरवायची आहे म्हणून असा सीन दाखवला असे मान्य करु एक वेळ. पण मग तिच्याकडे कुठून आले ते कानातले ह्याचा काहीच आगापीछा नाहीये आणि पुढेही काही संदर्भ नाहीये. मीच नीट पाहिला नसेल असे वाटले म्हणून इथे विचारतेय की कुणाला कळले का ते!

काल सोनी पिक्स वर possession नावाचा पिक्चर पाहिला.. सुपरनॅचरल मधला " डॅनी " आहे. खुप दिवसांनी भुत्,रक्त,सावल्यांचा खेळ पाहिला... ओके होता.. लहान मुलीने झपाटल्यानंतरची अ‍ॅक्टींग मस्त केली आहे.

drag me to the hell ......
paranoromal activity.....
The exorcism of Emily Rose .. सत्यकथेवर आधरित आहे ... फार भिती वाटते बाबा....

Legion - मानवजातीला कंटाळून देव त्यांना मारायला एन्जल्स पाठवतो. पण तेव्हाच एक मूल जन्माला येणार असतं जे वाचलं तर मानवजातीचा उध्दार करणार असतं. टीव्हीवर लागतो हा पिक्चर बर्‍याचदा.

तसंच द हिल्स हॅव आईज. आणखी एक पिक्चर होता त्यात ३-४ स्टुडन्टस एका गावात एका डोंगरावर जातात पण गावातले लोक त्यांना खाली उतरू देत नाहीत. कारण तिथे असलेल्या एका वनस्पतीमुळे ते मरणार असतात आणि ते संसर्गजन्य असतं असं काहीतरी कथानक होतं. नाव आठवत नाही.

मिरर्स, द फॉग हेही चांगले आहेत. कदाचित मी ह्याआधी ह्या बीबीवर लिहिलं असेल. इतकी पानं मागे जाऊन वाचायचा कंटाळा आलाय.

आणखी एक पिक्चर होता त्यात ३-४ स्टुडन्टस एका गावात एका डोंगरावर जातात पण गावातले लोक त्यांना खाली उतरू देत नाहीत. कारण तिथे असलेल्या एका वनस्पतीमुळे ते मरणार असतात आणि ते संसर्गजन्य असतं असं काहीतरी कथानक होतं. नाव आठवत नाही.>>>>>>>> मेक्सिकन जंगल दाखवलेय. नाव विसरलो सिनेमाचे

तसंच द हिल्स हॅव आईज.>>>>>>>>>>अतिशय घाणरेडा आनि किळसवाणा चित्रपट आहे.. आनि त्याचे ३ पार्ट पण काढलेत वर ....

आणखी एक पिक्चर होता त्यात ३-४ स्टुडन्टस एका गावात एका डोंगरावर जातात पण गावातले लोक त्यांना खाली उतरू देत नाहीत. कारण तिथे असलेल्या एका वनस्पतीमुळे ते मरणार असतात आणि ते संसर्गजन्य असतं असं काहीतरी कथानक होतं. नाव आठवत ना>>तुम्हाला the ruins म्हणायचाय

तसंच द हिल्स हॅव आईज.>>>>>>>>>>अतिशय घाणरेडा आनि किळसवाणा चित्रपट आहे.. आनि त्याचे ३ पार्ट पण काढलेत वर . >>>>> +१

legion हि तसाच आहे फालतु आणी सारखा लागत असतो हल्ली.

मला जुना राजेश खन्नाचा फरार पहिल्यांदा पाहिला तेव्हा आवडला होता. रहस्य चांगले आहे त्यातले. पहिल्यांदा पहाताना मजा येते.

>>तसंच द हिल्स हॅव आईज.>>>>>>>>>>अतिशय घाणरेडा आनि किळसवाणा चित्रपट आहे
हे मात्र बरोबर. मी पहिला अर्धा पाहिला आणि मग पुढचे पहायच्या फंदात पडले नाही.

>>तुम्हाला the ruins म्हणायचाय
असेल असामी.

पुनर्जन्मावरून आठवलं. ड्रॅगनफ्लाय म्हणून एक पिक्चर आहे. त्यावरून हिंदीत 'साया' काढला होता - जॉन अब्राहम आणि तारा शर्मा.

पॅरिस हिल्टन ने काम केलेला हाऊस ऑफ व्हॅक्स - हा मात्र काढायचा होता थरारपट आणि झाला तुफान विनोदी असला प्रकार आहे.

पॅरिस हिल्टन ने काम केलेला हाऊस ऑफ व्हॅक्स - हा मात्र काढायचा होता थरारपट आणि झाला तुफान विनोदी असला प्रकार आहे.>>>>>>>>. +१ जो कल्प्रिट आहे तो तर थर्ड क्लास दाखवलाय

Whiteout - अंटार्क्टिका मध्ये सहा महिन्यांसाठी सूर्य अस्ताला जात असतो आणि एक वादळ येणार असतं. तिथल्या रिसर्च स्टेशनमधे एक बॉडी सापडते. लवकरच आणखी बॉडीज सापडतात. ह्याचा शोध लावायची जबाबदारी हिरविणीवर येउन पडते.

मी मध्यंतरी कोणता तरी सिनेमा पाहिला होता टिव्हीवर. तिथे काही विद्यार्थी कोणत्या तरी दुसर्‍या देशात गेलेले असतात, तिथे त्यांना खूप त्रास दिला जातो, हात पाय वगैरे कट केले जातात अशी काय्तरी कथा होती.. बेक्कार घाण होता.

अंकु - एक्सॉरसिझम ऑफ एमिली रोज पण भयाण आहे सिनेमा..

जुना हाऊस ऑफ वॅक्स कुणि पाहिलाय? आणि नविन?

जुना बराच सुसह्य होता, नविन भयंकर इफेक्टिव्ह झालाय. शेवटी ते हाऊस वितळताना पाहणं छान असं नाही पण विलक्षण आहे.

जुना हाऊस ऑफ वॅक्स कुणि पाहिलाय? आणि नविन?>>>>>>>>>> मी नविन पाहिला आहे.. ओके आहे.. त्यामधे वन ट्री हिल मधला एक भाऊ आहे लीड मधे.. वॉर्नर ब्रदर चॅनेल वर सारखा दाखवतात.
अंकु - एक्सॉरसिझम ऑफ एमिली रोज पण भयाण आहे सिनेमा.. >>>>>>>>>>>> काय मस्त अ‍ॅक्टींग केली आहे तिने.. तो शॉट तर कसला भयाण आहे.. तिला पुर्ण शरीराल आकडी येते.. अनि ती खाली कोसळते.... मज्जाच

अजुन एक पिक्स्चर आहे... कॉस्नटीन...मला नीट टायपता येत नाहीये...
ममी २ पार्ट मधली हिरवीण रेचेल वाईज आनि keanu reeves आहे त्यात.

मी द फोर्थ काइंड बघायला सुरुवात केली आहे. बरा वाटतोय, उत्कंठा वाढलीये. अलास्कामध्ये घडलेल्या सत्यघटनांवर आधारीत आहे असं म्हटलंय.

सिनेमाची हाताळणी जरा वेगळ्या पध्दतीनं केली आहे. सिनेमा सुरू असताना मध्येच एखाद्या शॉटचं खरं व्हिडिओ फूटेज दाखवतात. कधीकधी दोन्ही एकाचवेळी अर्ध्याअर्ध्या भागात दाखवताहेत. आता हे कळायला मार्ग नाही की ती व्हिडिओ फूटेजेस खरीच आहेत की सिनेमाचाच एक भाग म्हणून आली आहेत. आगे आगे देखिये होता है क्या......

पूर्ण बघून झाला की इथे लिहिन. काय की बाई, पकवलंन की या शिणुमानं. ताणताणून धरतात न शेवटी काहीच निष्पन्न होत नाही. मात्र गोष्ट खर्‍या घटनांवर आधारीत आहेसं दिसतंय. इच्छुकांनी इथे भेट द्यावी : http://www.topsecretwriters.com/2012/05/the-real-story-behind-nome-alask...

राजेश खन्नाचा रहस्यमय चित्रपट "इत्तेफाक". फरार अमिताभ-शर्मिला टागोरचा होता.

"द स्लीपी हॉलो" कोणी आधी कथा वाचली नसेल तर रहस्य छान आहे.

डेंझेलचा "फॉलन" सुद्धा छान आहे. (रहस्य माहित असेल तरीही पहायला चांगला आहे).

बॉबी देओल - प्रिती झिंटाचा 'सोल्जर' ही छान suspense thriller होता.

अजून काही आवडलेले आणि कदाचित फार परिचित नसलेले हिंदी रहस्यपट
कब क्यो और कहा
राजेश खन्नाचा राज
सावन भादो
खेल खेल मे
देव आनंद -आशा पारेखचा महल

गुप्त (बॉबी देओल, मनिषा, काजोल) बरा काढला होता.
तसंच जुन्या काळातले - गुमनाम, मेरा साया, बीस साल बाद, कोहरा, ज्वेल थीफ
महल, पूनमकी रात (मला हे २ अजिबात आवडले नव्हते)

ऋषी कपूरच ' खोज ' पण छान होता. त्यावेळेला आवडला होता. (पण आत्ता अस वाटतं की नक्कीच ढापलेला असेल)

मी मध्यंतरी कोणता तरी सिनेमा पाहिला होता टिव्हीवर. तिथे काही विद्यार्थी कोणत्या तरी दुसर्‍या देशात गेलेले असतात, तिथे त्यांना खूप त्रास दिला जातो, हात पाय वगैरे कट केले जातात अशी काय्तरी कथा होती.. बेक्कार घाण होता. >>>>>>>>>>>>>>>>
.
.
हॉस्टेल ..........हा होता......त्याचे पार्ट देखील आले आहेत

Murder on Oriental Express - अ‍ॅगाथा ख्रिस्ती च्या पुस्तकावर आधारित. पुस्तक वाचलं नसेल, तर आवर्जून पहावा. आणि रहस्य माहित असताना सुद्धा, एक चांगला सिनेमा म्हणून नक्किच बघण्यासारखा आहे.

Pages