सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायको थ्रिलर्स आवडत असतील तर 'मलहॉलंड ड्राइव्ह' जरूर बघा.

(मला असाच बाफ आधी आल्याचं आणि त्यावर हेच सिनेमे सुचवल्याचं का बरं आठवत/वाटत आहे? देजा वु की काय?!)

भुतपिशाच्च किंवा व्हॅम्पायर म्हटलं कि Twilight सिरिजचा पण उल्लेख व्हायला हवा इथे.>> ती संपूर्ण सिरीज म्हणजे तमाम व्हॅम्पायरांवर अन्याय करणारी आहे Lol

ती संपूर्ण सिरीज म्हणजे तमाम व्हॅम्पायरांवर अन्याय करणारी आहे >>> हो तर काय. बिचारे रक्त प्यायच्या ऐवजी प्यारमें गम के आंसु पीत राहिलेत.
पण तरी मला आवडली सिरिज. Happy

वाट पहाते पुनवेची.. अलका कुबल पुढच्या जन्मात निशिगंधा वाड होते..
>>>>
बोम्बला , म्हणजे काय? निदान सई ताम्हणकर म्हणून तरी जन्म घ्यायचा.दोन्ही जन्म पुच्याटच Proud

गझनी आणि मेमेम्टोची स्तॉरी वेगळी आहे... मेमरी लॉस आणि कॅमेरा घेऊन फिरणं इतकच साम्य आहे... >> मग ह्या धर्तीवर.. रामगोपालवर्माने कपोलाला सरकारची स्टोरी ऐकवून 'माझा हा नवा सिनेमा डिरेक्ट करणार का?' असं विचारलं तर काही वावगं ठरू नये. नाही तरी त्यात एक क्राईम लॉर्ड ,त्याच्यावर हल्ला, धाकट्या मुलाची हिरोगिरी, नवीन ड्र्ग कार्टेलची घुसखोरी अणि अजून फक्त काहीश्याच गोष्टींचंच साम्य आहे.

बाळू जोशी Happy

"थ्रिलर" गटात सर्वार्थाने पात्र असलेली चित्रपटाची एक सीरीज म्हणजे

१. बोर्न आयडेन्टिटी
२. बोर्न सुप्रिमसी
३. बोर्न अल्टीमेटम

अपघाताने "मेमरी लॉस" झालेला सीआयए चा एक भाडोत्री मारेकरी 'जेसन बोर्न' आणि त्याने एजन्सीसाठी केलेली 'कृष्णकृत्ये' त्याच्या मृत्युनेच नाहीशी व्हावीत यासाठी वरिष्ठ पातळीवर चाललेली गुफ्तगू हालचाल. बोर्नची स्वतःला शोधण्याची तडफड, त्यासाठी करत असलेला तो आटापिटा, त्याला मारण्यासाठी त्याच्या मागावर येणारे अन्य भाडोत्री, आणि यासर्वातून बोर्नची जगण्याची दुर्दम्य इच्छा तसेच सीआयए चा बुरखा काढून त्या एजन्सीचे सत्य रूप जगाला दाखविण्याची त्याची मनिषा.... या सर्वांची वेगवान हाताळणी करण्यार्‍या दिग्दर्शक, संगीतकार, कॅमेरामन, एडिटिंग टीम यांचे अभिनंदन करावे असे वाटते.

"जेसन बोर्न' च्या भूमिकेतील क्षमता जबरदस्तपणे सादर करण्यार्‍या मॅट डेमॉनबद्दल तर जोरदार टाळ्या द्यावात असे वाटते.

क्रमांक २ च्या चित्रपटाचे काही शूटिंग गोव्याच्या काणकोण बीचवर झाले आहे. तेथील 'कार चेस' दृश्य अंगावर शहारे उभे करतात.

तिन्ही चित्रपट एकसो एक आहेत.

"जेसन बोर्न' च्या भूमिकेतील क्षमता जबरदस्तपणे सादर करण्यार्‍या मॅट डेमॉनबद्दल तर जोरदार टाळ्या द्यावात असे वाटते.>>>अगदी अगदी

आजुन काही हॉरर सिनेमे:
Child's Play
American Warewolf in London
Nightmare on Elm Street

एका जपानी Serial Killer वर एक सिनेमा पाहिला होता. नाव आठवत नाही पण सत्य घटनेवर आधारीत होता. जपानी, कोरीयन वगैरे काहीवेळा इंग्लीश सिनेमापेक्षा बरे असतात.

कुणी यांची नांवे सांगू शकेल कां?
१. उत्पल दत्त संपत्तीचा लोभी असतो. मेल्यावर ती कुणाला मिळू नये म्हणून तो लहान मुलाचा बळी देतो. नंतर कळते की तो त्याचाच नातू असतो.
२. अमोल पालेकर मानवी गर्भांचा व्यापार करणारा दलाल दाखवलाय.
हे दोन्ही चित्रपट लहानपणी दु.द. वर पाहिले आहेत.

हलचल नावाचा जुना सिनेमा आहे. ह्यात चित्रपटाचा नायक दोन प्रेमिकांमधलं संभाषण ऐकतो त्यात तो माणूस आपल्या बायकोचा खून करणार असतो. नायक त्या माणसाचं नाव ऐकतो पण त्याच नावाच्या अनेक व्यक्ती असतात.

जुन्या चित्रपटात मनोज कुमार-साधनाचा 'वो कौन थी' ही सुरेख आहे.

"हलचल" ~ येस्स. तो ओ.पी.रल्हनचा चित्रपट, कबिर बेदीचाही पहिलाच. तुम्ही म्हणता तसे ते दोन प्रेमिकांचे संभाषण [बायकोचा खून वगैरे..] ही तर त्या काळातील रेडिओवर लागणारी श्रुतिका असते, आणि ते संभाषण पलिकडच्या बाजूला कामात मग्न असलेल्या रल्हन या कारागिराच्या कानी पडते. त्याला वाटते आपण पाहिलेले जोडपेच तो खूनाचा कट शिजवित आहेत....मग पुढे कथानक रंगतदारपणे जाते. छान कल्पना होती. सारेच कलाकार अगदी नवे होते.

अमोल पालेकर आणि दिप्ती नवलचा एक सीनेमा "अनकही". त्यात अमोल च्या पत्रिकेत असतं की त्याची पहिली पत्नी तिच्या गर्भा सकट मरण पावेल आणि मग त्याच दुसरं लग्न होइल. घरचे सगळे त्याच्या पाठी असतात, लग्न कराव म्हणुन. त्याच एक मुलीशी अफेयर असत, पण ह्या भविष्याच्या भीतीने ते लग्न करु धजत नसतात. मग तो एक शक्कल काढतो आणि एका गावातल्या गरीब मुलीशी ( दिप्ती नवल) लग्न करतो. त्याच त्याच्या प्रेयसीशी अफेयर जोरात सुरु असत. हे लग्न करुन दिप्तीला दिवस जातात. तिच्या पोटात दुखायला लागते. मधल्या काळात, ती प्रेयसी च मन तिला खात असत कारण ती प्रेग्नंट असते. ती आत्माहत्या करते आणि इकडे दिप्ती सुखरुप बाळंत होते. म्हणजे रुढ अर्थाने त्याची पहिली पत्नी बाळासहित मरतेच. म्हणजे भविष्य खरं होतं.

अजुन इंग्रजी सीनेमे.... "नाइट ऑफ द लीव्हींग डेड", बफी द व्हांपायर स्लायर, बड द चड, स्पीशीज

फॉस्टर बाईंचा अजुन एक चित्रपट ( थोडे अवांतर) "द अ‍ॅक्युज्ड". ह्यात बलात्काराच द्रुष्य फारच अंगावर येणारं दाखवलं आहे. अगदी कीळस येते. हिचकॉक चा "सायको".... (कोणी लिहिलं आहे का आधी?)

विनोद खन्नाचा "अचानक". गुलजारचा सीनेमा. एक आर्मी ऑफीसर बायकोच्या प्रतारणे मुळे तिचा खुन करतो. नंतर पोलीसांपासुन पळण्याचा प्रवास खुप सुरेख दाखवला आहे.

विनोद खन्ना शबानाचा "शक" ह्यात एका द्रुष्या पुरतं आपल्या व.पु.काळ्यांनी काम केलं आहे. रादर त्यांचाच खुन होतो असे दाखवले आहे. त्याचा आळ विनोद खन्ना वर येतो. नक्की स्टोरी आता आठवत नाही. पण अरुणा+विकास चा चित्रपट. खुप छान होता.

पुर्नजन्मावर एक सीनेमा "कुदरत" ह्यात हेमा मालिनी, राजेश खन्ना, राजकुमार, विनोद खन्ना, प्रियाराजवंश... असे तगडे लोक होते. पटकथा खुप चांगली. गाणी अप्रतिम. खास करुन "हमे तुमसे प्यार कितना" हे किशोर आणि परवीन सुलताना ह्यांनी गायलेलं (स्वतंत्रपणे), तसच लताच "तुने ओ रंगीले कैसा जादु किया" हे गीत.

राजकुमारचा "हमराज", त्याचाच "लाल पथ्थ्रर" दोन्हीत खुप चांगली गाणी होती. दोन्हीत खुन, स्स्पेन्स, असा मसाला होता. हमराज मधले त्याचे पांढरे बुट सस्पेन्स वाढवतात.

द ट्रेन... इम्रान हाश्मी.. http://www.youtube.com/watch?v=5S2dP6AmNnU हा कधी येऊन गेला?

हा त्याचा वरिजनल मुवी.. http://en.wikipedia.org/wiki/Derailed_(2005_film) Proud

अनंत महादेवन प्रत्येक सस्पेन्स षिणेमात संशयित असतो.. पण शेवटी तो निरुपद्रवी प्राणी असल्याचे समजते. Proud

कानून.. राजेंद्र कुमार, अशोक कुमार http://www.youtube.com/watch?v=pvtbwcjFDuw&feature=watch-now-button&wide=1

सगळे जुने सस्पेन्स पिक्चर बी आर चोप्रा फिल्मच्याच नावाने आहेत का? धुंद, वर लिहिलेला इत्तेफाक, कानून....

पारध - लागू, नूतनचा सिनेमा - कोणी सांगू शकेल आंतरजालावर कोठे मिळू शकेल? धन्यवाद! खूप पाहावासा वाटतोय - माझे दोन्ही आवडते कलाकार.

अमी

Pages