सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा वाचुन लगेच गहराई पाहिला. आवडला...शेवट नाही भावला तरीही छान होता, पुर्ण चित्रपटभर किळसवाणे चेहरे आणि थरकाप उडवणारे संगीत दोन्ही नव्हते बरं का...तरीही भीतीच वाटते.

भुतपटांचे ठरावीक हिरो असायचे पुर्वी...अनंत नाग, निकाह मधला हिरो...***पराशर, धिरज कुमार, वगैरे.

अनंत नाग त्याच्या डोळ्यां मुळे असेल. बाकी पंकज पराशर आणि धीरज कुमार तसच विजयेंद्र घाटगे हे लोक मेन सीनेमातिल टाकाउ मग त्यांच्या पोटापाण्याची सोय नको?

कालच एच बी ओ वर "बरीड" म्हणुन सीनेमा पाहिला. एकच पात्र पण पटकथा फार सुंदर फुलवली आहे. मागच्या आठवद्यात "फ्रोजन" पाहिला होता. तो पण असाच सॉलीड होता. तीन मित्र एका ट्रॉली वर अडकलेले असतात बर्फात. तो ट्रोली मार्ग वाईट हवामाना मुळे ७ दिवस बंद ठेवतात. हे लोक मधेच घुसुन गेलेले असतात. त्या मुळे कोणालाच माहित नसतात. नंतर बरच रामायण होत. काय सीनेमे होते दोन्ही!!! सुरेख.

गहराई ची सुरुवात अगदी रामूच्या फुंक १ शी मिळतीजुळती आहे.. मालक- दुखावलेला नोकर- मालकाच्या मुलीला काहीतरी होणं-शाळेत विचित्र वागणं-बडबडणं

ghost and the darkness>>>>

सुरेख. तसाच एक सॅवेज हार्वेस्ट. खरी घडलेली गोष्ट आहे. अफ्रिकेत रहाणारं एक ब्रीटीशं कुटुंब आणि त्याच्या वर सिंहांचा कळप हल्ला करतो. सगळी कडे दुष्काळ पडलेला असतो. ह्या मोठ्या प्राण्यांना खायला छोटे प्राणी उरतच नाहीत. मग ते माणसांवर हल्ला करु लागतात. ह्या कुटुंबा चा मोठा बंगला असतो. मग ते तिकडुन काय युक्ती करुन सुटले ते दाखवले आहे.

तसाच दुसरा सीनेमा "अलाईव्ह" एक फुट्बॉल टीम ला घेवुन जाणारं विमान अ‍ॅन्डीज पर्वत राजीत कोसळतं. मग त्यांचे दुर्दैवाचे दशावतार दाखवले आहेत. त्यांना शेवटी आपल्या सहकार्‍यांचं मास खायला लागतं. असे ७२ दिवस ते अडकुन पडतात. २४ पैकी फार थोडे बचावतात. अगदी पहाण्या सारखा आहे. हा सीनेमा ची मुळ कादंबरी आधी वाचली "७२ डेज" . त्या वर एक डॉक्युमेंट्री पण लागली होती हिस्ट्री चॅनल वर. त्यातिल मुळ वाचलेल्या लोकांच्या मुलाखती होत्या. खुपच सुरेख चित्रपट.

"असे ७२ दिवस ते अडकुन पडतात"

~ मी पाहिला आहे. याच पठडीतील आणखीन एक थ्रिलर म्हणजे "१२७ अवर्स". एरन राल्स्टन नावाच्या गुहा शोध भटकंतीचा नाद असलेल्या साहसी युवकाला झालेल्या एका अपघातावर (घळीत अडकणे) या सत्य घटनेवर आधारित डॅनी बॉयेलचा हा चित्रपट संवादाच्या दृष्टीने एका पानाच्या लांबीचाही नाही, पण अथपासून तिथंपर्यंत अक्षरशः खिळवून ठेवतो. दरडीमध्ये उजवा हात अडकला आहे आणि तो इतका घट्ट बसलाय की निघणे केवळ अशक्य. मदतीला माणूस तर राहू दे पण माशीही नाही. अशा अवस्थेत एरनने १२७ तास कसे काढले आणि आपली सुटका कशी करून घेतली याची जिद्दीची कहाणी म्हणजे '१२७ अवर्स".

जेम्स फ्रॅन्को या सध्या चांगले नाव मिळवित असलेल्या अभिनेत्याने मध्यवर्ती भूमिका अशी काही रंगविली आहे की, त्याची स्वतःचीत ती कहाणी वाटावी.

आरे जेसनला सगळे कसे विसरले, friday the 13th, texas chainsaw massacre, hills have eyes १,२,

the best of all : exorcism of emily rose

अजुन काही,

reck2
the descet १ २ ३ *
* : खुपच भिति वाटत राहते पाहताना.
The Sixth Sense
Frailty

बघितले नसतिल तर नक्कि बघा, descet १,२,३ रात्रि सोउन्ड मोठा करुन बघा, बघवत नाहि, भिति वाटते फार.

"१२७ अवर्स">>>

मी पाहिला आहे एका विमान प्रवासात. त्याच्या यातना बघताना अगदी नको नको होतं

अशोकदा, ..पण १२७ अवर्स काही प्रसंगात मला तितकासा पटलेला नाही. हात तुटल्यावर बधीर जरी झालेला असला तरी वेदना ज्याप्रकारे त्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला हव्या होत्या त्याप्रमाणे पोचत नाहीत. पूर्वार्ध मात्र पूर्ण पकड घेतो.
७० डेज चे मराठी भाषांतरीत पण कादंबरी आहे. रविंद्र गुर्जरांची ' ७० दिवस'
रॉक क्लायंबिंग विषयातील व्हर्टीकल लिमिट प्रमाणेच आणखी एक जरुर पहाण्याजोगा चित्रपट म्हणजे..'के टू- द अल्टीमेट हाय'.
धाग्याच्या विषयाला धरुन प्रतिसाद नाहीये त्याबद्दल.. सॉरी शक्तिमान!!

हेम....

"वेदना पोचत नाहीत."
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण स्वतःच्या डाव्या हाताने नेलकटरसाईझच्या पात्याने उजवा हात कापून घेणे आणि त्या वेदना सहन करणे.....हे कितपत प्रभावीपणे मांडणे गरजेचे होते, यावर खुद्द दिग्दर्शक डॅनी बॉयल आणि त्यांच्या टीमने मेडिकल एक्स्पर्ट टीमची मदत घेतली होती. घटना तर सत्य आणि मग हेही नक्की की हात कापून घेण्याची आणि त्यानंतरची एकूणच देहाची अवस्था यावर एरन रॅलस्टनसमवेत त्यांच्या बैठकी झाल्या होत्या. चित्रपटात जरी "ते" कटिंग दृष्य तीन मिनिटाचे असले तरी खुद्द एरन तीन दिवस कणाकणाच्या 'प्रगती' ने तो हात कापून घेत होता. एकाक्षणी तर त्यातून रक्त येण्याचेही थांबले कारण कापलेला भाग इतका बधीर झाला की केवळ मांसच उघडे झाले आणि सर्व हात अक्षरशः गोठला होता.

एरन मुलाखतीत सांगतो की (सी.एन.एन.वर झाली होती) हातापासून निखळून पडल्यावर मी तिथेच वाळून कोलमडून पडलो होतो बराच वेळ. सलग पाच दिवस आणि रात्री डोळ्याला डोळा लागला नसल्याने तुटक्या हातापेक्षाही शरीराला हव्याहव्या असणार्‍या झोपेसाठी मी आसुसलो होतो. पण एकदा का झोपलो की वर येण्याची शक्यता धूसरच होती कारण अंधार पडायला सुरुवात होत होती. त्यामुळे नव्या चेतनेने एरन उठला, जे काही जवळ होते त्याने थोटा भाग गुंडाळला आणि मग रस्त्याला लागला. इथे 'वेदना' अक्षरश: मेली होती, हेम. "मी सुटलो...." हा विजयोन्मादच इतका विलक्षण की त्याच्यापुढे त्या हाताचे त्याला काहीच वाटेनासे झाले. [त्याच्या आनंदीपणाचे हे निरीक्षण एमरी काऊंटीच्या शेरीफने [स्टीव्ह स्वॅन्क] नोंदविले आहे "या तरुणाच्या जगण्याच्या जिद्दीला सलाम करावा लागेल. कारण रेस्क्यू हेलिकॉप्टरने त्याला इस्पितळाच्या प्रांगणात आणले त्यावेळे एखाद्या मुलासारखा त्यातून उतरून तो थेट हॉस्पिटलच्या अ‍ॅक्सिडेन्ट वॉर्डमध्ये चालत गेला...."

अशा जिद्दीचे चित्रिकरण करताना दिग्दर्शक बॉएल याने जाणीवपूर्वक 'एरन' वेदनेने कळवळत आहे/असेल हे दाखविणे टाळले. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा तो 'वेदने'चा मुद्दा सकारण दुय्यम दाखविला गेला आहे.

अशोक पाटील

अशोक, खरंच खुप छान माहिती दिलीत . फार भडकपणा न आणता, सुरेख बनवला आहे हा सिनेमा. बघताना जड जातं, पण एकुणात छानच आहे.

@ हेम ~ ओके, जरूर बघा. मी असा एखाद्या 'सत्य' घटनेवर आधारित चित्रपट जेव्हा पाहतो अन् जर तो भावला, तर अगदी दुसर्‍या दिवसापासून मुळात ती घटना कुठे आणि कशी घडली याचा मागोवा घेत राहतो (ती एक सवयच जडली आहे मला, असे म्हटले तरी चालेल). काही अमेरिकन मित्रही आहेत ज्यांच्याशी ई-मेल्समधून या विषयावर वारंवार चर्चा घडतात, त्यांच्याकडूनही वेळोवेळी मौल्यवान माहिती मिळते. एरनच्या सीएनएन इंटरव्ह्यूबाबत मला तिथल्याच एका मित्राने मेलमधून लिंक दिली होती. अशी माहिती मिळाली की त्यामुळे चित्रपटात दिग्दर्शकाने अमुक एक फ्रेम अशी न घेता तशी का घेतली असेल याचा आडाखा बांधतो येतो. फार इंटरेस्टिंग वाटते ही सवय.

'अमेरिकन गॅन्गस्टर' हा डेन्झिल वॉशिंग्टन आणि रसेल क्रोवे अभिनित चित्रपट पाहिला नसल्यास जरूर पाहा (असल्यास पुन्हा पाहा) आणि ही देखील एक सत्य घटना होती, ज्यातील मुख्य आरोपीला अमेरिकन कोर्टाने तब्बल ७० वर्षाची सक्तमजुरी ठोठावली होती. इतक्या प्रदीर्घ शिक्षेमागील नेमके काय कारण असावे यासाठी मग मी त्या सत्यकथेच्या मागे लागलो आणि त्या पांढर्‍या 'ड्रग' चा काळा व्यवहार पाहून सुन्न झालो होतो.

@ मनिमाऊ ~ थॅन्क्स फॉर अप्रेसिएशन. १२७ अवर्सला भडक जरूर बनविता आले असते, पण बॉएलने तो मोह टाळला. त्या दोन मुलीना एरन त्या खोल गुहेतील डोहात पोहण्यास लावतो आणि त्याचा थरारक आनंद त्या दोघीही घेतात..... ही एकमेव 'काल्पनिक' घटना दिग्दर्शकाने चित्रपटाचा पुढील ताण कमी करण्यासाठी चित्रित केली, आणि तेही एरनच्या परवानगीनेच. मूळ घटना फक्त त्या दोघी त्याला भेटल्या आणि त्याने सहज एकप्रकारची मदत म्हणून तेवढ्या वेळेत सुरक्षित 'रॉक क्लायम्बिंग' कसे करावे याचे एकदोन धडे दिले आणि त्याना तिथेच सोडून तो पुढे गुहा शोधासाठी निघाला. बाकी सार्‍या घटना जशाच्या तशा.....अगदी नायकाला होत राहणारे भास.

मराठीत म्हटले जाते "कधीकधी सत्य हे कल्पितापेक्षा रोमांचकारी असते". याचाच अनुभव असे सुरेख चित्रपट पाहताना येतो.

अशोक पाटील

जामोप्या तुम्हाला हवं असलेलं सगळं एकाच सिनेमात - 'दस कहानियां' मधे आहे. सस्पेन्स, मर्डर, भुत, थ्रील. पुनर्जन्म तेवढा नाही.

काही काही कथा अगदी टंपड आहेत, पण काही काही फार आवडल्या. शबाना आझमींची द बेस्ट ! नाव विसरले.

शबाना आजमी- नसिरुद्दीन शहा.. कथा राईसप्लेट... ( दस कहानिया) .. मलादेखील ती कथा आवडली.

ती अमृता सिंगची कथाही आवडली होती. ती विहिरीत उडी टाकून जीव देते ती कथा, मुलीचे लग्न असते ...

हेम, तुम्ही विचारलेल्या दोन्ही पैकी पहिली सत्यजेत रे प्रेसेंट्स् मधील एक कथा होती. नाव मला वाटत "यक्ष".

The others - फारच आवडलेला भूतपट Happy मला भूतं वगैरे असलेले चित्रपट फार आवडत नाहीत्...रहस्यपट आवडतात, पण हा खूप छान होता.

The blair witch project

बाकी sixth sense वगैरेची इथे चर्चा झालीच आहे. The ghosts and the darkness (यात ghosts नाहीत) अफ्रिकेतल्या २ नरभक्षक सिंहांवरील हा चित्रपट माझा फारच आवडता आहे. सुंदर घेतलाय!

जुन्या हिंदींपैकी - एक कत्ल नावाचा संजीवकुमार चा फार मस्त चित्रपट आहे.

बाकी धुंद, खोज, खामोश, इत्तेफाक हे माझे पण आवडते चित्रपट!

गुप्त (काजोलचा) पण चांगला होता. जॉनी गद्दार - फारच आवडलेला! अतिशय मस्त हाताळणी आहे या चित्रपटाची. परवाच बघितलेला कहानी पण खूप आवडला.

ड्युएल (Duel) हा स्टीव्हन स्पीलबर्गचा एक अप्रतिम थरारपट आहे. इतक्या थोडक्या संवादात, इतक्या साध्या प्रसंगातून त्याने हा एक अफलातून सिनेमा बनवला आहे की एकदा तरी पहावाच.
कॅलिफोर्नियातील रखरखीत भागात कार चालवणार्‍या एका माणसाच्या मागे एक ट्रक लागतो. आणि मग जो काही उत्पात घडतो तो बघावाच.
स्पीलबर्गच्या सुरवातीच्या काळातला हा सिनेमा पण त्यातही तो आपली जादू दाखवून जातो.
ह्यात पात्र म्हणावे असे एकच, कारचा ड्रायवर. दुसरे पात्र म्हणायचे तर म्हणजे एक अक्राळविक्राळ दिसणारा ट्रक. बस्स!

आणखी एक जुना पिक्चर म्हणजे बी आर चोप्रांचा कानून. ह्यात एक खून होतो आणि खटला चालू असताना वकिल न्यायाधीशावरच तो खुनी असल्याचा आरोप करतो. विशेष म्हणजे ह्या चित्रपटात एकही गाणं नाही. कलाकार - अशोक कुमार, राजेन्द्र कुमार, नंदा, शशिकला.

१ एप्रिलपासून मुव्हीज नाऊ चॅनेलवर रात्री ११ वाजता थ्रिलर, हॉरर चित्रपट दाखवणार आहेत. इच्छुकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा Happy

रात्री ११ वाजता थ्रिलर, हॉरर चित्रपट दाखवणार आहेत. इच्छुकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा>>>

अरे वाह!!
तसहि घरी सर्वजण असल्याने रात्रीहि आस्वाद घेता येइल. नायतर मग एकट्याने आस्वादासोबत भितीहि येते तोंडीलावणे म्हणून. Happy

माफ करा पण १२७ अवर्स हा चित्रपट मीही पाहीला होता. आणि मलाही तितकासा काही आवडला नव्हता.
आणि वरच्या प्रतिसादात म्हटल्या त्याप्रमाणे हात कापताना त्याला होणार्‍या वेदना त्या कलाकाराला प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आल्या नाहीत. पटकथा अशीही चित्रपटाला नाहीच आहे. पण मध्ये दाखविलेले त्याच्या स्वप्नातील काही प्रसंगही खटकतात.

या अशाच सत्यघटनांवर डिस्कवरी च्यान्यलवर I Shouldn't Be Alive हा डॉक्युमेंटरी कार्यक्रम लागायचा. त्यात दाखवलेले प्रसंग वरील सिनेमापेक्षा कीतीतरी जिंवत वाटतात.

स्वप्ना_राज, एकही गाणं नसलेल्या सिनेमावरुण कहानी आठवला. डोक्याला चालना देणारा रहस्यपट आहे. आणि त्यातही एकपण गाणं नाही. Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages