सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थेटरात आला आहे.

पण रात्री 10 ला थेटर बंद करायचे आदेश असल्याने सगळ्या थेटरात 7.00 पीएम चा शो शेवटचा आहे. त्यामुळे रविवार किंवा सुट्टी घेण्याशिवाय गत्यंतर नाही

किंवा शनिवार दुपार

मी मधे अमिताभ, इम्रान हाश्मी, अन्नू कपूर यांचा एक मूव्ही बघितला. त्यात अमिताभ आणि त्याचे काही मित्र रिटायर्ड लॉयर, जज वगैरे असतात. ते सगळे जण एका घरात रहात असतात आणि रोज एक खेळ खेळत असतात. त्यामध्ये जुन्या केसेस परत लढून त्यावेळच्या judgement ला विरुध्द असा निर्णय सुनवतात. तिथे इम्रान हाश्मी येतो आणि हे सगळे हाच खेळ त्याच्याबरोबर खेळतात आणि त्याला त्याच्या बॉसच्या हत्या करण्याच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावतात. चेहरे नाव आहे बहुतेक मुव्हीच.

https://youtu.be/ZZl12CRfcgY

भुलभुलैया 2

जुडवा असतात , एक मरून भूत होते व दुसरी जगते
पण शेवटी कळते की मेलेली दुसरी असते व पहिली जिवंत असते

Proud

बिपाशा बसुचा अलोन
साऊथ मुव्ही चारूलता
अजून एक मोहन लाल मुव्ही गीतांजली

असे सेम प्लॉटवर भरपूर सिनेमे येऊन गेलेत. यु ट्यूबवर सगळे फ्री आहेत.

ह्यांनीही दोघींची नावे मंजुलिका अंजुलिका ठेवलीत

त्यापेक्षा एकीचे नाव भूल अन दुसरीचे भुलैय्या ठेवायचे होते.

Proud

फोन भूत मध्ये आजवरच्या हॉरर आणि इतर जॉनरच्या सिनेमातील टिपीकल दृश्ये, बॅकग्राऊंड म्यूजिक, गाणी इत्यादींची खिल्ली उडवायचा प्रयत्न केला आहे. कॅटरीना किंवा जॅकी ज्या दृश्यांमध्ये आहे ती दृश्ये जरा तरी सुसह्य आहेत. ईशान आणि सिद्धार्थ दोघेही आधीच्या दोघांशिवाय मनोरंजन करण्यास असमर्थ ठरतात.

Pages