सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोनी कोंकना सेन, शबाना आझमी, राहुल बोस चा मैन अव्हेन्यु स्ट्रीट असा काहीतरी नावाचा पिक्चर पाहीला आहे का>>मला त्याचा एंड झेपला नाही Sad

भूत - अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, रेखा - बर्‍यापैकी जमला होता पण शेवटी फरदीन खानला छताला टेकवून त्याची कॉमेडी केलीन. फरदीन खानचं आकारमान पहाता त्याला छतापर्यंत नेणारं भूत अति पॉवरफुल असलं पाहिजे. Proud

डायरी ऑफ अ‍ॅन फ्रॅन्क वरचा पिक्चर पाहिला होता नेट फ्लिक्स वर. शेवट माहित असूनही सिनेमा प्रचंड गुन्तवून ठेवतो , आणि शेवटी काय होणार याची उत्कंठा लागून रहाते. कोणत्याही प्रकारे हिंसेचे प्रदर्शन न घडताही सतत अता हे लोक पकडले जाणार की काय अशी भीती , ताण सतत प्रेक्षकांच्या मनावर रहातो.
मला स्वतःला तरी अतिशय थ्रिलर वाटला. सतत अता पुढच्या शॉट मधे काय घडणार, पकडले जाणार की काय सगळे अशी भीती वाटत होती.

कोणी फुंक पाहिला आहे का ? सुरुवात खुप चांगली पण शेवट गमतिदार.... त्याचा सेक्वेल फुंक २ पण आला होता. तो बघायची "हिंमत" झाली नाही.

राम गोपाल वर्माच्या सीनेमांच असच होतं. शेवटात फसतात.

त्या दिवशी भट्ट कंपनीचा 'राज' पाहिला. तद्दन फालतु.

कोणी रागीणी एम.एम.एस पाहिला आहे का? त्याचा काय रीपोर्ट ?

मी "कौन" थिएटरमध्ये पाहिला होता. मंगलाला..
जाम टरकले होते. घरी जाण्या अगोदर बालगंधर्व ब्रिजावर टेकले होते थोडावेळ शांत होईपर्यंत... थरथराट झालेला माझा.. Sad

Wrong Turn चे सगळे ठीक आहेत........पण 1st part जरा भीतीदायक वाटला.........
लहान असताना मराठींत एक जुना सिनेमा पहिला होता..... अजिंक्य देव वगेरे....आणि सुनेला त्रास देऊन मारतात वगेरे.... मग तीच भूत होत....
तेव्हा भीती वाटली होती

कोनी कोंकना सेन, शबाना आझमी, राहुल बोस चा मैन अव्हेन्यु स्ट्रीट असा काहीतरी नावाचा पिक्चर पाहीला आहे का>> थँक्स अनु. मला कोंकणाच्या या सिनेमाचं नाव अज्जिबात आठवत नव्हतं. आता हा शोधुन बघतेच. मागे अर्धवट पाहिल्यामुळे कळला नव्हता. हा स्प्लीट पर्सनॅलिटी किंवा तत्सम विषयावर आहे ना?

लेटेस्ट पाहिलेला भन्नाट सस्पेन्स मुवी - कहानी. आवडलाच.

दक्षे, 'कौन' बघताना माझीही तंतरली होती. जेव्हा उर्मीला दार लावुन वळते आणि मागुन दारातुन दोन हात अचानक येवुन तिला पकडतात तेव्हा मी इतकी दचकले कि हातात गच्च धरुन ठेवलेली बॅग (भीतीने) अचानक फेकुनच दिली गेली. बाजुच्या लोकांसाठी विनोदी प्रसंग होता तो.

जलजला ... झलझला... http://www.youtube.com/watch?v=G-_vRdONT5c

ममी रिटर्न, मेकॅनोज गोल्ड यांचा भारतीय अवतार.. शोधून शोधून दमलो..... शेवटी झेड ( म्हणजे अमेरिकन झी हो! ) टाकून स्पेलिंग केले. मग जमले.. Proud

कोनी कोंकना सेन, शबाना आझमी, राहुल बोस चा मैन अव्हेन्यु स्ट्रीट असा काहीतरी नावाचा पिक्चर पाहीला आहे का : चित्रपटाचे नाव '१५ पार्क अ‍ॅव्हेन्यू'

बिक्रम बेताल......... http://www.youtube.com/watch?v=hETXp5Gbv0Q&feature=relmfu जगातल्या कुठल्याच चांदोबात मिळणार नाही. पहाच. Proud

बिक्रम बेतालचा बिक्रम आणि सिंहासन बत्तीशीचा विक्रम एकच होता का? मधुनच ते सिंहासन आणि अप्सरा येतात आणि गाणे म्हणतात... सत्य और अहिंसा का तुम देना संदेश! Proud

हा मस्त धागा आहे. अजूनपर्यंत न आलेले आणि मला आवडलेले काही :
रोजमेरीज बेबी : http://www.imdb.com/title/tt0063522/
घोस्ट अ‍ॅन्ड डार्कनेस : http://www.imdb.com/title/tt0116409/
शटर आयलंड : http://www.imdb.com/title/tt1130884/
डार्क वॉटर : http://www.imdb.com/title/tt0382628/

डार्क वॉटरचा मूळ जपानी सिनेमा अधिक परिणामकारक आहे. सबंध सिनेमाभर एक भयाण उदास आणि भितीदायक छटा असते. मूळ जपानी अभिनेत्रींनी कमाल केली आहे. तो सिनेमा बघताना चांगलीच तंतरली होती. मूळ जपानी सिनेमा इथे मिळेल. http://www.youtube.com/watch?v=KlkL2zpb-Q0

अजून आठवतील तसे इथे टाकेन.

रविवारी रात्री " द हील्स हॅव आइज" पाहिला. एकदम भयानक. हॉरीबल. त्या रात्री झोपच नाही लागली. खुप अस्वस्थ वाटत होत. त्याचे अजुन २ पार्ट पण आहेत. माझी हिंमत नाही.

चित्रपटाचे नाव '१५ पार्क अ‍ॅव्हेन्यू'>>>>>>>>>>>>> धन्यवाद भरत Happy
आणखी एक हॉरर मुव्ही आजकाल टीव्हीवर दाखवत आहेत - द अनबॉर्न.>>यावर हिंदी मधे बॉबी देओल आनि मुग्धा गोडसे चा टुकार पिक्चर येऊन गेला.
इंग्लीश शटर वर सुदधा श्रेयस तळपदे चा हिंदी रीमेक येऊन गेला. तो ही अत्यंत बोर होता... Sad

द आय... याच विषयावर एक हिंदी सिनेमापण आला होता. सर्जरीनंतर तिला भविष्य वगैरे दिसत असते.

http://en.wikipedia.org/wiki/Naina नैना . उर्मिला मातोंडकर

मॅजिक रोबो ..............

http://www.youtube.com/watch?v=d_VDMGbAyXk

खून, मांत्रिक, बळी, आत्मा, भूत, अंगात आत्मा येणे, जादुची गाडी, जादूचा रोबो, जादु टोना, अदृश्य मनुष्य, जादूचा जीन, डबल रोल ... हे सगळे एकाच वेळी बघा. Proud

सीडस ओफ चंकी कोणी पाहील का ???
भिती नाही वाटत..फुल टाईमपास आहे ..ह्यावरुन मराठीत लक्श्याचा झपाटलेला होता..

Seeds of chuckyचा पहिला भाग Child`s Play, ज्यावरुन झपाटलेला घेतला आहे. त्यानंतर आला Bride of Chucky(२रा भाग).

मध्यंतरी Abandon नावाचा सत्यघटनेवर आधारीत असलेला सिनेमा पाहिला. एक मुलगी बॉयफ्रेण्डला ऑपरेशनसाठी होस्पिटलमध्ये घेऊन येते. Minor Operation असते. ती कॅन्टीनमध्ये कॉफी घेत बसते. तासाभराने रुममध्ये येते. तिथे बेडवर तो वाचत असलेले पुस्तक तिला मिळते. अजुन कदाचित वेळ लागणार असे वाटल्याने ती वॉर्डबाहेर थांबते. बराच वेळ जातो... अजुन किती वेळ लागणार म्हणुन ती काऊंटरवर चौकशीसाठे जाते. तिथे तीला सांगतात की अशा नावाचा कोणीही पेशंट येथे नाही. जो डॉक्टर ऑपरेशन करणार असतो, तो ही त्या दिवशी साप्ताहीक सुटीवर आहे असे कळते. मग ती शोधाशोध सुरु करते.... ही सुरुवात आहे...Not so great पण बघणेबल नक्कीच आहे.

"डंख" नावाचे मराठी नाटक फार पुर्वी पाहिलेले आठवते. तेंव्हातरी आवडले होते. पण फार काहिच आठवत नाही. मला वाटत त्यात अविनाश मसुरेकर होता.

Pages